आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांबे ची हॅट्रिक..........जबरदस्त बॉलिंग ............ केकेआर चा मुर्खपणा ....निव्वळ २ रन्स मधे ६ विकेट ......

१२१-० वरुन १२३-६ ते ही फक्त २ ओव्हर्स मधे.......... चु गिरी यार निव्वळ ...

साकिब आणि सूर्यकुमार परत आधीच्या मॅचची पुनरावृत्ती करु शकतील का? तेच दोघे होते टाय झालेल्या मॅच मध्ये..

जिंकलेली मॅच अक्षरशः हातातुन घालवली....... १७ बॉल्स मधे अवघ्या ९ रन्स काढुन यादव हातभार लावला..

६ विकेट्स जाउन सुध्दा जिंकण्याच्या स्थितीत होती मॅच ... Angry

तांबे ही सोन्याची खाण ठरतेय रॉयल्ससाठी !!
वॉटसनची जिगर व ३बळी यालाही सलाम !!
केकेआरचा आज आत्मविश्वासाच्या शिखरावरून अक्षरशः अपयशाच्या दरीत कडेलोट !

कसली सॉलिड बोलिंग आहे IPL मध्ये
शकिबल हसन ला कोलकत्या वाल्यांनी बांगलादेश ची आठवण करून दिली
८ बॉल मध्ये ६ विकेट

दर वर्षी प्रमाणे चेन्नई चे ओपनर्स जबरी फॉर्म मध्ये आहेत
सेहवाग ला चेन्नई च्या टीम मध्ये का नाही टाकत … इंडियन टीम ला त्याची गरज आहे

तांबे भारतीय T20 मधे असायला हरकत नसावी, कि त्याचे वय त्याच्या विरुद्ध जाईल ?

आज MI ने सूयाल ऐवजी एखादा भारतीय batsman नि हंक ऐवजी merchant de lange/hazelwood ला घ्यायला हवे होते का ?

बंगलोरविरुद्धही डंग गंडला ! पण मुंबई मात्र पराजयाच्या खाईतून वर उसळून येतेय, हेंही खरं ! १८६ हा
बंगलोरलाही टेंशन देणारा स्कोअर आहे !! त्यातच डि व्हिलीयर्सही दुखापतग्रस्त आहे . बघूं मूबईची विजयाची नवी घोडदौड सुरूं रहाते का .

गेल नी धुवायला घेतलय मुंबई च्या बॉलर्स ना.

स्टार्क आणी पोलार्ड क्रिकेट सोडून बॉक्सिंग का नाही जॉईन करत?

<< स्टार्क आणी पोलार्ड क्रिकेट सोडून बॉक्सिंग का नाही जॉईन करत?>> कारण - १] क्रिकेटएवढे पैसे आतां बॉक्सींगमधे मिळणं अशक्य व २] क्रिकेटच्या राड्यामधें नुसती बोलाचीच कढी व बोलाचाच भात असतो; बॉक्सींगमधे तेवढ्यावरच थांबतां नाही येत [ आणि हो, क्रिकेटमधे तसं नसतं तर स्टार्कची काय टाप होती म्हणा पोलार्डशीं पंगा घेण्याची !] Wink
बंगलोर- ११९-४ - एबी व कोहली बाद !!

हे रन अप मधे अर्धवट सोडून देण्याचे प्रकार झेपत नाहीत खरे. हे वेरिएशन का ?

स्टार्कने पोलार्ड च्या अंगावर बॉल मुद्दाम टाकला कि चुकून टाकला गेला ?

वाटलं तरी मुद्दाम टाकल्यासारखंच . >> मग तर अजूनच विचित्र आहे. What was he thinking exactly ?

<< What was he thinking exactly ?>> कदाचित असंही असेल -

aaaaaa.JPG

क्रिकेटच्या राड्यामधें नुसती बोलाचीच कढी व बोलाचाच भात असतो; बॉक्सींगमधे तेवढ्यावरच थांबतां नाही येत [ आणि हो, क्रिकेटमधे तसं नसतं तर स्टार्कची काय टाप होती म्हणा पोलार्डशीं पंगा घेण्याची !] - वाह भाऊ, IPL ज्वर आहे का हा? तुम्ही चौकार - षटकार मारल्याशिवाय एकही बॉल सोडत नाही Happy

हे रन अप मधे अर्धवट सोडून देण्याचे प्रकार झेपत नाहीत खरे. हे वेरिएशन का ? - क्रिकेट फलंदाजांना फार झुकतं माप देतं आणी गोलंदाजांना थोडा leeway हवा हे जरी खरं असलं, तरी काल जे रसेल ने केलं ते धोकादायक वाटतं, कारण त्यात कुणीतरी जायबंदी होऊ शकतं.

मुंबई जिंकून गुण -तक्त्यात हळूहळू वर सरकत्येय. चौथ्या जागेसाठी दोन 'मेंटॉर'मधे लढत होणार अशीं चिन्ह आहेत - सचिन वि. द्रविड ?

<< मागच्या मॅच मधुन शिकले बहुतेक केकेआर .... >> मागच्या मॅचमधून इतक्या प्राथमिक गोष्टी शिकायला काय नवशिके होते कीं काय ते सगळे मागच्या मॅचपर्यंत ! वॉटसन व तांबे यानाच मुख्यतः श्रेय नाही का जात मागच्या मॅचमधल्या केकेआरच्या वाईट कामगिरीचं !! Wink
पंजाब - २३१ ! चेन्नईची आज खरी परिक्षा !!!

<< मॅक्सवेल ठार वेडा आहे राव >> खरंय. आणि हॅम्लेटसारखी त्याच्या वेडालाही एक पद्धत आहे; व त्याला वेडाचे झटके नाही येत तो सदाचाच ठार वेडा असतो व बरोबरच्यानाही वेडा करतो उदा. आज मिलर ३८ चेंडुत ४७ व बेली १३ चेंडूत ४० !!! Wink

David Miller चा कॉमेंट भारी आहे "I don't really say much [in a partnership with Maxwell], he just says I'm going again and I just and watch"

त्याला वेडाचे झटके नाही येत तो सदाचाच ठार वेडा असतो >> Happy

टिपिकल धोनी: "Jadeja was our final throw of the die but when he fell, we decided to just play it out"

तेव्हा स्कोर होता ८८/४ (१०.५ ओव्हर्स). धोनी, ड्यु प्लेसिस आणी मन्हास यायचे होते. @१०.५ ओव्हर्स, पंजाब चा स्कोर होता ८६/२.

<< @१०.५ ओव्हर्स, पंजाब चा स्कोर होता ८६/२.>> याला दुसरी बाजू होती - १३+ च्या सरासरीने धांवा करताना विकेटस जावून डाव कोसळणे. धोनीने मॅक्सवेलची तोंड भरून स्तुति केल्यावरच आपल्याला लक्ष्य गांठणं अशक्य आहे हें दिसल्यावर 'रन-रेट' तरी खाली घसरूं नये म्हणून पुढचा खेळ प्लान केला होता , असं सांगताना हें विधान केलं. [ ' २३१ला १३१ सर्व बाद ने उत्तर देवून 'रन-रेट'वर जो परिणाम झाला असता तो भरून काढणं कठीण होतं', अशा आशयाचं त्याचं विधान होतं ]. अर्थात, सर जडेजांचं नांव पुढे करणं ही धोनीची संवयच आहे.

Pages