केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे १० तारखेलाच झालं मतदान. दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाकडून पोल चीट्स मिळाल्या होत्या. सकाळी ८-८.३० लाच गेलो होतो मतदानाला. त्या वेळी अजिब्बात गर्दी नव्हती. लगेच पाच मिनीटात मोकळे.

.दोन दिवस खपून मतदान नक्की करा असं एका पार्टीतर्फे पाच एकशे फोन केले अन मीच मतदान करू शक ले नाही कारण यादीत नाव नव्हते. ़़.. जीवंत असताना नाव कसं काय गायब झालं ? ह्यापूर्वी मतदान केलंय नवर्याच नाव आहे... २२मार्च च्या आधी बुध्दी का झाली नाही यादी पाहायची... फार वाईट वाटले. विदर्भात असं खूप मोठ्या प्रमाणात घडलंय.

सुट्टी नाही तर रजा टाका.
नाहीतर पुढची पाच वर्षे राजकारणावर काही बोलू/ लिहू नका.

अल्पना शाब्बास! मंजू अरेरे!

वोटिंगसाठी अर्धा तास कसेही अ‍ॅडजस्ट करु शकता.. >>>> मी दुसर्या ठिकाणी आहे... आणि इथे त्यावेळी स्टाफ आणि टेंडर चालु आहे...

विधानसभा च्या वेळेला नक्की आहे मतदान....

उदयन,
काँग्रेसवाला उमेदवार पडेल की तुमचं मत चुकलं तर Sad हापिशल सुट्टी असते मतदानाची.
मी माझ्या ऑन ड्यूटी स्टाफला ३-३ तासाच्या सुट्ट्या अ‍ॅडजस्ट करून दिल्यात. (इस्पितळ ही अत्यावश्यक सेवा असली तरीही)
शिवाय,
Clipboard01.jpg

कोल्हापूर शहर मतदान १७ एप्रिल रोजी आहे. आमच्या बिल्डिंगमधील सर्वांची मतदान प्रक्रियेचे कार्डस चार दिवसापूर्वीच आली आहेत. या संदर्भातील एक किस्सा सांगण्यासारखा आहे. कलेक्टर ऑफिसकडील तीन पुरूष व दोन स्त्रिया भर उन्हात (४० तापमान होते त्या दिवशी) आपल्याजवळील सारे दप्तर सांभाळत, विविध फाईल्स, ते कार्डसचे गठ्ठे घेत....अक्षरशः घामाघूम होऊन आले....प्रत्येक फ्लॅटधारकाजवळ घरातील मतदारांची चौकशी करून योग्य ती स्लिप कुटुंब प्रमुखाला देऊन सह्या घेणे चालू होते. माझा फ्लॅट तिसर्‍या मजल्यावर... अपार्टमेन्टला लिफ्ट नाही....तरीही चेहर्‍यावर कोणतीही तक्रार न दाखविता त्या पाच लोकांनी हे महत्त्वाचे काम पूर्ण केले.

शेवटचा फ्लॅट माझाच असल्याने आता या बिल्डिंगमधील त्यांचे काम पूर्ण झाले होते....म्हणून मी त्याना पाच मिनिटांसाठी थांबविले व सर्वांना घाईघाईने गारेगार लिंबू सरबत करून दिले....ते घेताना त्या कर्मचार्‍यांच्या घामाजलेल्या चेहर्‍यावर पसरलेला आनंद पाहून मला समाधान झाले....!

सरकारच्या संबंधित विभागाने केलेली अशी सारी तयारी आणि वेळेवर मतदाराकडे पोच केलेली पत्रे पाहता एक कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान केलेच पाहिजे अशी भावना मनी उमटली आहे. मतदान केन्द्रही अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरच आले आहे. १७ ला मी जाणारच.

माझ्या आजेचं नावंही नाहीये मतदार यादीत. तिला मतदान करायच. काय करावं?

मी १७ ला मतदान करणार. मतदानाबाबत उदासीन असलेल्या माझ्या मित्राला आणि एका मैत्रिणीला अनेक धमक्या देऊन मतदानासाठी राजी केलंय. तिघंही सोबत मतदान करायला जाणार.

