केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस गळतीसाठी जास्वंदाची पानं आणि फुलं वाटुन केसांवर त्याचा लेप १ तासाकरीता लावावा.नेटवर अजून बरीच माहिती मिळेल ह्याबद्दल.
पण केस गळायचे थांबतात. मला तर पहिल्याच वापरात बराच फरक दिसून आला. जवळ जवळ १०० % . Happy

मी एक दिवस आड केस धुते आणि धुताना नेहमी लॉरिअल चा कंडिशनर वापरते. (शॅम्पू निराळा निराळा असतो) पण माझे केस रूक्ष वाटतायत. काय करावं?

आठ्वड्यातुन दोनदाच केस शॅम्पू ने धुवावे. शॅम्पू एक्च फि क्स करा. .. केस मऊ होन्यासाठी कोरफ ड कंडिशनर म्हनुन वापरता येईल. अजुन अन्ड्याने पण केस म ऊ होतात. तसेच मागे नारळाच्या दुधाबद्द्ल लिहलय त्याचा

प्रयो ग सुद्धा करुन पहा..

रामदेव बाबाचे milk protein shampoo वापरुन पहा व मेहन्दी पण try करा नक्की फ्ररक पडेन

पतंजलि चे शॅम्पु चांगले आहेत.. मी अ‍ॅन्टीड्न्ड्र्फ चा वापरला आहे....दक्षे पतजंलि चे प्रोड्क्ट्स ट्राय करुन पाहा.. आनि प्रत्येक वेळी कंडीशनर वापरतेस का ??? त्याने सुद्धा केस कोरडे होऊन गळतात असा माझा स्वानुभव आहे.

मी लॉरीअल चा शॅम्पु आनि कंडीशनर वापरला तेव्हा चांगला वाटला.. २ आठवड्यानंतर मस्त केसगळती सुरु झाली.. तेव्हापासुन मी गार्निअर , लॉरीअल च्या कंडीशन र च्या वाटेला नाही गेले.. घरगुती च ट्राय करते वेगवेगळे..

मी सध्या ट्रेसेमी वापरतेय... केसगळती आहेच पण आठवड्यात हेअर स्पा करून घेतला. मस्त मसाज करून घेतला, वॉश करून घेतला. मग कंडीशनर लावून घरी पाठवलं तिने. दोन तास धुवून टाकला. मस्त स्मूद सुळसुळीत झालेले केस. एरवी माझे नॅचरल वेव्ही कर्ल्स आहेत, पण थोडे स्ट्रेटही झालेले.

नारळाचे दूध ट्राय करेन या वीकांताला... पण स्वतः चंपी करण्यापेक्षा करून घेण्यात जास्त सुख असतं... काय रिलॅक्सेशन असतं ते!! अवर्णनीय!! डोळे मिटून पडून राहायचं फक्त!! अहाहा!!

मी पण ट्रेसमी वापरते आहे माझेही केस कुरळे आहेत पण हा शॅम्पू वापरायला सुरुवात केल्यापासुन मस्त स्ट्रेट झाले.

ट्रेसेमी काय? शांपू का कंडिशनर फक्त? की दोन्ही? Uhoh

मी मेंदी नाही वापरत,. कलर करते केस. सनसिल्कचा नवा शँपू पण छान आहे. मला आवडला.

शांपु आहे. मला हा शाम्पु खरच खुप आवडला. माझा शॉर्ट मशरूम कट असतो त्यामुळे या छोट्या छोट्या केसांचे कर्ल न होता मस्त सरळ राहतात.

दक्षू कुठला कलर? मी पहील्यांदाच केला... लॉरीयल. फक्त नॅचरल टच अप. नो हायलाईटिंग! तरी भीती वाटते. कलर उडताना भयाण होणारेत. पण मेहेंदीपेक्षा तरी बरे दिसताहेत सध्यातरी!

