केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केलं.
कलकत्त्यातल्या काही भागात आणि इतर ग्रामीण मतदारसंघात मनःपूत हिंसाचार, सॉफ्ट रिगिंग वगैरे चालू आहे. तृणमूलकृपेने. आमच्याकडे सगळं शांत.

सातीगो, मी मतदान केल्याचे लिहूनही माझे नाव वर का नाहीये, मी राजकारणावर तावातावाने बोलत नाही म्हणून का? Wink

रच्याकने मी नेहेमीच मतदान करतो बरं Happy

निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. त्याबद्दलच्या जाहिराती वृत्तपत्रांतून झळकत आहेत.
९ जून ते ३० जून दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे.

गेल्यावर्षी मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळली गेली त्यासंबंधीची ही एक बातमी आणि अग्रलेख
http://archive.indianexpress.com/news/12-lakh-names-removed-from-elector...

जागो रे

तेव्हा ऐन मतदानाच्या वेळी किंवा त्यानंतर जागे होण्यापेक्ष आताच आपली नावे मतदारयादीत आहेत ना हे तपासून पहा; नसल्यास नोंदवून घ्या.

निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ :
मतदार याद्या, जमा केलेल्या अर्जांची सद्य स्थिती इ. माहितीकरिता.

काल ठाण्यातल्या एका वाचकाचं लोकसत्तात पत्र आलं होतं. हेच नोंदणीचं आवाहन वाचून तो नावनोंदणीसाठी गेला, तर तिथल्या कर्मचार्‍यांनी सांगितलं की त्यांना अशी कुठलीही ऑर्डर आलेली नाही, नव्या नोंदणीचे ६ क्रमांकाचे अर्ज त्यांच्याकडे सध्या नाहीत Uhoh
पत्रलेखकाने म्हणे लोकसभा निवडणुकीच्या आधीही नोंदणीसाठी कागदपत्रं दिली होती, पण त्याचं नाव यादीत आलंच नाही.

मीपण ही अ‍ॅड बघितली पण मतदारनोंदणी/ दुरर्स्ती कुठे जाऊन करायची आहे? कोणाला माहिती आहे का?

ललिता-प्रीति, तुमचंही एक पत्र होतं लोकमानसात(मार्च्/एप्रिल महिन्यात); सांगितल्या ठिकाणी आयोगाचे कोणी कर्मचारीच उपस्थित नव्हते म्हणून?

कालच्या सह्याद्राच्या साडेनऊच्या बातम्यांतही निवडणूक आयुक्ताची या संदर्भात मुलाखत होती.
लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावे मतदार यादीत होती त्यांनीही पुन्हा पडताळून घ्यावी म्हणे. Uhoh

राजू७६, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याची सोय दिसते आहे आणि संबंधित अधिकार्‍यांचे भ्रमणध्वनिक्रमांकही दिलेले आहेत.

कालच्या सह्याद्राच्या साडेनऊच्या बातम्यांतही निवडणूक आयुक्ताची या संदर्भात मुलाखत होती.
लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावे मतदार यादीत होती त्यांनीही पुन्हा पडताळून घ्यावी म्हणे.

------माझ्या मित्राने २०१४ लोकसभा निवडुकीच्या आधी दोन लोकसभा, विधानसभा व पालिकेसाठी मतदान केलेले आहे. यावेळी मतदान केद्रावर गेल्यावर त्याचे नाव यादीत नसल्याचे त्याला कळाले, आश्चर्य वाटले होते. व्यावस्थित मागोवा घेत त्याने त्याचे नाव मिळवले (प्रिन्टेड यादीत होते - त्याच्यात चिवटपणा होता म्हणुन काही तास त्याने किल्ला लढवला आणि मतदान करणे त्याच्या साठी किती गरजेचे आहे हे दाखवले).

एकवेळा नाव मतदार यादीत असेल तर परत परत मतदाराने खात्री कशाला करायला हवी? Sad अडचण कुठे आहे ? तत्रज्ञानात बदल होतो आहे आणि हा 'transition period' आहे म्हणुन का अजुन काही ?

आमच्या (कॅनडामधे) कडे मतदार यादीत नाव नसेल निवडणुक अधिकारी एक फॉर्म भरुन घेतात ज्यावर तुमचे नाव आणि पत्ता लिहायचा. सोबत फोटो असलेले दोन ओळखपत्र दाखवायचे, पण परत पाठवणे मान्य नाही.

देशाबाहेर राहणारे भारतीय नागरिकांना मतदान करण्याची सोय आहे का ? नसल्यास होण्याच्या दृष्टीने विचाराधीन आहे का ?

Pages