आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता युवराज फॉर्ममधे आला म्हणून टीममधे येईल नि aus मधे world Cup साठी जाईल नि bouncy pitches वर flop होईल नि मग परत सगळे 'ये रे माझ्या मागल्या' सुरू.

धोनी ने तो किती भारी फिनिशर आहे हे आज परत एकदा दाखवून दिले.... खरच कॅप्टन कूल!
कुणास ठाउक मुद्दाम तसे करतो का तो. तशी सवय लावून घेतली तर एक दिवस तोंडघशी पडेल.
बिच्चारा राहुल शुक्ला - ३ ओव्हर्स मधे १५ नि शेवटच्या ओव्हरमधे धुतला.\
इंग्लंड सिरिजमधे सुद्धा जाईल ना युवराज आधी?

उदयन.. - देवाचे नशीब! उगाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलात तर तो कसलातरी वेगळाच अवतार घेऊन यायचा इथे!

युवीची कालची फलंदाजी त्याच्या पूर्वीच्या फॉर्मची झलक दाखवून गेली असली तरी त्याचे बहुतेक फटके जाग्यावर उभे राहूनच मारलेले होते ; जेंव्हा जेंव्हा पायांचा वापर केला तेंव्हा तेंव्हा तो गडबडला होता, असं प्रकर्षानं लक्षात येत होतं. ऑफ-स्टंपच्या बाहेर मारा करण्याऐवजीं विकेटवर मारा केला असता तर युवीला इतकी फटकेबाजी जमली नसती, असा माझ्या तुटपुंज्या ज्ञानाचा असाच आपला अंदाज. कुणाच्याही कोंबड्याने कां होईना, रॉयल्सचं काल उजाडलं, हें खरं !

<< "ये पैसा बोलता है... ये पैसा बोलता है" >> पैशांशीच समीकरण मांडलं तर युवीला उरलेल्या सर्व सामन्यांतही प्रत्येक षटकात तीन-चार षटकार मारले तरीही त्याच्यावर लागलेल्या बोलीची उंची गाठणं कठीण आहे !! Wink

Ojha on fire!!

म्हणजे ओझा पेटला आहे, की जळ्ळा मेला ओझा?!
बिच्चारा संदीप शर्मा! आता त्याला गल्ली क्रिकेटमधे पण कुणि घेणार नाहीत टीममधे!

२०५ हैद्राबाद... बॅटींग पिच आहे......... मॅक्सी आणि मिलर दोघांपैकी एक जण तरी शेवटपर्यंत उभा राहिला तर नक्कीच होतील ... स्टेन ला आणि भुवीला तेव्हढे सांभाळावे लागेल

सेहवाग सोडून सगळेच फॉर्मात !! >> येह बात कुछ हजम नहि हुयी भाउ. मागच्याच मॅचमधे ७० एक काढलेले त्याने, त्या आधी सुद्धा तो २०-३० र काढतोय बहुतेक मॅचमधे. त्यामूळे फॉर्मपेक्षा काहीतरी वेगळे नाहि जमत नाहिये असे वाटते.

"सेहवाग सोडून सगळेच फॉर्मात !!" - आज सुद्धा २०० चा स्ट्राईक रेट होता त्याचा. Wink

अर्थात मला सेहवाग आवडतो. कदाचित द्रविड, कुंबळे, तेंडुलकर, लक्ष्मण ई. काळाचा एक शेवटचा उरलेला धागा म्हणून असेल. असो. विषयांतर नको. बॅक टू आयपीएल २०१४.

