निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजरात, दिल्ली , झारखंड , राजस्थान बिजेपी क्लीन स्वीप दुसर्या कोणाला चांसच नाही !!

मावळ
APPA ALIAS SHRIRANG CHANDU BARNE Shivsena 138849
JAGTAP LAXMANBHAU PANDURANG Peasants And Workers Party of India 85507
NARWEKAR RAHUL SURESH Nationalist Congress Party 49164

इथेच खूप अवघड वाटत होते! पण घाटाखालच्यान्नी देखिल जोर धरलेला दिस्तोय

बेफिकिरांनी लिहिलेल्या चार कारणांशी सहमत. अजून एक अ‍ॅड करावेसे वाटते.

काँग्रेस काही करू शकणार नाही, रागा सारखा माणूस पंतप्रधान होण्याची भिती यामुळे बदल हवाच्च.
आप अजून अंड्यात आहेत, भाबडे आहेत देश चालवण्याची क्षमता नाही वगैरे... त्यामुळे बदलासाठी सध्या तरी भाजपपेक्षा बरा पर्याय नाही.

या भावनेतून भाजपचे सगळे मुद्दे पटत नसले तरी भाजपकडे कल झुकलेला असू शकतो,

नानबा : हेडर मधे अपडेट करण्यासाठी माहिती कोणत्या स्त्रोतातली निवडू ?
मला जर एखादी अधिकृत लिन्क सांगितलीत तर करू शकेन.
मी जे देत आहे ते ndtv.com वर पाहून देत आहे.

तब्बल ३० वर्षांनी भारत ह्या देशात एकाच पक्षाचे स्थिर सरकार येणार!

मतदारांचे अभिनंदन! मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी!

१०० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसची प्रथमच इतकी भयानक हार! तीन आकडी जागाही मिळू न शकण्याचे चान्सेस!

नरेंद्र मोदींनी राजकारणात व्यावसायिक शैलीने घोडदौड केली.

कल्याण- श्रीकांत शिंदे ७२०००नी आघाडीवर. >>>> चांगलं आहे.. परांजप्यांचं 'राजकारण' त्यांना भोवलं.. आणि कल्याण डोंबिवली मतदार संघ जातीला मत न देता पार्टीला देतो हे पुन्हा सिद्ध झालं !

अगदी अगदी पराग, मागे सगळीकडे काँग्रेस आलेली असतांना आम्ही इथे युतीला निवडून दिले आणि त्याच उमेदवाराने पक्ष बदलून आमचा विश्वासघात केला.

प्लिज सांगा ही पोस्ट चालत नसेल तर डिलिट करेन.

बेफि Lol

जर काही चांगले व्हायला हवे असेल तर खालील गोष्टी व्हायला हव्या आहेतः

सुप्रिया सुळे
विश्वजीत कदम
मुलायम सिंग
निलेश राणे

हे चौघे हारायला हवेत.

बेफि - सहमत,
पण सर्वांनी ही काळजी नक्की घ्या की येथल्या चर्चेला भलतेच वळण लागू नये.

मी अजुनही निकाल कळविणार्‍या संकेतस्थळाच्या शोधात आहे. Sad

तीन कलाकारांचा मागोवा घेतला....

१. विनोद खन्ना, गुरुदासपूर : ६० हजार मतांची आघाडी घेतली आहे.
२. हेमा मालिनी, मथुरा : ७० हजार मतांची आघाडी
३. शत्रुघ्न सिन्हा, पाटणा : ९ हजार मतांची आघाडी

तिघेही अर्थात भाजपचे उमेदवार आहेत.

BREAKING
Lok Sabha results: LK Advani congratulates Narendra Modi for BJP-led NDA's massive win

अविश्वसनीयः

उत्तर प्रदेश
बिहार
मध्यप्रदेश
राजस्थान
गुजरात
महाराष्ट्र

ह्या सहा राज्यात भाजपचे निर्विवाद बहुमत! काँग्रेस पूर्णतः नेस्तनाबूत!

Uhoh

Pages