बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी, सीमा, मंजूडी Happy
सीमा, तुझ्या पद्धतीने गुलाबजामुन करायचे होते, पण चितळेचं पाकिट मिळालं आणि ते राहुन गेलं.
मंजूडी, ४-५ तासांची पार्टी होती, आल्या आल्या स्टार्टर्स आणि २-३ तासाने डिनर. सगळ्याचं १-२ पिस खाल्ले की फार नाही होत. सोबत चिप्स सालसा पण होतेच Wink
रायत्यात बुंदी नव्हती घातली. २-३ दिवसात संपवला.

प्रॅडी, मेडिटेरीयन राईस, व्हेजी ब्रॉथ, भाज्या घालुन. साईडला लेट्युसची पाने.
पिटा चिप्स आणि हमसमधे चिली फेक्स, ऑलिव्ह ऑईल घालुन डिप.
व्हेज चिली सुप छोट्या पिटा ब्रेडसोबत.

माझी आई एप्रिल मधे रिटायर होतेय. ऑफिस मधे लंच पार्टी साठी काय बेत करावा? मराठ्मोळं जेवण हवं. (मसालेभात आणि पुरणपोळी सोडुन.) घरी करून नेता येण्यासारखं काहीतरी. काय करता येईल?

उन्हाळा आहे तेव्हा श्रीखंड/ आम्रखंड चालावं किंवा गुलाबजाम... भरली वांगी/ मटकीची उसळ/ डाळींब्याची उसळ, चांगल्या घरगुती पोळ्या, खमंग काकडी, सुरळीच्या वड्या... कसा मेनू हवा आहे त्यावर अवलंबून.

लेमन राईस/ चित्रान्न, पुरी-भाजी, आम्रखंड/ गुलाबजाम, कोथिंबीर वडी, मटकी उसळ, रायते. आणखी एक पर्याय : बटाटेवडे चटणी, मटार.उसळ पुरी/पोळ्या, स्वीट - जिलेबी.

ब.वडे.. तोंपासु!!

माहेरी पाडव्याला जिलबी-ब.वडे, कैरी घालून चटणी आणि शिवाय कडुलिंबाची चटणी हाच मेनू दरवर्षी असायचा. खास चैत्री मेनू. यंदा पाडव्याला करायला हवा Happy

रविवारी सासु , सासरे, दिर, जाउ जेवायला येणार आहेत.टीपिकल मालवणी आहेत सर्व... जाउ एकटी मासे प्रेमी आहे. बाकीचे चिकन प्रेमी आणि अती चिकित्सक...प्रत्येक गोष्टीत खोड्या काढायची सवय.....

लंच ला येणार आहेत सगळे.....वेळ कमी असणारे....
मी मेनु असा ठरवते आहे - चिकन स्टार्टर किंवा कोलंबी फ्राय, चिकन रस्सा, भात, भाकरी / चपाती , सोलकढी , आईसक्रीम

कमी वेळात बनणारे स्टार्टर अर्थात चिकन चे..आणि टिप्पीकल मालवणी चिकन रस्साची रेसिपी असेल तर सांगा.

तुळू गर्भारशीला डोहाळजेवणाला जेवणासाठी काय मराठी पदार्थ करावेत? तिला खूप मसालेदार नको, याशिवाय कुठलेच पथ्य नाहीये. शिवाय मी काही खास सुगरण नाहीये, हे ध्यानात धरून कृपया पदार्थ सुचवू शकाल का?

धारा, भात प्रकार करणार असशील तर माइल्ड स्पायसी मसालेभात, टोमेटो सार किंवा सोलकढी, काकडी कोशिंबीर, पोळ्या/ पुर्या, फ्लावर-मटार-ओले खोबरे घालून भाजी किंवा मॆत्रिणीच्या आवडीची भाजी, गाजर/दुधी हलवा/ आंब्याचा शिरा हा मेनू कसा वाटलोय? चटणी - कॆरीची. तळण हवे असेल तर पापड्या, कुरडया इ.

संध्याकाळ च्या वेळेला साधारण ५-६ वाजता दही वडे आनि व्हेज हांडवो सोबत चहा सोडुन अजुन कुठेल पेय देता येइल ??? साधारण २० लोकांकरिता. आनि आता उन्हाळ्यात पीठ किती वेळ आंबवायला ठेवु ?? ४-५ तासात बस्स होतील का ??

फ्रूट पंच मस्त लागते. अमूल किंवा नेस्ले चे कोल्ड मिल्क/ कॉफी येते ते कॅन्स ठेवता येतील.

कोक, मिरिंडा सेवन अप पण मस्त लागते. मॉकटेल्स बनवता येतील. फ्रेश लाइम सोडा. जलजीरा.

कमी वेळात बनणारे स्टार्टर अर्थात चिकन चे > चिकन टिक्का. मॅरीनेशन करून ठेवता येतील आधीच. छोट्या स्टिक्स वर लावलेत तर एकाला एक आख्खी स्टिक असं देता येईल.
ड्राय चिकन मंच्यूरेअन.
कबाब (आयत्यावेळेला फ्राय/ शॅलोफ्राय)
चिकन रोस्ट (?)

