अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी कोणीतरी उल्लेख केला आहेच .. एक पुस्तक आहे.. "many lives many masters"
यात ७०-८० च्या दरम्यान घडलेली गोष्ट अथवा आत्मचरित्र..
त्या डॉ. कडे त्यांच्याच हॉस्पिटल मधली नर्स म्हणुन काम करणारी एक मुलगी काही अगम्य त्रास (विचित्र स्वप्ने, काही गोष्टींची खु भिती) या कारणाने योगायोगाने येते..

तिच्य ट्रिट्मेंट दर्म्यान आलेले अनुभव लिहिले आहेत..

तिच्यावर बरेच उपाय करुन काही फरक पडत नाही म्हणुन डॉ. हिप्नॉटिझम चा पर्याय घेतात.. आणी मग हळु हळु कळत जाते की तिने ह्या आधी जवळ जवळ ८०-९० जन्म घेतले आहेत .. आणी बरिच भिती आधिच्या जन्मातल्या प्रसंगांशी सबंधित आहे..

त्यात ते डॉ. तिला हिप्नॉटिझम दरम्यान अगदी म्रुत्युच्या जवळचे आणी नंतर चे डिटेल्स पडताळतात..

असे बरेच म्रुत्यु शी निगडीत अनुभव ती सांगते .. त्यात सारांश असा की ती मरतान सांगते "मला खुप हलक वाटतय मी खुप उंच उंच जात आहे .. एक खुप मोठी शक्ती प्रकाश दिसत आहे .. जो खुप छान वाटत आहे .. इथे खुप जन आहेत आम्ही सगळे नव्या जन्माची प्रतिक्शा करत आहोत ई. "
तो प्रकाश एक शक्ती आहे ज्याला ती मास्टर म्हणते आणी ती शक्ती त्यांच्याशी बोलतेही..

अजुन ही खुप छान आणी बर्याच प्रश्नांन उत्तर मिळेल अस पुस्तक आहे.. जरुर वाचा..

>>>मला exorcism पुस्तकाची आठवण झाली.. अरेरे ती सुदधा अशीच काहीतरी अगम्य ,लॅटीन + इंग्लिश अश्या भाषेत बडबड करायची.. अर्थात ते पुस्तक आहे>>>

अंकू
exorcism नावाचा एक picture पाहिलाय मी.तो याच पुस्तकावर आधारीत आहे का ते माहित नाही.पण मला आजिबात आवडला नव्हता.मुख्य कारण म्हणजे तोंडातून रक्त वैगरे पडण्याचे अत्यंत किळसवाणे दृश्ये दाखवल्यामुळे.काही काही horror picture मध्ये हॉरर च्या नावाखाली अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे प्रकार का दाखवतात काही कळत नाही.असे चित्रपट पाहून फक्त किळस वाटते भीती नाही वाटत.चित्रपटाने प्रेक्षकांना घाबरवणे अपेक्षित असते.पण बहुतांश horror pictures च्या दिग्दर्शकांना भीती आणि किळस या मधला फरकच कळत नसावा.

अवान्तराबद्द्ल क्षमस्व!.

ज्या भाषेशी आयुष्यात कुठलाही संबंध आला नाही अशा भाषेत बोलाण्यार्या लोकांचे किस्से बर्याचदा ऐकले आहेत पण प्रत्यक्ष पहिले मात्र नाही. या प्रकाराची तर्कसुसंगत अशी कारणमीमांसा कधीच ऐकण्यात किंवा वाचण्यात आली नाही.कोणी ह्या बाबतीत अधिक सांगू शकेल का?
विज्ञानदास??

अबिर हॉटेल चे नाव माहीत आहे का? गावाला जाताना बहुतेक दिवसाच जातो, त्यामुळे तीथे हॉटेल आहे का बघता येईल.

