अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जर आधीचे प्रतीसाद वाचाल तर त्या आय डी ला त्याच वेळेस सर्वांनी समजवुन सांगितलेलं होत. पण त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतल नाही.. उलट अ‍ॅरोगंटली सर्वांना उत्तरं देत गेले. राहीलं बाकीच्या आय डीं नी या वादावादीत सामील होण्याच तर तुम्ही आधीचे सर्व प्रतीसाद शोधा आणि वाचा तुमच्या लक्षात येईलच. जर कुठलाही आय डी वावगं वागला असता तर अ‍ॅडमिन नी त्यांची ही हाकलपट्टी केलीच असती....

हे काका जसे चवथ्या मजल्यावर पोहोचले त्यांनी पाहिले फ्लोर वरच्या लाइट्स बंद चालू होत होत्या , काका ऑफिस मधे गेले तर तिथले टाइप रायटर आपोआप चालू होते आणि फाइल्स हलत होत्या काका समजुन गेले इथे काहीतरी अमानवीय आहे

>>>> ओ, ऑफिस सुरू असताना जिथे टाईपरायटर चालू नसतात, फायली हालत नाहीत तिथे माणसं घरी गेल्यावर कसं काय हे होईल? की पूर्वी कामं न केलेले मंत्रालयातले मृत कारकून आता भूतयोनीत गेल्यावर कामं करतात?

ओ, ऑफिस सुरू असताना जिथे टाईपरायटर चालू नसतात, फायली हालत नाहीत तिथे माणसं घरी गेल्यावर कसं काय हे होईल? >>>> हिच तर अमानवीय गोष्ट आहे. Proud

अब कि बार ....Admin कि सरकार.....>?>>>>>>>>>>>>>>> मायबोली त्यांचचं आहे....सरकार कोण हे तुम्ही ठरवणार???? मग काय हकल्ल्या गेलेल्या आय डी ची सरकार हवी का???

ओ, ऑफिस सुरू असताना जिथे टाईपरायटर चालू नसतात, फायली हालत नाहीत तिथे माणसं घरी गेल्यावर कसं काय हे होईल? >>>> हिच तर अमानवीय गोष्ट आहे.>>>>>>>>>>>>>>>>> Rofl

अहो अनिश्का madam .आमच्यवर का चिडताय उगाच.... आम्ही तर Admin च्या निर्णयच कौतुक केलाय... का अजून Bro भाऊ चा राग डोक्यातून गेला नाही का ???

आता काही किस्से येतील अशी अपेक्षा ठेवावी का? मला नुसता किश्श्यांमध्ये इंटरेस्ट नाही तर ते घडण्यामागे काही कारण असतील का याची उत्सुकता आहे. कारण या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही काही लोकांनाच हे अनुभव येतात यामागच कारण जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.

अरे वा रिया..ब्रो गेले न तु नीट मराठीत लिहायला लागलीस की Wink
इडा पीडा टळली गं बाई.
हलके घे Happy

लोल अग नंतर पुन्हा इंग्रजी होईन Happy
विपु बघ. आता इथे अवांतर बास Happy विनोदाच्या धाग्यावर कंटुनी करुयात Wink

भुताच्या बीबीवर पण गोंधळ???>>>>> तोही माणसांचा झकोबा... आता बोला Wink

हा माझ्या ऑफीसमधील किस्सा.

