केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्सकूल - मी १०९ नंबरच्या केंद्रात मतदान केले. तुम्ही कुठे राहता?

चिनूक्स - आता काय होऊ शकेल? फेरमतदानाची शक्यता आहे का? (ह्यामागे एक मोठी शक्ती असणार असे वाटू लागले आहे. एक लाखाच्य आसपास मतदारांची नांवेच गायब असण्यामागे)

फेअरमतदान होईल की नाही माहीत नाही, पण निदान तक्रारी तरी पोहोचतील. आज सकाळी ११ वाजता तक्रारी स्वीकारायला सुरुवात झाली. मी दुपारी एकच्या सुमारास तक्रार नोंदवली, तेव्हा माझ्या तक्रारीचा क्रमांक पाच हजाराच्या आसपास होता. भरपूर गर्दी होती. त्यामुळे यादीत नाव नसलेल्यांची संख्या लाखाच्या घरात नक्की आहे. तिथे बरेच असेही होते की ज्यांनी दोन महिन्यांपूर्वी यादीत नाव तपासलं होतं, पण काल नाव गायब होतं.

त्यासाठी SMS पण करता येईल. प्रत्यक्ष जायची गरज नाही. तो पर्याय सकाळच्या पेपर मध्ये आज आला आहे.

कागदपत्रं पूर्ण करूनही नाव न आलेल्या लोकांच्या यादीत मी अन पत्नी देखील आहोत.

परवा इथे अधिकार्‍यांना भेटून आलो, ४ एक तास त्यात घातले. एक बारटक्के बाई आहेत त्यांनी निदान योग्य त्या माणसाकडे पाठवले, हे सर्व काम एका कंत्राटदाराला दिले आहे. त्याच्या आणि महा शासनाच्या COD यादीत खूप फरक आहे.

त्यांच्याकडे एक वेगळीच यादी लोकल पिसीवर पण आहे, ती रोज अपलोड करतात म्हणे, दुसरे दिवशी सकाळी पाहिली तर ती यादीत ते नाव परत नाही, आज पाहिले परत नाही. म्हणजे ते नाव त्या यादीत (लोकल) आहे, नी मुख्य यादीत नाही.

उदा तिथे एक जण केदार केदार जोशी अश्या नावाचा होता. पत्ता दिसत नव्हता. मी त्याला सांगीतले की कोण्याही केदारच्या वडलांचे नाव परत केदार असण्याची शक्यता शून्य आहे. ख्रिश्चन मध्ये ज्यू केदार असे लिहितील, कागद्पत्र दाखवा त्या केदार केदार ची, अर्थातच ती नाही मिळाली. नंतर तेथील सहा. निवडणूक अधिकार्‍यांना भेटलो, तो एक वेगळाच अनुभव.टोटल सरकारी माणूस ! अनेक तासांनंतर तो कारकुन म्हणाला की ही टायपो आहे, ती चूक त्यांची मग ते भोग आम्ही का. भोगावे? ह्याचे उत्तर नाहीच.

सहा. निवडणूक अधिकार्‍यांना ते नक्की काय भुमिका बजावत आहेत हे कळत नव्हते असे मला वाटले.

एकुण तिथे गोंधळ होता. हे सर्व आदले दिवशी. काल तीन बुथवर जिथे शेजार्‍यांची नावे आली, तिथे पाहून आलो तर यादीत नाव नव्हतेच.

एकंदरीत परवा अर्धा दिवस आणि तीन ऑफिस पालथी घातली आणि सरकारी गोंधळांचा तमाशा अनुभवला. कालचे वेगळेच.

जशी काही माझीच गरज आणि माझीच लाचारी अशी वर्तवणूक मला त्या ऑफिस मध्ये करावी लागली, अन्यथा ती यादी पण पाहयाला मिळाली नसती ज्यात केदार केदार जोशी असे नाव आहे.