>>>बाकीचे तीन कुटुंब कोण होते? त्यांच्याशी काही बोलणं झालं का?>>>

रीया,
आम्ही सर्व मिळूनच ३ कुटुंब होतो.
मी,माझे आई-बाबा,आणि बहिण=४
पहिली मावशी,तिचे मिस्टर आणि त्यांची मुलगी=३
दुसरी मावशी,तिचे मिस्टर आणि त्यांच्या ३ मुलगी=५
असे एकूण १२ जण एकत्रच होतो.आमच्यापैकी प्रत्येकाला हे अनुभव जाणवले होते.
आमच्या व्यतिरिक्त त्या हॉटेलात असलेल्या अनोळखी कुटुंबाबद्दल मात्र माहित नाही.त्यांच्याशी काहीच बोलणे झाले नाही.

>>>अबिर हॉटेल चे नाव माहीत आहे का? गावाला जाताना बहुतेक दिवसाच जातो, त्यामुळे तीथे हॉटेल आहे का बघता येईल.>>>

सामी,
घटनेला खूप वर्ष झाल्यामुळे मला हॉटेलचे नेमके नाव नीटसे आठवत नाही.पण नावात gardens असं काहीतरी शब्द होता.मी इतर कोणाला विचारून आठवतंय का ते बघतो आणि सांगतो.१४ वर्षात त्या भागात देखील भरपूर बदल झाले असतील म्हणा.पण मला ह्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.मी विचारून सांगतो तुम्हाला नाव.

अबीर, थ्रिलींग आहे अनुभव अगदी... महाड माझं माहेर. त्यामुळे तिथे जाणं होतंच असतं पुन्हा सासरच्या वाटेवरच आहे पण तुम्ही सांगितलेल्या वर्णनाचं हॉटेल पहील्याचं स्मरत नाही...

अवांतर : तोंडातून रक्त वैगरे पडण्याचे अत्यंत किळसवाणे दृश्ये दाखवल्यामुळे.काही काही horror picture मध्ये हॉरर च्या नावाखाली अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे प्रकार का दाखवतात काही कळत नाही.असे चित्रपट पाहून फक्त किळस वाटते भीती नाही वाटत.चित्रपटाने प्रेक्षकांना घाबरवणे अपेक्षित असते.पण बहुतांश horror pictures च्या दिग्दर्शकांना भीती आणि किळस या मधला फरकच कळत नसावा.>> याच्याशी सहमत. बहुसंख्य हिंदी चित्रपट... भयपट याच पठडीतील असल्याने एकतर किळसवाणे किंवा हास्यास्पदच वाटतात. पण काही इंग्रजी चित्रपटांमध्ये वातावरणनिर्मीती करून अंगावर काटा फुलवण्याचे काम केले आहे. "jaws" हा अमानवीय भयपट नाही पण तरीही भीती मात्र वाटते पाहताना.

मला हिंदीमधील बीस साल बाद (जुना), कोहरा आणि सगळ्यात जास्त आवडलेला म्हणजे गुमनाम!!

बाकी सर्व ठिके, पण महाडहून राजापूरला चार तासांत पोचणे हेच मुळात अमानवीय काम आहे. चौदा वर्षापूर्वी म्हणजे रस्ता तसा बरा होता. तरी ते अंतर २०० किमी चार तासांत पार करण्याचे खचितच नाही. कारण वाटेत तीन घाट लागतात.

नॅशनल हायवेवर बहुतेक ख्रिश्चन ग्रेव्हयार्ड नाही आहे. खुद्द चिपळूणचे कुणी असले तर नक्की सांगू शकतील. बाकी, कोकणात फुलांचा सुवास आणि घुंगरांचा आवाज हा तिथल्या झाडांमुळेच असतो.

तुम्ही बहुतेक पॅगोडा रेझॉर्ट्स म्हणत आहात असा अंदाज. कारण ते हॉटेल बांधल्यापासून आम्ही बंदच पाहिलंय.

