निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

४०० जागांची स्थिती

भाजप आणि मित्रपक्ष - २१८ - ५४.५%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६९ - १७.२५%
तिसरी आघाडी - ११३ - २८.२५%

रा गा हारेल असे दिसतेय.

बिजेपी क्लिन स्विप. आत्ता वरून असे दिसतेय की त्यांना कुणाची गरज पडणार नाही.

नमो डिड इट !

४४४ जागांची स्थिती

भाजप आणि मित्रपक्ष - २४५ - ५५.१८%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६७ - १५.१%
तिसरी आघाडी - १३२ - २९.७%

हा धागा निकालांपुरताच मर्यादीत राहु द्या<<<

माफ करा अ‍ॅडमीन महोदय, हे समजले नाही. Happy

निकालांवर चर्चा अपेक्षित नाही आहे का येथे?

कृपया अ‍ॅडमिन यांची सुचना लक्षात घेऊन सर्वांनी (माझ्यासह) हा धागा निकालाच्या चर्चेपुरता मर्यादित ठेवावा ही विनंती.
अन्य वादविवाद, झगडे नकोत असे अ‍ॅडमिन यांना सुचवायचे आहे असे मी समजतो. धन्यवाद !

टाईम्स नाऊ वर अर्णब फारच गोंधळ घालतोय, त्यापेक्षा NDTV चांगले वाटतेय.

इस्ट आणि बंगाल मध्ये भाजपाची मुसंडी Happy

बेफिकीर, साती यांनी चालू केलेल्या धाग्यावर एक लिन्क आहे.

https://www.google.co.in/elections/ed/in/districts?utm_source=ob&utm_med...

या लिन्कमधे पिनकोड क्रमांक दिला तर त्या मतदारसंघाची माहिती मिळू शकेल.
मी त्यामधे चेक केले तेव्हा पुण्यात शिरोळे ५०% आणि कदम ३०% असे दाखवत होते.

मयेकरांनी दिलेल्या लिंकवर खूप क्लीअर माहिती मिळत आहे.

सुप्रिया सुळे आणि जानकर ह्यांच्यात फक्त ६५०० मतांचे मार्जिन आहे. सुळे आघाडीवर अर्थातच!

Pages