मी बर्‍याच दिवसांपासून लॉरेल चे कंदीशनर वापरात आहे. मला नक्की काळात नाही की ते वापरावे की नाही? मे सिळकेशा शीकेकाई वापरते म्हणून कोणीतरी म्हलले की त्याने केस कोरडे होतात म्हणून कोंदीशनर वापरावे..मला खूप संभ्रम आहे..प्लीज़ सांगा...आणि इथे अमेरिकेमधे काय उपचार करत येतील ते ही सांगा...

लॉरियलचे कंडीशनर चांगले आहे. शक्य असल्यास अधून मधून नीरजाने सुच वलेल्या नारळाच्या दुधाचा वापर करून बघण्यास हरकत नाही.

कोणी Brazilian Keratin Treatment केली आहे का? आणि त्याचे दुश्परिणाम माहित आहेत का? माझे केस खुप कर्ली आहेत आणि मेंटेन करायला अवघड. खुप फ्रिझी पण आहेत.

केस प्रचंड कमी झालेयत, आधीच्या पेक्षा २/३ कमी झालेत.. Sad Sad
सध्या हिमालयाचा शांम्पु, कधीतरी डव्ह चे कंडिशनर वापरतेय
काही उपाय सांगा प्लीज प्लीज, पोटातुन काही घ्यायला हवे का?

दिपु स्काल्प ला इन्फेक्शन वैगरे झाल आहे का चेक कर, dermatologist ला दाखवून बघ. नुसते तेल आणि शॅम्पू लावून फरक पडेलच असे नाही. मी हिमालया वापरायचे , आता पतंजली चे शॅम्पू आणि तेल लावून फरक पडतोय.

हेअर स्पाचे किती घेतात? मी रवीवारी पार्लरमध्ये गेले होते, तिथे एकजण करुन घेत होती. रेट विचारल्यावर, केसांवर अवलंबुन आहे म्हणाली. माझे केस बघुन १२०० सांगितले. वर्थ आहे का एवढे देणे??

पार्लर लौकीकता, पार्लरमधील अत्याधुनिक उपकरणे, सुविधा, स्वच्छता, स्टाफचे कौशल्य यावर सुद्धा रेट्स अवलंबून असतात. माझं छोटंसं तरीही वर्थ पार्लर आहे. खूप अत्याधुनिक नाहीत तरी जरूरीची साधने आहेत. मी लग्नासाठी संपूर्ण पॅकेज घेतलं होतं ज्यात वॅक्सींग, पेडीक्युअर, मेनिक्युअर, फेशियल ब्लीच, बॅक पॉलिशींग आणि हेअर कलर होतं. त्यात तिने हेअर कट फ्री दिला. माझे बेसिक हेअर स्पा चे ५०० घेतले. ज्यात तिने आदल्या दिवशी हेअर मसाज ( यात हेड मसाज, पाठीचा मसाज आणि हातांचा मसाज दिला Wink बरेच दिवस बॅक एक होत होतं मस्त पाठीचं मानेचं खांद्यांचं रगडून मर्दन केलं :)) आणि वॉश दिला. नंतर दुसर्‍या दिवशी कंडीशनर लावून दोन तास बसवलं. मग वॉश आणि मग सेटींग... ५०० रू. वर्थ आहेत वाटलं. मंथली सिटींग घ्यायला बोलावलेय... जमेल असं वाटत नाहीये Happy

काही उपाय सांगा प्लीज प्लीज, पोटातुन काही घ्यायला हवे का?>> दिपू केस गळतीवर मागची पाने चाळून बघा. खूप उपाय आहेत. खाण्याविषयी ताजे अन्न, मोड आलेली धान्ये उदा. कच्चे मूग खावेत. फायबर वाले घटक, पालेभाज्या पोट साफ ठेवण्यासाठी उपयोगी असतात. तरीही वैद्यकीय सल्ला घ्याच.

सोना२, मला खुप चांगले वाटले. ट्रिटमेन्ट करुन आल्यावर ४८ तास केसांना पाणी लागुद्यायचे नाहीये. नंतर धुतल्यावर माझे केसं तरी खुप स्ट्रेट राहात नाहीत (चायनिज मुलींसारखे) पण मला असेच आवडतात. साधारण ६ माहीने टिकतात. साईड ईफेक्ट्स अजुन तरी काही दिसत नाहीयेत. मी आत्तापर्यंत ३ केले आहेत.

