निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रा गा आता आघाडीवर आहे. इतर ठिकाणीही दाखवत आहे. तो हारायला हवा, तर काँग्रेस मध्ये कोणीतरी चांगला लिडर पुढे येऊ शकेल.

शिवसेनेला दोन कॅबिनेट पदे मिळतील, सहा महिन्यांनी विधानसभेच इलेक्शन आहे शिवसेना २० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे शिवसेनेला वाटा दिला जाईल.

सध्याचा कल असाच्या असा (प्लस मायनस १०-१५ जागा) रिझल्ट मध्ये कन्व्हर्ट होईल की नंतरच्या फेर्‍यात उलट होऊ शकेल?

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सगळे मतदारसंघ दिसतच नाहियेत. आमच्या ऑफिसातल्या सगळ्यांना २७ मध्ये लई इंटरेस्ट आहे पण तो दिसतच नाहिये Uhoh

कसला गोंधळ आहे! निखिल वागळे सांगत होते की रागा तिसर्‍या क्रमांकावर गेलेत आणि बाजूला चौकटीत बातमी होती की स्मृती इराणी पिछाडीवर!

केदार,

एका चॅनेलवर सूत्रसंचालकाने एका काँग्रेस नेत्याला सॉलीड हाणले. तो नेता म्हणत होता की अमेठीत अनेक पॉकेट्स आहेत आणि अजून बर्‍याच ठिकाणची मतमोजणी व्हायची अहे अमेठीमधील! त्यामुळे राहुल गांधींचे काय होते हे बघण्यासाठी जरा प्रतीक्षा करा. त्यावर सूत्रसंचालक म्हणाला की तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या मतदारसंघात तुम्हाला प्रतीक्षा करावी लागत आहे ह्यावरूनच तुमची हालत समजत आहे.

थोडक्यात असे, की रागा जिंकले तरीही त्या जिंकण्याला काही अर्थ नाही हे काँग्रेसच्या इतर नेत्यांना आपोआपच मान्य होईल.

बेफी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तो हारला म्हणजे त्याच्यावर जबाबदारी पण टाकली जाईल, आत्ता काँग्रेसी लोक सारवासारव करत आहेत की तो जबाबदार नाही. ( म्हणजे मनमोहन सरकार जबाबदार आहे असा दुसरा अर्थ)

नक्की काय ते ठरवा. आधीच्या सरकारच्या कामगिरीवर मतदान झाले की प्रमुख नेत्यांच्या प्रचाराच्या आधारावर ? Light 1
बहुतेक पत्रकारांचे मत हे आहे की सुरुवातीला विकास प्रगती इ.ना धरून असलेला प्रचार नंतर वैयक्तिक पातळीवर उतरला. तू तू मैं मैं चालू होते. प्रचाराने आतापर्यंतची सगळ्यात खालची पातळी गाठली यावर सगळ्यांचेच एकमत आहे.

मुंबईत सर्व सहा जागांवर महायुती पुढे.
नाशिकमध्ये भुजबळ ४९००० मतांनी मागे.
पुणे अनिल शिरोळे ५२०००+ नी पुढे
रत्नागिरी विनायक राऊत ३३०००+ ने पुढे.

बेफिकीत मागच्या पानावर तुम्हीच लिहिलेले चार मुद्दे वाचा.<<<

होय, पण माझ्या (ते चार मुद्दे किंवा नंतरचे म्हणणे ह्यापैकी) कोणत्या विधानात विसंगती जाणवली?

Pages