अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिन - हे सगळे घाग्याला भरकटवणारे कमेंटस प्लीज काढून टाका ना. >> होना दर वेळेस नविन प्रतिसाद बघून यावे तर काहीतरी फाल्तुपणा.

tyapeksha ya ID ne ch samajun ghetal je ghyayach te tar bar hoel Happy

अभिजीत भौ तुम्हाला प्रॉब्लेम नक्की काय आहे?? मी किस्से शेयर करायला सांगितले तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे?? उगाच फालतु कमेंट का मारत बसला आहात????? तुमच्या फालतु किश्श्यांना कोणी भाव दिला नाही तर उठ्सुट बाकीच्यांवर कशाला बोलत सुटताय??? तुमच्याकडे नसतील किस्से नका टाकु...उगाच लावालाव्या,कुचाळक्या करणं बंद करा.....अ‍ॅडमिन हे बघत नाही आहेत का???

नवशिक्यांचे व्हेजिटेबल सुप करन्या एवढे सोप्पे नसते किस्से शेयर करने ?>>>>>>>>>>>. तुमच्या सारखे खोटे किस्से टाकणार्यांपेक्षा ते सुप फार बरं आहे

आणि हा फालतुपणा करुन जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी तुम्हाला अ‍ॅप्रिशिएट करेल तर करत राहा असा फालतुपणा.....बेस्ट ऑफ लक

Anishka, shant ho ! Happy

नवशिक्यांचे व्हेजिटेबल सुप करन्या एवढे सोप्पे नसते किस्से शेयर करने
>>>
Personal comments nahi karal tar bar hoel abhijit.
Tumache kisse taddan falatu ahet, amhi kisse takayache ki nahi ha amacha personal choice ahe tenvha tumhi bhari kisse taka mhanun mage lagu naka. tumachya stories and kisse tumachyajaval theva hi namra vinanti.

ithun pudhe personal comments kelyat tar Admin kade takrar karavi lagel

tyapeksha ya ID ne ch samajun ghetal je ghyayach te tar bar hoel >>>> माबोवर समजुतदार आयडी निर्माण व्हायचेत अजुन

Asach kahi nahi mugdha Happy

asale kahi ID yetat ani sagalyana vaat anatat.

purvi ek 'kavi' ase hote
maz ek 'gazalakar' ase ale
madhye ek 'pakru tadnya ' ale hote

aata he bro - amachyakade taddan falatu ani khotya katha mubalak pramanat milatil.

aso!

रिया:amhi kisse
takayache ki nahi ha amacha personal choice
ahe

एक्साक्ट्ली मला हेच सांगायचे आहे , तुम्हाला वाचायचे असेल तर वाचा फालतू कमेंट करू नका (तुम्हाला कुणीही इथे जज म्हणून नाही बसवले ) ही अनिष्का पर्सनल झाली म्हणून मला ही ह्वाव लागल

जियो और जीने दो

अनिष्का :आताचे रस्ते डांबरी आहेत..
आताची माणसेही डांबरट आहेत>>>>>>>>>>>.. म्हणून इथे
तुम्ही डांबरट पणा करुन लोकांना वात का आणताय

ha dhaga sagalyanchya entertainment sathi ahe. amhala tumachya kissyani bore hot ahe
ani amhala mhanje mala ani anishkala nahi tar sagalyanach!

rahila prashn anishkane personal honyacha , tar ti je bolali te ithe tumache je chale chalu ahet tyawishayi bolali. muddam tumachya avalokanat jaun tumach lekhan kadhun tyawar comment karat nahiye he lakshat theva!

It's not me or Anishka who is asking you to stop, but everyone is fed up with you! please grow up!

ही अनिष्का पर्सनल झाली म्हणून मला ही ह्वाव लागल >>>>>>. मी तुमची मैत्रीण नाहीये मला अग तुगं करायला....
पर्सनल व्हायला मी तुमच्या प्रोफाईल मधे जाउन पाहिलं नाही तुम्ही काय लिहिलय आणि नाही ( जस तुम्ही माझ्या प्रोफाईल मधे जाउन सुप वगैरे बघुन आलात )....इथे जे किस्से तुम्ही टाकताय त्यावरुनच मी म्हणतेय.....तुम्ही ही इथल्याच कमेंटस वरुन बोला.....