म्हणून मग काल परत जिल्हाधिकार्‍यांना घेराव घातल्याच्या ठिकाणी गेलो नाही. नो युज ! पण आज समस केला.

आमच्या सारख्या लोकांचे परत मतदान होईल ही शक्यता शून्य आहे.

<त्यासाठी SMS पण करता येईल. प्रत्यक्ष जायची गरज नाही. तो पर्याय सकाळच्या पेपर मध्ये आज आला आहे>

नाही. अशा इमेलींचा किंवा एसएमएसचा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंध नाही, तुमच्याकडे तक्रारीची पावती असेल, तरच आम्ही काही करू शकू, असं तिथे लिहून ठेवलेलं आहे. सर्वांना शिक्क्यानिशी पावती मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन तक्रार करणं हाच पर्याय आहे.

मातोश्री एकट्याने काठी टेकत टेकत जाऊन मतदान करून आल्या. नाव सापडायला वेळ लागला थोडा. पण बूथ वरच्या कर्मचार्‍यांचा अनुभव खूपच सुखद धक्का देणारा अस म्हणत होती.

माझ्याही अनेक पुणेकर मित्र मैत्रीणिना मतदान करता आलेल नाही
नाव नसल्याने
आधी ह्या लोकांनी दोन तीन वेळेला मतदान केलेल आहे तरीही

मी पण जाणार २४ तारखेला.लिस्ट मध्ये नाव आहे, मी चेक केले आहे... एक शंका - मला स्लिप शिवाय मतदान करू देतील का?स्लिप मिळण्याचि शक्यता कमी आहे कारण जुने घर सद्या बंद असते आणि वोटर आयडी कार्ड वर अजून जुनाच पत्ता आहे.

EPIC नसेल तर मतदानासाठी जाताना खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊन जा ओळख पटविण्यासाठी.

१) पासपोर्ट
२) ड्रायव्हिंग लायसन्स
३) Govt. PSUs/Public Limited Co. नी कर्मचार्‍यांना दिलेले फोटो आयडेंटिटी कार्ड
४) बँक्/पोस्ट ऑफिसने दिलेले फोटोसहित पासबूक
५) PAN कार्ड
६) आधार कार्ड
७) Smart Card issued by RGI under NPR
८) MNREGA Job Card
९) फोटोसहित असलेले पेन्शनचे कागदपत्र
१०) Authenticated Photo Voter Slip issued by the election machinery.
११) Health Insurance Smart Card issued under the scheme of Ministry.

एका पत्रकार मित्राकडून आलेला मेसेज
Dear Citizens, we r holding a meeting on sunday 20/4/2014 at Harshal lawns karve rd opp Mcdonalds kothrud pune Between 9am to 1 pm to file the PIL to fight for our fundamental right to vote. All citizens are requested to participate with their relevant documents and also citizens who have voted but wish to support this cause your participation wud be valuable. Looking forward to your support. Jai Hind
Regds
Anita Shamani 9822976049

आमच पण होलसेल (घरातल्या सगळ्यांच ) मतदान झालं. सगळ्यांच्या स्लिप्स आल्या होत्या घरी. विशष म्हणजे बायकोचे आणि भावाच्या बायकोचे नाव अगदी मार्च च्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म भरुन देखिल स्लिप सकट घरी आले होते.

आमच्या विधान्सभा संघात ८० % + मतदान झाले आहे. सकाळी ८ वाजता जावुन देखिल अर्धा तास थांबावे लागले. प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकिचे वातावरण यावेळी लोकसभेला होते.

लोकहो मतदान कराच. आणि मतदान करताना मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहितेचा भंग (कोणत्याही पक्षाकडून /व्यक्तीकडून) होत आहे असे दिसल्यास निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइनवर /तिथे असलेल्या निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करा. तुमची तक्रार ऐकून घेतली जात नाहीये असं दिसल्यास किमान सोशल मिडियामध्ये याबद्दल माहिती देत रहा.
EC Helpline 1800-22-1951

सकाळी ७ वाजता जाऊन मतदान करून आले. १५ मिनिटं रांगेत उभं रहावं लागलं. सकाळपासूनच मतदान केंद्रावर बर्‍यापैकी रांग होती. (उन्हामुळे असेल.)

