आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे काय ...................:राग:

मी सकाळीच ३०० केलेले.......माझ्या प्रतिक्रिया कश्या डिलिट झाल्या

ओ अ‍ॅडमिन .. नंबर नको टाकु असे सरळ सांगा ना..

नाही टाकत .. उगाच दोन दोन वेळा मेहनत करावी लागते धाग्यांवर लक्ष द्यावे लागते Happy

गेला आठवडाभर घरचे नेट बंद असल्यामुळे मोबाईलवरुन रोमात होतो

आज राजस्थानने कूपरला संधी द्यायला हवी होती असे वाटतेय!
राजस्थानच्या पुढच्या दोन मॅचेस बंगलोर आणि चेन्नईशी असल्यामुळे आजची मॅच जिंकून भक्कम स्थितीत जाण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल Happy

हो ना... उगाचच टेंशन देतायेत. नीट संभाळून खेळा.

हॉज असता तर जरा बरं वाटलं असतं. पण त्याला यंदा फारशी संधी मिळेल असं दिसत नाहीये.

आज राजस्थान चं अवघड आहे. उरलेल्या ५ पैकी ३ ओव्हर्स भुवी आणी स्टेन च्या आहेत. छया! मूड-ऑफ! Sad

आधीच टी-२०त निकाल अनपेक्षित . त्यांतच प्रत्येक संघ जर असा प्रत्येक मॅचला वेगवेगळ्या, विचित्र मूडमधे खेळायला लागला तर..... मुंबईसुद्धां कां नाही होणार चँपियन !!! Wink

आयपीएल बघायचा स्टॅमिना संपला का सगळ्यांचा ? निदान मुंबईची तरी बघूया आज ! १५६ करायच्येत चेन्नईला जिंकण्यासाठी !

घरच्या खेळपट्टीवर अगदींच वाईट तर्‍हेने हरवूं नये मुंबईला म्हणून तसं थोडं नाटक केलं चेन्नईने पण शेवटीं हरवलंच मुंबईला !!

दिल्लीचे थिंकटँक जे कोणी असेल तो अत्यंत महामुर्खशिरोमणी म्हणुन सहज खपुन जाईल Angry

लक्ष्मीरतन शुक्ला ची बॅटींग काय डुमनी पेक्षा चांगली आहे काय ?
पिटरसन ओपनिंग ला आला तेव्हा वाटले चला आज तरी डोके वापरत आहेत.. परंतु नंतर डुमनिला उशिराने पाठवल्याने रन्स तर कमी बनलेच उलट ज्या वेगात बनायला हवे होते ते बनले नाही
येडपट लोक जो फार्मात बॅट्समन आहे त्याला जास्तीत्जास्त ओव्हर्स खेळायला द्यायला हवेत ... उशिराने पाठवल्याने एक तर त्याला कमीत कमी वेळॅत जास्तीतजास्त रन्स काढायचे प्रेशर असेल वर मारण्याच्या नादात तो आउट होउन जातो अश्याने त्याला दर मॅच मधे खेळायला कमी मिळते .... फार्म जाण्याचा धोका असतो...

इतके साधी गोष्ट कळत नाही ?????????

या गोष्टीत पंजाब ने चांगली चाल चालली आहे.. सेहवाग नंतर लगेच मॅक्सवेल आणि नंतर मिलर व बेली ला उतरवुन रन्स चा टेंम्पो त्याच वेगात चालेल याची काळजी घेतात.. त्यामुळेच २०० रन्स सुध्दा ते सहज साध्य करुन घेतात

चेन्नई.

स्मिथ आणि मॅक्युलम त्यानंतर रैना , प्लेसिस, जाडेजा, धोनी हे सगळे विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिध्द आहे.. म्हणुन चेन्नई चेसिंग मधे अव्वल ठरते ..

ए बी डिव्हीलिअर्स बद्दल काही रोचक गोष्टी.

१) ज्युनिअर नॅशनल हॉकी टिम साठी त्याचे नाव शॉर्ट लिस्टेड होते.
२) द आफ्रिकेच्या ज्युनिअर रग्बी टिम चा कर्णधार
३) शालेय जलतरण स्पर्धेचे सहा रिकॉर्ड नावावर
४) ज्युनिअर धावपटु १०० मीटर स्पर्धेत सर्वात जलद धावपटु
५) द आफ्रिका ज्युनिअर डेव्हिस कप टेनिस टीम मधील सदस्य
६) अंडर-१९ नॅशनल बॅडमिंटन चँम्पिअन
७) द आफ्रिका गोल्फ विजेता
८) स्वतःचा म्युझिक बँड ज्यात तो गिटारिस्ट आणि गायक आहे
९) अभ्यासात देखील प्रगती ... त्याच्या शास्त्रीय प्रोजेक्ट ला नेल्सन मंडेला यांच्या तर्फे राष्ट्रीय पदक मिळाले आहे

>>दिल्लीचे थिंकटँक जे कोणी असेल तो अत्यंत महामुर्खशिरोमणी म्हणुन सहज खपुन जाईल

गॅरी कर्स्टन..... आता बोल Wink

उदयन, तुझ्या वरच्या चिडचिडीवरुन असे दिसतय की ड्युमिनी तुझ्या फॅन्टसी टीममध्ये होता Wink

गॅरी कर्स्टन.. >>> तरी असे डावपेच ???? होउ शकतो मॅरिट मधे येणारा मुलगा अचानक नापास सुध्दा होउ शकतो ..

Biggrin

नक्कीच होता.. आणि त्याचा फार्म बघता दिल्ली आता जशी हारत आहे कमी रन्स केल्यामुळे किमान तशी तरी हारणार नाही हे नक्की

पंजाब सारख्या टीम विरुध्द कोलकत्ता सारखे टीम जिंकली Happy
दोन्ही मॅच मधे मॅक्सवेल चालला नाही.. बहुतेक कोलकता ला मॅक्सवेल चा तोड सापडला आहे
ना मॅक्स्वेल चालला ना मिलर चालला.. फक्त सेहवाघ चालला.. ( गंभीर ने चालवला असेल Wink कारण गंभीर ला देखील चालवला )

पियुश शर्मा मोर्कल दणदणीत चालले

<< पंजाब सारख्या टीम विरुध्द कोलकत्ता सारखे टीम जिंकली >> गंभीरपेक्षाही उथाप्पा केकेआरला अधिक प्रेरणादायी ठरतोय ,असं वाटतं; त्याने यष्टीरक्षण सुधारलंय व फलंदाजीतही त्याला आतां चांगलाच सूर गवसलाय !

Pages