केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि मतदार याद्यात घोटाळा
आमच्या खास प्रतींनिधिकडून
पुण्यात दोन लाख मतदारांचे नाव यादीतून गायब , मतदार यादीत आढळली सोलापूर ची नावे , अनेक ठिकाणी मतदान यंत्रात घोळ आढळला , काही ठिकाणी मतदान थांबवण्याची शक्यता .
बाडमेर मध्ये सुद्धा मतदान थांबवले .लोकांचा लोकशाही वरून विश्वास उडू नये म्हणून कॉंग्रेस प्रेरित प्रसार माध्यमे बातम्या दाखवत नाही अशी टीका स्थानिक नेत्यांनी केली .
गेल्या निवडणुकीत कर्नाटकात असली मतदान यंत्रे मिळाली होती , प्रत्येक तिसरे मत कॉंग्रेस ला जाणार मग तुम्ही कोणतेही बटन दाबा .
अजून सुद्धा अमेरिका , जपान , फ्रांस हे देश शिक्का पद्धत वापरतात , निवडणुकी आधीच जपानी कंपन्या नि मतदान यंत्रातले दोष दाखवले होते . आपण कधी सुधारणार ?

http://indiaevm.org/

India's EVMs are Vulnerable to Fraud

पुण्यात मतदान यंत्रात बिघाड, कोणतेही बटण दाबा मत काँग्रेसलाच!
http://maharashtratimes.indiatimes.com/liveblog/33847122.cms या लिंकवर पहा लाईव्ह ब्लॉग...
‪#‎pune‬ ‪#‎EVM‬ ‪#‎Elections2014‬ ‪#‎myfirstvote‬ ‪#‎LSPolls‬ ‪#‎India2014‬ maharashtratimes

खाजपेयी चे कारस्थान

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/congress/articleshow/33210...

कुठलेही बटन दाबले तर भाजपाला मत

गेल्या निवडणुकीत कर्नाटकात असली मतदान यंत्रे मिळाली होती , प्रत्येक तिसरे मत कॉंग्रेस ला जाणार मग तुम्ही कोणतेही बटन दाबा .>>>>>>>>> असे असते तर गुजरात मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजप आले नस्ते

भाज्पाला सत्तेवरुन दुर केले की लगेच यांचे समर्थक असले प्रकार आहेत म्हणुन सुरु करतात ... कैच्याकै आरोप लावणे सवयच आहे भाज्प्यांना

दोन वेळा फॉर्म भरल्यानंतर मतदार यादीत नाव आले, वोटिंग कार्ड तर मिळालेच नाही पण आज लग्नानंतर पहिल्यांदाच पनवेल मध्ये मतदान केले Happy

इब्लिसांसारखे पिसाळलेले जे फेसबूकवर आहेत त्यांनी लिहिले की हत्तीचे बटन दाबले की कमळाचा दिवा लागतोय.
<<
बेफी,
तिथेही लोकांनी सळो की पळो केलंय का तुम्हाला? अरेरे Lol
जौद्या. आज सुट्टीची सक्काळी सक्काळीच सुरू केलेली दिसतेय. स्टॉक पुरवून वापरा. ड्राय डे आहे आज. Wink

@ लिंबूजी ह्या वेळचे resolution बरेच बरे आहे. नाहीतर ह्यापूर्वी जी परिपत्रके निघायची त्यात बर्‍याच पळवाटा आणि exceptions असायचे. पूर्वीची परिपत्र्के बरेचदा फक्त शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या सुट्टीबद्द्लच जास्त भाष्य करायची.

कंपनीने फुल्ल दिवस फुल्ल पगारी सुट्टी दिल्याने येत्या २४ तारखेला दुपारी बारा वाजता आरामात उठून यंदा मतदान १०० टक्के केले जाणार.

तेवढे केल्यावर धाग्यावर नाव झळकवा Wink

झालं एकदाच मतदान....