देशा बाहेर रहाण्याचा हा एक मोठा गैर फायदा आहे ...:(

भारतात असताना प्रत्येक वेळी इमानदारीत मतदान केले आहे

पुढच्या मतदाना पर्यन्त देशाबाहेरील लोकान साठी पोस्टा ने मतदाना ची सोय होणार आहे असे ऐकत आहे ...
आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहोत...

मतदार राजा --तुला अभीवादन .....
images.jpg

रिया....

"मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे..." याबद्दल मी त्या टीमला विचारले होते मुद्दाम. तर त्यांच्यातील प्रमुखाने "एक तर कलेक्टर ऑफिस वा तहसिलदार कार्यालयात अर्जासह भेटा....तितका वेळ नसेल तर लागलीच अधिकृत पक्षाच्या उमेदवाराच्या पक्ष बोर्ड ऑफिसमध्ये संपर्क साधावा. प्रत्येक उमेदवाराने काही लोक केवळ यासाठीच तैनात केलेले आहेत." तुमच्या आजींच्या नावासंदर्भात (आता मतदानासाठी दोनच दिवस राहिले असल्याने) तुम्ही भागातील उमेदवाराच्या प्रतिनिधींशी संपर्क साधणे उत्तम....ते शोधून देतील कार्ड.

माझ्या दिवंगत आईचं नाव मतदारयादीतून काढण्यासाठीची कागदपत्रे किमान ४ वेळा पूर्ण केली आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच पूर्तता केली होती. अजूनही आईच्या नावाची स्लिप येते.
आता बाबांना तेच तेच कागदपत्र सबमिट करायचाही कंटाळा आलाय. आणि त्यांचे वय बघता हे खेटे मारत रहाणं त्यांना शक्यही नाहीये.

बाकी मतदान कर्तव्य म्हणून करायचे वगैरे ठिके. पण निवडून कुणीही येवो सामान्य माणसाच्या नशिबातली महागाई आणि इतर सगळ्या गोष्टींना कुलूप लागणार नाही यावर माझा विश्वास पक्का होत चाललेला आहे.

मामा, धन्यवाद. पण आजीला दगदग शक्य नाही आणि आईला इलेक्शन ड्युटी असल्याने वेळ नाही. मलाही सुट्टी नाहीये आज उद्या त्यामुळे ही सगळी पळापळ जमणार नाही असं वाटतय. काय होतंय बघुया.
पण मागच्या इलेक्शन पर्यंत यादीत असलेलं नाव गेलं कुठे? Uhoh

बाकी मतदान कर्तव्य म्हणून करायचे वगैरे ठिके. पण निवडून कुणीही येवो सामान्य माणसाच्या नशिबातली महागाई आणि इतर सगळ्या गोष्टींना कुलूप लागणार नाही यावर माझा विश्वास पक्का होत चाललेला आहे.<<<

अनुमोदन!

आमच्या कोथरुडची तर्‍हाच अजब आहे.

१. आमचा भाग कोथरुडमध्ये असूनही बारामती विधानसभा मतदार संघात मोडतो (म्हणे)

२. परवाच्या दिवशी मतदान आहे आणि अजुन इथे 'उभे' कोण आहे हेही समजलेले नाही.

३. प्रचार करण्याच्या तर लायकीचाही आमचा भाग कोणाला वाटत नसावा.

४. नांवे, स्लिपा इतकेच काय तर मतदान केंद्र कुठे आहे ह्याचाही सगळा आनंद आहे.

आणि म्हणे 'केलं की नाही?'

Light 1

बेफी, तुम्ही कमळालाच मत देणार कुणीही उमेदवार असला तरी. मग कशाला टेन्शन करताय?
असो.
मतदान करण्या आधी, पंजासमोरचं बटन दाबून मशिन चालू असल्याची खात्री करून घ्या म्हणजे झालं! Happy

आमच्या घरातल्या ५ पैकी ३ जाणांचीच नावे यादीत आहेत.. आजोबा आणि आईचे नावच यादीतून गायब झाले आहे.. दरवेळेस आम्ही एकत्रच मतदानाला जातो.. पण गेल्या यादीत असलेली नावे अचानक कशी गायब होतात हे गौडबंगालच आहे..