नाही, ते पॅगोडा नसावे,त्या काळात खेड ते चिपळूण या रस्त्यात फक्त दोन मोठी हॉटेल्स होती १) ताज ग्रूपचे रिव्हर व्ह्यू आणि २) हॉटेल वक्रतुंड रिव्हर व्ह्यूमध्ये जाण्यासाठी परशुराम येथे हायवे सोडून आत जावे लागते, परंतु या अनुभवकथनातील परिस्थिती पाहता ते नसावे असे दिसते. राहता राहिले वक्रतुंड पण हॉटेलचे वर्णन जुळत नाही. ही दोनच मोठी हॉटेल्स त्या काळात या टप्प्यात होती हे मी ठामपणे सांगू शकतो.
@ अबिर, जर खेडपासूनचे अंदाजे अंतर किंवा हॉटेलचे नांव यावर प्रकाश टाकू शकलात तर अधिक माहिती देऊ शकेन.

काही घटना का घडल्या असतील याची अजिबातच उलगड होत नाही.

साधारण ८९-९० मधल्या घटना आहेत. अमानवीय म्हणाव्या की नाही माहित नाही. बाबांबरोबर शाळेत जात असताना, आमच्या टू व्हीलर ला अपघात झाला, सुदैवाने मला फक्त मुका मार आणि बाबांना गुडघ्याला जखम एवढ्यावर निभावलं. त्याच दिवशी गोव्यात माझ्या सख्या मोठ्या काकांना हृदयविकाराचा झटका आला पण त्यातून ते सावरले (स्वतः डॉक्टर असल्यामुळे कदाचित). गडहिंग्लज ला दुसरे काका ऑफिसमधे चक्कर येऊन पडले (तो ही एक हृदयविकाराचा सौम्य झटकाच होता हे हल्ली हल्लीच समजलं). तिसरे काका हलशी (बेळगाव) इथे हृदयविकाराने गेले.

आज इतक्या वर्षांनतरही चार सख्या भावांना, चार वेगवेगळ्या ठि़काणी, एकाच दिवशी असे जीवघेणे अनुभव का यावेत याचं काही पटेल असं कारण नाही मिळालं.

आज इतक्या वर्षांनतरही चार सख्या भावांना, चार वेगवेगळ्या ठि़काणी, एकाच दिवशी असे जीवघेणे अनुभव का यावेत याचं काही पटेल असं कारण नाही मिळालं.

एक मात्र खर कि याला योगायोग तर नाही म्हणता येणार...

आधी कोणीतरी उल्लेख केला आहेच .. एक पुस्तक आहे.. "many lives many masters"

हे पुस्तक आहे आत्ता माज्याकडे ... मस्त आहे ... आणि खूप गुंतागुंतीचा विषय सोप्या भाषेत सांगितला आहे ... पण शेवटी शेवटी तोच तोच पणा येतो... (आपल्याला सगळ्याच गोष्टीत फिल्मिनेस पाहिजे असतो म्हणून तस वाटत असेल कदाचित )

ते हॉटेल असे गायब झालेले नसावे.माहीती पुन्हा रिवाईज करा अबीर..मला उत्सुकता आहे...