आमच्या इथल्या शाळेत एकूण पाच प्रभागांचे मतदान होते.. १०९, ११०, १११, ११२, ११३..

११३ सोडल्यास बाकी चारही ठिकाणी आत्ता ४:३० वाजता किमान ५० जणांची रांग होती.. आणि ११३ला माझ्या पुढे फक्त ४ जण होते... आणि हा विभाग बहुतांशी सोसायटी मध्ये राहणार्‍या लोकांचा आहे... ह्यांना देव मतदान करण्याची सुबुद्धी कधी देणार त्यालाच माहिती... ही दरवेळेसचीच रड आहे...

आज सकाळीच मत देउन आलो फ़क्त १तास उशीरा जायची सवलत होती सगळा दिवस नेह्मी सारखाच. म्हणून आत्ता प्रतिसाद देतोय
मुलाला आम्ही पोलियो डोस घेउन आलो आहोत असे च वाटत होते.

दिवसभर सगळीकडे ' मतदान करा' चा प्रचार केल्यानंतर संध्याकाळी एक प्लेजंट सरप्राईज!
काम कमी असल्याने नवर्याने चक्क पिक्चरची तिकीटे बुक करवली.
पिक्चर होता भूतनाथ रिटर्नस. लहान मुलांचा असेल म्हणून मुलाबाळांसकट गेलो तर काय, तो पिक्चर ' मतदानाबद्दल जागृती ' या विषयाबद्दल होता.
अगदी नोटाबद्दलही फार रंजक पद्धतीने माहिती होती.
बालकलाकारांसह सर्वांचीच कामे अत्त्युत्तम .
पण सगळ्यात महत्त्वाचे काय तर 'आपले मत आपले भविष्य' हाच विचार मांडला होता.
वेळ आणि संधी मिळताच नक्की पहा.

साती खास तुझ्यासाठी... माहेरी घरातील सातही जणांनी केलं. त्यातले दोघे पुण्याहुन गावी गेलेत काल-परवाच, मतदान करायला. Happy

सुनिधी त्यांचं अभिनंदन!

आमच्या माहेरचे पण पुण्याहून रत्नागिरीला गेलेत खास याचसाठी.

मतदान केले.
गर्दीच्या आधी म्हणुन सकाळी अलार्म लावुन उठलो. (सुट्तीचा दिवस असुनही)
साडेसातला मतदान केले.
बायकोच्या व्होटर कार्ड वर चुकीचा फोटु होता.
दुसरे आयडीप्रुफ घेवुन गेलो होतो.
वादावादी होणार अशी अपेक्षा होती पण नाही झाली.
मग दिवसभर निवांत होतो.
आमच्या मतदारसंघात ६५ टक्के मतदान झाले म्हणे.

अश्विनी के - तुझा रिक्षावाल्याचा अनुभव छानच Happy कौतुक वाटते अशा लोकांचे.

काल मतदान केले. ह्यावर्षी तरुणाईचा उत्साह खूप होता असे वाटले Happy

आज महाराष्ट्रात १७ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर झाली आहे. बर्‍याच ठिकाणी ६० टक्क्यापेक्षाही अधिक मतदान झाल्याची बातमी, जी खरोखरी कौतुकास्पद आहे.

मला आनंद होतो की आमच्या दोन्ही मतदार संघांनी : १ कोल्हापूर व २. हातकणंगले यानी टक्केवारीच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दोन्ही ठिकाणी ७२ टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान.

दोन्ही उमेदवार आपापल्या सुशिक्षितपणामुळे कॉलेज विद्यार्थी वर्गात प्रचंड लोकप्रिय आहेत....कदाचित त्यांच्या त्या करिष्म्यामुळे विद्यार्थी वर्ग मतदान केन्द्राकडे ओढला गेल्याचे चित्र दिसत होते.

