आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीरजी, १४.३ षटकांत १८९ नव्हे तर १९० काढणं अत्यावश्यक होतं. कारण तितक्याच षटकांत विजय मिळवणं हाही निकष आहेच !

तरी नशीब काल पाऊस पडला नाही आणि डकवर्थ लुईस आला नाही, नाहीतर ते हिंदी समालोचक आणखी भंजाळले असते आणि इथेही बेफींच्या खात्यात चार-चौदा पोस्ट आणखी वाढल्या असत्या.

अवांतर - अश्यावेळी डकवर्थ लुईस फायद्याचा ठरतो मात्र चेसिंग टीमला. कारण रनरेट असाही जास्तच हवा असतो, पण टारगेट कमी आणि १० विकेट हातात असतात.

तुमचा अभिषेक | 26 May, 2014 - 00:17नवीन
अवांतर - अश्यावेळी डकवर्थ लुईस फायद्याचा ठरतो मात्र चेसिंग टीमला. कारण रनरेट असाही जास्तच हवा असतो, पण टारगेट कमी आणि १० विकेट हातात असतात.

>>

तुम्ही पाउस मध्यंतरात येणार असे गृहित धरत आहात. Happy
अफ्रिकेला १ चेंडुत २१ धावा वर्ल्ड्कप १९९२ व्हाइल चेसिंग असे टार्गेट मिळाले.
याच वर्ल्ड्कपमध्ये भारताची ४ षटके कमी झाली आणि टार्गेट फक्त १ धावेने तो सामना आपण २/३ धावांनीच हरलो.
विशेष म्हणजे हे २ ही सामने जिंकणारे संघ फायनल आणि सेमिफायनलला क्वालिफाय झाले.

...
आज जर आधिच पाउस पडला असता आणि मग राजस्थानने १० षटकात ९० धावा केल्या असत्या तर त्या मुंबैला ४.३ षटकात कराव्या लागल्या असत्या.

असामी ही गणित करणार्याची आणि ते खेळाडुंना समजावुन न सांगणार्याची चुक आहे ....... पुढचे ३ बॉल पैकी एका बॉल वर देखील ४-६ लागला असता तरी मुंबई क्वालिफाय केली असती .. पण त्या ३ बॉल मधे वाईड पडला असता तर राजस्थान आत गेली असती Happy

निलिमा,
अर्थातच मध्यंतरालाच पाऊस, सुरुवातीलाच पडला तर डकवर्थ लुईस येतच नाही.
तसेच तुम्ही जे आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे ते डकवर्थ लुईस नुसार नव्हते.

असो, माझा पॉईंट सांगतो
जर एखादा संघ २० ओवर मध्ये ८ च्या गतीने १६० मारतो, त्यानंतर पाऊस पडून ओवर कमी झाल्या तर समोरच्या संघाला १२ ओवरच उरल्या तर समजा त्यांना १० च्या गतीने १२० मारायला लावले. तर इथे हे समीकरण विजयासाठी बरोबर आहे कारण १० विकेट तुमच्या हातात असतात.
पण नंतर जेव्हा रनरेट काऊंट होतो तेव्हा फक्त रनरेटच बघितला जातो. म्हणजे तो संघ १२ ओवर मध्ये ११० मारून हरला तरी त्याचा रनरेट साधारण ९ असल्याने जास्त होतो. खरे तर इथे रनरेट डिफरन्स काढताना पहिल्या संघाची धावगती देखील १२ मध्ये १२० नुसार १० धरायला हवी पण ती २० मध्ये १६० नुसार ८ च धरली जाते. (हे मागे एका सामन्यात मी असे पाहिले होते)

जे आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे ते डकवर्थ लुईस नुसार नव्हते >>> ओये.. कि बोलु छु ..
डकवर्थ लुईस बद्दलच आफ्रिकेचे उदाहरण आहे जाँटी रोर्‍ड्स आणि हँन्सी क्रोनिये खेळत होते तेव्हा पाउस आला Happy

उदयन नाही,
तो नियम पण या डकवर्थ लुईसचाच असून त्याचे नावही हेच असेल तर माहीत नाही
मात्र तो नियम वेगळा होता,
अत्यंत गचाळ असल्या नियमात तेव्हा ज्या ओवर मेडन वा कमी धावा असलेल्या होत्या त्या कमी झाल्या होत्या. सध्याचा नियम लॉजिकली करेक्ट आहे ज्यात विजयाची संधी ज्याची त्याला तेवढीच राहते.

please remember last year champion league match Mumbai win in 13 over and qualified for semi and win final. .... history repeat now

