आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या सामन्यात रन-रेटच्याबाबतीतला नियम इतका आत्यंतिक महत्वाचा असूनही दोन्ही संघांचं त्याचं ज्ञान इतकं तोकडं असावं याचंही आश्चर्य वाटलं ! >>>

३ बॉल्स वर ८ रन्स हवे होते .. पहिला बॉल हा वाया गेला .... दुसर्या बॉल वर राय्डु ने ६ रन्स केले .. आता ३ र्या बॉल वर २ रन्स ऐवजी १ रन घेतला अश्या वेळेला दोघांचे ही रनरेट सारखे झालेले. कारण त्यावेळेला दोन्ही टिम्स ने विशिष्ट ओवर्स मधे समान रन्स केलेले होते. म्हणजे दोघांचे रनरेट 0.076821 झालेले .. मॅच संपली नव्हती कारण १ रन अजुन जिंकायला हवा होता.. तेव्हा सल्लामसलत करुन असे ठरले की पुढच्या ४ थ्या बॉल वर जर चौकार अथवा षटकार लागला तरच मुंबई कॉलिफाय होईल कारण चौकार या षटकार मुळे रनरेट सरळ ४०० या ६०० ची सरासरी धरुन वाढेल .. अश्यावेळी मुंबई चे नेटरनरेट राजस्थान पेक्षा जास्त होईल. अगर १ रन या २ रन्स निघाले असते तर रनरेट बुस्ट झाला नसता.

रनरेट हा तुम्ही किती ओव्हर मधे किती रन्स केले आणि तुम्ही किती ओव्हर्स मधे किती रन्स दिले यावर अवलंबुन आहे Happy

Mumbai T20 ने रन्स केले = 2180 ते इतक्या षटकात 271.3आणि रन्स दिले = 2170 इतक्या षटकात = 273.3

तर

Rajasthan T20 ने रन्स केले = 2155 इतक्या षटकात 269.5 आणि रन्स दिले 2164 इतक्या षटकात =273.0

आता मुंबईचे रनरेट ०.०९५ आणि राजस्थान चा ०.०६० आहे.. जास्त फरक नाही

सामना टाय झालेला नव्हता. विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर १८९ झाल्या असत्या तर टाय म्हणता आले असते. १४.३ षटकात तेवढ्या धावा करणे हा 'आय पी एल' चा नियम नाही आहे, तो फक्त प्लेऑफला क्वॉलिफाय होण्याचा नियम होता. प्रॉब्लेम असा झाला की पुढच्या चेंडूवर एकच धाव घेतली असती तरी मुंबई सामना जिंकले असते. आता चेंडू व विकेट भरपूर शिल्लक असल्यामुळे नियमानुसार मुंबईला अजून फलंदाजी करू देणे मस्टच होते. त्यामुळे पुढचा चेंडू तर टाकावाच लागणार होता. पण त्यात एक गोची होती. नेमकी त्याच चेंडूवर मुंबईने फोर किंवा सिक्स मारली तर तो विनिंग शॉट असल्यामुळे त्याच्या पूर्ण धावा (चार किंवा सहा) ह्या स्कोअरमध्ये पकडाव्याच लागल्या असत्या (हेही नियमाप्रमाणे) आणि त्याद्वारे मुंबईचा रनरेट आर आर च्या पुढे गेला असता.

तेव्हा, १८९ धावा १४.३ षटकांत होईपर्यंत कोणाला हे समजले नव्हते असे नव्हे.

खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन म्हणून फॉकनरने वाईड बॉल टाकला नाही, टाकला असता तर आर आर क्वॉलिफाय झाले असते. सो, फुल मार्क्स रॉयल्सच्या खिलाडूवृत्तीलासुद्धा! Happy

टाकला असता तर आर आर क्वॉलिफाय झाले असते >>>>>> बेफी वाईड बॉल टाकला असता तरी क्वालिफाय झाले असते कारण तो बॉल ची नोंदणीच झाली नसती म्हणजे जिथे १ बॉल मधे २ रन्स हव्या होत्या आधीच्या नियमा नुसार तेच समिकरण पुढे गेले असते कारण ३नच बॉल टाकले गेले आणि रन्स जेवढे हवे होते ते झालेले Happy
म्हणुन त्याने वाईड बॉल टाकला नसेल

उदयन,

तुमचा प्रतिसाद नीट समजला नाही.

