नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१/१०/२०१३ पासून करेन करेन म्हणताना आज १/५/२०१४ चा मुहूर्त उजाडला! स्ट्रॉबेरीक्रश वापरून सेट करायला ठेवले आहे.

मुग्धा मी पण केले आंबाफ्लेवर, व्हेनीला फ्लेवर आणि खस फ्लेवर मध्ये अब स्ट्रोबेरी आणि शहाळ्याची बारी.....
बाकी रेसपी हिट...
कॅमेरा नाहीए त्यामुळे फोटो नाही टाकले..... पण माझी मुलगी आयस्क्रीम खाऊन एकदम खुश आहे.. परत एकदा धन्यवाद ../\..

तेजस्विनी 19
तुम्ही वैनिला फ्लेवर साठी काय केलत
आय मीन batter मध्ये काय काय घेतलत

मला करायच आहे vanilaa फ्लेवरच

मुग्धा, आज मी मँगोच केलं तुझ्या रेसिपीनुसार. अगदी अप्रतिम जमल होतं.
घरी सर्वाना खूप आवडलं . नॅचरल्स सारख लागत होत सेम टु सेम. धन्यवाद.
अंजू, तू केलेलं ही मस्त दिसतयं फोटो मस्त आलाय.

मला पण आज मुहूर्त मिळाला. कधी पासून म्हणतेय करेन करेन .आंब्याच केल होत.
मुग्धे खरच किती किती किती ग गोड तू. आत्ता वेगवेगळे फ्लेवर ट्राय करणार Happy

ह्या रेसिपी नी कुल्फी करता येपरदेशात कुल्फी मोल्ड नसतील
तर कुल्फी कशी सेट करता येईल? मदत करा प्लिज़़.

ह्या रेसिपी नी कुल्फी करता येईल का? परदेशात कुल्फी मोल्ड नसतील
तर कुल्फी कशी सेट करता येईल? मदत करा प्लिज़़.

आभा कुल्फि करता येईल की नाही माहीत नाही. तुम्ही जपानात असता ना? कुल्फिचा साचा आयकियात मिळतो. तिकडे आहे ना आयकिया?

ह्या पद्धतीने कुल्फी केली आहे. फारच अप्रतिम होते. फळांच्या गराऐवजी वेलची,
केशर आणि थोडी पिस्त्याची पूड घातली. कुल्फी मोल्ड्स नसतील तरीही नुसतं आईस्क्रीम म्हणून सुद्धा खाता येईल. सर्व करताना थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालायचे. अहाहा!
कधी एकदा करून खात्ये असं झालंय.

मी सेट करायला ठेवलंय शहाळ्याचं..
कसं होणार आहे भिती वाटतेय>>>> ए शहाणे... फोटो टाक म्हटल होत तुला. टाकले नाहीस म्हणजे आक्री चांगल झालय आणि ते तु लग्गेच हादडलस फोटो बिटो विसरलीस

मुग्धे केलं बरं का आंब्याचे आईसक्रिम, तुझ्या रेसिपीने. धन्यवाद>>>>> अन्जुडे फोटु मळ्य्म्म्म्म

सर्वांना आक्री आवडाल्याबद्दल धन्स.

अन्जू , छान दिस्तय............... लगेच खाऊशी वाटतय................ Happy

ह्या पद्धतीने अन्जीरचे करता येईलका???????

मैत्रीणींनो धन्यवाद, आता सिंगापुरात आहे. मुस्तफात बघणार आहेच.
पण अजुन काही आईडीया असेल तर म्हणुन विचारले. आईकिआ
मध्ये मेटल चा कुल्फी सेट असेल का? तिथेही नक्की बघेन. परत एकदा घन्यवाद.

आयकियात प्लॅस्टिकचा आहे. मी तिकडूनच घेतलाय.

मुग्धा आईस्क्रिम भारीच आहे. मी फोटो बघून समाधान मानून घेतेय. Happy

The आभा , कुल्फीसाठी लाजो यांनी दिली आहे ती रेसिप बघाल का? ऑसम कुल्फी होते. सिंगापूर च्या मी ट्राय केलेल्या सगळ्या हॉटेल्समधे टुकार कुल्फी होती. त्यामुळे तिथे असताना लाजो रेसिपी जिंदाबाद. Happy
मुग्धटली, त्तुम्ही दिलेल्या रेसिपी प्रमाणे कालच आंबा आईस्क्रीम केले होते . अत्ता पर्यंत अनेक वेळा सताफळ , चिकू आईस्क्रीम केले आहे. मस्त सोप्पी रेसिपी आहे. थँक्स. आईस्क्रमचा लगेच फडशा पडल्याने फोटो काढता आला नाही.

ऑर्कीड इथल्या बर्‍याच मंडळींच अस झालय... आइस्क्रीम फ्रिजमधुन बाहेर आल की कधी एकदा पोटात जातय अस होउन कोणी फोटो काढायच्या भानगडीत पडतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे आंबा, सिताफळ, चिकु यांना बर्‍याचदा आइस्क्रीमात घालुन झालय त्यामुळे त्यांचे फोटो नसले तरी काही प्रोब्लेम नाही.. यात काही व्हरायटी केली असेल तर फोटो नक्की काढुन टाकावा..

व्हेनीला फ्लेवर आणि खस फ्लेवर>>>> यासाठी काय घालत तेजस्विनी? व्हॅनिला इसेन्स आणि खस सरबत का?

Pages