तो आधी पासुन तोच आहे . मधे काही बदल केला असेल टी२० सारख्या खेळांसाठी तर त्याची माहीती नाही पण आधीपासुन डकवर्थ लुईसचाच नियम मान्य केलेला आहे

A new rule introduced for that World Cup meant the target was reduced only by the amount of runs we had scored in our least productive two overs with the bat. That meant they were left needing 21 runs from their final ball.

http://www.theguardian.com/sport/2009/mar/21/rain-saves-england-world-cup

>>>>>>>>

हा घे उदय, एका लेखातून शोधला तो रूल... वर जे मी मराठीत लिहिले तेच यात ईंग्लिशमध्ये आहे Wink
चल तुर्तास मी कल्टी..

जेव्हा मुंबईच्या १४.३ ओवर मध्ये १८९
धावा होत्या तेव्हा मुंबईचा नेट रणरेट ०.०७८०९९
होता आणि राजस्थानचा ०.०७६८२१ म्हणजेच
मुंबईचा रणरेट राजस्थान पेक्षा सरस होता.
आता मुंबईला गरज होती फक्त विजयाची पण
अधिकृत लक्ष्य १४.३ ओवरमध्ये पुर्ण न झाल्यामुळे
मुंबईला प्ले ऑफ मध्ये जान्यासाठी पुढच्या चेंडुत नेट
रणरेट जास्त ठेऊन विजय मिळवने आवश्यक होते..
चौथ्या चेंडुत मुंबईला नेट रणरेटसाठी २ धावा करणे
गरजेचे होते म्हणजेच १९१ धावा.
पण विजयासाठी फक्त एकच धाव
हवी होती त्यामुळे २ धावा धावुन काढने शक्य
नव्हते कारण एक धाव काढल्यानंतर मुंबई
जिंकली असती आणि दुसरी धाव काढु
शकली नसती. त्यासाठी मुंबईला चौकार
किंवा षटकार ठोकने आवश्यक होते,
यावेळेस जर चेंडु वाईड पडला असता तर मुंबईच्या १९०
धावा झाल्या असत्या आणि वाईड चेंडु
मोजल्या गेला नसता म्हणजेच १४.३ षटकातच मुंबई
जिंकली असती आणि प्ले ऑफ मध्ये गेली असती..
जर चौथा चेंडु खाली गेला असता किंवा विकेट
गेली असती तर १४.५ आणि १४.६ चेंडुत फक्त एक
चौकार ठोकला असता तर मुंबई प्ले ऑफ मध्ये
पोहचली असती.
जर तिन्ही चेंडु खाली गेले असते तर मुंबईला १५.१
षटकात षटकार ठोकने गरजेचे होते तेव्हा मुंबईचा रणरेट
०.०८०५१९
झाला असता आणि राजस्थानचा ०.०७४१६३,
तरीही मुंबई प्ले ऑफ मध्ये गेली असती.
असो मुंबईला याची गरज पडली नाही आणि १४.४
षटकातचं १९५ धावा ठोकत क्रिकेट
इतिहासातला सर्वात अशक्य विजय नोंदवला.

तो आधी पासुन तोच आहे . मधे काही बदल केला असेल टी२० सारख्या खेळांसाठी तर त्याची माहीती नाही पण आधीपासुन डकवर्थ लुईसचाच नियम मान्य केलेला आहे >> हे चुकीचे आहे उदयन. अभिषेक म्हणतोय ते बरोबर आहे. ९२ च्या वर्ल्ड कपमधला नियम अतिशय विचित्र होता ज्यात कमी धावा दिलेली षटके बाजूला करून त्याप्रमाणे धावा बदलल्या जात असत. वरचे निलिमाने दिलेले भारताविरुद्धचे उदाहरण त्याच वर्ल्ड कपमधल्या बहुधा कांगारूंच्या मॅचमधले होते. आफ्रिके च्या त्या सामन्यानंतर प्रचंड आरडाओरडा झाल्यावर डकवर्थ standard झाले. मधे कोणी तरी त्यातले लूपहोल्स भरून जयदेवन मेथड पण आणली होती जी नेमकी कमी षटकांच्या सामन्यामधे डकवर्थ मधे येणारी अ‍ॅनामोली बाजूला करत होती पण बथ्थड BCCI ने त्याला कधीच बॅक न केल्यामूळे बारगळली. इथे अधिक माहिती मिळेल.

http://www.rediff.com/cricket/report/duckworth-lewis-jayadevan-rain-rule...

