आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुर्रे............... जिंकले ... कोलकता करबो लडबो जितबो.....सलग ६ मॅचेस जिंकले ..
१९५ रन्स संघात कोणी ही डिव्हिलिअर्स . मॅक्सी सारखा बीग हिटर नसताना केले.. रॉबिन उथ्थप्पा जबरदस्त फॉर्मात

दोन्ही कॅप्स कोलकता कडे...... ऑरेंज कॅप उथ्थप्पा आणि पर्पल कॅप नरेन ....

एकाच ओव्हर मधे भागिदारी तोडुन नरेन ने मॅच जिंकवली आधी तडकरे - कोहलीची एकाच ओव्हर मधे विकेट घेउन ८६ रन्स ची भागिदारी तोडली नंतर ऐन मौक्याला डिव्हिलिअर्स - युवराज ची दोघांची विकेट एकाच ओव्हर मधे घेउन सामन्याला कलाटणी दिली .. अन्यथा शेवटपर्यंत एक जरी टिकला असता तर डेन स्टेन सारखा धुतला असता

<< << फक्त त्या नारायणला सांभाळोन ..>> १६ तारखेपासून सगळेच नारायण फॉर्म गमावून बसलेत >> सुनील 'नरैन'ला आपण 'नारायण' केला पण 'नरैन'चा 'नरेंद्र' पण होऊं शकतो हें लक्षांतच नाही आलं आपल्या !! ४-२०-४ !!! Wink
अभिनंदन केकेआर, उदयन व इथले सर्व केकेआर चाहते !

कोटी भारी हा भाऊ ..
बाकी माझे भाकीतही खरे...
और इस तरह से बेंगलोर के साथ मुंबई भी बाऊंडरी से बाहर ...

पहिल्या ज्या चार टीम्स आहेत त्याच आता प्ले ऑफ्स खेळणार.. फक्त क्रम पुढे मागे होऊ शकेल.. तो सुद्धा २ , ३, ४ मध्येच.. कारण ह्या चारही टीम्स चे नेट रन रेट पॉझिटीव्ह आहेत.. त्यामुळे हैद्राबाद किंवा मुंबई जर एकतर्फी मोठ्या धावसंख्येने जिंकले तरच पुढे जाऊ शकतात.. आणि हे सगळं कधी तर राजस्थान त्यांच्या दोन्ही मॅचेस हारले तरच..

नाही तीन फिक्स आहेत. तू दिलेल्या सिनॅरिओ राजस्थान सर्व मॅच (दोन्ही) हारले आणि (किंवा नाही) हैद्राबाद किंवा मुंबई सर्व जिंकले तरच राजस्थान बाहेर जाईल.

प्ले ऑफ मध्ये पंजाब विरुद्ध चेन्नई मॅच व्हावी आणि चेन्नई हारावी.

कांहीं तुरळक अपवाद असले तरीही, दुसर्‍यांच्या हरण्यावर आपण स्पर्धेत टीकण्याची ज्या संघांवर पाळी येते, तेंव्हा अशा संघांचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. दुसरं, कालचा सामना पाहिल्यावर फॉर्मच्या जोरावर दोन्ही सामने जिंकण्याची शक्यता मुंबईपेक्षां हैदराबादच्या बाबतींत अधिक वाटते ! तिसरं, शेवटीं जोरदार मुसंडी मारणारा केकेआरचा संघ पहिल्या दोन स्थानांवर स्थिरावलेल्या पंजाब व चेन्नईला हुलकावणी देवून चँपियन होण्याची शक्यता दाट आहे !
[ या सर्वाला आधार ? फक्त माझा आंतला आवाज, ज्यामुळे आतांपर्यंत मीं अनेकदां थप्पड खाल्लेली आहेच ! Wink ]

शेवटीं जोरदार मुसंडी मारणारा केकेआरचा संघ पहिल्या दोन स्थानांवर स्थिरावलेल्या पंजाब व चेन्नईला हुलकावणी देवून चँपियन होण्याची शक्यता दाट आहे ! >>> जियो भाउ जियो ........ Happy आपल्याल्या ५ किलो साखर फ्री.. Happy

तिसरं, शेवटीं जोरदार मुसंडी मारणारा केकेआरचा संघ पहिल्या दोन स्थानांवर स्थिरावलेल्या पंजाब व चेन्नईला हुलकावणी देवून चँपियन होण्याची शक्यता दाट आहे !
>>>>>>>
याची नक्कीच दाट शक्यता आहे,
खास करून कलकत्याने चेन्नईला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावल्यास ब्राईट चान्सेस.
त्यांची बॉलिंग नेहमीच त्यांची स्ट्रेंथ होती आणि आता फलंदाज सुद्धा चमकू लागलेत.
उथप्पा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्मला. गंभीर ला सूर गवसलाय, शाकीब आक्रमक खेळतोय, आणि हे ही काय कमी म्हणून युसुफ पठाण नावाचे ओझे जे ते बाळगत होते तो सुद्धा गेले काही सामने पाहता अचानक खेळून जाईल असे वाटतेय.

