Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योकुने एमै पेक्षाही जास्त
योकुने एमै पेक्षाही जास्त विचार करून मेनु प्लान केलाय
ही ही ही...
ही ही ही... :p
लेकीच्या चौथ्या
लेकीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त घरीच पार्टी ठेवली आहे. साधारणपणे ३२ मोठे आणि २० लहान मुले असतील (वयोगट ३ ते १० वर्षे). काय बेत ठेवावा. छोले आणि पावभाजीला सोडून. तिच्या आधीच्या वादिला झालंय आणि बरंच कॉमन आहे. बरेच ठिकाणी तोच बेत असतो. पिझ्झा नकोय, इतक्या लोकांसाठी मॅनेज करणं कठीण वाटतंय. मुलांना नूडल्स ठेवावेत का? की फ्राईड राईस ठेवावा? की दोन्ही? आणि जोडीला काय ठेवू? आणि मोठ्यांसाठी?
केक आणि जुसेस व कोल्ड-ड्रिन्क्स तर असतीलच. गोड म्हणून अन्गूर गुलाबजाम कसे वाटतात? आणि आईसक्रीम असेलच.
१२५ लोकासाठी वरण or पालक दाल
१२५ लोकासाठी वरण or पालक दाल करायचा बेत आहे.
किती quart करावी लागेल?
मोठ्याकरता वेगळा मेन्यू +
मोठ्याकरता वेगळा मेन्यू + त्यातलाच थोडा, अन अजून काही तरी असं छोट्यांना असं आहे का?
मग लहानांकरता लहान लहान पिझ्झे असतात त्यातले ठेवता येतील. बाकी बरेच मेन्यू काँबोज आहेत ईथेच.
गोगो, बिर्यानी, रायता, मिर्च
गोगो, बिर्यानी, रायता, मिर्च का सालन
स्टार्टर - गोबी मंचुरीयन, रगडा पॅटिस आणि पाणी पुरी, भेळ
सगळं मुलांना ह्यातलं आवडतचं, वेगळं काहीच करायची गरज नाही.
पिन्कु, १५ क्वॉर्टची तयार पालक दाल पुरेल.
धन्यवाद प्रीति.
धन्यवाद प्रीति.
क्वार्ट म्हणजे काय?
क्वार्ट म्हणजे काय?
थँक्स प्रीती. अजुन काही
थँक्स प्रीती.
अजुन काही आयडीयाज असतील तर सांगा...
इतक्या लोकान्सठि theme menu
इतक्या लोकान्सठि theme menu बरे पडतात .शिवाय खुप variety नको - लोक बर्याच वेळी एखाद्याच पदार्थावर तुटुन पडतात ...मग ईतर गोष्टी उरतात पण तो एक पदार्थ मात्र कमी पडतो , असा माझा अनुभव आहे (कधितरी थोडी लाजच अनुभवलेली आहे ). खाली काही tried and tested मेनु देत आहे - पहा काही मदत होते का
- मिसळ पार्टी ( मिसळ -पाव /दही बुत्ती / पन्हे किन्वा पियुष/लस्सि)
- भेळ पार्टी ( भेळ / रगडा पॅटिस /दही वडे / जल जीरा - जोडीला चट्ण्या)
-barbeque पार्टी(वेगवेग्ळ्या grilled veggies / पनीर /कबाब , पुलाव , corn चाट , लिम्बु सरबत - जोडीला kahi dips ही dips readymade किन्वा आपल्या regular चट्ण्या - पुदिना , दाण्यान्ची ओली चटणी , tomato चटणी etc.कबाब म्हणुन अळुवडी , पालक पॅटिस . कोबी वड्या ... इत्यादी आपल्या वड्या एकदम भाव खाउन जातात
-Indo चायनीज
गोबी मंचुरीयन , शेझ्वान baby corn , garlic mushroom ,fried rice , noodles -बरोबर शेझ्वान चटणी , ग्रीन चिली सोया सॉस etc . Drink म्हणुन coke
- mumbai Special
वडा पाव , दाबेली , मटार पुलाव , कुल्फि
अरे वा प्रीति, मस्त
अरे वा प्रीति, मस्त सजेशन्स!
बटाटेवडे-चटणी / मेदूवडा-चटणी / साबुदाणा वडे-चटणी / कटलेट्स किंवा आलू टिक्की घालून केलेले सैंडविच वा बर्गर्स / ब्रेड पकोडे - चटणी.
आणखी एक टिपिकल मेनू पदार्थ म्हणजे समोसे / समोसा चाट वगैरे. आलू समोसे, कचोरी इ.
डोसे गाडी लावली तर मुले व मोठे आवडीप्रमाणे डोसा/उत्ताप्पा खाऊ शकतात.
वत्सला, क्वार्ट हे
वत्सला, क्वार्ट हे व्हॉल्युमचं युनिट आहे. जनरली भांड्यांवर लिहिलेलं असतं.

अरुंधती,
पिंकु, हे प्रमाण मी अजुन एक भाजी आहे असे समजुन आहे.
जर २ भाज्या असतील तर १२ क्वार्ट कर, जर ३ भाज्या असतील तर १०च पुरेल
इथे नक्की लिही, पुरलं कि उरलं वरण.
समोसा असेल तर आणखी काय
समोसा असेल तर आणखी काय ठेवल्यास थोडी वरायटी कम पोटभरी होईल? पार्कमधल्या पार्टीसाठी हवंय. घरी बनवलं नाही तरी चालणार आहे. समोसे मागवू त्यांनाच ऑर्डर देऊ. आभार्स
वेका चमचमीत हवे असल्यास रगडा
वेका
चमचमीत हवे असल्यास रगडा पॅटिस /पाव भाजी /चना चाट
थोडे साधे हवे असल्यास इडली /ढोकळा /sandwich
प्रिती, भाजी एकच आहे. चपाती,
प्रिती, भाजी एकच आहे. चपाती, वेज कोर्मा, पालक वरण, भात, सलाड, श्रीखन्ड, लोणचे-पापड असा बेत आहे.
