निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका मस्त बहर.

मागच्या धाग्यात नि.ग. करांनी दिलेल्या टिप्स वरून घरी उपलब्ध असलेल्या पान, बडीशेप, गुलकंद, धणाडाळ, खडीसाखर ह्यापासून तयार केलेले गोड पान.

चंदेरी फुलांचा बहर मस्तच...
साधना, त्या स्नो पीज असतात. दाणे अगदीच कोवळे असतात. शेंगा सालासकटच खायच्या असतात त्या.

आज एक गंम्मत झाली.. आफ्रिकेत स्थानिक पातळीवर काही फळे आवडीने खाल्ली जातात. माझ्या मित्रमैत्रिणींना माझी आवड माहीत असल्याने मला त्यातला वाटा मिळतोच. आज माझी सहकारी काही फळे घेऊन आली.
आपल्याकडचा देशी बदाम असतो तसेच रुप. आणल्या आणल्या तिने मला हवे का म्हणून विचारले. आधी मला देशी बदामच वाटले म्हणून नाही म्हणालो. ( कारण ऑफिसच्या परीसरातच त्याची खुप झाडे आहेत. आणि मी रोज आठ दहा तरी खातो.. )

थोड्या वेळाने ती खायला लागली तर फळाच्या आत काहीतरी वेगळेच दिसले. साधारण ड्रॅगन फ्रुट असते तसे म्हणजे पांढर्‍या गरात काळ्या बिया होत्या. एस्ते डोसे ( गोड आहे हे, घे ) असे ती मला म्हणाली. तर काय आश्चर्य.. त्याला चक्क आपल्या वेलचीचा स्वाद आणि तशीच मुरमुरणारी चव होती.. आफ्रिकन वेलचीचा शोध लागला मला. पोर्तुगीज भाषेतले नाव तिने जिंगींगा असे सांगितले. फोटो काढलेत मग टाकतो.

सुप्रभात अ‍ॅन्ड हॅपी विकेंड.
जागू, पान फारच टेम्प्टींग दिसतंय.
चला आता जरा समुद्रकिनार्‍यावर जाऊया.
स्थळः आवासचा समुद्रकिनारा.
हे खेकड्याचं घर आहे का? आणि त्या बारक्या गोळ्या खेकडे करतात का? कशासाठी?

ही आवासची मधुमालती. Combretum indicum, also known as the Chinese honeysuckle or Rangoon creeper संदर्भ विकी.

जवळूनः

या वरच्या फोटोवरुन मी कलर पेन्सिल स्केचही केलं होतं.

जागुले, पान एक्दम टेंप्टिंग गो!!!!

दिनेश, फोटो टाक लौकर...

आता खूप झाला आळस माझ्या कॅमेर्‍याचा... फोटोग्राफीला सुरुवात करायला हवीये.. (स्वगत!!! )

वेके, स्नो पीज , मशरूम , सेलेरी, कोवळ्या आल्याच्या चकत्या स्टर फ्राय करून खूऊऊप मस्त लागतात..

वर्षू, काढ बाहेर कॅमेरा आणि झटक त्यावरची धुळ...

ह्या मधुमालतीला वासही खुप छान येतो. मी हल्ली रात्री चालायला जाते, साधारण ९ ला जाते आणि दहा साडेदहापर्यंत परत येते. शेजारच्या पारसिक हिलवर जाते. रात्रीचा प्राजक्त, मधुमालती आणि रातराणी ह्या सगळ्या मंडळींचा घमघमाट सुटलेला असतो. काल अचानक लाईट्स गेले. रात्रीच्या अंधारात सगळी झाडे इतकी मस्त चमकत होती. थोड्या वेळाने चंद्रही आला डोक्यावर. त्याच्या प्रकाशात हिरवट पांढरी बोगनवेल, अनंत, गुलाबी,लाल आणि पांढरी फुले एकाच गुच्छात असलेली मधुमालती ही सगळी मंडळी अचानक काही वेग़ळीच दिसायला लागली..

ह्या मंडळींकडे बघत धावत जाताना मला अचानक अमानविय... हाही धागा आठवला.. नेमके त्यावेळी रस्त्यावर कोणी नव्हते, बंगले मागे पडलेले आणि त्यामुळे सोबतीला केवळ गर्द रान. मी कानाला हेडफोन लावुन गाणी ऐकत धावत असताना अचानक कोणी खाकरल्याचा आवाज आला. समोर कोण नाही, एका बाजुला खाई, दुस-या बाजुला जंगल, त्यातही कोणी नाही. मागे वळून पाहिले, तिथेही कोणी नाही.. म्हटले अमानवीय की काय........ शेवटी रेडिओवरुनच खाकरल्याचा आवाज आला असेल अशी समजुत घातली स्वतःची.. Happy

वर्षा तुझी स्केचेस मस्त असतात अगदी..

