निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२००+ पाँईट गेन. निफ्टी ४०० पर्यंत

कोणा कोणाकडे फ्युचर लाँग आहे?

जर ३०० + झाले तर अप्पर सर्किट नक्की लागणार !

>>>> मोदीप्रकाशात लुंगेसुंगेही चमकून घेत आहेत. <<<<
लुन्गेसुन्गेच कशाला? म्या बी इलेक्शनला हुभारणार व्हतो...... पार्टीन सान्गितल की ब्याकस्टेजलाच काम कर म्हणुन न्हाय हुभारलो! Wink

मार्केट पाहिले तर उद्यापासून परत FDI / FII इनफ्लो सुरू होईल. कारण गेले काही महिने ही लोकं काठावर उभी होती आणि पोस्ट पोल प्रिडिक्शन नंतर मार्केट इतके वर गेले आहे की बास. खूपच + सेंटिमेंट आहे.

मजा येतेय बघायला.. कितीतरी वर्षांनी निवडणुक परिणामांची अशी मस्त चर्चा चाललीय आणि धडधडत्या हृदयांनी लोक पाहताहेत जिथे मिळतेय तिथे पाहताहेत. सेम हीच परिस्थिती १९७७ ला होती.. Happy

मुलायम सिंह हारले तर उत्तम होईल. ते 'लडके है, गलती हो जाती है' विधान अजूनही आठवले की असे वाटते ह्याला उभेच राहू द्यायला नको होते.

परिस्थिती गंभीर आहे सेन्सेक्सची... >> नाही रे असे होणारच होते. सेन्सेक्समुळे कळतेय की विकासाच्या नावावर वोटिंग झाले, हिंदूत्वावरच नाही. नाही तर इतका वर गेलाच नसता.

फक्त आता पहिल्या काही पॉलिसी डिसिजन मध्ये घोळ होऊ नयेत. अन अ‍ॅम शुअर मोदी ते करणार नाहीत. पहिल्या काही महिण्यातच चित्र दिसेल.

सेन्सेक्समुळे कळतेय की विकासाच्या नावावर वोटिंग झाले, हिंदूत्वावरच नाही. नाही तर इतका वर गेलाच नसता<<<

Don't agree with this. सेन्सेक्स सेंटिमेंट्सवर बदलत आहे. मोदी प्रशासन आल्यास ते व्यवसायासाठी उत्तम ठरेल व विकासाभिमुख ठरेल म्हणून नव्हे. Happy

नुसत्या + सेंटीमेंट्स वर सेन्सेक्स वर जातोय ते चांगलेच आहे..पण ते कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे.. तर त्याचा जास्त उपयोग होईल.

>>कितीतरी वर्षांनी निवडणुक परिणामांची अशी मस्त चर्चा चाललीय आणि धडधडत्या हृदयांनी लोक पाहताहेत जिथे मिळतेय तिथे पाहताहेत.
अगदी अगदी !!!!११!!

. मोदी प्रशासन आल्यास ते व्यवसायासाठी उत्तम ठरेल व विकासाभिमुख ठरेल म्हणून नव्हे. >>. व्यवसाय वाढला की एम्लॉयमेंट वाढते = प्रगती नाही का? हे सगळेच हातात हात घालून असतात ना.

.पण ते कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे >> सर्किट लागेल आता.

मी सर्व पोझिशन काढेन आणि आता शॉर्ट वर जाणार. म्हणजे ४०० ने तरी कमी होईल ह्या महिन्यात.

Pages