आपल्या भारत देशाने आम्हा परदेशी स्थित नागरिकांना इमेल वगैरेंनी मतदान करायची सोय उपलब्ध करून दिलेली नाही.

अहो तुम्ही तिकडून मतदान करता येत नाही म्हणून अस्वस्थ आहात? इथे जे आहेत त्यांनाच मतदान करता येत नाही आहे.

मुंबईची अनेक कुटुंबे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरला पैसे उधळत आहेत.

आता अशी वेळ आली आहे की कोणत्याही मतदान केंद्रात जाऊन कोणालाही मत देता यावे अशी सोय व्हायला हवी आहे.

ताई उभ्या असतात आमच्याइथे!
<<
बघा! म्हंजी तुम्हास्नी ठावं हाय कोण हुबं हाये त्ये.
मग
>>
२. परवाच्या दिवशी मतदान आहे आणि अजुन इथे 'उभे' कोण आहे हेही समजलेले नाही.
<<
याला भाजपेयी मिसइन्फर्मेसन प्राब्लेम म्हणावा का?
का ताईंना 'उभे' र्हाता येणं शक्य न्हाईच, असे तुमास्नी म्हानाचं हाये? Wink
(उभे ची अवतरणचिन्हे तुमच्या वाक्यातून साभार)

असो.

पंजा नाय तं घड्याळाम्होरलं बटन दाबा. आपल्याला काय, मशीन चालू असल्याची खात्री करून घेण्याशी मतलब.

अहो इब्लिस, एकट्या ताईच उभ्या असल्या तर निवडणूक अर्थपूर्ण होईल तरी का? बिनविरोध नाही का यायच्या त्या? जगात काही इतरही पक्ष असतात ह्याची काही कल्पना आहे का आपल्याला? Light 1

इब्लिसदादा Uhoh
नुसतं कोणता पक्ष आपल्या एरियात आहे ते माहीत असणं पुरेसं असतं का? उमेदवार कोण ते माहीत नको?
काल परवा ऑफिसात यावरुनच वाद झाले एकाशी खुप.
तो म्हणे उमेदवार कोणी का असेना मी चिन्ह पाहुन मत देणार Uhoh
वा रे जागरुक नागरिक Sad

रिया, सगळीकडे हेच चालले आहे. एक तर माणूस पाहून (मग तो कोणत्याही पक्षात का जाईनात) तरी मत देतात किंवा पक्ष पाहून तरी (मग उमेदवार तुरुंगात का असेनात).

त्या शिवाय का मुलायलसारखे नालायक वर्षानुवर्षे निवडून येतात?

माझं तर स्पष्ट मत आहे की माणुस पाहुनच मत द्या रे. पक्ष पाहुन काय मत द्यायचं? Sad
मी व्यक्ती पाहुन मत देते. पक्ष पाहुन नाही. कारण मला कोणताच पक्ष क्लिन वाटत नाही.

उमेदवार बघूनच मत द्यायला हवं. पक्षाला काही अर्थ नाही. पंजा, घड्याळ, कमळ, इंजिन, धनुष्यबाण आणि अजून कोणीही... सगळे एका माळेचे मणी. वरवरचे अजेंडे वेगळे. आतमधे सर्वांचा अजेंडा जाऊ तिथे खाऊ यापलिकडे नाही.
आपल्या भागात चुकून काही काम झालं असेल तर ते करणारा उमेदवार आपला एवढंच बघितलेलं बरं. तेही झालेलं नसेल तर निगेटिव्ह व्होटींग नावाचा जोक आहेच.

रिया,
बेफ़िंच्या गल्लीत ताई (सुप्रिया सुळे) उभ्या आहेत, हे त्यांना ठाउक आहे. आता कमळवाला कोण याची उत्सुकता असेल, अन कमळवाले प्रचार करायला उदासिन असतील किंवा आपल्याच घरची मतं आहेत, कशाला प्रचार करा या भ्रमात असतील, तर त्याला कुणाचा काय इलाज?

शिवाय
नमो नमो करत डोळे झाकून, काय वाट्टेल ते उमेदवार घुसले असले, तरी कमळावर शिक्का मारा असं 'ते' म्हणताहेत.
मग कसला आला जागरुकपणा?

अन म्हणे काँग्रेसचे गट्ठा मतदान असते Proud

Pages