हेअर स्पा घेताना त्या मुली मसाज करताना भयंकर केस गळतात माझे तरी, जसे काही त्या खेचुन काढतात केस.
दोन वेगवेगळ्या पार्लर मधे सेम अनुभव. तेव्हापासुन घरीच मसाज करते गरम तेलाचा.
बाकिच्यांना पण असाच अनुभव आहे का? की माझ्याच केसांचा प्रोब्लेम आहे हा? Uhoh

मोनाली, मी पार्लरवालीला सुरूवात करण्याआधीच प्रॉब्लेम्सची लिस्ट सांगायला सुरूवात करते. ती त्यावर एकेक उपाय सुचवते. आपल्या बजेट मधील आणि पटेल असा उपाय निवडायचा. तिला मी दोन तीनदा विचारून खात्री करून घेतलेली की माझे केस खूप डल फ्रीजी आणि नाजूक आहेत. मला स्पा तर घ्यायचाय पण हळूवारपणे... जास्त घासून मसाज करू नको. तिने मस्त प्रेशर पॉईंट्सना हळूवार प्रेस करत मालीश करून दिलं. मुली शिकाऊ कॅटॅगरीमधील नसल्या पाहीजेत. त्यांना अ‍ॅक्युप्रेशर व मसाजचे ज्ञान असावे.

या वेळी घेईन स्पा तेव्हा हेअर पॅकही लावून घेणारेय. बघुया. मीसुद्धा रेग्युलर करत नाही. घरीच वेळ मिळेल तसं कोमट तेलाने मालीश करते. पण पाठीचा मसाज, मान व खांद्यांचा मसाज खूप गरजेचा वाटतो.... पूर्ण स्पा नेहमी परवडेल की नाही माहीत नाही... हा बजेट मध्येही बसतो. रिलॅक्स वाटतं २ दिवस तरी Happy

पाठीचा मसाज, मान व खांद्यांचा मसाज खूप गरजेचा वाटतो.... पूर्ण स्पा नेहमी परवडेल की नाही माहीत नाही... हा बजेट मध्येही बसतो. रिलॅक्स वाटतं २ दिवस तरी>> +१
मी पण करत होते आधी, तेव्हा माझ्या केसांसाठी ८०० घेतले होते.
साधना तुम्हला हवा असल्यास माझ्या पार्लरवालीचा पत्ता देईन. खारघरमध्ये असते ती. मस्त आणि प्रोफेशनल आहे.

दिपु, Homeopathy try करा. मला फायदा झाला होता. Dr, विचारुन Biotin supplements पण सुरु करा. बाकी ईथे दिलेले घरगुती उपाय पण करत रहा. नक्की फायदा होईल. Patience मात्र ठेवा.

भयंकर केस गळताहेत काही महिन्यांपासुन. म्हणुन मग लॉरिअल पॅरिसचा अ‍ॅन्टी हेअरफॉल शॅम्पु आणला. एका वापराने तरी चांगला वाटला. केसं थोडेसे कमी गळाले धुतल्यावर. महिनाभर वापरल्यावर नक्की कळेल.

ताज्या रोजमेरीचा केसांसाठी काही वापर होतो का? कसा करायचा?

ड्रीमे मी लॉरियल चा बरगंडी लावते नेहमी. कलर लावायला सुरु केलं तेव्हा फक्त एकदा गार्नियर लावला होता. दोन दिवस डो़कं गच्च धरून ठेवल्यासारखं वाटत होतं. लॉरियल तिप्पट महाग आहे पण तोच वापरते. एकदा दोनदा मॅट्रिक्स पण वापरून पाहिला, पण त्याने डार्क बरगंडी शेड येते ती नॅचरल वाटत नाही. आणि त्याचा वास दोन दिवस नाकात बसून डोकं दुखतं. दोन्ही वेळा अनुभव आल्यानं मी आपलं लॉरियल वर स्थिर झाले.

Pages