खेकड्यांएवढे चांगले घड्याळजी नसतील. त्यांचे खाद्य म्हणजे रेतीतले सूक्ष्म जीव. पण त्यांना ते तसे डायरेक्ट खाता येत नाहीत. त्यासाठी त्यांना घास घास भर रेती घेऊन ती चघळावी लागते. त्यातला खाऊ खाल्ला कि उरलेल्या रेतीचे ते असे गोळे करुन ठेऊन देतात. त्यांच्या आकाराप्रमाणे ते आकाराने लहानमोठे गोळे करतात. त्यांना कोरड्या वाळूत खाणे जमत नाही म्हणून जिथपर्यंत लाटा येतात तिथेच ते राहतात. भरतीच्या वेळी रेतीखाली लपतात. व ओहोटी लागली कि बिळातून वर येतात. भरती ओहोटीच्या वेळा त्यांना बरोबर कळतात. ( संदर्भ : बीबीसीची टाईम मशीन मालिका )
खेकडे जरा मोठे झाले कि खडकावरचे अन्न शोधून खातात व नंतर तिथेच राहतात. खाताना त्यांचा पोटातही रेती जातेच. म्हणून ते नीट साफ करावे लागतात खाताना. जपानमधे खेकडे पकडून त्यांना काही दिवस स्वच्छ पाण्यात ठेवतात. त्यामूळे त्यांच्या अंगातली रेती निघून जाते व ते जास्त चवदार लागतात ( म्हणे. )

आणि हा १०० पोस्टींचा खाऊ! (हे काय आहे? )
DSCN7868.jpg

हा चिबुड आहे. असं दुकानदाराने सांगितल पण चिबूड मी झोपेतही ओळखेन. याची चव काकडी+ चिबूड अशी होती. काहीतरी संकरीत प्रकार वाटतोय. Happy

अग असे भरपुर प्रकार सध्या बाजारात आहेत. मेलॉन्सचे प्रकार आहेत हे, चिबुड, खरबुज, टरबुज, कलिंगड ही सगळी चचुलत भावंडेच. मुळ फॅमिली मेलन्स. एक बॉबी नावाचा प्रकार आहे, लहान गोल गरगरित न त्यावर हिरव्या उभ्या रेषा .. खुपच बॉबी लागले खायला... परत पुढच्या वेळेस बघितले तर नव्हते Happy

वेका, चेरी चा बहर खुप सुंदर....

जागु, विड्याचे पान मस्त लावलय... आणि बर्‍यापैकी मोठ आहे आकाराने...

हे चिबुड काय असतं, फळ का भाजी? नागपूर ला नाही मिळत हे....

वर्षा, मधुमालती + पेन्सिल स्केचही खुप गोड... त्या सोबत केळीचे पानं पण काढली होती बहुतेक..

हे हामी मेलन तर नव्हे??

इकडली ही वरायटी आकाराने मोठी असते बरीच , पण एक गोल मेलन मिळते हिरव्या रंगाचे.. खायला खरबुजा सारखेच

लागते..

सुदुपार!!

मधु, कुंडीतली माती अलगद हाताने उकरुन आले बाहेर काढता येईल. त्यातले डोळे असलेले भाग कापून परत
पेरायचे. बाकीचे आले वापरता येईल. अगदी अर्धा इंच असले तरी त्याची चव फारच छान असते. >>>>>>

दिनेशदा तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे माती अलगद उकरली. हिरवी पाने गळून पडली होती. पण माती खाली १/२ सें.मी. चा कोंब आहे आजूबाजूला थोडे उकरून एक लहान तुकडा बाहेर काढला. मस्त... घरचे आले!!!
(प्रयोग मल्हारचा असल्याने जास्त लुडबुड करणे शक्य नाही. त्याची उत्सुकता टिकली पाहीजे. तो कोकण क्रोकोडाईल सफारी गेला आहे, तवढ्यात मी माझे समाधान करून घेतले)

मातीतून काढलेले:
0536_0.jpg

धुतल्या नंतरः
0537.jpg

मी कानाला हेडफोन लावुन गाणी ऐकत धावत असताना अचानक कोणी खाकरल्याचा आवाज आला. समोर कोण नाही, एका बाजुला खाई, दुस-या बाजुला जंगल, त्यातही कोणी नाही. मागे वळून पाहिले, तिथेही कोणी नाही.. म्हटले अमानवीय की काय........ शेवटी रेडिओवरुनच खाकरल्याचा आवाज आला असेल अशी समजुत घातली स्वतःची.. स्मित>>>>>>>>>>.साधने, नको तेव्हा ’तो’ धागा आठवला ना? Wink (खूप हसले मी) Lol

मधुरा मस्त आल मस्त आलय. Happy

वर्षा मधुमालती पाहून प्रसन्न वाटल.

हे फोटो आमच्या समुद्र किनारच्या खेकड्यांच्या कलाकुसरीचे.
http://www.maayboli.com/node/30779

दुबइ मिरॅकल गार्ड्न.
miraclegarden.JPG

... जिप्सी सारखा कॅमेरा आणी फोटो काढण्याची कला दोन्ही नसल्यामुळे खूप खंत वाटली...इथे नावे विचाराय्ला एकेका फुलाचे फोटो टाकेनच Happy

जागुले पान अगदी चविष्ट!
वर्षू किती ते माहेरपण करून घ्यावं? चल आता उचल तो कॅमेरा आणि डकव बरं इथे चायनीज फोटो.
वर्षा फोटो मस्त , आणि दिनेश ...खेकड्याची रांगोळी बघितलीये. पण ते काय असतं हे आत्ताकळलं. इन्ट्रेस्टिन्ग!
साधना ....गो गर्ल गो..........
मधूचं (़ खरं म्हण़्जे मल्हारचं) आलं मस्तय!


पोटोमॅक नदीतले इतर पक्षी.... गीज, बदकं. किनार्‍यावरचे लोक त्यांना खायला टाकत...तेव्हा ते अती कलकलाट करायचे.

Pages