ह्या अभिजित ब्रो ने काहीही पाणचट किस्से टाकले आहेत. हे अस्ले किस्से टाकणे 'ब्रो' ने बंद करावे ही नम्र् विनंती.

हो....जर मी इथल्याच कमेंट वरुन तुमच्याशी काही बोलतेय तर मला हे अपेक्षित आहे की तुम्हीही इथल्याच कमेंट वरुन वाद घाला... आणि मला अगं तुगं करण्याबाबत बोलताय तर मला एकच सांगावसं वाटतय की तो रिस्पेक्ट चा भाग आहे...इथे मोस्टली सर्व एकमेकांना आदरार्थी संबोधन वापरुनच बोलतात ( पर्सनली ओळखल्याशिवाय )....अर्थात कोणाला कशी हाक मारावी हे मी तुम्हाला शिकवणारी कोणीच नाही..पण तुम्ही मला अगं तुगं केलेलं मला आवडत नाहीये इतकच सांगायच आहे...

रिया: ha dhaga sagalyanchya entertainment sathi ahe.
amhala tumachya kissyani bore hot ahe
ani amhala mhanje mala ani anishkala nahi tar
sagalyanach!

वकील पत्र घेतल का "मा. बो " च्या सर्व सदस्यांचे

सर्वांसाठी त्यांची मत सोडून दया ( मत लादू नका ) े

Anishkane ithe tumhi je lihilay tyabaddal tumhala je kahi mhanal asel te mhanalay.

Amhi kai decide karu? disatay te dolyana.

Mi konach vakilpatra ghyayach ani konach nahi to maza vaiyaktik prashn ahe.

tumachi ka jalatey itaki?

ani amhala mhanje mala ani anishkala nahi tar
sagalyanach!>>>>>>>>>>>.. तुम्हाला तसं वाटतय तर त्याला आम्ही काहीच करु नाही शकत....

सर्वांसाठी वकिल पत्र घेण्याची पात्रता नाही अजुन आमची.....

Ani what do you exactly want to say?
MABO warachya pratyek sadasyane yeun tumhala ithe kisse taku naka as sangayala hav ka?
tas asel tar attach kiman 5-6 tari zalech.

tumacha nemaka akada kiti ahe?

Hava sodayala dusarikade ja krupaya
amhala tumachya havet kahi interest nahi

अकड़ा ?

Happy Wink Happy

आता तरी धाग्याला अनुसरुन चांगले किस्से येतील ही अपेक्षा....मला काही भुतं दिसत नाहीत....माहित असलेले किस्से टाकुन झालेत....त्यामुळे मी वाचुन कमेंट्स करणार..... Happy

त्यामुळे मी वाचुन कमेंट्स करणार..... >>>>>

किस्से खरे आहेत , त्यांना उगाच भयानक करायला खोटेपना मला टाकायला आवडत नाही .

कमेंट बोचक असू नये personal वाटते

अनिष्का., रिया, नताशा -

माझा अमानवीय किस्सा. अगदी लेटेस्ट

ह्या बाफवरच्या नॉन भूतांनी ह्या बाफवर घातलेला गोंधळ पाहून ती भूतं माझ्या कम्प्युटरवर आली आणि एकदम निळा स्क्रीन आला की. निळा स्क्रीन बघून माझी तंतरलीच एकदम. मग कळले की इथल्या बाष्कळपनाला कंटाळून ती माझ्या क्म्प्युटरवर आली. बघा तुमच्या कम्प्युटरवर आली असतील. त्यांना जरा खायला प्यायला द्या आणि बाफवर परत पाठवून द्या. मग इथल्या नॉन भूतांना तीच बरोबर शांत करतील.

माझ्या कॉम्प वर नाही आलियेत...वल्ले.... Happy मलाच भुक आवरत नाहीये...भुताना कुठुन खायला घालु???????????

सॉरी मी अवांतर केलं....

पण आता खरच भुतांचे किस्से टाका कोणीतरी

पेटला धागा. आशुचँप, आता लवकरच नवा धागा काढावा लागणार. ह्याची द्वीहजारी जवळ आली.
अजुन एक दिवस आग धगधगली तर आमावस्या यायची वाट नाही पहावी लागणार Wink

Pages