मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव, मोबाईल वर बोलता बोलता मोबाईल हरवला हे सांगण्याचा प्रताप मी पण केलाय...
आणि पल्लि तर एकदम ग्रेटच... Rofl

विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

अगदी लेटेस्ट वेंधळेपणा... ५ मिनिटांपूर्वीचा. दुध तापवायच होतं. गॅस सुरु केला. पातेलं ठेवलं आणि फोन आला. परत आलो तेव्हा पातेलं चांगलच तापलं होतं आणि जराही विचार न करता दुध ओतलं. शेवटी जे व्हायच तेच झालं.

आणखी एक.. बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेउन एका घरी गेलो होतो. ऊन्हाळ्यात लग्न. दुपारी ऊन वाढतं म्हणून पत्रिका द्यायला लवकर निघत असे. या घरी मी सकाळी ७ लाच पोचलो तर घरात अन्धारलेलं. मला वाटलं वीज महामंडळाची कृपा असेल म्हणून विचारुन गेलो - "लोडशेडिंग का?" नंतर लक्षात आलं... घरी कूलर सुरु होता.. लाईट्स सुरू होते... नि मी डोळ्यांवरून गॉगल काढलाच नव्हता...

एक किस्सा माझ्या मैत्रिणीचा. अमेरिकेत असताना सॅन डिएगो सी वर्ल्ड ला गेलो. रविवारची प्रसन्न सकाळ नि हवेत मस्त गारठा. अमेरिकेच राष्ट्रगीत झालं नि आमचा ग्रुप तिकीटं घ्यायला वळला. तेव्हा मॅडमच्या लक्षात आलं - बॅंक ऑफ अमेरिकेचं तिचं डेबिट कार्ड गायब आहे. झालं. कस्टमर केअर ला फोनाफोनी सुरु झाली. पण रविवारच तो. कुणी भेटायलाच तयार नाही. शेवटी जिथे अकाऊंट होतं तिथल्या कस्टमर केअर ऑफिसर चा नंबर मिळाला नि तिला ते कार्ड ब्लॉक करायला सांगितलं. संध्याकाळी परतलो. त्यानंतर २ दिवस तिचे सगळे व्यवहार दुसर्‍या कुणाच्या तरी कार्ड वरून सुरु होते आणि तिसर्‍या दिवशी ते कार्ड तिच्याच जॅकेटच्या खिशात सापडलं!!! मग पुन्हा फोनफोनीचा प्राणायाम सुरु झाला. नंतर तेव्हा कळलं. ती कस्टमर केअर वाली आमच्या या मॅडम पेक्षाही वेंधळी निघाली. तिने ते कार्ड ब्लॉक केलंच नव्हतं!!!

विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

कुकरची शिटी झाल्यावर कोणी गॅस बंद करायचा सोडुन लाईटचं बंद असलेलं बटण पुन्हा बंद करायचा प्रयत्न केलाय का??
-------------------------
जाने क्युं लोग मोहोब्बत किया करते है..

योगे Lol

मी माबोचा नवीन सदस्य आहे.
मला हा धागा खुप आवडला.

आता माझेही काही किस्से...

मी शाळेत असताना, आम्हा काही मित्रांचा ग्रुप होता. एकदा मी नेहमीप्रमाणे तयारी करुन मित्राच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर काकी आणि तो मित्र माझ्याकडे बघुन जोरजोरात हसायला लागले. मला तर काही कळेचना. नंतर त्यांनी सांगितल्यावर कळले की मी सर्व तयारी तर केली होती, पण शाळेची पँट न घालता घरी घालायची पँट घातली होती.

शाळा सुटल्यावर आम्ही स्कूल बस पकडायला धावत असू. ड्रायव्हरच्या बाजुची जागा मिळाली की स्वर्ग जिंकल्याचा आनंद होई. एकदा मी असाच शाळा सुटल्यावर धावत सुटलो, आणि मला हवी असलेली जागासुध्धा मिळाली, पण नंतर मला कळलं की मी या धुंदीत माझी शाळेची बॅग, पाण्याची बाटली वर्गातच ठेवुन आलो होतो. Biggrin

परीक्षेमध्ये तर हमखास कोणतेतरी पूस्तक किंवा काहीतरी डेस्कमध्ये विसरायचो, आणि परीक्षा सुरु असतानाच माझ्या (किंवा अन्य कोणाच्यातरी) लक्षात आल्यावर मी शिक्षकांना सांगायचो. नंतर तर अस व्हायला लागलं की शिक्षक स्वतः येऊन माझा डेस्क तपासु लागले. Sad

--------------------------------------------------
ना संपणारे अखंड स्वप्न असावे,
ना बोलता एकू येतील असे शब्द असावेत,
ग्रीष्मात पाउस पडतील असे ढग असावेत,
ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत.