तिथे उपस्थित सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस अगदी सौजन्यानं आणि हसतमुखानं वागत होते. (दिवसाची सुरूवात असल्यामुळे असेल. ;))

माझं मतदारयादीत नाव असल्याचं मला माहिती होतं. पण आम्हाला समहाऊ चिठ्ठ्या मिळालेल्या नव्हत्या. केंद्राच्या बाहेर यादीत नाव शोधणे आणि चिठ्ठ्या शोधणे यासाठी लोकांनी भरपूर कोंडाळेयुक्त गर्दी केली होती. चिठ्ठी अनिवार्य नसल्याचं पेपरमध्ये वाचलेलं होतं. म्हणून मी त्या फंदात न पडता तशीच गेले. केंद्रातल्या कर्मचार्‍यानं अगदी व्यवस्थित मला सांगितलं, की "गर्दी नसती, तर यादीत मी तुमचा नं. शोधला असता. पण आत्ता गर्दी आहे. वेळ जाईल. तुम्ही चिठ्ठी आणलीत तर बरं होईल. चिठ्ठीवर सिरियल नं. असतो. " मग मी परत बाहेर आले. बाहेर येताना 'परत लायनीत उभी राहणार नाही, चालेल ना?' असं त्याला विचारलं. तो अगदी हसून "हो, हो" म्हणाला. Lol बाहेर तोपर्यंत कोंडाळंयुक्त गर्दी हटलेली होती. माझी चिठ्ठी मला लगेच सापडली. मी परत आत गेले, मतदान केलं. बाहेर पडताना त्या कर्मचार्‍याला हसून 'थँक्यू' म्हटलं. खूष झाला तो पण.. Proud

केलं . हे माझं मुंबईतलं पहिलंच मतदान. .
सकाळी ७.५० ला गेलो तर बरयापैकी रांगा होत्या, उत्साह बघुन बरं वाटलं.
नुस्तेच उशीरा ऑफिसला जाणारे नाही तर गृहिणी, वयोवृध्द ही सकाळी सकाळी आले होते..
माझ नाव लिस्ट मध्ये होते पण कार्ड आले नाही , आधार कार्ड आणी व्होटिंग स्लीप दाखवुन काम झालं..

काल निवडणू़क आयोगाच्या कर्मचार्‍यांनी चिठ्ठ्या आणून दिल्या होत्या. (त्यापूर्वीच एका पक्षाचेही कार्ड मिळाले होते.)
आत्ताच मतदान करून आलो. आमच्या कक्षात ४-५ जणांपेक्षा जास्त लोक रांगेत नव्हते. पण अन्य काही कक्षांत मात्र मोठ्या रांगा होत्या.
आमच्या कॉलनीत प्रचाराला कोणत्याही पक्षाचा उमेदवार आला नव्हता. बोरिवलीत एक सभा झाली होती त्याचे पत्रक आले होते. उमेदवारांचा भर घरोघर जाऊन प्रचारावर नसावा.

उमेदवारांचा भर घरोघर जाऊन प्रचारावर नसावा. >>

लोकसभा निवडणूकीला ते शक्यही होत नाही. विधानसभा आणि लोकसभेत भर इनडायरेक्ट प्रचारावर जास्त असतो. महा/नगरपालिका / ग्रामपंचायत निवडणूकीला मात्र घरोघरच प्रचार असतो.

६४ लाख लोकांना ह्यावेळी मतदार यादी घोळामुळे मतदान करता येणार नाही असा आकडा आहे.