२०-२० मध्ये एखाद दुसरा फलंदाज १५०-२०० च्या स्ट्राईकरेटने स्फोटक खेळी करतो आणि सामना जिंकवून देतो. आणि गंभीर नेहमी नारायणला त्याच्यासमोर आणून त्याला बाद करायला बघतो. आणि तो नारायण सुद्धा बहुतांश वेळा त्याचा विश्वास सार्थ ठरवतो, हेच खरे कलकत्याच्या यशाचे गमक आहे, कारण असा ट्रंप कार्ड हातात असल्याचा विश्वास नेहमीच गंभीरच्या देहबोलीमध्ये झळकताना दिसतो अ‍ॅण्ड बॉडी लँगवेज मॅटर्स ..

<< नारायणला त्याच्यासमोर आणून त्याला बाद करायला बघतो.>> स्थितप्रज्ञाची सर्व लक्षणं असलेला नरैन/ नारायण हा खरंच केकेआरच्या यशाची गुरुकिल्ली आहे ! काय होत्या कालच्याही त्याच्या चार विकेटस ! मानलं !!

उथप्पा मध्यंतरी वनवासात असताना टीव्हीवर त्याची एक दीर्घ मुलाखत ऐकली होती. तो क्रिकेटबाबत त्यावेळींही अतिशय 'कमिटेड' व मेहनत घेत असल्याचं जाणवलं होतं. ह्या आयपीएलच्या सुरवातीला त्याचं यष्टिरक्षण काळजी करण्यासारखंच वाटलं पण बहुधा 'मॅच प्रॅक्टिस'चा अभाव हें कारण असावं. अतां तो नि:संशय टॉप गिअरमधेच आहे !

एकंदरीतच, स्पीनर्स आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यात वरचढ होतायेत असं दिसतंय. पुधचे सामने रंगतदार होतील असं वाटतंय.

<< आपल्याल्या ५ किलो साखर फ्री.>> डॉक्टर म्हणतोय, 'ह्या वयात साखर सोडा , निदान कमी करा'; त्यांतच, निवडणूक निकालाचे लाडू झालेत. आतां ही साखर ? नको रे बाबा, सॉरी .. बाबू !! Wink

नारायन नारायन........ बहुतेक बँगलोर वाले जप करायला विसरले वाटते .. एकाच ओव्हर मधे दोन्ही वेळेला सेट बॅट्समन च्या विकेट्स काढणे . हॅट्स ऑफ ......

हेच कालच्या मॅच मधे अश्विन ला जमले नाही वॉर्नर आणि धवन दोघांनाही रोखने चेन्नई च्या स्पिनर्स ना मुश्किल जात होते

थांबा रे घाई करू नका. दर वर्षी IPL च्या शेवटी RCB ने संपूर्ण नांगी टाकणे, CSK मंदावणे होतच असते. पाठी जाऊन बघा बरं हवं तर. शेवटचे चार फूल फॉर्ममधे असणारे संघ असावेत एव्हढीच इच्छा

चला मुंबईने अजून एक टप्पा गाठलेला आहे.. पण च्यायला नेट रनरेट काही वाढवला नाहीच आजही.. चांगल्या सुरुवाती नंतर पोपट झाला पार... २००+ स्कोर हवा होता.. जो वेड्यासारखा खेळून होऊ शकला नाही..

आज राजस्थान जिंकले तर मुंबई आणि हैद्राबाद बाहेर.. पण जर राजस्थान हारले तर मात्र काहीही होउ शकते.. अर्थात राजस्थानने मुंबई बरोबरची अखेरची मॅच जिंकल्यास तेच पुढे जातील..

आज MI ने काही केले ते थक्क करून टाकणारे होते. आज राजस्थान हरले तर मजा येईल, एकदम दोन मॅचना खूप मह्त्व येईल.

<< आज MI ने काही केले ते थक्क करून टाकणारे होते. >> आज MI जे कांहीं केलें ,तें त्यानाच ठप्प करुन टाकणारे होते !

37 रन्स मधे 8 विकेट्स गेल्या मुंबईच्या
दिल्लीचे नशिब असते तर आज दिल्ली जिंकली असती आज देखील मुर्खपणा करून 5 नंबर वर डुमनी ला पाठवले आधी पाठवले असते तर 20 रन्स कमी पडले नसते

आता पंजाब विरुद्ध केकेआर मध्ये केकेआर सरस वाटतेय.
कारण ते गोलंदाजी + फलंदाजी दोहोंमध्ये सरस वाटून राहिलेत.
आणि त्यापेक्षा महत्वाचे विजयाचे मोमेंटम ...
आपले सारे पैसे आता कोरबो लोरबो वर ..

