निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, मानुषी, मस्त फ़ोटो. Happy
जागू ,पान छान दिसतय. Happy
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

जागु, पान मस्त दिसतंय. रविवारच्या दुपारच्या जेवणानंतरचे दिवस आठवले. Happy मागच्या मायदेशदौर्यात जिजूने बोरिवलीला एक घंटा पानवाला म्हणून आहे त्याच्याकडे नेलं होतं. त्याच्या दुकानात असलेल्या घंटामुळॅ त्याच्या दुकानाचं नाव गिनेज बुकात गेलंय. No photography allowed there Happy

खेकडे मला वाटायचं बिळं करताना माती उकरून बाहेर डेकोरेशन करतात Wink

वर्षु, मला स्टर फ्राय्ची आयड्या आवड्ली फक्त काही पिकं जसं स्नो पीज, cherry tomatoes, कोवळ्ञा बिन्स बागेतून घरात येतंच नाही. पोरं तिथंच फस्त करतात. तसंही हा उद्योग मुळात मुलांना याचा आनंद घेता यावा म्हणून तर करतो Happy

दुबईच्या गार्डनमुळे दुबईला जायची इच्छा वाढलीय Happy

मानूषी,, हेच फोटो थोडे प्रोसेस केले तर अगदी व्यावसायिक वाटतील.. अगदी जाणवेल एवढे नाही करायचे प्रोसेस, नैसर्गिकच रंग ठेवायचे. थोड्याश्या सरावाने नक्की जमेल.

ओह...सर्वांना धन्यवाद!
दिनेश माझ्या लेकीकडे इन्स्टाग्राम म्हणून काहीतरी आहे. तिने काढलेल्या फोटोंवर त्यात ती काहीतरी अमेझिन्ग गोष्टी करत असते.

मानुषी.. तो ऊडत्या पक्ष्याचा फोटो खुप सुंदर आलाय.. त्याला अजून थोडे खुलवायला हवे..उडत्या पक्ष्याचा असा फोटो काढणे खरेच कठीण आहे.

हो दिनेश... खूप पक्षी उडत असताना खूप फोटो घेतले...रॅन्ड्मली. त्यातलाच हाएक.
खूप फोटो घेतले की एखादा तरी बरा....आपल्याला आवड्ता मिळ्तो.

मानुषी, सगळेच, अगदी व्यावसायिक फोटोग्राफर्स पण असेच करतात. आणि आपल्याला रिझल्ट्स पण लगेच दिसतात. पुर्वी रोलवाले कॅमेरे असायचे त्यावेळी ज्याम सस्पेन्स असायचा.

मनुषी, दोन्ही फोटो एकदम छान. उडणार्‍या पक्षाचा अगदी खासच!!

लाल जाम
0541.jpg

चैत्र चाहूल लागल्यामुळे फक्त फुलेच नाही तर फळेही लाल झाली आहेत.

वॉव, लाल जाम... रोज अ‍ॅपल ना इंग्लिश मधे???

इंडोनेशिया ला लोकल भाषेत याचं नाव आहे,' जांबू(जाम) मेराह"(लाल)' लिटरली लाल जाम.. Happy

भारतात ही होतं का हे फळ सर्रास??

मानुषी... झटकी झटकी गा धूळ...

तुझी फोटोग्राफी मस्त मस्त चाललीये... एक्सेक बढकर फोटू टाकतेयस.. यू एस च्या ऋतुपरिवर्तना ची मजा इकडे बसून मिळतीये

खेकड्यांच्या रांगोळी मागचे कोडे दिनेश मुळे उलगडले,,, आता बीच वर चालताना अजून लक्ष देईन

वर्षू, लाल जाम तितके कॉमन नाहीत पण आहेत. तू त्याची फुले बघितलीस तर हरखून जाशील. मस्त गडद गुलाबी रंगाची फुले असतात. मधु कडे फोटो आहे का ?

ओ वॉव.. लाल जाम आणी स्टार फ्रूट ( करंबळ?? ) मला फक्त थायलँड, इंडोनेशिया आणी चीन चेच प्रॉडक्ट वाटायचे

करंबळ, आपल्याकडे पण आहेत. अगदी मुंबईत पण झाडे आहेत. गोव्याला तर खुपच आहेत. तिथल्या देवळाबाहेर विकायला असतात. वर्षू गोव्याला पावसाळ्यात जा. पर्यटक नसतात आणि त्या काळात गोवा खुपच सुंदर असते.