मार्चमध्ये आम्हाला कामाचा व्याप खूप असतो. बरेचसे प्रोजेक्ट ३१ मार्च च्या आत क्लाईंटकडे सबमिट करणे अनिवार्य असते.मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तर फार काम वाढले.मी आणि माझे अभियंते सहकारी रात्री ४ ते ५ वाजेपर्येंत स्वारगेट ऑफीसवर काम करु लागलो.एक दिवस असेच काम करताना रात्री २ वाजताच सर्वांना कामाचा कंटाळा आला आणि आजचे काम बंद करावे असे वाटले.मी जरा आराम करावा म्हणून ऑफीसच्या रेस्ट रुममध्ये जाउन पडलो.कधी डोळा लागला कळलाच नाही तोपर्यंत माझे सहकारी ऑफीसमध्येच टाईमपास करत होते,(मुव्ही डाउनलोड,तीन पत्ती वगैरे). रेस्ट रुममध्ये मी एकटाच होतो.तिथेही एक संगणक आहे जो १९९८ सालचा आहे जो अत्यंत जूनाट पधदतीचा (२५० एमबी रॅम आणि ८ जीबी हार्डडीस्क- आम्ही त्याचा उच्चार मजेने बच्चा कॅम्पुटर असा करतो ) असा आहे. त्याचा वापर आम्ही फक्त मॅच बघण्यासासाठी किंवा एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो .
मी जेव्हा झोपलो तेव्हा सार काही शांत होते. अचानक मला जाग आली तेव्हा तो जूनाट कंपूटर चालू झालेला होता, रेस्टरुमला आतून कडी असल्यामुळे कुणी आत येउ शकत नव्हते आणि मी तो कंम्पुटर चालू केलेला नव्हता.तसाही त्याला चालू व्हायचा कमीतकमी पाच मिनीटे नक्कीच लागतात.
मी जरा गोंधळून गेलो कारण त्याच्या स्क्रीनवर डेव्ह नावाची गेम ओपन झालेली होती .( ज्यात उड्या मारत ,रॉकेट वगरे चालवून सात टास्क पुर्ण करायचे असतात.) तसे स्क्रीन स्थिर होती पण अचानक चालू झालेला कंम्पुटर आणि गेम मला हलवून गेला मी काही न बोलता बाहेर आलो आणि सहका-यांना सांगून घराकडे निघालो. माझे बाकिचे सहकारीही घराकडे निघाले मात्र विक्रम आणि किशोर नावाची दोन माकडे अजून ऑफीसच्या माझ्या कंम्पुटरवर टाईमपास करत बसले होते.

यानंतर जे घडले हे त्यांनी मला दुस-या दिवशी सांगीतले ते असे...

माझ्या केबीनमध्ये कंपुटरसमोर असताना त्यांना एक न्युजपेपरचे पान केबीनच्या दारार पडलेले दिसले. वार्याने उडून आले असावे असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले .मात्र काही वेळात त्या पानाचा एक कोपरा वर खाली होत फडफड आवज करु लागला.किशोरने तो आवाज नको म्हणून त्या पानावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते पान त्याच्या पायाखालून उडून पुढे सरकले आणि पुन्हा फडफड करु लागले. हा सर्व प्रकार पाहून दोघे टरकले.तरी त्यानी ते पान हाताने उचलून पुन्हा खाली एका कोप-यात ठेवले आणो त्याच्यावर एक लॅपटॉप ठेवला . पानाची फडफड शांत झाली. त्या दोघांनी निघायचे ठरविले .माझा कंम्पुटर बंद केला आणि साधारण ५ मिनीटांनी पुन्हा पानाची फडफड सुरु झाली .आता दोघांनाही घाम फूटला कोणताही आवाज न करत त्यांनी ऑफीस सोडले.

हा प्रकार का झाला असावा अशी चर्चा दूस-या दिवशी चालू झाली, माझ्या ऑफीसच्या रेस्ट रुमच्या वरच्या फ्लॅटमध्ये काही विद्यार्थी राहत होते, मागच्या मार्चमध्ये (२०१३) त्यातील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.कदाचित त्याचा तर काही संबंध नव्हता ते अजून गूढ आहे. मात्र त्यानंतर आम्ही रात्री १२ नंतर कधीच ऑफीसवर थांबलो नाही.

नशिब भंकस बंद होऊन किस्से सुरु झाले. धन्यवाद अ‍ॅडमिन.

@ किरणकुमार - बाप रे खतरनाकच आहे. तुम्ही तो पेपर पाहीलात का? कदाचित त्यात काही बातमी असेल जी तुम्हाला काही हिंट देईल. ( हॉरर फिल्मवरुन प्रभावित)

baapre Sad

nilson is mhaning right!
pahayach na tya paper war kai lihilay te

baki bhut hi mazyasarkhach dave game ch shaukin disatay Lol

बाप रे खतरनाकच आहे. तुम्ही तो पेपर पाहीलात का? कदाचित त्यात काही बातमी असेल जी तुम्हाला काही हिंट देईल.

