निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांकजी मी अजुन महिन्यातून एकदा तरी चूल लावते. >>>>>आहाहा...... जागू, ती चुलीवरची भाकरी पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलंय ...स्लर्प ..... Happy

धन्यवाद शशांक जी.. आज संध्याकाळीच घरी नेते... हिरवा पाचु सापडल्या सारखा वाटतो आहे.
जागु, तुझे पण आभार... तुझ्यामुळे या फुलाच्या प्रेमात पडले...

जागू, मस्त लिहिलायस लेख.... आईचे गुण लेकी मधे आपचुकच येतात... त्यामुळे तुझ्या लेकींना
पण चुल तेवढीच जवळची वाटेल बघ...

शशांक, छान लिहिलं आहे. Happy
मी अजुनही तांदळाचे पोहे होताना पाहिले नाही. Happy पेण/अलिबाग परीसरात एखादी चक्कर मारावी लागेल आता. Happy

मी अजुनही तांदळाचे पोहे होताना पाहिले नाही. स्मित पेण/अलिबाग परीसरात एखादी चक्कर मारावी लागेल आता. >>> मला नाही वाटत आता असे कांडून कोणी करत असेल - आता बहुतेक सगळं यंत्राने होत असेल ... Happy

शशांकजी, आम्ही निखार्‍यावर कांदे, करांदे, काजू, भाजून खायचो. अहाहा! काय चविष्ट लागायच सगळं. Happy
त्या मोठ्ठ्या पातेल्यात पाणी उकळत होते आणि त्यात सालासकट तांदूळ (आता नेमका शब्द आठवत नाही काय म्हणतात त्याला ते ???? -साळीचा तांदूळ म्हणतात बहुतेक ) >>>>>>>>>>>आमच्याकडे त्याला भातंच म्हणायचे. Happy
अगदी हलक्या हाताने -.... त्या कांडणामुळे त्या तांदळाच्या वरच्या सालामधून ते पांढरट पोहे बाहेर पडत होते ... (आता नेमके आठवत नाहीये ते वेगळे कसे करत होते ते .....)>>>>>>ते सुपात घेऊन पाखडतात व भाताची सालं व पोहे वेगवेगळे करतात. आमच्या घरी पण पोहे कांडले जायचे.त्यात कांडताना हळदीची पाने पण टाकली जायची. मस्त वास येतो मग. आणि आम्ही पण लुड्बुड करून, पोहे कांडून बघायचो. Proud (सगळ दृष्य जसच्या तसं उभं राहिलं. प्रज्ञा,,,,,,,,,,,,,,,,,,,,)

त्या कांडणातून असले मस्त पोहे बाहेर पडत होते ना की ते गरम गरम पोहे खाताना (कुठल्याही तिखटमिठाशिवायही) असे वाटत होते की अमृतही फिके पडेल याच्यापुढे - असली जबरदस्त चव होती त्या ताज्या पोह्यांची .....
आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही मी ... ती जबरी चव ... (तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥ या बुवांच्या उक्तीचीच आठवण आली अगदी ... स्मित -- त्या चवीला उपमाच नाही त्याच्यासारखी तीच चव .. स्मित)>>>>>>>>१०० % अनुमोदन! Happy (गेले ते दिन, राहिल्या त्या आठवणी. :अओ:)

कोणाला असले पोहे खायला मिळाले असतील तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !!>>>>>>>>आम्ही, आम्ही.

जात्यावर, आईबरोबर (एका पायाची घडी आणि एक पाय सोडलेला ) दळायला पण मजा यायची. एका हाताने खुंटा धरून जाते फिरत असतानाच, दुसर्‍या हाताने त्यात धान्य टाकायचे. आणि कधी कधी मज्जा म्हणून वेगात जाते फिरत असताना खुट्यांचा हातच सोडून द्यायचा. ते बिचारे गरागरा फिरत रहायचे. मग परत खुंटा पकडून दळायला सुरुवात. Proud

खरेच ते पोहे मस्त असायचे. मी कांडताना कधी पाहिले नाही पण खाल्लेत. आताही कोकणसरसमधुन लाल तांदळाचे पोहे विकत घेते. अर्थात ते मशिनचे आहेत, पण तरीही.. दुधाची तहान ताकावर....