चहा सोडुन अजुन कुठेल पेय देता येइल ? >>> कोकम सोडा अप्रतीम लागतो. जलजीरा सोडा पण चालेल. रसना + सोडा पण ट्राय करू शकता.

अजून एक ऑप्शन - फालूदा. सगळे ग्लासेस करून ठेवायचे अन आयत्या वेळेला फक्त सर्व करायचे. पण एवढे ग्लासेस हवेत मात्र घरामध्ये.

कोल्ड कॉफी + आईसक्रीम

योकु, मला फालुदाची (हमखास) रेस्पि विपुत मिळेल का? माझ्या लिस्टवर आहे केव्हापासून. ही वरची कमेंट वाचून एकदम आठवलं.

आभार्स Happy

अंकु, हे पेय म्हणून नाही पण जेवणानंतर गारेगार खायला बरं वाटेल म्हणून- मध्यंतरी माझ्याकडे पार्टी होती म्हणून फ्रूट सॅलड केलं होतं. सकाळी कस्टर्ड, फ्रूट्स एकत्र करून छोट्या छोट्या डिस्पोजेबल पिचर्समध्ये गार करत ठेवली. सर्व करताना कलिंगडाचा गर काढायला छोटा गोल स्कूपसारखा चमचा येतो त्याने वॅनिला आईस्क्रिमचे दोन तीन स्कूप्स घालून दिलं.

दिनेशदानी दिलेली आहे युक्ती सांगा बाफवर पण ते शोधणं मात्र आहेच... मी पाहिलं सर्चून पण नाही मिळाली...
आता त्यानाच विचारावं Happy

हे टिपिकल मालवणी पद्धतीचं चिकन आहे की नाही माहित नाही, पण साबा असं बनवतात..

ओलं खोबरं थोडं भाजुन वाटुन घ्या.. कांदा थोडा गुलाबी परतला की त्यात धने, दालचिनी, बडीशोप, खसखस, तमाल्पत्र, लाल मिर्ची, मिरी इ. खडा मसाला टाकुन अजुन थोडा वेळ परता. मगजबी, काजु ची पावडर किंवा ते भिजत घालुन पेस्ट करुन घ्या. भाजलेला मसाला वाटुन मग परत तेलावर परता. परतत आल्यावर काजु-मगजबी ची पेस्ट/पावडर टाका. अन यातच बर्‍यापैकी शिजलेलं चिकन टाकुन चांगलं शिजवुन घ्या. याचा रसा खुप पातळ करत नाहीत. बर्‍यापैकी दाट ग्रेव्ही असते. याबरोबर कोंबडीवडे मस्त लागतात. तिखट अजुन हवं असेल तर लाल मिर्ची पावडर टाकायची मसाल्यात.

navaycha birthday ahe 22 april la....menu kay tharvu
2 starter-??
2 any veg sabzi-palak paneer dusri kay karu
rice-veg pulav+boondi raita
roti
desset -??

pls help

नमस्कार एमै, किती लोक्स येणारेत? लहान मुलं? कुणी मदत करायला आहे का? तुम्ही नोकरी करत असाल तर ते सांभाळून करणार आहात की सुट्टी घेऊन निपटणार आहात? तुम्ही भारतात आहात का? कारण मग आताच्या गरम वातावरणाप्रमाणेही मेन्यू ठरवता येईल.

योकु-madat karayla mavshi ahet.....hoo punyatch ahe....baherch lok koni nahiyet...fakat tychya sathi surprise asnar ahe....tyamule adhi thodishi taiyari karta yeil as asava

२२ एप्रिल = मंगळवार म्हणजे संध्याकाळी मेन्यू हवा असं धरूनः

वेलकम ड्रिंक - कोकम सोडा/ गार सोलकढी

स्टार्ट्स - हरा भरा कबाब / मिनि समोसा / साल्सा-नाचोज / मोनॅको बिस्किटांवर टॉपिंग्ज

मेन डिश - पालक पनीर + भरवा भिंडी / बघारे बैंगन / डुबकीवाले आलू / दम आलू बरेच पर्याय आहेत...

राईस - वेज पुलाव + बुंदी रायता याऐवजी दही बुत्ती काकडी घालून जमेल?

गोडात केक असेलच + मिनि गुजा घालून कुल्फी करता येईल (संजीव कपूर च्या साईट्वर मिळेल), नंदिनीनी दिलेली फिरनी पण करता येईल... नाहीतर सरळ प्लेन वॅनिला आईसक्रीम ठेवता येईल + वेगवेगळे सिरप्स (रोज, खस, मँगो, ऑरेंज, चॉकोलेट)

भाज्यांमध्ये दुसरी भाजी ग्रेव्ही नसलेली चालणार असेल तर कॉर्न-कॅप्सिकम किंवा चायनीज स्टाईल व्हेजी स्टर फ्राय देखील ठेवता येईल.

एप्रिलमध्ये जर माझ्या नवऱ्याचा वाढदिवस असता आणि आम्ही पुण्यात असतो तर आमरस-पुरी, आम्रखंड-पुरी, मॅंगो मिल्कशेक, मॅंगो आईस्क्रिम, कैरीचे टक्कू, कैरीचे पन्हे यापैकी काही प्रकार केले असते कारण त्याला आंबा व कैरीचे प्रकार आवडतात.

Pages