प्रविण सुश्मा,
मी जी लिंक दिलेली होती त्याचेच भाषांतर केलेले दिसते आहे. धन्यवाद. केवळ आळशीपणापायी मी फक्त लिंक देऊन थांबलो.

भाउ, अहो भाउ!

अजून या ज्वलंत विषयावर एकहि व्यंगचित्र नाही?? चालणार नाही.
लिहायला लागू का मी आता? मी एकदा लिहिले की असामी त्याला चार चार प्रतिसाद देतात. म्हणजे मूळ लिहिणारा मी एक वेडा असेन (असेन का, वेडपटपणाचेच लिहीले होते) तर त्यावर चार प्रतिसाद देणार्‍याचे काय? हे असले इथे होण्यापूर्वी एक फक्कड व्यंगचित्र टाकून द्या. दोन तीन टाकलीत तरी फारच छान.

asaamee - thank you for the link you gave.

Jhakkee - आपण दिलेली लिंक अजून पाहिलेली नाही, ती तीच आहे का?

धन्यवाद

<< भाउ,.. अजून या ज्वलंत विषयावर एकहि व्यंगचित्र नाही?? चालणार नाही. >> झक्कीजी, माबोकरांकडून मला झोडपायचा तुमचा डाव मला कळतोय; पण शेवटचं षटक असलं व समोर मॅक्सवेल असला तरीही तुम्ही चेंडू हातात दिला कीं मीं गोलंदाजी करणारच -

ashpath_0.JPG

हा हा भाऊ पुन्हा एकादा भारी व्यंगचित्रे हा.. इथूनच कच्चा मसाला गोळा करता आणि फर्माईशीनुसार लागलीच सप्लाय करता हे विशेष.. Happy

बाकी आयपीएलच्या मोस्ट ग्लॅमरस टीम मुंबईने स्पर्धेची सुरुवात निराशाजनक केली असली तरी जोरदार मुसंडी मारत या धाग्याचा सुद्धा टीआरपी वाढवला आहे.
आता अंतिम इच्छा आहे की.. सॉरी इच्छा आहे की अंतिम सामन्यात शाहरुख विरुद्ध आमची मुंबई ... टू मोस्ट ग्लॅमरस टीम इन आयपीएल आमनेसामने यावेत .. काय माहौल असेल.. इमॅजिन करूनच बेभान व्हायला होतेय.. ..

भाऊ तुम्ही वर पोलार्ड ला शेवटची ओव्हर देण्याबद्दल म्हटले ते बहुधा मलिंगा गेल्यामूळे "मजबूरीका नाम" प्रकारातले आहे. बुमराह,अँडरसन नि पोलार्ड हे तिनच पर्याय होते, बुमराहने १९ वी टाकलेली. अँडरसन त्याच्या शैलीमुळे मार खाऊ शकतो तेंव्हा पेस वेरिएशन करू शकणार्‍या पोलार्डाचाच पर्याय उरला. मागच्या २-३ सामन्यापूर्वीपासून हे सुरू आहे.

खरे तर यापुढले तिन्ही सामने खुर्चीला खिळवून बसवण्या इतके अटीतटीचे होतील ही आशा आहे.
कदाचित नेहेमीचे खेळाडू (मॅक्स्वेल, नरिन, उथ्थप्पा, इ. ऐवजी) कुणितरी वेगळेच खेळाडू चमकून जातील.

<< पेस वेरिएशन करू शकणार्‍या पोलार्डाचाच पर्याय उरला.मागच्या २-३ सामन्यापूर्वीपासून हे सुरू आहे. >> असामीजी, हें खरं असलं तरीही शेवटच्या षटकासाठी तो पर्याय मला तरी घातक वाटतो, हेंही खरं.

[ आंतल्या गोटातली खबर आहे कीं अँडरसन मुंबईच्या कप्तानावर जाम उखडला आहे; रन-रेट्चं कारण पुढे करून त्याला शतकापासून व्यंचित करण्यात आलं पण तेंच कारण महत्वाचं असतानाही सिमन्सला मात्र शतक करायला देण्यात आलं ! त्याच्या मतें हा सरळ सरळ वर्णभेद आहे !!! Wink ]

पोलार्ड तसा काही भारी गोलंदाज नव्हताच आणि सध्या खूपच निरुपद्रवी वाटतोय. त्याचे ते सो कॉलड पेस वेरीएशन अगदीच पांचट आहे. तो गोलंदाजीला येताच मी किमान दहा रन मोजतो. सध्या मुंबईची हिच एक वीक लिंक दिसतेय, एक गोलंदाज कमी पडतोय.

Pages