निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोर्तुगीजांचे राज्य होते ना गोव्यावर.. म्हणून. इथेही त्यांचेच राज्य होते. स्थानिक भाषा इथे व्यवहारातून लुप्तच झालीय.

वर्षू, लाल जाम तितके कॉमन नाहीत पण आहेत. तू त्याची फुले बघितलीस तर हरखून जाशील. मस्त गडद गुलाबी रंगाची फुले असतात. मधु कडे फोटो आहे का ? >>>> फुले माहीत नाही. मी तर हे विकत आणले. माझ्या कॉलनीत विरारहून एक भाजीवाली भाजी घेऊन येते. तिच्याकडे मिळाले.

मधू जाम जामच गोड आहेत . आणि ते चैत्रांगण उतरवून घे़ऊ? >>>>>
हे चैत्रांगणचे पोस्टर आहे. मागे एकदा कोल्हापूरला गेले असताना विकत घेतले होते. लॅमिनेट करून घेतले आहे. त्यावर प्रकाशकाचे नावही आहे. मी फक्त ईथे टाकले.

मी टाकला होता लाल जामच्या फुलाचा फोटो. जाम, पेरु, जांभूळ, लवंग.. सगळे एकाच कुळातले. त्यांची फुले सारखीच असतात. पण या जामचे फूल खुप मोठे असते आणि गडद गुलाबी रंगाचे असते.

चैत्र, चैत्रचाहूल, चैत्रपालवी, चैत्रांगण, चैत्रगौर
घरावर गुढी, अंगणात रांगोळी, दारावर तोरण
आंबा, आम्रखंड, आंब्याची डाळ
कैरीची चटणी, कैरीचे लोणचे, कैरीची आमटी, कैरीचे पन्हे
भिजवलेले चणे आणि कलिंगडाची फोड
चाफा मोगरा सुरंगीचा वास आणि कडुनिंबाचा कडूपणा
आणखी काय हवे नवीन वर्षाच्या स्वागताला???
नववर्षाच्या शुभेच्छा !!!

मानुषीताई, सी गल चा फोटो अमेझिन्ग आहे.....मस्त कॅप्चर केला आहात.
सर्वांना गुढीपाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा!

पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

From mayboli
गुढीला पांढ-या चाफ्याच्या फुलांची माळ हवी खरं म्हणजे, चाफा फुले पानाविना ह्या बोरकरांच्या कव्यपंक्तीची प्रचीती देणारा!

From mayboli
हे जरा जवळून
From mayboli

हा जरा वेगळा पाने न झडता फुलणारा

From nasik

मनुषी, प्राची अप्रतिम फोटोज...

मधु मकरंद... चैत्रांगण मस्त...

तसेच सगळ्यांचे चैत्रपाडव्या चे फोटोज खुप सुंदर...

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नुतन वर्षाच्या सर्वांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!!!
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या "गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर" माझा पहिला ब्लॉग "विमुक्त मी".
सध्या मायबोलीवरच्या पूर्वप्रकाशित थीम्स/फोटोफिचर सादर करत आहे (नविन एखादी थीम/फोटोफिचर प्रकाशित केल्यावर तुम्हाला फेसबूकवर टॅग करेनच Wink ). नविन थीम्स्/फोटोफिचर लवकरच घेऊन येईन. सध्या trial and error बेसिसवर आहे. सो काही सुचना असतील तर अवश्य कळवा. आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला नक्कीच आवडेल. कडुलिंबाचा कडुपणा गिळुन आणि गुळाचा गोडपणा ओठावर ठेवून नवीन वर्षाची सुरूवात करत आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत आहेतच. Happy

पुन्हा एकदा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!

"वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" सध्या सर्वत्र अशीच स्थिती आहे आणि सर्वांचीच अवस्था "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी झालेली आहे. याला कारण नुकताच सुरू झालेला कडक उन्हाळा. उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्‍यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".
http://vimuktamee.blogspot.in/2014/03/blog-post_30.html

आपल्याकडे वसंत सुरु झाला आजपासून तसा इंग्लड मध्ये ही स्प्रिंग सुरु होतो. थोडी कमी झालेली पण पूर्ण न गेलेली थंडी, हवा तशी ढगाळच, आकाश करडं, मधूनच डोकावणारा मंद आणि हवाहवासा वाटणारा सूर्यप्रकाश, जमीनीवर जिथे मिळेल जागा तिथे हिरवळ त्या हिरवळीतच मधुन मधुन वर आलेले डॅफोडिल्सचे कंद आणि त्यातून वर आलेली ही वर्डसवर्थची डॅफोडिल्स. हळदुल्या रंगाची. वर करडं आकाश, खाली हिरवळ आणि त्यावर आपल्या माना उंचावून जग बघणारी ही पिवळी डॅफोडिल्स अप्रतिम दिसतात. अगदि पंधरा वीस दिवसच असतात पण त्या दिवसात लंडनला एक वेगळेच वैभव प्राप्त करुन देतात.

From mayboli

ही जवळून

From mayboli

धन्यवाद सायली Happy

मनीमोहोर>>>>>>मनीमोहर, क्या बात है!!! मस्तच फोटो. Happy

Pages