ह्या विकान्ताला आहे, झाले कि नक्की कळवते इथे.
वेका चेंबुर ला झामा स्वीट्स
वेका चेंबुर ला झामा स्वीट्स मधे समोसा + छोले देतात...मे बी तुम्हाला माहीत असेल..पण ते छोले आणि २ समोसे खाल्ले तरी जेवण जात नाही...
सायन च्या छोले समोश्यास तोडच
सायन च्या छोले समोश्यास तोडच नाहीये... :p
योकु, सायन काय? तुझ्यासारख्या
योकु, सायन काय? तुझ्यासारख्या खवय्याकडून ही अपेक्षा नव्हती. गुरुकृपाचे समोसा-छोले म्हण.
हं मला ते नाव काही केल्या
हं मला ते नाव काही केल्या आठवत नवतं...
जिभेवरच्या पाण्यात वाहून गेलेलं बहुतेक!
सायो, यांना दीपच्या
सायो, यांना दीपच्या समोशाबद्दल सांगुयात का?
अनिश्का चेंबुर कशाला आमच्या
अनिश्का चेंबुर कशाला आमच्या रुपारेलच्या कँटिनमध्ये समोशाबरोबर मला वाटतं रगडा असायचा तो पण यम्म्म्म
बरं झालं आठवण करून दिलीस. असो सेंट्रलची खादाडी डायरे़क्ट कर्जतच्या बटाटावड्ञाकडे येऊन तिथेच थांबली आहे. गरज असल्यास ज्यांनी त्यांनी
घेऊन ठेवणे 
सध्या मात्र समोसे म्हटले की दिपचेच (विकेंडलाच केलेल्या स्नॅकची शपथ
) टडोपा इ.इ.इ.इ.
पण मला रगडा समोसे वगैरे नकोय (हमार पब्लिक सिर्फ समोसे पे तुट पडती हय म्हणून) वेगळा पदार्थ हवा आहे (कमी कटकटीचा असल्यास उत्तमच)
पुन्यांदा आभार्स
पण मला रगडा समोसे वगैरे नकोय
पण मला रगडा समोसे वगैरे नकोय (हमार पब्लिक सिर्फ समोसे पे तुट पडती हय म्हणून) वेगळा पदार्थ हवा आहे (कमी कटकटीचा असल्यास उत्तमच) >>> समोसा चाट = मायनस रगडा + थोड्या जास्त चटण्या, गोड + तिखट, चाट मसाला, दही (हवं असल्यास) बाचिकांटोकोहीमी. हे पण छान लागतं.
dhokala! veggie
dhokala!
veggie cutlet
aluvadi
kobi-vaDyaa
koradI bhel
dadpe pohe(ghari karava lagatil)
चना चाट / स्प्राऊटेड हिरवे
चना चाट / स्प्राऊटेड हिरवे मूग चाट / स्वीट कॊर्न चाट / सुंदल / कैरीची किंवा आंब्याची डाळ / भेळ / दही-बटाटा-शेव-पुरी/ पाणी पुरी
ओके बरेच पर्याय आहे.
ओके बरेच पर्याय आहे. संध्याकाळी घरी गेल्यावर साधक-बाधक चर्चा करणेंत येईल.
>> बाचिकांटोकोहीमी हे काय आहे? डोकं गरगरलं माझं
बाचिकांटोकोहीमी >>>बारिक
बाचिकांटोकोहीमी >>>बारिक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची.
(No subject)
धन्सं गं अल्पना.. आणि योकु
धन्सं गं अल्पना..
आणि योकु ____________/\_____________
सुरुवातीला समोसा, केक, वेफर्स
सुरुवातीला समोसा, केक, वेफर्स आणि जेवायला नूडल्स, फ्राईड राईस + वेज मन्चुरिअन ठेवला तर कसं वाटेल (लेकीच्या ४थ्या वाढदिवसाच्या पार्टीला) ?
सोबत ज्युसेस व कोल्ड ड्रिन्क्स असतीलच. आणि शेवटी आईस्क्रीम.
खूपच सुटसुटीत वाटतोय का हा बेत? पण जनरली अनुभव असा आहे की समोसा आणि केक खाल्ला की जेवणासाठी जागा उरत नाही जास्त पोटात. लोक मेन कोर्स जास्त घेत नाहीत. काय वाटतं?
जनरली अनुभव असा आहे की समोसा
जनरली अनुभव असा आहे की समोसा आणि केक खाल्ला की जेवणासाठी जागा उरत नाही जास्त पोटात. लोक मेन कोर्स जास्त घेत नाहीत>>>+१
नूडल्स / फ्राईड राईस पैकी एक + वेज मन्चुरिअन मग व्यवस्थित खपेल. पार्टीची वेळ काय असेल आणि हे सगळं तुम्ही करणार असाल तर खपेल सुद्धा; नूडल्स + फ्राईड राईस + वेज मन्चुरिअन. जर ऑर्डर करणार असाल तर आधी टेस्टिन्ग करून बघा, सगळ्याची चव कशी आहे ते. सर्व्हिन्ग अरेन्जमेन्ट कशी आहे त्यावर पण खप अवलंबून आहे. बफे लावला तर एखादाच पदार्थ खूप खपू शकतो जर pesonal serving असेल तर फूड मॅनेजमेन्ट करता येइल.
Pages