आणि गंमत म्हणजे २००+ चेस मध्ये साहा आणि मननचा वाटा मॅक्सी-मिलरपेक्षा मोठा होता..... ओझा, व्होरा, साहा ही खरी इंडीयन प्रिमीअर लीग Happy

बेली पंजाबचा धोनी ठरतोय.... गुड फिनिशर Happy

आज मुंबई जिंकली तर मुंबई, बंगलोर, कोलकोता आणि हैद्राबाद असे चार संघ १० सामन्यातुन ०८ गुणांवर असतील..... तीव्र चुरस Happy

<< सेहवाग सोडून सगळेच फॉर्मात !! >> येह बात कुछ हजम नहि हुयी भाउ.>> मीं सेहवागचा फॉर्म म्हटलं होतं; शूमाकर १००-१२५ च्या वेगाने गाडी चालवतो तर त्याला फॉर्ममधे आला म्हणायचं का ? Wink
झालं ! आमची मुंबई कोलकत्याच्याही खालीं गेली !! Sad

भाउ, व्यंगचित्र कुठे आहे?
तुम्हाला वस्तुस्थितीत जो विनोद दिसतो तो इतर फार क्वचित कुणाला दिसतो. त्यातून तुम्ही चित्र काढून तो स्पष्टहि करता. मानले तुम्हाला!
आता येऊ द्या एखादे, बरेच दिवस झाले.
(नाहीतर मी लिहीन, ही धमकी कायम आहे! Happy तेंव्हा निदान इतरांचा विचार करून तरी एक चित्र टाकूनच द्या.)

<< कसला फालतू आउट झाला रोहित शर्मा.... हेहेहे नरीन >> तें १९वं षटक होतं व वाटेल तो धोका पत्करून धांवसंख्या १७०च्या आसपास तरी नेणं अपरिहार्य होतं; रोहितला दोष देणं योग्य नाही, असं वाटतं.

झक्कीजी, मीं कांहीं सिद्धहस्त कार्टूनिस्ट नाही; गोड मानून घ्या झालं -

aaiPllL.JPG

राजस्थान परत जिंकले! पण दिल्ली अगदीच कणाहीन खेळले. कूपर, रहाणे, फॉकनर, सॅमसन, भाटिया छान खेळले. पहिल्या ओव्हर मधे सुटलेला कॅच आणी पिटरसन विरुद्ध न केलेलं अपील ह्या चुका चांगल्या संघांविरुद्ध महागात जाऊ शकतात.

भाउ, आय पी एल च्या सगळ्या निकालांचे खरे कारण तुम्ही लोकांसमोर आणले.
मी आता संदीप शर्माबद्दल लिहीलेले मागे घेतो. मी दोन जन्मात केली नसती एव्हढी कमाई त्याने कदाचित त्या एका मॅचमधे केली असेल. गल्ली क्रिकेटमधे त्याला घेतले नाही तर तो गल्लीच विकत घेईल!

झक्की अतिशय बेजबाबदार कॉमेंट. ज्या उदयोन्मुख खेळाडूबद्दल कोणीही कसलीही शंका घेतलेली नसताना असा कॉमेंट का करावा ?

लोकांना जिथे तिथे फिक्सिंग आणायला का आवडते तेच कळत नाही ..... आमच्या ऑफिसात आहेत असे एक-दोन जण..... क्रिकेटची चर्चा चालू झाली रे झाली की फिक्सिंगचे रडगाणे गायला लागतात.... आम्ही फक्त त्यांना "गेट वेल सून" म्हणतो Wink

>>राजस्थान परत जिंकले!
आणि ते परत परत जिंकत रहावेत हीच इच्छा!

कूपरला पिंच हिटर म्हणून पाठवण्याची चाल अगदीच अनपेक्षित Happy
बेन कटींगला बघून मला मागच्या काही सीझनमधला शॉन टेट आठवला.... पुढची मॅच त्याला बसवून हॉजला खेळवले पाहिजेल..... बिन्नीला थोडा ब्रेक देवुन उन्मुक्त चंद आणि अंकीत शर्माला खेळवून बघितले पाहिजेल

शेवटच्या चार ओव्हर्समध्ये कूपर आणि फॉल्कनर ही राजस्थानची ताकद आहे!

स्वरुप, "क्रिकेटची चर्चा चालू झाली रे झाली की फिक्सिंगचे रडगाणे गायला लागतात" - I agree. लोकं तिथेच अडकुन बसतात. मला त्याचंही काही वाटत नाही, पण 'तुम्ही बघू नका, ते सगळं फिक्स्ड असतं' वगैरे सल्ले मात्र अती होतात. असो.