झेनॉग्लॉसी म्हणतात नवीन भाषा अचानक बडबडण्याला.त्याची कारणे:-
१-टेलीपॅथी.
२-चुकून एखाद-दोन शब्द/फ्रेजेस उच्चारणे.तेच सतत उच्चारणे.
३-मित्र किंवा कोणी ओळखीचे त्या भाषेशी संबधीत असणे किंवा लक्ष्य वेधून घेण्यासाठी अशी भाषा शिकणे.
४-एकंदर मेंदूचा वापर हा खूप कमी असतो.समुद्र्,अवकाश आणि मेंदू यात अजून बरेच शोधण्यासारखे आहे,ज्याला एक जन्मही अपुरा पडेल.मेंदूच्या कुठला कोपरा कशाने भरला आहे आणि तो केव्हा अ‍ॅक्टीव्हेट होईल कळणे कठीण.
५-अशा केसेस मध्ये पेशंट बंगाली,एजीप्शीयन अशाच भाषा बोलत असतो.त्यानंतर इतर भाषांचा क्रमांक.
६-ठोस पुरावे नाहीत.ठोस अभ्यास अजून तरी नाहीए यावर.
७-आपली पुस्तके खपावित म्हणून लेखक कितीही मोठा मानसशास्त्रज्ञ असला तरी काहीही सांगू शकतो.
८-झेनोग्राफीचेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीएत.खूपच कमी रिसर्च.
९-असे घडत असेल परंतु त्याला अतर्क्य म्हणू नये,मानू नये.
१०-कुठलंही पुस्तक वाचून मानसीकता तयार करु नयेत अशा गोष्टींच्या ज्यांना अजून आधारच नाही आहेत.
११-हायपोथेसिस टू प्रूफ टू कन्फर्मेशन अशी पध्दत आहे,अगदी नेहमीच्या माणसाने देखील तिच कायम ठेवावी असे वाटते.

कुणी लेखक म्हणतो म्हणून पुर्वजन्म्,झेनॉलोजी,इतर गोष्टींना महत्व दिले जाते असे वाटते.माझा एक लेखप्रयत्न माबोवर काल दिलेला आहे.तिथे काही चर्चा या गोष्टींबद्दल केलीत तर आवडेल.शिवाय त्यांचा आधार पडताळून बघण्यासाठी इतरांनासुध्द्दा मदत होईल.

बाकी जाई,अबीर्,ब्रो एक टूर काढावी सगळ्यांची ज्यांचे अनुभव इकडे आहेत त्यांच्या हॉरर स्पॉटस ना भेटी... Wink
कधी निघुयात...?

ध.

ओह्ह सही, अमानवीय धागा आणि एवढ्या पोस्टी.
मलाही आलेत बरेच अनुभव, सुरुवात म्हणून एखादा पिकनिकमध्ये एंजॉय केलेला सांगतो.

मित्राच्या गावी गेलेलो, अर्थात कोकणच. त्याच्या घराच्या मागे स्मशान होते आणि त्याने गावी पोचताच आम्हाला सांगितले होते की इथे भूताखेतांचे प्रकार फार घडतात पण काही घाबरायची गरज नाही, आपण इज्जत मध्ये राहिलो तर ते देखील इज्जत मध्ये राहतात. "भूतों के भी कुछ उसूल होते है", हे तेव्हा पहिल्यांदाच समजले. Happy

दिवसा समुद्रावर मस्त खेळून आलो, वाटेतील स्मशानभूमीही बघून झाली, साधारण दोनेक दिवसापूर्वी चिता जळाल्याचे अवशेष होते, पण ठिकाय इथवर काही घाबरण्यासारखे नव्हते. रात्री मात्र अनुभव यायला सुरुवात झाली.
दोन मित्र विहीरीवर पाणी भरायला गेले होते. एकाने हंडा पाण्यात सोडला. बुडूक बुडूक आवाज करत पाणी भरले, तसा तो जड झालेला हंडा वर खेचायला सुरुवात केली. वर येईपर्यंत तेवढाच वजनदार पण शेवटचा हिसका देऊन त्याला हातात घेताच हंडा हलका आणि रिकामा. पुन्हा आत सोडला, पुन्हा पाणी भरले, पुन्हा वजनदार हंडा वर खेचला, पुन्हा हातात काही नाही. तू रहने दे बे तेरेसे नही होगा, म्हणत दुसर्‍या मित्राने त्याला शिव्या घालत स्वता दोन ट्राय मारल्या, त्यालाही दोन्ही वेळा हाच अनुभव.