येssssss माझं नाव पण आलं वरती Proud
मी माझ्या एका मित्राला आणि मैत्रिणीलाही बळजबरीने घेऊन गेले. त्यांना सांगितलं तुम्हाला मत द्यायचं नाही तर नोटाचं बटण दाबा. रडत खरडत का होईना त्यांनी मतदान केलं. मग मी त्यांचे फोटो काढले. त्यांना सेलेब्रेटी असल्याचा फील दिला. Uhoh
नाटकं नुसती. पण एकंदर वाटतय पुन्हा बिना कटकट मतदान करतील Wink

काल सकाळी केले मतदान !!

कॉलनीतिल एक जण चीन वरुन आलेले मत देण्याकरिता..

बाकी नीधप च्या मताशी सहमत आहे - कोणी आले तरी फ़ार फ़रक पडेल असे नाही...

मी पण काल मतदान केले, सकाळी ९ च्या सुमारास. १० मिनिटे रांगेत उभे राहून केले.
ज्ये. ना. रांगेत उभे न करता त्वरित आत सोडत होते, बाकीचे आक्षेप घेत नव्हते, पोलिस व मतदानासाठी खास तैनात कर्मचारी येणार्‍या नागरिकांच्या त्याच त्या प्रश्नांना, न कंटाळता, अत्यंत शांत आणि समंजसपणे उत्तरे देत होते. यादीतले नाव न वगळले गेल्या कारणाने विशेष समाधान प्राप्ती Happy

पुण्यातल्या याद्यांमधून ज्यांची नावं गायब आहेत, अशांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचं काम नव्या प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. तक्रार नोंदवायला प्रचंड रांगा लागल्या आहेत.

सर्व पुणेकर नाग्रिकाना नम्र विनंती ज्याना मतदार यादीत नाव नसल्या मुळे मतदान करता आले नाही त्यानी 2 दिवसात इलेक्शन कमीशन कोल्लेक्टेर ऑफिस पुणे अत्थ्वा भाजप कार्यालय जोगेश्वरी मंदिर अप्पा बलवंत चौक पुणे मनसे कार्यालय झेड ब्रिज नारायण पेठ पुणे येथे अर्ज भरुन देणे जेणे करुन एकुण शिल्लक मतदार ( ज्याना मतदान करता आले नाही) संख्या लक्ष्यात येईल आणि या सर्व नाग्रिकाना 24 तारखेला आपले मत योग्य उमेदवाराना मतदाना द्वारे बजावता येईल आज जसे आपण सर्वानी मतदान करुन आपला नाग्रिक्त्वाचा हक़ बजवला तसाच आत्ता एक जागरूक पुणेकर म्हणून हा sms आपल्या सर्व social media sources माध्यमातून share आणि forward करा कारण अज्जुन जवळ जवळ 50% मतदार मतदानाच्या हक्का पासून वंचित आहे
आपला उमेदवार जिंकणार
आपली सरकार येणार
Since Many names were missing from the voters list, we are taking action against it. Please send- name, mobile no,Part no, where voted last time, ..this is to be sent to ivote@vbipune.org. We are compiling these details and sending to the Collector. Your email should reach us before 10am tomorrow. And tell all.
If your name was eliminated from voters list email- punemissingvoters@gmail.com pass the message

माझं नाव दोन्-दोन यादींमधे होतं. काल भर दुपारी सगळं आवरुन मी व आई मतदानाला गेलो. विशिष्ट उमेदवारांनी चौकाचौकात लोकांना रिक्षाने नेण्या-आणण्याची सोय केली होती Proud
शाळेच्या बाहेर गर्दी दिसत होती. बर्यापैकी पोलिस बंदोबस्त होता. पण आमच्या रुममधे अजिबात लाईन/गर्दी नव्ह्ती. मी एकाच लिस्टीत नाव पाहिलं. वोटर कार्ड नसल्यामुळे पॅन कार्ड दाखवलं आणि ५ मिनिटात मतदान झालं. Happy

Pages