हल्ली कोणी वेंधळेपणा करत नाहि वाटत?
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

लोकांची नावे लक्षात ठेवण्याच्या बाबतीत मी अगदीच 'ही' आहे... मला नंबर्स बरोबर लक्षात रहातात! पण अगदी , आतेभाऊ, मावसभाउ, मामेभाउ, त्यांच्या बायका मुलांची नावेच लक्षात रहात नाही मग , वहिनी कशा आहेत किंवा मुले/ ताई/ दादा काय करतो वगैरे विचारुन वेळ मारुन न्यावी! ऑफीसमधे तर नविन ऑफीस जॉईन केले की ओळख परेड होते ना..दोन मिनीटात मागे गेलेल्यांची नावे विसरते! आख्ख्या ऑफीसमधील लोकांची नावे लक्षात ठेवता ठेवता वर्ष निघुन जाते!

<<<<<<<
दुसरे म्हणजे स्टीलच्या डब्यांच्या झाकणांचे अन माझे काय वाकडे आहे समजत नाही! एकाच वेळेस दोन लहान मोठ्या आकाराचे डबे काढले की हमखास एकाचे झाकण दुस-याला जाणार म्हणजे अ‍ॅटलिस्ट तसे ठेऊन तरी बघते! मग तो अगदी चहाचा डबा आणि कुर्ड्या पापडांचा मोठ्ठा डबा असेल तरी!
<<<<<
२-३ वर्षांपूर्वी पुण्यातील एका सुप्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टीट्युटच्या डायरेक्टर ची सेक्रेटरी म्हणुन काम करतांना , दिवसभरातुन इतके फोन रीसीव करुन करुन शेवटी घरीसुद्धा लँडलाईन वर कोणाचा फोन आला की ," गुडमॉर्निंग/ गुडईविनिंग एसायटीम!" असे म्हणायचे!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

तो दुसरा पॉइन्ट मात्र जरा अतिच आहे बर का ....
इतके बेन्धळे असु नये ...... पाप लागते ... Happy
एकदा जय जय बाप्पा कर ... मग बाप्पा पाप पुसून टाकेल ....

Share your code .. http://www.maayboli.com/node/7676

नयने, तु म्हणजे माझी बहीण आहेस अगदी. मला काहि केल्या नावच आठवत नाही.
मायबोलीवरच्या आय डी आणि खर्‍या नावांचे समीकरण तर अजुन सुटले नाही. जीमेलात इतके लोक्स आहेत ते मायबोलीकर आहेत हे आठवतं पण त्याचा माबोचा आय डी च आठवत नाही मला. प्रत्येक वेळी खात्री करुन घ्यायला लागते. Sad

मोठ्या बरणीतून छोट्या बरणीत लोणचं काढताना मी हमखास छोट्या बरणीचं झाकण मोठ्या बरणीला लावते.... २ आठवड्यातून एकदा तरी हे घडतंच...

२ आठवड्यातून एकदा तरी हे घडतंच...>>
वेंधळेपणात ही कमालीचे सातत्य आहे काय Proud

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

छोट्या बरणीचं झाकण मोठ्या बरणीला लावते.... >>

छोट्या बरणीचं झाकण मोठ्या बरणीला लागत??? दक्षे, झाकण बरणीत पडत नाही का? झाकणाच्या वेंधळेपणाची कमाल आहे बुवा.... Biggrin

दक्स मी अस दुधाच्या पातेल्यांवर चाळण ठेवतो ना त्या ठेवताना केलय पुन्हा दुध दुसर्‍या पातेलीत तापवाव लागलय, चाळण घासावी लागलेय. एका कामात किती ती काम.

नयने मी पण नाव विसरते बर्‍याच वेळा. माझी एक मैत्रिण आहे तिची बहीण आजारी होती मध्यंतरी, मी तिला पण नावानिशी ओळखते पण गेला आठवडाभर तिच (म्हणजे मैत्रिणीच्या बहीणीच) नावच आठवत नाहीये. अशी पण चौकशी करता येत नाही तुझी बहीण कशी आहे आता. अस विचारल तर तिला वाईट वाटेल परक्या सारख. एकतर मी तिचा वाढदिवस पण विसरले ह्या वर्षी.

