अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Agree!

रिया तुम्हीही तुमच तोंड संभाळा

मी तुम्हाला काही उलट बोलत नाही प्लीज माझ्या तोंडाला लागू नका

तू चिप

Anu kuthe nadi lagateyes? he is useless....!

ata radayala lagatil te bichare Wink

mala jinkanyat interest nahiye.
tumhi tumache manane banavalele kisse takan band karal tenvha amhi jinklo!

मी माझे एअरपोर्ट विषयी जे किस्से टाकले ते खरे आहेत

बाकी जे इतरांनी मला सांगितलेले किस्से होते ते मी टाकताना सांगितले होते, की हा किस्सा मला आमक्याने सांगितला आहे आणि तमकयाने सांगितला आहे ,

are he ajun ithech vatat Lol
avaghad ahe

tumache sagalech kisse taddan falatu ani khote ahet!
aso!

4.bp.blogspot.com/-N875vSwqssg/ToxMx-ZWdHI/AAAAAAAAAT8/mQWoedfMchw/s1600/%25E0%25A4%258F%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg

2.jpg

पाहिलेत का माझे लिखाण?
वाचलेत की नाही? तसही तुम्हाला झेपेल असं वाटत नाही. सो चालू द्यात!

कोकॉ सेम हिअर

सर्वच मंड ळीनी डॉ अब्राहम कोवूर यांचे gods demons and devils व Begone Godmen ही छोटी पुस्तके अवश्य वाचावीत म्हणजे असे दिसण्यामागची कारणे लक्षात येतील. मी वयाच्या २१-२२ पर्यन्त असल्य अमानवीय गोष्तींना फार घाबरत असे . मात्र हे पुस्तके वाचून या क्षेत्रातल्या लोकांशी सम्पर्क आल्याने आता रात्रीस्मशानात रहायची सुद्धा तयारी आहे Happy

अभिजीत ब्रो यांचे सदस्यत्व स्थगीत केले आहे. >> का?
मला नाही वाटत पुरेसे कारण होते त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी. त्यांनी जे काही किस्से/गोष्टी टाकल्या त्या ईथल्या काही लोकांना खर्‍या वाटल्या नाहीत म्हणून (खरंच अमानवीय धाग्यांवरच्या पोष्टी ऑथेंटिक असाव्यात असा पाठपुरावा होतोय का? Uhoh )
त्यांच्या पोस्टी रंगवून सांगितलेले किस्से किंवा बनवलेल्या कथा होत्या (त्यात काही वावगे नाहीये) म्हणून काही आयडींनी आक्षेप घेतला आणि गलका वाढला. वादाला तोंड फोडणार्या आणि पुढेही वादावादीत बाकीच्याही आयडी सामील होत्याच की? समज ही देता आली असती.

निर्णय आवडला नाही. एका आयडीच्या ऊत्साहाला समज देऊन वळण लावता आले असते(खरं तर त्याचीही मला गरज वाटत नाही).

चमन, त्यांनी पुर्वी थोपुवरच्या कथा तशाच्या तशा उचलून टाकल्या होत्या. प्रताधिकार भंग आहे हा
त्यांना सांगुनही त्यांनी त्या तिथुन काढलेल्या नाहीत.

असं मला वाटत,बाकी योग्य व्यक्तीकडुन योग्य ते उत्तर मिळेलच बहुदा

Thanks admin

अभिजीत ब्रो यांचे सदस्यत्व स्थगीत केले आहे. >> का?
मला नाही वाटत पुरेसे कारण होते त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी. त्यांनी जे काही किस्से/गोष्टी टाकल्या त्या ईथल्या काही लोकांना खर्‍या वाटल्या नाहीत म्हणून (खरंच अमानवीय धाग्यांवरच्या पोष्टी ऑथेंटिक असाव्यात असा पाठपुरावा होतोय का? )
त्यांच्या पोस्टी रंगवून सांगितलेले किस्से किंवा बनवलेल्या कथा होत्या (त्यात काही वावगे नाहीये) म्हणून काही आयडींनी आक्षेप घेतला आणि गलका वाढला. वादाला तोंड फोडणार्या आणि पुढेही वादावादीत बाकीच्याही आयडी सामील होत्याच की? समज ही देता आली असती.

निर्णय आवडला नाही. एका आयडीच्या ऊत्साहाला समज देऊन वळण लावता आले असते(खरं तर त्याचीही मला गरज वाटत नाही).
>>>>>>>>>>>>>> +१

Pages