उद्या मुंबईला काय किती आपटायचीय कोणाकडे कन्फर्म आकडे आहेत का?

साधारण ४०-४५ धावांनी विजय, किंवा १४-१५ षटकात चेस असे असावे..

<< उद्या मुंबईला काय किती आपटायचीय कोणाकडे कन्फर्म आकडे आहेत का?>> निद्रीस्त 'पठाणी पॉवर' केकेआरसाठी जागी झाली तशीच 'पोलार्ड पॉवर' मुंबईसाठी आतां खडबडून उठली तरच मुंबईला कांही तरी आशा आहे; गेल्या दोन सामन्यात धांवगती वाढवायची चांगली संधी दवडल्याने, मुंबईला नशीबाला मात्र दोष देतां येणार नाही, हें नक्की ! [ अर्थात, साहेबांच्या संघाबद्दल असं लिहायला जीवावर येतंय, हेंही खरं !]

जर आज पहिली बॅटिंग मुंबईला मिळाली तर २०० हवेत म्हणजे राजस्थान चोक होईल आणि ५० एक धावांनी जिंकले तर सगळं आलबेल. Happy मुंबई जिंकावी असे वाटतेय.

चांगले खेळणारा संघ जिंकावा असे वाटते.

टूर्नामेंटच्या पहिल्या जवळपास साठ पासष्ट टक्के भागावर परदेशी खेळाडूंचेच वर्चस्व राहिले.

मॅक्सवेल
मिलर
बेली
ए बी डिव्हिलियर्स
फॉकनर
स्मिथ (आर आर चा)
स्मिथ (सी एस के चा)
वॉट्सन

इत्यादी!

गोलंदाजीत मात्र आपण आश्चर्यकारकरीत्या बरे खेळलो.

तांबे
भुवनेश्वर
अमित मिश्रा
चावला
मोहित कुमार

वगैरे!

त्यामुळेच युवराज, पठाण, उथप्पा, गंभीर ह्यांना गवसलेला सूर आनंददायी वाटत आहे.

Happy

डेन स्टेन ला बसत असलेला मार बघुन वाईट वाटते.. स्लॉग ओव्हर्स मधे त्याचा डिंडा झालेला आहे काही काही मॅचेस मधे तब्बल २४-२६-२८ असे रन्स निघत आहेत त्यातले ८०% फटके हे समोर लागत आहे.. फक्त २०% फटके हे यष्टीमागे लागत आहे त्यामुळे मारण्याच्या नादात स्टेन चा वेग मुळे रन्स निघाले असे देखील म्हणता येत नाही ..:(
यंदाच्या आयपीएल मोसमात त्याची धार कमी झाली . सुरुवात मॅक्सवेल ने केली शेवट काल पठाण ने केला .
जितके रन्स सुरुवातीच्या ओव्हर मधे त्याच्या निघत नाही त्याच्या कित्येक पटीने रन्स शेवटच्या ओव्हर्स मधे निघत आहे हे खचितच चांगली गोष्ट नाही आहे. आधी डेन स्टेन चे ओवर्स स्लॉग ओव्हर्स मधे बाकी असताना बॅट्स्मन विचार करत असे की याची ओव्हर सोडुन इतरांना झोडावे . आता उलट होतान दिसत आहे.. डेन स्टेन ची ओव्हर आहे ना .. मग घेउ कव्हर करुन . मॅक्सवेल ने स्लॉग ओवर ला २ वेळा लयलुट केली . डिव्हिलिअर्स ने तर मॅचच फिरवलेली त्याच्या ओव्हर मधे. धोनी ने देखील त्याच्या ओव्हर मधे २०-२४ रन्स काढलेले .. कालच्याच मॅच मधे पठान ने मॅच ची सरासरी त्याच्या एका ओव्हर मधे कव्हर केली आणि मॅच १५ ओव्हर च्या आतच संपवली ..४ ओव्हर मधे ४३ रन्स गेले.. एका मोसमाने त्याच्या कामगिरीवर प्रश्न उठवणे चुकिचे आहे पण या मोसमात १४ मॅचेस खेळला आहे ज्यात ४-५ मॅच सोडल्यास बाकी मॅचेस च्या स्लॉग ओवर मधे पुर्ण निष्प्रभ झालेला आहे त्याच्या बरोबरीने भुवनेश्वर कुमार ने चांगली सरासरी राखली आहे.
लवकरच डेन स्टेन खराब फॉर्म मधुन बाहेर येईल आणि परत आपले वर्चस्व प्रस्थापित करणार.. Happy