हे वाढदिवस प्रकरण पण मी बरेचदा विसरते (ते ही काही ठराविक लोकांच्या बाबतीत)

तुझी बहीण कशी आहे आता >>
सोप्पे आहे... मग काय म्हणता आहेत बहिणाबाई किंवा कशी आहे बहिणाबाईंची तब्येत ? असे विचारयचे..ती मैत्रिण आपण्हुन सांगेल नाव Proud

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

मग विचारायच की पेशन्ट कशी आहे म्हणुन ....
जर तिने विचारलेच की कोण पेशन्ट म्हणुन तर वर तिलाच म्हणायचे की , "काय आता स्वतःची बहिण आठवत नाही का ??"
Wink
ईब्लिसपणा कधी कामाला येणार ?
Share your code .. http://www.maayboli.com/node/7676

<<< तुझी बहीण कशी आहे आता >>
त्यापेक्षा आपणच नाव ठेवायच."ठमी कशी आहे आता ? "
*************************************************
तू नसताना आठवीत बसतो जराजरासे,
तुझे बहाणे, ना येण्याचे तर्‍हेतर्‍हेचे

काल ऑफिसमध्ये एकाच्या लग्नचा वाढदिवस होता...
सगळ्यना मेल केला होता की सन्ध्याकाळी पार्टी आहे म्हणुन ...
मी मेल चेकलाच न्हवता ..... सगळे म्हणाले चल पार्टीला.... मी तोन्ड वर करुन तयार ...
कशाची पार्टी ते माहित न्हवते .... केक खाताना मी उत्सबमुर्तीला विचारले .... "काय हो तुमचे लग्न झालेय काय ? " Proud
तो अर्धा केक तोन्डात धरुन मझ्याकडे पहात राहिला.

Share your code .. http://www.maayboli.com/node/7676

मी दोनच दिवसा पुर्वी हापिसातल्या कलिगच्या वाढदिवसाच्या पार्टीला हादडुन आले. पण तिचा वाढदिवस विसरले होते (ती माझ्या अगदी बाजुच्या डेस्कवर बसते हापिसात). तिला सकाळी आल्या आल्या म्हंटल पण, वा आज नविन ड्रेस, छान आहे, काय आहे आज?. केक दिला तेव्हा आठवल वाढदिवस आहे तिचा ते. Wink खाल्या केकला जागुन मग मी शुभेच्छा दिल्या तिला. Proud

-------------------------------------------------------------------------
गजरे वालीची परडी संपली. घागर रिकामी जाहली रे .....

कॉलेजात असताना आईने मला एक छोटीशी पर्स दिली होती. नविन पर्स मैत्रिणींना दाखवण्याची उत्सुकता होतीच. बसमध्ये उभी होते म्हणुन बॅग रॅक वर थेवलि. कन्डक्टरला पैसे देऊन ती छोटी पर्स बॅगेत टाकली. कॅम्पसमध्ये पोहचताच पर्स दाखवायला गेले तर पर्स बॅगमध्ये नव्ह्तीच्.मी माझि बॅग समझून कुणा भलत्याच्याच बॅगेत माझी नवी कोरि पर्स (त्यात २०० रुपये होते) काळजीपुर्वक घातली होती.

मी व लेक सिनेमाला गेलो. आधी हॉट डॉग घेतले. टेबलापाशी पोहोचलो. लेक खाणार तेवढ्यात टूंऊऊऊऊऊउईइइइइइइइइइइ करून आतले सॉसेज खाली घसरून पड्ले. परत नवीन घ्यावे लागले. पैसे वाया!
परत लाजिरवाणे किती. सिनेमाही तसाच पडेल होता.

हा बहुधा पल्लीच्या वेंधळेपणाच्या पठडीतला असावा .. धन्स पल्ली उर्फ गुरूमैय्या Happy माझी पुरानी यादे ताझा केल्याबद्द्ल..

