केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवर्‍याचेही व्होटींग झाले. स्लिप नव्हती आली पण बूथच्या बाहेर चेक केल्यावर नाव सापडले यादीत आणि करता आले त्याला.

मीही केल सहपरिवार १७ लाच . धागा आत्ता पाहिला Happy
त्यामानाने हातकणंगले मधे नाव नसण्याचे प्र॑कार कमी घडलेले दिसले (ओळखीच्या तर कुणाच अस झाल नाहीच , पण कानोकानीही ऐकल नाही )

केलं, केलं!! Happy सकाळी ७ वाजता जाऊन आम्ही मतदान करून आलो. तेव्हापासूनच मतदान केंद्रावर बर्‍यापैकी रांग होती. या भागात खरंतर चांगले पर्याय नाहीत. पण एकूण लोकांनी यंदा खरंच मनावर घेतलेलं दिसतंय! Happy बाकी, पोलिस, निवडणूक अधिकारी इ ची वागणूक सौजन्यपूर्ण आणि चक्क 'प्रोफेशनल' पण!!

भारतात अपंग लोकांसाठी काहीच सुविधा नाहीत. इथे पहिल्या मजल्यावर ठेवलय मतदान पेटी. आता व्हिलचेअर वरच्या माणसाला कसं घेवून जायचं?(इति काका) Sad

माझे नाव ऑन्लाईन लिस्टीत नव्हते पण नशिबाने घरी चिठ्ठी आली. आज सकाळीच करुन आले. आमच्या कॉलनीत फारशी गर्दी नाहीय मतदानासाठी पण बेलापुर झोपडपट्टीत माझ्या बाईला सकाळी घरी परतावे लागते इतकी गर्दी होती. ती दुपारी जाईल आता, लोकांच्या घरची कामे आटोपुन Happy

केलं ना सगळ्यांनी..
मग आता पाच वर्षांनी भेटु पुन्हा.. आणि हो तुम्हाला मिळालेली "मतदारराजा" ही उपाधी पण काढुन घेण्यात येत आहे, आजपसुन तुम्ही पुन्हा सामान्य "जीवजंतू"..

सचिन तेंडुलकरने ४१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना हा जो फोटो दिला आहे तो त्याच्या सार्‍याच चाहत्यासाठी "मतदान" प्रेरणादायी ठरावा...आणि त्यानी अजूनी मतदान केले नसेल तर आता कोणतीही सबब न सांगता आपल्या हक्क बजावावा...

24sachin.jpg

तो थोडीच माबोकर आहे. नाही लिहिलंस तरी चालेल किंवा त्याचे नाव लिहिलेस तरी चालेल. ते काय गुपित बिपित नाहीये Happy

डन !
अगदी शेवटच्या घडीला मत नोंदवले, आमच्या मतदार केंद्रातून मी शेवटचा मतदार, माझे मत टाकले आणि मशीन बंद केली, पसारा आवरून घेतला.
कदाचित दक्षिण मुंबईमधून किंवा मुंबईमधून किंवा सबंध भारतातून शेवटचे मत माझेच असण्याचीही शक्यता आहे.

मी पण दिलं मत. पाउण तास रांगेत लागावं लागलं. माझ्या मागे पण १०० तरी लोक रांगेत होते. Happy

मीही मत नोंदवून आले. घरातील सर्व सज्ञान सदस्यांनी मत दिले. दुपारी ४ वाजता फारशी गर्दी नव्हती . सा बा सकाळी गेल्या होत्या तेव्हा मात्र गर्दी होती. तिथले कर्मचारी मात्र शांतपणे सर्वांना मदत करत होते.

ह्म्म्म, आमचंच राहिलंय आता. एकदम शेवटी. अजूनही प्रचाराचा लवलेशही नाही. फक्त काही होर्डिंग्ज आहेत. तसाही प्रचाराचा जोर अर्धग्रामीण भागातच असणार जास्त.

Pages