तुम्ही लिहिलेले वाक्य असे आहे:

>>>बेफी वाईड बॉल टाकला असता तरी क्वालिफाय झाले असते <<<

हे तुम्ही मुंबईबद्दलच लिहिले आहेत ना? मग तेच तर मीही म्हणतोय. (क्षमस्व, आधीच्या प्रतिसादात संघांच्या नावांची माझ्याकडून अदलाबदल झाली होती ते संपादीत केले - उदयन, आता माझा प्रतिसाद विचारात घ्यावात)

जर तुम्ही हे आर आर बद्दल लिहिले असलेत तर मला तसे वाटत नाही, इन फॅक्ट विवेक आणि वकार ह्यांच्या समालोचनातही हाच मुद्दा डिस्कस झाला. वाईड बॉल टाकून भले बॉलची एन्ट्री होत नसेल, पण एक धाव मिळत असल्यामुळे मुंबई जिंकली असती मात्र मुंबईला हवा तो रनरेट मिळवता आला नसता.

पण असा वाईड बॉल टाकणे हा रडीचा डाव ठरेल म्हणून वॉट्सन आणि फॉकनर ह्यांनी व्यवस्थित बॉल टाकायचा निर्णय घेतला.

वॉट्सनचा चेहरा पाहून कोणाला तरी आनंद झाल्याचे वर नोंदवलेले दिसले, मला मात्र वाईट वाटले. ही डिड व्हॉट ही कूड डू! Happy

नशीब त्याच्याबाजूने नव्हते काल!

गेम ऑफ अन्सर्टन्टी वगैरे ठीक आहे.

पण संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फ्लॉप गेलेल्या यूसूफ पठाण आणि कोरे अँडरसन ह्यांच्यामुळे त्यांचे त्यांचे संघ अनुक्रमे पहिल्या दोन स्थानात येणे व प्लेऑफला क्वॉलिफाय होणे हे करू शकावेत हे मनाला पटत नाही समहाऊ! Happy

हैदराबाद आणी केकेआर तूल्यबळ असतीलही, पण टूर्नामेंटच्या दृष्टिकोनातून राजस्थान आणि मुंबई ह्यापैकी राजस्थानने बराच सरस खेळ केलेला होता गेले दिड महिना! त्यामुळे एखाद्या क्षणामुळे, एखाद्या दिवसामुळे सगळे काही हिरावून घेतले जाणे हे आवडत नाही, अर्थात, हाच खेळ आहे हे मान्यच. Happy

उदयन.. |

अश्यावेळी मुंबई चे नेटरनरेट राजस्थान पेक्षा जास्त होईल. अगर १ रन या २ रन्स निघाले असते तर रनरेट बुस्ट झाला नसता.

.....

२ रन्स ते काढुच शकले नसते कारण १ धाव काढल्यावर चेंडु मृत झाला असता, कारण सामना जिंकला गेला. पण चौकार वा षटकार मारला तर चेंडु तोपर्यंत मृत होत नाही आणि
त्या धावा पण मोजाव्या लागतात.
मला आश्चर्य वाटले की क्रिकइन्फो वर हडलमध्ये म्हटले की तरेला चौकार माराय्ला ३ चेंडु आणि षटकार मारायला ४ चेंडु उपलब्ध होते पण ते खरे नाही कारण जर त्याने १४.४ वर धाव घेतली नसती तर फोकनरने १४.५ चेंडु खुप वाइड टाकुन RR ला क्वालिफाय केले असते.

--------------------------------------------------

बेफि..

इन फॅक्ट विवेक आणि वकार ह्यांच्या समालोचनातही हाच मुद्दा डिस्कस झाला. वाईड बॉल टाकून भले बॉलची एन्ट्री होत नसेल, पण एक धाव मिळत असल्यामुळे मुंबई जिंकली असती मात्र मुंबईला हवा तो रनरेट मिळवता आला नसता.

>>
नाही बेफि, बॉलची एन्ट्री झाली नसती तर १९० ला १४.३ नेच भागावे लागले असते म्हणजे मुम्बईचा NRR वाढला असता कारण चेंडु धरला नाही तर ते १४.३ वर २ धावा काढण्यसारखेच आहे.

...................................................................

सामन्याआधिचे गणित चुकीचे होते हा राजस्थान रॉयलचा क्लेम पण अगदी असत्य नाही कारण
जर १४. ३ वर १८९ धावा झाल्या असताना १४.४ वर चौकार चालला असता तर
१४.३ वर १८७ धावा झाल्या असत्या तर १४. ४ वर षटकार पण चालला असता.
म्हणजेच मुंबईला १४.४ ओव्हरस हे टारगेट होते पण अर्थात ही पाळी येउ देणे ही राजस्थानचीच चुक होय.