आम्हाला हा अनुभव कधीच नाही घेता आला. Sad
गरम गरम पोहे खाताना>>>>आमच्या घरी दिवाळीला पोह्याचा चिवड करायचे तेंव्हाच भाजलेले गरम गरम पोहे खायचो. Proud

अजून एक गंमत - पूर्वी या अशा गावांमधे "गुळाचा" (नो टायपो - साखरेचा नाऽही गुळाचाच Happy ) पण बिनदुधाचा "च्या"ही प्यायलोय मी - असला खमंग चहा अस्तो ना हा.... एकदम भारी... Happy

आणि एक राहिलं - धारोष्ण (निरसं) दूध - गायीचं किंवा म्हशीचे दूध काढल्या काढल्या पिताना इतकं कोमट आणि गोऽड लागतं ना - हे देखील दुसरे अमृतच असावे अस्ले भारी असते .... Happy

अजून एक गंमत - पूर्वी या अशा गावांमधे "गुळाचा" (नो टायपो - साखरेचा नाऽही गुळाचाच स्मित ) पण बिनदुधाचा "च्या"ही प्यायलोय मी - असला खमंग चहा अस्तो ना हा.... एकदम भारी.>>>>...हा कधी कधी असायचा आमच्याकडे.
Happy
आणि एक राहिलं - धारोष्ण (निरसं) दूध - गायीचं किंवा म्हशीचे दूध काढल्या काढल्या पिताना इतकं कोमट आणि गोऽड लागतं ना - हे देखील दुसरे अमृतच असावे अस्ले भारी असते .... >>>>>>>>याची आज सकाळीच आठवण झाली होती. कित्येक वर्षात तसे दूध मिळाले नाही. Uhoh

पण बिनदुधाचा "च्या"ही प्यायलोय मी - असला खमंग चहा अस्तो ना हा.... एकदम भारी>>>>येस्स, हा अनुभव कित्येकदा घेतला आहे. अगदी पितळीच्या थाळीतुनही. Happy

गायीचं किंवा म्हशीचे दूध काढल्या काढल्या पिताना इतकं कोमट आणि गोऽड लागतं ना >>>दूधाचा आणि आमचा ३६चा आकडा सो ह्या अनुभवाच्या वाटेला कधीच गेलो नाही. मागे एकदा कोल्हापूरला गेलो असता मित्रांनी मात्र गंगावेश इथे धारोष्ण दूधावर ताव मारला होता. Happy

दूधाचा आणि आमचा ३६चा आकडा सो ह्या अनुभवाच्या वाटेला कधीच गेलो नाही. मागे एकदा कोल्हापूरला गेलो असता मित्रांनी मात्र गंगावेश इथे धारोष्ण दूधावर ताव मारला होता. स्मित>>>>>>>>>>>.जिप्स्या, ह्यावर माझे वडील काय म्हणतील सांगू, रागवू नको हां! "पिकल्या झाडाखाली उपाशी मरणार! " Lol

शोभा Proud
पन खरंच दूधाचा आणि माझा अजुनही ३६चाच आकडा आहे Happy मात्र दूधाच्या पदार्थांशी (पेढे, बर्फी, मावा,दही, ताक इ.इ.) ६३ चा आकडा. Happy Wink

पण बिनदुधाचा "च्या"ही प्यायलोय मी - असला खमंग चहा अस्तो ना हा.... एकदम भारी>>>>येस्स, हा अनुभव कित्येकदा घेतला आहे. अगदी पितळीच्या थाळीतुनही. >>>> कित्येकदा नाही पण दोन चार वेळा प्यायले आहे, पितळीत चा, धारोष्ण दूध, घट्ट कवडीच दही...... आहाहा........

शोभाताई नुसतं दुध प्यायला मला पण नाही आवडत पण त्यात कॉफी घालून प्यायला आवडतं.

पोह्यांची वर्णने मस्त. मी लहान असतानापण घरी पोहे कांडलेले नाही बघितले कोकणात.

कित्येकदा नाही पण दोन चार वेळा प्यायले आहे, पितळीत चा,>>>>>>....आम्हाला कपात किंवा स्टीलच्या फ़ुलपात्रात मिळायचा. Happy

साधना लाल तांदुळाचे पोहे, काय आठवण काढलीस, गावावरून येतात कधी कधी लाल तांदूळ आणि पोहे, आमची शेती नाही पण गावातली लोकं देतात.