त्याच वेळी मी आणि ज्याचे ते गाव तो मित्र, असे आम्ही दोघे विहीरीवर गेलो तेव्हा त्यांनी घडला प्रकार सांगितला. मलाही एक ट्राय मारायची उत्सुकता होती, खरे खोटे करायला. पण तो गाववाला अनुभवी मित्रच म्हणाला, त्याची काही गरज नाही, पाणी भरू देत नाहीये. कोण भरू देत नाहीये तर अर्थात धाग्याचे टायटल सो कॉलड अमानवीय शक्ती.
मग काय, वाद न घालता तो हंडा तिथेच सोडून आम्ही परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी विहिरीवर शोधूनही सापडला नाही. शेजारचे एक अनुभवी काका म्हणाले, जाणार नाही तो कुठे, मिळेल दोनचार दिवसांत. अर्थात अमानवीय शक्तीयोंके भी कुछ उसूल होते है, काम झाल्यावर परत करणार असतीलच Wink

याच गावाचे अश्याच रात्रींचे आणखी एकदोन अनुभव पुढच्या पोस्टमध्ये टाकतो. तोपर्यंत या हंड्यात पाणी न येण्यामागे सायन्स वायन्स असेल तर प्लीज वेलकम. मी स्वता हंडा खेचला नसल्याने स्वानुभव बोलू शकत नाही मात्र दोन मित्र खोटे बोलण्याचा वा गंडले असण्याचा प्रश्न येत नाही, माझ्यामते. तसेच शेजारच्या काकामामांनीही आमच्यावर अविश्वास दाखवला नाही याचा अर्थ हा अनुभव भल्याभल्या गावकर्‍यांनीही घेतला असावा.

आज इतक्या वर्षांनतरही चार सख्या भावांना, चार वेगवेगळ्या ठि़काणी, एकाच दिवशी असे जीवघेणे अनुभव का यावेत याचं काही पटेल असं कारण नाही मिळालं.
>>>>>>>>>>>

यामागे करणी हा प्रकार असू शकतो का?
सध्या माझा एक मित्र भोगतोय, तो सविस्तर किस्सा नंतर किंवा सध्या सांगणे योग्य की नाही हे ठरवावे लागेल. पण त्यामुळे हे देखील त्यातलेच असावे का असा विचार मनात आला?
अर्थात यावर विश्वास माझा आधी नव्हताच पण त्या मित्राचे ऐकून जाम कन्फ्यूज झालो आहे.

अबीर __ आपला अनुभव ज्यांनी अनुभवला त्यांच्यासाठी डरावणा तर आहेच पण इंटरेस्टींग सुद्धा. कथा नाटक सिनेमा मटेरीअल असल्यासारखा Happy

दक्षिणा __ त्या दोनेक दिवसांत आमची मेंटेलिटी अशीच होती की इथे भुतांचे अनुभव येतात पण ते उगाच आपल्या वाटेला जात नाही, त्यामुळे अगदीच कोणाला धडकी भरली वा भितीने थरकाप उडाला असे झाले नाही. तसेच परत त्या मित्राच्या गावी जायचे तर कदाचित दोनचार वीर पुन्हा तयारही होतील.
तेथील अनुभव लिहितो अजून, तसेच त्यावर मी फार पुर्वी एक हलकीफुलकी कथाही लिहिली होती. (ती माझी फारशी आवडती कथा नसल्याने रिक्षा फिरवत नाही Proud )