मुंबई ची गोष्ट करतोय बेफी

वाईड बॉल ने आधीचेच समिकरण जुळणार होते.. कारण तो बॉल वैधच नसता परंतु त्यावर निघणारे रन्स मात्र वैध असतात.. Happy रनरेट सहाजिकच त्य वाईड ने वाढणार होता कमी नाही होणार होता. तोच जर वैध बॉल वर वैध १ रन्स मिळाला असता तर रनरेट कमी झाला असता.

वाईड बॉल ने आधीचेच समिकरण जुळणार होते.. कारण तो बॉल वैधच नसता परंतु त्यावर निघणारे रन्स मात्र वैध असतात.. स्मित रनरेट सहाजिकच त्य वाईड ने वाढणार होता कमी नाही होणार होता. तोच जर वैध बॉल वर वैध १ रन्स मिळाला असता तर रनरेट कमी झाला असता.<<<

मला जे समजले ते असे की बॉल वैध नसला तरी रन मिळाल्यामुळे मुंबई सामना जिंकले असते मात्र त्या वैध एक रनने त्यांचा नेट रनरेट 'तितका' झाला नसता जितका त्यांना प्लेऑफला 'क्वॉलिफाय' व्हायला हवा होता.

हे अंडरस्टँडिंग चूक आहे का? तसे असल्यास माहीत नाही. Happy

त्या वैध एक रनने त्यांचा नेट रनरेट 'तितका' झाला नसता जितका त्यांना प्लेऑफला 'क्वॉलिफाय' व्हायला हवा होता. >>>
बेफी ..........
३ बॉल मधे क्वालिफाय व्हायला ८ रन्स हव्या होत्या जर तिन बॉल्स मधे ७ रन्स निघाल्या आणि पुढ्चा बॉल जर वाईड पडला तर ३ बॉल्स मधे ८ रन्स झाल्यात की Happy मुंबई आपसुकच क्वालिफाय झाली कारण जितके रन्स हवे होते तितके रन्स तितक्याच बॉल मधे निघाले Happy

क्वालिफाईंगच्या नियमाच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. पण माझा मुद्दा तो नसून दोन्ही संघ त्यांच्यासाठी त्या दिवशीं आत्यंतिक महत्वाच्या असणार्‍या त्या नियमाबद्दल अनभिज्ञ असणं हा आहे ! रायुडू बाद झाला तेंव्हां तो सामना हरलो म्हणून ढसा ढसा रडत होता, रोहितने त्याच कारणाने चेहरा साफ टाकला होता व द्रविड सहकार्‍यांच्या गळ्यात हात टाकून नाचायलाही लागला होता; जर या नियमाची सखोल माहिती असती तर अशा टोंकाच्या प्रतिक्रिया आल्या असत्या का ? एवढा 'सपोर्ट स्टाफ' असूनही कप्तान, प्रशिक्षक, मेंटॉर व खेळाडूना हे बारकावे माहित नसणं आश्चर्यकारक नाही वाटत?

[ मला 'कबाबमें हड्डी' बनणं अजिबात नाही आवडत पण जें खटकलं त्याचा उल्लेख अशासाठी केला कीं वे.इंडिजमधे वाडेकरच्या संघाने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यांत एका कसोटीत त्या सिरीजसाठी ठरलेल्या 'फोलो-ऑन'च्या नियमाचं सोबर्सचं तोकडं ज्ञानही वे.इंडीजला खूपच महागात पडलं होतं !]

मला जे समजले ते असे की बॉल वैध नसला तरी रन मिळाल्यामुळे मुंबई सामना जिंकले असते मात्र त्या वैध एक रनने त्यांचा नेट रनरेट 'तितका' झाला नसता जितका त्यांना प्लेऑफला 'क्वॉलिफाय' व्हायला हवा होता. >>>

चूक.. अवैध बॉल वर वैध रन मिळाल्यामुळे त्यांना क्वालिफाय करायला जेवढे रन्स हवे होते तेव्हढे झाले असते आणि मुंबईच क्वालिफाय झाली असती...

पुढच्या शक्यते मध्ये राजस्थान क्वालिफाय झाले असते.. वैध बॉलवर एकच धाव निघणे किंवा एकही धाव न निघणे...

चूक.. अवैध बॉल वर वैध रन मिळाल्यामुळे त्यांना क्वालिफाय करायला जेवढे रन्स हवे होते तेव्हढे झाले असते आणि मुंबईच क्वालिफाय झाली असती... <<<

नाही सॉरी, मी हे म्हणत नाही आहे. क्षमस्व! माझा गोंधळ झाला आहे.