हो भरतजी, वोटिंग मशीनवर इतक्या उमेदवारांची नावं आहेत त्यातल्या एकाशिवाय बाकी कोणालाही प्रचाराकरता आलेलं मी पाहिलं नाही. निवडणू़क आयोगाच्या कर्मचार्‍यांनी आणून दिलेल्या चिट्ठीत माझा पत्ता काही वेगळाच आहे. मतदान केंद्राच्या बाहेर ती चिठ्ठी दाखवून फोटो ओळखपत्र असलेली चिठ्ठी घेतली आणि फार गर्दी नसल्यामुळे १० मिनिटात मतदान झालंसुद्धा!
आता पत्ता बदलून मिळण्यासाठी आणि नवीन मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी हेलपाटे घालावे लागणार.

दरवेळी ऑफिसला जाताना मदतान करुन निघतो... मागिल अनुभव असा की, ९ च्या दरम्यान १५-२५ मधे माझा नं. असायचा. पण यंदा तो ४१ वा लागला. लोकांनी मनावर घेतलेलं दिसतयं.

आज २४ एप्रिलला ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सहपरिवार सानपाडा, नवी मुंबई येथे मतदान केले. खूप लोक मित्र/परिवारसह मतदानासाठी आले होते.

एक सुचना - Election web link आता बरोबर चालत नाही. त्यामुळे गल्ली/ रस्ताच्याकडेने स्वयंसेवकाचे मंड्प आहेत ति़कडे आपला वार्ड्/नावाची खात्री करावी. नाव नसेल तर मतदान करु शकत नाही. फोटो आयडी घेउन जा..

भल्या पहाटे साडेसात वाजता जाऊन मतदान केले. मॉर्निंग वॉक वरून येणारे, बहुतेक जेष्ठ नागरिक, (सुट्टी असुनही) ऑफिसला जायच्या घाईत (?) असलेले लोक, पहिल्यांदा मतदान करणारे बरेच दिसले. पण एक गोष्ट मात्र खटकली. पुरुष आणि महिला अश्या दोन वेगळ्या रांगा केल्या होत्या. जेष्ठ नागरिकांना सुध्दा त्याच रांगेत ऊभे रहायला सांगितले होते.
माझ्यापुढे एक सत्तरीच्या पुढच्या आजी ऊभ्या होत्या. मतदानासाठी गर्दी असल्याने अर्धा तास रांगेत ऊभे राहायला लागले. त्या आजी मला म्हणाल्या, "आत्ता पर्यंत प्रत्येक वेळी मतदान केले आहे मी. पुढल्या मतदानाला मी असेन असे वाटत नाही." मला अगदी गलबलुन आले. तिथे असलेल्या पोलिसाला बोलवुन मी विनंती केली कि या जेष्ठ नागरिक आहेत. किमान यांनातरी पुढे जाऊ द्या. पाठीमागे ऊभी असलेली बाई मला म्हणाली, "मलासुध्दा घाई आहे ऑफिसला जायची." तिचा प्रचंड राग आल्याने मी तिला सरळ सुनावले, "पाहिजे तर तुम्ही माझ्याआधी मतदान करा, पण यांना जाऊ द्या." मग ती बाई शांत झाली. पाच मिनिटांनी तो पोलिस त्या आजींना पुढे न्यायला आला तेव्हा काहिही न बोलता त्या माझ्या डोक्यावर हात ठेऊन निघुन गेल्या. टचकन पाणी आले तेव्हा माझ्या डोळ्यात.

आमच्याकडे एकच लाईन होती.. सिनियर सिटिजन्सना लगेच सोड्त होते.. काही वार्डंला खूप गर्दी होती काही वार्डंना गर्दीच नव्हती.

१५ मिनिटात मतदान करुन बाहेर आलो... गर्दी पाहून बरे वाटले.एवढ्या उन्हातही लोक बर्‍याच संख्येने येत आहेत.

Pages