आठवीत वगैरे असेन..
वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर दिला कि दुसऱ्या दिवशीच्या पहाटे गावी पोहोचत असू. घराच्या अगदी जवळ चावडी. आणि तिथे एक दगडात बांधलेला जुना स्टेज. जेवणं झाली कि सगळी गडी माणसं गप्पा मारायला चावडी जवळ.. नऊ च्या दरम्यान टोटल सामसूम. तरणी पोरं तिथं ओळीत स्टेजवर झोपायची. माझा चुलत काका (शरया नाना) सुद्धा तिकडे पडी टाकायचा.. वयाने तोही फार मोठा नव्हता. मला पण तिकडे झोपायला जाम आवडायचं पण आजीचा कडाडून विरोध असे. रात्री बेरात्री जाग आली तर पोरगं घाबरेल.. पण एकदा मजबूत हट्ट केला. झोपलो त्यांच्यात जावून.
... अपरात्री जाग आली... उन्हाळ्याची रात्र पण छान गार हवा. अख्ख खेडं चिडीचूप.. सामसूम.. नक्की किती वाजले होते काय माहित. मी शरया नानाला उठवलं. म्हटलं जोराची लागलीय..
एक कि दोन?
.. दोन?
स्टेजच्या मागच्या भिंतीवर खिळे ठोकलेले असायचे आणि त्यावर टीनपाट.. अश्या रात्री बेरात्रीच्या इमर्जन्सीची सोय. (मला नक्की आठवत नाही पण पाणी भरण्याचीही काही तरी सोय होती)
बरं जायचं कुठे अश्या वेळी तर चावडीच्या डाव्या हाताला एक पायवाट वर डोंगरात जाते. त्या वाटेत जे चढ लागतात त्याचा पहिला टप्पा.. “टोंगी”. त्याच्या सुरुवातीलाच एक एकुलतं घर होतं. मला एरव्हीही त्याच्या समोरून जाताना कसलीशी भीती वाटायची.
शरया नाना बिचकतच तयार झाला. शेवटी तो तिथला, तिथे वाढलेला.. मी म्हणजे त्याची जबाबदारीच.. Lol
मिट्ट अंधार, मुळात फार लाईट्स वगैरे नव्हत्या तेव्हा.. आणि विजेरी वगैरे कुणी ठेवायचं नाही. एक आजोबा होते ज्यांच्याकडे ती असे पण त्यांना कुणी ती मागायचं नाही.
चालायला लागलो.. मला आठवतय मान उजवीकडे करून थोडं मागे बघितलं होतं मी घाबरत घाबरत तेव्हा वर आभाळात चंद्रकोर टांगली होती,. तिचा प्रकाश आधार..
असाच थोडा पुढे गेलो आणि मी आहे तिथे थबकलो. पोटात भीतीचा भला मोठ्ठा गोळा. नानाने आधी माझ्याकडे बघितलं आणि नंतर मी कुठे बघतोय ते बघितलं त्याचंही उचललं पाऊल फ्रीज!
दूर त्या घराच्या अगदी समोर, घराकडे पाठ करून स्वच्छ शुभ्र साडीमध्ये एक स्त्री उभी होती.. पदर वाऱ्याने उडत होता..
त्या घरात एक स्त्री होती याची कल्पना मला होती पण ती साधारण गृहिणी होती त्यामुळे ती हि असणं शक्य नव्हतं. मग हि कोण?.. आणि त्या बिचारीच्या दारासमोर का उभी आहे? चेहरा नीट कळत नव्हता कारण आम्ही बरेच लांब होतो. मागे न वळता मागे आलो.. तिने नक्कीच आम्हाला बघितलं असणार.. पण तिची काहीच हालचाल झाली नाही..
आम्ही आता अश्या अंतरावर उभे होतो कि ती जराशी पुढे आली असती आणि आम्ही धूम पळालो असतो तर पंधरा वीस ढेंगामध्ये पोरांच्या वर जाऊन ऊडी मारू शकलो असतो. तेव्हा दोघे एकमेकांच्या धीराने तिथेच उभे राहिलो. तिची काहीच हालचाल झाली नाही. नाना धिटाईने सरळ चार पावलं पुढे गेला, मी ५०: ५० पोझिशन मध्ये उभा होतो. त्याच्या मागे तिरका तिरका दोन पावले आलो. नानाला धीर आला. आणखी दोन पावले पुढे.. ती जराही हलली नाही.. पदर मात्र उडतोय.
आता आम्ही एकमेकांच्या हाताला धरून सोबत चार पावलं पुढे गेलो. टीनपाटातल्या पाण्याने मातीत थेंबांची नक्षी काढली होती तोवर.
ठरवलं आता फक्त दोन चार पावलं आणखी. मग रिस्क नाही घ्यायची.. आपण धावायचं गणित करायचो आणि ती उडून यायची. धडाडत्या काळजाने चार पावलं पुढे आलो आणि...
नाना म्हटला,”सागर (टोपण).. कापड वाटतंय रं..
मी,” कपडाच आहे..”
एका उंच काठीवर एक कपडा (किंवा शर्टहि असेल) होता.. चंद्राचा प्रकाश त्यावर सरळ पडून अशी काही आकृती तयार झाली होती कि ज्याचं नाव ते.
पायात थोडीशी जान आली.
नाना,” जावूया का पुढे”?
मी म्हटलं राहू दे, या इथेच आणि उरलंय त्याच्यातच उरकून घेतो.. Lol
...
निघेपर्यंत एक सेकंदसुद्धा शर्टावरची नजर ढळू दिली नाही...
.....
दुसऱ्या दिवशी सकाळी.. बघायला आलो.. काठी होती.. कपडा नव्हता...
......
थोडा धीर दाखवला म्हणून एक किस्सा “अमानवीय” होता होता राहिला...