मला असे म्हणायचे आहे की मुंबई क्वॉलिफाय झाली नसती. हे कसे चूक ते कृपया कोणीतरी सांगा. हिंदी समालोचनात तरी मी जे म्हणत आहे तेच सांगण्यात आले होते.

रायडु का रडला .. याचे कारण त्याला वाटले की १ बॉल मधे २ रन्स हवे आणि आपण एकच रन काढु शकलो .. ही चुक टिम मॅनेजमेंट ची आहे ज्याने गणित चुकिचे केलेले.. जे नंतर अंपायर्स ने बरोबर केले. षटकांचा भागाकार केल्यावर त्यांना खरी सरासरी कळली Happy

तुम्ही लोक जे बोलत आहात त्यापैकी काहीही कसे काय हिंदी समालोचनांत सांगितले गेले नाही? Uhoh

हिंदी समालोचनात असे म्हंटले गेले की:

१. पुढच्या चेंडूवर ४ किंवा ६ मारल्यास मुंबई नुसतीच जिंकेल नव्हे तर क्वॉलिफाय होईल

२. पुढच्या चेंडूवर तीन किंवा कमी धावा निघाल्यास मुंबई क्वॉलिफाय होणार नाही.

३. पुढचा चेंडू वाईड टाकला तरी मुंबई सामना जिंकेल पण क्वॉलिफाय होणार नाही.

बेफी तुम्हाला जे म्हणायचे ते एकदा शांतपणे लिहा आणि नंतर १० वेळा वाचुन काढा मग पोस्ट करा.. तुम्ही संघाची नाव देखील बदलत आहेत Happy

रनरेट = एकुण धावसंख्या / षटके
१) रायडु ने जर १४.३ वर २ धावा काढल्या असत्या
मुम्बई १४.३ मध्ये १९०
मुंबई क्वालिफाय

२) १४.४ वाईड टाकला.
१४.४ चेंडु धरला गेला नाही
मुंबई १४.३ मध्ये १९०
मुंबई क्वालिफाय

म्हणुन १४.४ था फोकनरने वाईड टाकला नाही.
१४.५ वा नक्की टाकला असता.

१. पुढच्या चेंडूवर ४ किंवा ६ मारल्यास मुंबई नुसतीच जिंकेल नव्हे तर क्वॉलिफाय होईल

२. पुढच्या चेंडूवर तीन किंवा कमी धावा निघाल्यास मुंबई क्वॉलिफाय होणार नाही.

३. पुढचा चेंडू वाईड टाकला तरी मुंबई सामना जिंकेल पण क्वॉलिफाय होणार नाही.

१ ला आणि २ रा मुद्दा बरोबर .....

३ रा मुद्दा चुक... कारण वर दिलेले आहे ३ बॉल्स मधे ८ रन्स चे टारगेट आपसुक पुर्ण झाले असते

एक उदाहरण देतो जर मला ३६ च्या सरासरीने रन्स काढायचे असल्यास एक बॉल वर चौकार बसला तरी पुढच्या षटकात सरासरी रनरेट ३८ होईल कारण मी जिथे ६ रन्स हवे होते तिथे ४ रन्स केले म्हणजे २ रन कमी .. ते पुढच्या षटकात अ‍ॅड होणार Happy

बेफ़िकीर | 25 May, 2014 - 23:55

निलिमा,

मुंबईने १८९ धावा केल्या तेव्हा किती चेंडूत केलेल्या होत्या?

>>
१४.३ षटकात..

पण पुढचा चेंडु जर वाईड असता तरी षटके १४.३ नच राहिली असती (कारण वाईड बॉल मोजला जात नाही)

हिंदी कॉमेंट्री कोण करत होता........... सिध्दु होता का .....ओये गुरु.... चक दे फड्डे व्यक्तिरिक्त त्याला गणिती ज्ञान शुन्य आहे... पुढच्या वेळेला हिंदी कॉमेंट्री फक्त ऐका.....त्यावर विचार करु नका Biggrin

अरेच्या? माझा असा गोंधळ का होत आहे? हिंदी कमेंट्री ऐकत असताना आणि मॅच पाहात असताना एक गोष्ट अतिशय स्पष्ट झालेली होती, ती म्हणजे रायूडूने एक धाव काढणे ह्याचा अर्थ मुंबई क्वॉलिफाय न होणे! मी असे समजत होतो की रायडूने एक धाव काढली तेव्हा स्कोअर १८९ झाला व तो १४.३ षटकात झाला. म्हणजेच, क्वॉलिफाय होण्यासाठी असलेल्या चेंडूंची मर्यादा संपली. त्यानंतर फक्त औपचारीकता म्हणून मॅच जिंकण्यासाठी चेंडू टाकणे उरलेले असणार. मग पुढच्या चेंडूवर पुन्हा 'असे झाले तर मुंबई अजूनही क्वॉलिफाय होईल' हा मुद्दा आला कसा आणि कुठून? Happy

१४.३ षटकात..

