निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बेफी मी नेटवर बघतोय कारण देशात नाहीये.
मी पण देशात नसल्याने नेटाने नेटवर पहात आहे Happy
मतदान करू शकलो नाही याचे दु:ख आहे.

हे अदर्स महत्वाचे ठरतील असे टीव्हीवर काही जणांचे म्हणणे आहे >> नाही ठरणार.

काँग्रेस ममताला पंतप्रधाण करण्याच्या मार्गावर आहेत. पण २८०+ मिळाल्यामुळे ती वेळ येणार नाही असे वाटते.

एनडीएच्या बाजूने आतां दिसणार कल असाच राहिला तर निकालानंतरचा घृणास्पद ' घोडे बाजार' तरी आपल्याला पहावा लागणार नाही व एनडीएला परिणामकारक शासन न करण्याला सबबही रहाणार नाही !

बरीच बडी धेंडं पिछाडीवर असणं [ व हरणं] ह्याचं श्रेय नविन मतदाराना जात असावं व लोकाना गृहीत धरण्याच्या वृत्तीला ही सर्वात मोठी चपराक ठरावी !!

भाऊ नविन तर आहेच पण जास्त आहे लोकाना गृहीत धरण्याच्या वृत्तीला .

व्होट फॉर होप आणि व्होट फॉर प्रोगेस असे आहे.

मयेकरांच्या लिंकवर एकनाथ गायकवाड ट्रेलिंग दाखवतायत (तब्बल १६००० ने), आणि टीव्हीवर (सीएनएन आयबीन) वर राजदीप सरदेसाई सांगताहेत की एकनाथ गायकवाड लीडींग आहेत... असं कसं? हा काय प्रकार आहे?

भाजपला जर मित्रपक्षांची गरजच भासली नाही तर शिवसेनासारखे पक्ष आता काय करणार?

(नरेंद्र मोदींच्या मातु:श्री सूर्याला अर्घ्य देत आहेत. वाहिन्यांवरील लोक 'चहावाला पंतप्रधान झाला' असे म्हणून स्वतःच नवल व्यक्त करत आहेत).

Pages