आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू बोलव मी आले नव्हते
असे कधीही झाले नव्हते

कसे प्रसवले दु:ख अचानक
अजून तर ते न्हाले नव्हते

प्रशांत पोरे

न्हाले नव्हते<< वाह पोरे वाह
माझ्या माहीतीप्रमाणे मराठी शायरीत ही कल्पना वापरून शेर ह्या आधी झाला नसावा
न्हाले न्हवते = नहाण आले नव्हते ...
भन्नाट आवडला हा शेर

मागे एक मतला झाला होता . पण नंतर कवाफी विशेष न मिळाल्याने गझल झालीच नाही . असो .

मला तर चालला असता पुजेला देव कोणीही
ह्रदय घडवीण मी त्याचे दगड तू ठेव कोणीही

-सुशांत Happy

रेखीव तरी आहेस किती
मोडून पहा ना मूस कधी

=====================

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

-चित्तरंजन भट

पहा जरा भांडून मनाशी..गझल तुलाही लिहिता येइल
दुनियेपासुन दूर राहुनी दुनियेवरती लिहिता येइल

--सुशांत

फुलाशी गप्पांत त्याच्या..शब्दांच्या शृंकला,
माणूस पाहुनी मात्र...तो न जाने का भुंकला!

मंदिरात मूर्तीशी हात त्याने जोडीले,
उतरताना पायऱ्या...भिकाऱ्यापाशी तो थुंकला.

नरकाचे शाप दिले...त्यासी जगाने
अन तो म्हणे, मी स्वर्ग जिंकला

-- आशिष राणे

फुलाशी गप्पांत त्याच्या..शब्दांच्या शृंकला,
माणूस पाहुनी मात्र...तो न जाने का भुंकला!

मंदिरात मूर्तीशी हात त्याने जोडीले,
उतरताना पायऱ्या...भिकाऱ्यापाशी तो थुंकला.

नरकाचे शाप दिले...त्यासी जगाने
अन तो म्हणे, मी स्वर्ग जिंकला>>>>>>>>.

तिन्ही शेर जबरदस्त... जियो

@समीर चव्हाण
तशी मला शेर लिहायची सवय नाहीये.
शेर लिहिण्याचे काही नियम असतील तर नक्की सांगा
मी तसे लिहिण्याचा प्रयत्न करेन

दोन्ही ओळी एका वृत्तात हव्यात, ही तांत्रिक बाब.
शेर समजून घेण्यासाठी काही गझल वाचल्यात तर कळू शकेल.

समीर

गच्चीवरी बसाया येऊ नकोस चंद्रा
माझ्या इमारतीचा पाया हवेत आहे <<<

क्षमस्व, शेर म्हणावा असे ह्यात काहीही नाही.

गच्चीवरी बसाया येऊ नकोस चंद्रा
माझ्या इमारतीचा पाया हवेत आहे <<<

काय म्हणायचं तेच स्पष्ट होत नाही मलातरी.

एक नवीन शेरः

बलाट माझ्या भाळावर मी लिहून आलो
सुनावणी कोणतीच ना ऐश्या दरबारी

समीर चव्हाण

माझेही दोन नवीन शेरः

तुला हव्या त्या क्षणी कधीही तुझ्या नशीबी नसेन मी
तुला म्हणालो नसेन मी हे मला म्हणालो असेन मी

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

-'बेफिकीर'!

तुला हव्या त्या क्षणी कधीही तुझ्या नशीबी नसेन मी
तुला म्हणालो नसेन मी हे मला म्हणालो असेन मी

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

व्वाह!!!!!!!! Happy

दुसरा शेर तर...... खूपच आवडला!!!!!!!!!!!! .....धन्यवाद सर!

Happy

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

व्वा.

जयदीपः आपले बरोबर आहे, बलाट म्हणजे (खोटा) आळ.
बलांट असाही शब्द दिसत आहे.

बेफीजींचे दोन्ही व समीरजींचा एक शेर आवडले
बलांट /बलाट हे दोनही शब्द माझ्यासाठी नवे मी 'बालंट' असा शब्द ऐकला आहे

Pages