निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो शशांक माझ्या माहेरी काहीवर्षे म्हशींचा गोठा होता. मला त्याचा अनुभव आहे. हिरवा पाला, गवत खाऊन म्हशी पातळ दूध देतात. उन्हाळ्यात मात्र घट्ट दूध देतात. उन्हाळ्यात सुबाभुळ चा पाला जास्त दूध येण्यासाठी चांगला असतो.

गुळाचा चहा आई पूर्वी कधीतरी करायची. मस्त लागतो.

फार फार वर्षापूर्वी निगच्या याच धाग्यावर (पान क्रं. २४) एक प्रश्न विचारला होता. ज्याच्या सगळ्यांनी अनुल्लेख केलेला (साधना सोडुन), त्याचं नाव सापडलं. Wink Happy

रच्याकने, तुर्‍यासारखा फुलोरा येणारा (याच सीझनमध्ये) वृक्ष कोणता आहे. आज पाहिला पण नावं आठवत नाही आहे (एका मित्राने नाव सांगितलं होतं पण विसरलो). संपूर्ण झाडावर एकही पान नाही पण बारीक बारीक फुलांचा फुलोरा आहे.>>>>>>>त्या झाडाचं नाव "शेमट" आहे बर्का. Happy

commonly known as: Indian ash tree, moya, wodier
http://www.flickriver.com/photos/dinesh_valke/2236607821/

पुरंदरे शशांक | 12 March, 2014 - 16:41
आज ऑफिसला येताना एक फुलोरा पाहिला.
पानं साधारण तिवरांसारखीच, पण हा फुलोरा वेलीवर होता,
फुलं करंजासारखी सफेद (किंवा फिक्कट गुलाबी) असावी. त्याची मांडणीही करंजाच्या फुलासारखीच होती. कुठलं असांव हे फुल? >>>> अरे जिप्सी - फोटो टाकायला काय घेशील रे ...... >>>>>> ए काये जिप्सी - मी तुझ्या पोस्टची दखल घेतली होती हां - त्याच पानावर ..... तेव्हा माझी मूठ उघड बरं ....... Happy Wink

फार फार वर्षापूर्वी निगच्या याच धाग्यावर (पान क्रं. २४) एक प्रश्न विचारला होता. ज्याच्या सगळ्यांनी अनुल्लेख केलेला (साधना सोडुन),>>>>>>>>>>अर, मी पाहिला नसेल. नाहीतर त्वरीत उत्तर दिलं असत. Wink (काय ते विचारू नये :फिदी:)

. तेव्हा माझी मूठ उघड बरं ....>>>>>>>>>>>बालपण मनात अगदी घर करून बसलय ना?>>>> हे जिप्सीला अज्जिबात माहित नसणार .... सांग बरं जिप्सी - याचा अर्थ ??? Happy

खरंच नाही माहिती >>>> क्या बोला था मैं .... मुझे पैलेच मालूम था ये कि जिप्सीको इसका पता नही होगा ... Happy

१००० प्रतिसादांबद्दल अभिनंदन! Happy
DSCN0181.jpg

क्या बोला था मैं .... मुझे पैलेच मालूम था ये कि जिप्सीको इसका पता नही होगा ..>>>>>>>...इसने, ऐसा कुछ बचपन मे किया नही है! ये अभी करेगा! Wink (सिखावो उसको. काम आयेगा.) Lol

Jipsya mi tula ghevdyacha vel tyach post sathi takla hota na re.
Halli na tujh lakshach nast. Hahahaha...

पुन्हा आसमंत मधे, मेथीच्या वासाच्या दूधाचे प्रकरण आहे.

जागूबाई, कामाला लागा बरं.. पुढचा भाग येऊ द्या आता.
वर्षू गेलीय चायनाला आणि टिंब टिंब चा सन्यास आहे.. त्यामूळे फोटो पण तूलाचा काढायला हवा.

बापरे काय धावतोय हा धागा! पोष्टी वाचुन वाचुन दमायला होतय.....आणि शोभा ताईं च्या पोष्टी वाचुन
खुप हसायला येतय..... Proud

टिंब टिंब चा सन्यास आहे

टिंब टिंब आत्ताच गृहस्थाश्रमी झालाय.... त्याच्या पथ्यावरच पडलाय हा संन्यास....

करु दे बिचा-याला मजा थोडे दिवस. मग आहेच आटे-डाल का भाव..... Happy

जिस्प्या, आता तुला कळले ना कोतुखमै?????????

एप्रिल मध्ये राणीच्या बागेत कोणत्या दिवशी आणि कधी भेटणार? मलाही यायचं आहे.

अंजली ठरले की इथे टाकुच प्लान.. तुही ये.

आमची जुळी बाळं जरा मोठी झाल्यावर आज फोटो काढला. त्यांच्यावर सावली येईल अशी फडकी घालून ठेवते ग्रिल्सवर. पण सावलीत फोटो येईना म्हणून अर्धं मिनिट फडकी बाजूला करुन फोटो काढलाय. मम्मा कबुतर लांबून बघतं होतं.

kabutar pillu.JPGkabutar pillu 1.JPG

मम्मा कबुतर इज हॅप्पी. तिला तसेही पोरांचे करायचा कंटाळा आहे. आणि आता एक गडी म्हणजे मोलकरीण मिळाल्यावर ती सुपर हॅप्पीच असणार ना.... अश्वे, फेबुवर टाक गं म्हणजे ममा कबुतर तुला सुपर लाईक करेल

कित्ती गोड. मी नालासोपारा येथे असताना माझ्या कुंडीतपण कबुतराने अंडी घातली होती २. कुंडी खूप लहान होती आणि एक पिल्लू मेले तेव्हा मला खूप वाईट वाटले, एक मात्र छान झाले आणि नंतर उडून गेले.

साधना, ती कबुतरं घरात आलेली अज्जिबात आवडत नाहीत मला. म्हणजे आलीच तर मी मारत वगैरे नाही पण त्यांना हाकलून देते. पण पिल्लांचा कसा गं राग राग करणार? मागच्या वेळचं पिल्लू चांगलं थोराड झालं तरी जाईच ना. मग त्यालाही शुक शुक करुन कुंडीच्या काठावर चढायला लावलं. ३-४ दिवसांनी सज्जावर उतरायला लावलं. मग परत ३-४ दिवसांनी उडायला लावलं. त्याचे आईबाबा त्याचे जामच लाड करत होते.

अ़न्जू Happy

नयना, मम्मा कबुतर मान वाकडी करुन बघत होतं फक्त.

त्यालाही शुक शुक करुन कुंडीच्या काठावर चढायला लावलं. ३-४ दिवसांनी सज्जावर उतरायला लावलं. मग परत ३-४ दिवसांनी उडायला लावलं. त्याचे आईबाबा त्याचे जामच लाड करत होते.>>>>>>>>>>>>हे खरं तर त्याचे पालक करताना मी पाहिलयं, पण साधना म्हणते तसं , जर परस्पर होतेय शिकवणी तर ते कशाला मध्ये येतील ? Light 1 Lol

आज ऑफीस मधल्या ऐका मैत्रीणी ने ही फुले भेट म्हणुन दिलीत....
सकाळ पासुन इतक प्रसन्न वाटत आहे.... उद्या आमच्या कडे पाहुणे येणार आहेत,
तेव्हा बैठक खोलीत ही काचेच्या बाउल मधे ठेवणार आहे मी......krishna kamal11.JPG

Pages