पावसाळ्यात तिथे मानकुराय नावाचे आंबे मिळतात. गोव्याबाहेर ते क्वचितच मिळतात. गोवेकरांचा तो जीव कि प्राण. हापूसपेक्षा खुप वेगळ्या चवीचे पण अगदी मस्त.

मधू जाम जामच गोड आहेत . आणि ते चैत्रांगण उतरवून घे़ऊ? आई नेमाने घालायची. मी ही कधीमधी घालायची.
दिनेश .जायंट वेलची मस्त.
मानकुराद गोवेकरांचा जीव ़ की प्राण ......अगदी अगदी ....ंमाझी वहिनी गोव्याची . तिच्याकडून हे मानकुराद ऐकलंय.

पुर्वी रोलवाले कॅमेरे असायचे त्यावेळी ज्याम सस्पेन्स असायचा.
>>>>>>>>
मी कॉलेजात असताना वडिलांशी माफक आर्ग्यू करून क्लिक ३ चा ७५ रु. चा कॅमेरा पदरात पाडून घेतला होता.
पण आधीच तेव्हा ७५ रु. हे ७५००० रु. वाटायचे. त्यात तो पुढे रोल आणा तो "धुवायला" टाका. त्यातले मग काही फोटो आलेले नसायचे काही चुकून एकावर एक.....इ.इ.
खूपच खर्चिक काम. पण छंदापुढे काय?

सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy
काय भराभरा धावतोय हा धागा... Happy
सगळ्यांचे फोटो मस्त. लाल जाम उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत! मानुषी, अगं कित्ती सुंदर फोटो आहेत!
दा, मला पण ही खेकड्यांची माहिती आजच कळली. मी समजत होते की, बीळ करताना ते माती बाहेर टाकतात ती 'ती' माती असते. आणि जायंट वेलची मस्तच दिसतेय!
मधुरा, बरं झालं तू चैत्रांगणाचा फोटो इथे दिलास. खूप सुबक आणि सफाईदार काढलंय ते. (रच्याकने, ते पेंटिंग वाटातंय इतकं सुबक आहे!). आणि गेरूच्या पार्श्वभूमीवर तर ते खूपच खुलून दिसतंय!

नववर्षाचा हार्दीक शुभेच्छा...
त्या वेलचीला इथे जिंगींगा म्हणतात. पोर्तुगीज भाषेतला शब्द आहे म्हणे. डिक्शनरीत सापडला नाही. झाड कसे असते तेही कळले नाही. तेवढे पोर्तुगीज मला येत नाही आणि माझ्या सहकार्‍यांना आम खाण्याशी मतलब. झाडबिड ते बघत नाहीत. इथे हा प्रकार नुसताच खातात. पण तो एकदम तोंडात टाकता येत नाही. मुरमुरतो. एक दोन बिया
एकावेळी चघळून चघळून खाव्या लागतात. मस्त टाईमपास होतो.

मानुषी.. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले १९७९ ला. त्यावेळी रंगीत रोल धुवायला २ महिने लागायचे.
त्यानंतरच तिच्या लग्नाचा अल्बम आला.
व्हीडीओ नव्हता. चक्क फिल्म काढली होती तिच्या लग्नाची. प्रोजेक्टर वापरून दाखवावी लागे.

वर्षु, गोव्याला पावसाळ्यात जा. पर्यटक नसतात आणि त्या काळात गोवा खुपच सुंदर असते.>>> अगदी पावसाळ्यात गोवा म्हणजे स्वर्ग धरेवर अवतरला अशी स्थिती!!

दा, पोर्तुगीज भाषेत गुड मॉर्निंगला 'बोम दिया' असंच म्हणतात आणि गुड नाईटला 'बोआ नॉइटं'! Happy

हो शांकली, मला कामचलाऊ पोर्तूगीज येतं.. तसे काही शब्द कॉमनही आहेत. अगदी कोकणी, मराठी भाषेतलेही आहेत.

Happy
गंमतच आहे नै! अगदी कोकणी, मराठी शब्द पण त्या भाषेत आहेत ह्याची! गेली अनेक शतके व्यापारामुळे जो अनेक देशांशी संबंध आला त्यामुळे असं झालं असावं का?

Pages