बिन्नी ला ब्रेक ची गरज आहे हे नक्की. बेन्स, हूडा, चांद, शर्मा ह्यापैकी कुणीतरी त्याच्या जागी खेळ्वता येईल. कटींग ची बॉलिंग बघितली नाही, पण हॉज राजस्थान ची मोठी ताकद आहे आणी तो कसातरी प्लेयिंग ११ मधे यायला हवा असं वाटतं. परवा चेन्नई विरुद्ध हे फार प्रकर्षानं जाणवलं. तो उभा राहिला असता, निदान बेजबाबदार फटका मारून आऊट नसता झाला असं वाटत होतं.

>>पण हॉज राजस्थान ची मोठी ताकद आहे आणी तो कसातरी प्लेयिंग ११ मधे यायला हवा असं वाटतं. परवा चेन्नई विरुद्ध हे फार प्रकर्षानं जाणवलं
खरय.... हैद्राबाद, चेन्नइ अश्या चांगली गोलंदाजी असणार्‍या संघांविरुद्ध तरी त्याला खेळवायला पाहिजे Happy

बिन्नी ला ब्रेक ची गरज आहे हे नक्की. बेन्स, हूडा, चांद, शर्मा ह्यापैकी कुणीतरी त्याच्या जागी खेळ्वता येईल. कटींग ची बॉलिंग बघितली नाही, पण हॉज राजस्थान ची मोठी ताकद आहे आणी तो कसातरी प्लेयिंग ११ मधे यायला हवा असं वाटतं. >> चार non देसी खेळाडू हा problem होत असावा. वॉटसनलाच बसवून adjust करता येईल Wink

उन्मुक्त चंद ला गेल्या वर्षीचे पहिले दोन शून्य अजून नडताहेत. यंदा अजून फारसे बॅटींग टॅलंट पुढे आलेले नाहिये - nair , केदार जाधव वगळता. मनिष पांडे १-२ इनिंग्स खेळून गेलाय, उत्थप्पा सध्या चांगला खेळतोय, रायुडू सध्या फॉर्म मधे वाटतोय. पण बाकी फारसा कोणी नवीन दिसत नाहिये.

बांग्लादेशासाठी ही टीम कशी वाटते ?
नायर, राहाणे, उत्थप्पा, सॅमसन, कार्थिक (कॅ.), पांडे/रायुडू, रिषी धवन, संदिप शर्मा, मोहित शर्मा, तांबे, चहल/अंकित शर्मा/अक्षर पटेल. Strangely, there is no off-spinner other than शिवम शर्मा who has played only 2 matches so far.

>>वॉटसनलाच बसवून adjust करता येईल
तसेही करायला हरकत नाही..... स्मिथलाही बसवता येइल एखादी मॅच.... पण ज्या मॅच मध्ये हॉजला खेळवतील त्यात त्याला वरती पाठवले पाहिजेल बॅटींगला..... मान्य की तो खूप भारी फिनिशर आहे पण अश्याने संधीच मिळत नाहेये बिचार्‍याला!

झक्की अतिशय बेजबाबदार कॉमेंट.
अहो मी मॅच फिक्सिंग नव्हते म्हंटले, तो उदयोन्मुख आहे, आज फक्त दहा लाखाला असला तरी पुढच्या आय पी एल पर्यंत दहा कोटीचा होईल, तेव्हढी माझी कमाई नव्हती.
मी भारत सोडला तेंव्हा मला १०५० रु. दरमहा पगार होता. नि तो खूप जास्त होता माझ्या कित्येक मित्रांपेक्षा.तर दहा लाख म्हणजे सुद्धा खूप वाटणार नाहीत का?

च्यायला, एकदा नाव कानफाट्या ठेवायचे नि सतत तसेच बोलायचे! बोला, बोला. तुमच्या बुद्धीने तुम्ही लिहा! तुमच्या एव्हढे हुषार आम्ही नाही! जसे जमेल तसे लिहीतो.

Pages