कट्टर आरआर फॅन असुनही असेच म्हणेन की प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांच्यावर शेवटच्या सामन्यावर अवलंबून रहायची वेळ येतीय याचा पूर्ण दोष आरआर थिंकटँक आणि कर्णधार म्हणून वॉटसनकडे जातो
They have done too much experiments at the worng stage of the tournament Sad
आता या सगळ्यातुन बोध घेउन आज आपला सर्वोत्तम संघ त्यांनी खेळवला पाहिजेल आणि नुसते प्लेयींग-११ मध्ये घेउन उपयोग नाही त्यांना मॅक्झिमम संधी दिली पाहिजेल कारण प्रश्न प्लेऑफमधल्या स्थानाचा आहे (तिथेही सामना चेन्नईशी असणार आहे)

माझ्या मते आजचा राजस्थानचा संघ (फलंदाजी क्रमवारीनुसार): वॉटसन, रहाणे, करुण नायर, सॅमसन, हॉज, स्मिथ, फॉल्कनर, भाटीया, अंकीत शर्मा, धवल कुलकर्णी, तांबे

हल्ला बोल राजस्थान Happy

उदयन.... का कुणास ठाऊक पण पिंच हिटर म्हणून फॉल्कनर फारसा चालणार नाही असे वाटते!

कालची पठाणची खेळी मात्र फुल्ल पैसावसूल होती (नशीब समोर इरफान नव्हता बॉलिंगला.... वाचला बिच्चारा!)

पण गंभीर फार रेस्टलेस होतो छोट्या छोट्या गोष्टींनी.... कर्णधारपदाला आवश्यक असणारा ठहराव त्याच्याकडे नक्कीच नाहीये!

स्टेनला मुळात आपला अ‍ॅटीट्यूड चेंज करने गरजेचे. वर्ल्ड्स बेस्ट फास्ट बॉलर मी माझ्या पेसनेच बीट करून विकेट काढणार, फलंदाजांची तारांबळ उडवणार हे कदाचित आफ्रिकेतल्या खेळपट्ट्यांवर शक्यही होईल मात्र इथे तो स्लॉग ओवर्समध्ये जुन्या चेंडूवर असाच धोपटला जाणार.

असो, आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे खूपच कठीण आहे. कारण मुंबईने जर चांगल्या खेळपट्टीवर २०० धावा मारल्या तर त्यावरच राजस्थानच्या तळापर्यंत पसरलेल्या फलंदाजीला १५०-१५५ पर्यंत रोखणे कठीण व्हावे. कदाचित त्यापेक्षा आधी तुम्ही काय ते मारा मग आम्ही ते १४-१५ ओवरमध्ये चेस करायला जमते का बघू अश्या डावपेचाने टॉस जिंकल्यावर पहिली गोलंदाजी स्विकारली जाईल.
जे काही डावपेच असतील त्याची सुरुवात मनाजोगती होण्यासाठी मुंबईचे टॉस जिंकणे आज खूप गरजेचे.
आज मुंबई जिंकली तर आयपीएलची रंगत फारच वाढणार आहे.

पण गंभीर फार रेस्टलेस होतो छोट्या छोट्या गोष्टींनी.... कर्णधारपदाला आवश्यक असणारा ठहराव त्याच्याकडे नक्कीच नाहीये!<<< अ‍ॅटिट्यूडही फार आहे त्याला! आता ज्या फॅनला बॉल साईन करून द्यायचा आहे तो हसून धन्यवाद म्हणत आहे तर त्याच्याकडे न बघताच त्याच्या हातात बॉल सरकवून पुढे जातो. अंपायरच्या निर्णयावर प्रचंड शिवीगाळ करत परत जायचे आणि जोरात बॅट फेकून द्यायची वगैरे! विराट कोहलीचीही वागणूक कप्तानपदास साजेशी वाटत नाही. Sad

पण गंभीर फार रेस्टलेस होतो छोट्या छोट्या गोष्टींनी.... कर्णधारपदाला आवश्यक असणारा ठहराव त्याच्याकडे नक्कीच नाहीये!
>
खरेय, खास करून साहजिकच त्याची तुलना आपल्याकडून कॅप्टन कूल धोनीशी केली जात असल्याने हे प्रकर्षाने जाणवते.
पण त्याची थिंकिंग कॅप नेहमीच ऑन असते. एकीकडे शिखर धवन, सेहवाग, शर्मा हे भारतीय खेळाडू ओके ओके किंवा मारून मुटकून बनवलेले कप्तान वाटत असताना गंभीरचे डावपेच नेहमीच भावतात. कलक्त्याच्या आजच्या यशात त्याच्या कप्तानीचा फार मोठा वाटा आहे.

Pages