माझ्या ओळखीचे एकजण ठाकूर म्हणून गोव्याला असतात्.त्यांचे मेव्हणे - श्री.पेंड्से पुण्यात राहतात.
एक दिवस - महिना अखेर होती ती - ठाकूरांनी पाठवलेली काही पुस्तकं पेंड्सेंना द्यायची होती..ते माझ्या घरी येणार होते.त्याआधी मी त्यांना कधीच पाहिलेले नव्हते (सूज्ञ वाचकांच्या बरोब्बर लक्षात आले असेल की इथेच वेंधळेपणाची प्रथम ठिणगी पडली Happy ) आणि कर्मधर्मसंयोगाने पेपरवाला सुध्दा त्याच वेळेस पेपरचे बिल न्यायला यायचा होता.मी ऑफिसात जायच्या गडबडीत होते. तर बेल वाजली आणि दारात एक मध्यमवयीन माणूस .. गोरापान आणि एकदम टिपटॉप .. मी त्याला आत बोलावलं आणि तो काही बोलायच्या आतच पुस्तकांची बॅग त्याच्या हातात दिली .. आणि म्हंट्लं (हे आणि वर) पेंड्से काका , तुम्हाला उगीच इतक्या लांब यावं लागलं. .. तो म्हणाला 'माझं आडनाव पेंडसे नाइय्ये ---- आहे.' तरीही माझ्या डोस्क्यात उजेड नाही पडला..मी वर 'हो का? पण ठाकूरांनी तर पेंडसेच म्हंटलेलं ' मग तो म्हणे 'अ‍ॅक्चुअली ते पेपरचं बिल ..' मग माझी पेटली ५०० ची .. मग मी पडेल चेहर्यानी पैसे दिले .. तो गेल्यावर स्वतःच्या वेंधळेपणावर आश्चर्य वाटून घेतलं पण खरी गंमत तर पुढेच होती .. नंतर थोड्या वेळानी जेव्हा रिअल पेंडसेकाका आले तेव्हा मी त्यांना पुस्तकं देताना विचारलेलं "तुम्ही तरी नक्की पेंडसेच ना ? " ते कसनुश्या चेहर्याने हो हो म्हणले Sad बिच्चारे Happy

मी तरी काय करणार ? तो पेपरवाला पेंडसेकाकांहून पण चिकणा आणि टिपटॉप होता ... Wink

Happy

हा किस्सा मी किर्लोस्कर मधे trainee engineer असताना घडला. आम्ही १५ जण होतो आणि कम्पनी चा आसपास राहायचो. माझा मेस मधे यातलि बरीच मुले यायचि. यात काहि जणान्ना shift मधे पण काम कराव लागत असे.
तर एक मुलगा आमचा बरोबर आला आणि नन्तर एका महिन्या नेच दिसला. तर मी त्याला सार्वासमक्ष विचारले -"तु महिन्या तुन एकदाच जेवतो काय?"
तो बिचारा embarass होउन घाई-घाईत जेवून निघून गेला.

"भैरप्पा कुलकर्णी यानी लिहिलेलं पर्व आहे का हो??"
"परवा गेलं ते पुस्तक.. "
"परवा नाही हो.. पर्व नाव आहे पुस्तकाचं. पर्व"

लायब्ररीवाला लवकरच राजिनामा देणार. Happy

माझ्याबाजूच्या ताहेराने फोनवरून एका नाशिकमधल्या माणसाचे नाव "संग्य चहा डे" असं लिहून घेतलय.
माणसाचे नाव "संजय चहांदे"" Proud

रविवारी मित्राला फोन लावून विचारलं "काय बे. फार दिवसातून फोने केलास नाहीस. *&&%$" फोन त्याचा होणार्‍या बायकोने उचलला होता.

(सध्या इतकेच किस्से आठवतायत.)

--------------
नंदिनी
--------------

भैरप्पा कुलकर्णी ? Uhoh

हो!! मी असंच विचारलं होतं. तोपण एक वेंधळेपणाच!!!
--------------
नंदिनी
--------------

तु महिन्या तुन एकदाच जेवतो काय >>> हा हा हा हा Lol Lol

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

काल एका प्रॅक्टीस डायरेक्टरच्या (संजयच्या) घरी फोन लावला, तिथे दुसर्‍या डिलिव्हरी मॅनेजरने (अतुल) फोन उचलला होता. मी तोर्‍यात त्याला विचारलं. संजय आहे का? Uhoh
आणि तु संजयच्या घरी काय करतोयंस?
मी कॉर्डीनेट्स लिस्टमधून संजय ऐवजी अतुलचा नं पाहून तो नं संजयचा म्हणून फिरवला होता.

कविता महाजनांचे 'ब्र' हे पुस्तक शोधत होतो... पुस्तकपंढरीच्या अन्नुताईना मेल टाकली...

If you have kavita mahajan's bra, please let me know the price...

vinay Happy

Pages