नाही,दुस-या दिवशी कोणते पान होते ते कळायला काही मार्ग नव्हता कारण ऑफीसबॉयने सगळे पेपर एकत्र केले होते रद्दीत द्यायला त्यातून शोधणे शक्यच नव्हते आणि आमच्याही डोक्यात शोधायचा विचार आला नाही. मात्र तो जूनाट कंम्पुटर चाळण्याचे ठरविले होते, अजून अभ्यास चालू आहे.
१० एप्रिलला काही चौकशीनंतर एक संबंध असा आढळला कि एकदा हा कंम्पुटर बिघडला होता तो जूनाच असल्याने फेकून द्या किंवा विकून टाका असे आमच्या ऑफीस असिस्टंट ला सांगितले होते.त्याने ते ऐकण्याऐवजी तो कंम्पुटर दुरुस्त करण्याचे ठरविले,सहाजिकच दुरुस्तीसठी ऑफीसमधून खर्च मिळणार नव्हता म्हणून त्याने वर राहणा-या त्या बहाद्दराला ( आत्महत्या केलेल्या) बोलावून कंम्पुटर दुरुस्त केला होता त्यामध्ये त्याने नेमके काय केले काही पार्ट बदलले का नाही समजू शकले नाही. अजूनही तो जूनाट कंम्पुटर तसाच आहे. कधी कधी आय पी एल ची मॅच बघता बघता अचानक डेव्ह गेम चालू होते. आम्ही जूना कंम्पुटर आहे खराब झाला असेल असे म्हणून सोडून देतो म्हणजे आमचीच समजूत काढतो .खर काय ते आम्हा चौघांनाच माहिती आहे . असो..................................

ऑफीसमधीला वातावरण बिघडू नये आणि त्याचा कामावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही ही गोष्ट आमच्यापर्येंतच ठेवली आहे पण छडा लागेपर्यंतच ........................

किस्सा आवडला, बहुधा त्या फडफडणार्‍या पानामुळे क्ल्यू लागू शकला असता असेच वाटतेय.....

smiley.jpg

मी सुरवातिपासुंन सर्व किस्से वाचले फारच भितीदायक होते हे किस्से ,रात्रि वाचताना खुप भीती वाटते पण मज्जा सुध्हा वाटते .....

पण मधेच ही भांडन वाचली , ती अजुनच भयानक वाटली

जाइ - Lol

१४० प्रतिसाद बघुन वाटले की भुतांचे पेव फुटले की काय?
पण एथे तर एका आयडीचा मड्डर झाला ना, आता तो भुत होवुन परत आला म्हंजे ?

अभिजीत ब्रो यांचे सदस्यत्व स्थगीत केले आहे. >> का?
मला नाही वाटत पुरेसे कारण होते त्यांचे सदस्यत्व रद्द
करण्यासाठी. त्यांनी जे काही किस्से/
गोष्टी टाकल्या त्या ईथल्या काही लोकांना खर्या वाटल्या नाहीत
म्हणून (खरंच अमानवीय धाग्यांवरच्या पोष्टी ऑथेंटिक
असाव्यात असा पाठपुरावा होतोय का? )
त्यांच्या पोस्टी रंगवून सांगितलेले किस्से
किंवा बनवलेल्या कथा होत्या (त्यात काही वावगे नाहीये) म्हणून
काही आयडींनी आक्षेप घेतला आणि गलका वाढला.
वादाला तोंड फोडणार्या आणि पुढेही वादावादीत
बाकीच्याही आयडी सामील होत्याच की? समज
ही देता आली असती.
निर्णय आवडला नाही. एका आयडीच्या ऊत्साहाला समज देऊन
वळण लावता आले असते(खरं तर त्याचीही मला गरज वाटत
नाही).
>>>>>>>>>>>>>> +२

Pages