तुमचा अभिषेक -
यामागे करणी हा प्रकार असू शकतो का? >>> हो असू शकतो.

सध्या माझा एक मित्र भोगतोय, तो सविस्तर किस्सा नंतर किंवा सध्या सांगणे योग्य की नाही हे ठरवावे लागेल >>>
लवकर ठरवा.

विज्ञानंदास माझा एक मित्र आहे तो आणि त्याचे 5मित्र अमावस्ये च्या रात्रि भुत शोधायला आरे कॉलोनी मधे निघाले ,
त्यांना वाटले भुत दिसले तर आपण पळून जाऊ आणि तेवढाच एक भुत बघितल्याचा एक्सपीरियंस येइल , हे सारे गेले खरे तिथे , आणि थांबुन रात्रि 2 वाजेपर्यंत त्यानी पार्टी पण केलि . सारे घरी जायला निघाले , माझा मित्र रंजित चक्क त्यांच्याशी वेगळ्याच भाषेत बोलू लागला , ते सगळे समजुन गेले काय झाले ते , त्यांनी त्याच्या आई वडिलांना सर्व सांगितले , त्याला निट करायला बिड जिल्ल्ह्यत कोण्या एका बाई कड़े नेला तेंव्हा त्या बाई ने त्याच भुत काढल , आणि सांगीतल की ते कर्नपिशाच होत , (पण या मधल्या काळात त्यांने खुप सतावल तो लोकांचे सीक्रेट सर्वांसमोर सांगू लागला )

हे कस शक्य आहे ?

Ghost Space: The Mumbai Ghost - http://www.ghost-space.com/2010/05/the-mumbai-ghost.html?m=1

अभिनंदन आशु तुमच्या अमानवीय धाग्याचे २००१ झाले नवा बाफ काढा. अमानवीय २.
तुमच्या मुळे बरेचसे अमानवीय किस्से आमच्यासमोर आले. काहि किस्से घाबरावून गेले, काही चक्रावून गेले ,मज्जा आली , भीती ही वाटली तरी हा पुढचा "अमानवीय 2 "बाफ तुम्ही लवकर काढावा ही विनंती .

धन्यवाद
जाइ

अरे ही हाकच आहे की Proud
विपूत लिहून येते Happy
उद्या सकाळपर्यंत नवा धागा नाही निघाला तर आपणच काढुयात मग Happy

अरे आत्ताच पाहीलं..
आशुचँSSSप...आशुचँप...आशुचँSSSप...काँग्रॅटस्... Happy
दोन हजार लिमिट ए का?असंये का? मग नवा धागा उघडायला बोलवलंय का? बोलवा ना मग?इथंच पुढं जात आसल तरी बी नवा काढा की,धागा...

Pages