पण पुढचा चेंडु जर वाईड असता तरी षटके १४.३ नच राहिली असती (कारण वाईड बॉल मोजला जात नाही)<<<

माझी शंका ही आहे की १४.३ षटकांमध्ये १९० करता आल्या नाहीत म्हंटल्यावर आपोआपच मुंबईचे क्वॉलिफाय होण्याचे चान्सेस संपत नाहीत का? १४.४ वा बॉल फार तर मुंबईला मॅच जिंकून देऊ शकेल, पण त्याद्वारे मुंबई क्वॉलिफाय कशी होईल?

क्वॉलिफाय होण्यासाठी असलेल्या चेंडूंची मर्यादा संपली >>>>>>> बरोबर .. आहे परंतु त्या वेळेला मॅच संपली नव्हती आणि राजस्थान आणि मुंबई एकाच रनरेट वर उभे होते .. अश्यावेळी पुढचा चेंडु जर १ रन निघाला असता तर राजस्थान चा रनरेट वाढला असता आणि मुंबईचा कमी कारण एका चेंडु वर एकच धाव.. परंतु पुढच्या चेंडु वर ६०० च्या सरासरीने रन्स निघाले त्यामुळे राजस्थान निर्धारीत षटकात आवश्यकतेपेक्षा जास्त धावा दिल्या .. आणि त्यांचा रनरेट कमी झाआळाआ

१४.४ वा बॉल फार तर मुंबईला मॅच जिंकून देऊ शकेल, पण त्याद्वारे मुंबई क्वॉलिफाय कशी होईल?
>>
बरोबर १४.३ च्या पुढचा बॉल वाईड असता तर तो १४.४ म्हणुन मोजलाच गेला नसता.म्हणजेच १४.४ बॉल पडलाच नसता आणि धावसंख्या १९० झाली असती.

बेफी ते हिंदी समालोचकच चुकीचे बोलत होते ते प्रमाण मानू नका.

वाईड टाकून काहीही फायदा नव्हता कारण तो बॉल काऊंट होत नसल्याने अल्टीमेटली १४.३ षटकात १९० हेच टारगेट अचीव होणार होते.

पुढच्या चेंडूवर देखील बाऊंडरी मारून जिंकू शकत होते हे मला आधीच ठाऊक होते, उलट म्हणून रायडूने दुसर्‍या रनच्या नादात बाद होण्याऐवजी जर एक रनच मिळणार असेल तर तो इज्जतमध्ये घेऊन बाऊंडरी मारायचा चान्स नवीन बॅटसमनला देण्याऐवजी अँडरसनला द्यावे असे मला वाटत होते.

अर्थात हा जो नियम मला माहीत होता तो राजस्थानच्या गोटात कसा माहीत नव्हता याचे आश्चर्य कारण त्यांना लगेच खूश होऊन नाचताना बघून मी चकीत झालो.

कदाचित आणखी एक बोल फुकट जाऊन त्याच्या पुढच्या बॉलवर षटकार मारला असता म्हणजे १४.५ मध्ये १९५ तरी कदाचित चान्स असावा. नॉट शुअर ते कॅलक्युलेशन करावे लागेल. मात्र त्या केस मध्ये वाईड टाकून १४.४ मध्ये १९० करणे राजस्थानला शक्य होते. पण या केस मध्ये नाही.

ओह ओके, तर म्हणून फॉकनरने १४.४ हा चेंडू वाईड टाकला नाही. समजले मला. पण तो चेंडू कसाही टाकला आणि त्यावर कितीही धागा निघाल्या तरी १४.३ ची मर्यादा संपली आहे म्हंटल्यावर पुन्हा क्वॉलिफाय होण्याचा प्रश्न का आला हे अजून नाही लक्षात आलेले. Sad

१८९ धावा १४.३ षटकांत करणे आणि १९५ धावा १४.४ षटकांत करणे ह्यामध्ये नेट रन रेट हा महत्त्वाचा मुद्दा येतो.. आणि तो मुंबईचा राजस्थान पेक्षा जास्त असल्याने ते क्वालिफाय झाले..

Pages