या गायी-म्हशीच्या दुधाच्या संदर्भात - या जनावरांनी लसणाची किंवा कांद्याची पात खाल्ली असेल तर त्याचा वास दुधाला हमखास यायचा - माझी आजी तिच्या उपवास वगैरे प्रकर्णामुळे असले दुध प्यायची तर नाहीच पण परत पाठवून(!) द्यायची त्या गवळ्याकडे ... मी मात्र मुद्दाम ते वासाचं दूध प्यायचा प्रयत्न करायचो आणि मग आजीच्या हातचा धपाटाही खायचो .... Happy

इथे पुण्यात जे माझे मित्र आहेत - ज्यांच्या घरी गायी-म्हशी आहेत - त्यांना मी विचारत होतो की पावसाळ्यातला ओला पाला (गवत) खाऊन मस्त दूध येत असेल ना या जनावरांना .... तर ते म्हणाले की तसे नाही - या असल्या दुधात पाण्याचा अंश जास्त असतो (त्यांच्याकडे त्याला पाणीदार शब्द आहे...) त्याला चांगला भाव येत नाही - आणि हीच जनावरे उन्हाळ्यात - थंडीत जो कडबा खातात - वाळलेला - त्यामुळे दूध जास्त घट्ट मिळते ... (अजूनही ते आंबोण वगैरे बरेच सायास करावे लागतातच ते घट्ट दूध - जास्त फॅटवाले- दूध मिळवण्यासाठी.... )

ते पोह्याचे पापड लाल तांदुळाच्या पोह्यापासुन करतात का?
(पोह्याचे पापड, गव्हाच्या कुरडया, तांदुळाचे पापड, साबुदाण्याचे पापड (चिकवडी ??) म्हणजे जीव कि प्राण Happy )

लहानपणी गावी गुळाचाच चहा असायचा. चवीला चांगला लागायचा. पण तेव्हाच्या लोकांना साखरेचे अप्रुप असायचे. स्पेशल पावना आला की साखरेचा चहा.. इथे गॅसवर गुळाचा चहा केला तरी त्याला ती गावची चव येत नाही.

माझ्या दोन्ही आज्यांच्या सैपाकखोल्यांमध्ये दोन-तिन फुट उंच आणि चार फुट लांब अश्या दोन लाकडी पेट्या होत्या. त्या पेट्यांमध्ये महत्वाचे सामान जसे की अख्खे मसाले व. असत. साखरही त्यातच असायची. आणि चावी आजीच्या गळ्यात. Happy त्यामुळे कधी साखर खायला मिळाली की तो दिवस दिवाळीच वाटायचा.

मला अजुन लहानपणीचे वीज नसलेले गाव आठवतेय. प्रत्येक खोलीत उंब-यावर रॉकेलचे दिवे ठेवायचे. कंदील असायचे पण ते बाहेर मेन खोलीत आणि येताजाता वापरायला. बाकी घरात सगळिकडे बाटलीतले दिवे. जुन्या अर्ध्या फुटी चॉकलेटी रंगाच्या बाटल्या, त्याच्या बुचात दोरीची वात घातली की झाला दिवा. उंब-यावर दिवा ठेवला की दोन्ही खोल्यात प्रकाश.

आणि गंमत म्हणजे तेव्हा तो पिवळसर प्रकाश खुप जास्त वाटायचा. सगळे गाव साधारण साडेसात आठच्या सुमारास झोपायचे. फक्त आमचे घर तेवढे दहा वाजेपर्यंत जागे असायचे. आता १ वाजेपर्यंत असते Happy

जिप्सी, पोह्याचे पापड लाल तांदुळाच्या पोह्यापासून नाही करत बहुतेक, कारण त्याचे डांगर विकायला असतना ते पांढऱ्या रंगाचे असते. त्यात तिखट-मीठ घालून खायला छान लागते, आवडत असेल तर ताक घालायचं.

तुम्ही जे बोलताय त्याबद्दल मला काडीचाही अनुभव नाहीये Uhoh
तांदळाच्या पोह्याची प्रोसेस तर पहिल्यांदाच ऐकली Uhoh
गुळाचा चहा मी पिऊ शकेन का? (नाsssssssssssssssही)

गावावरून येतात कधी कधी लाल तांदूळ >>>>>>>>>>>गेले कित्येक वर्षे मी ह्याच्या शोधात आहे. अजूनही मिळालेला नाही. Uhoh
मला अजुन लहानपणीचे वीज नसलेले गाव आठवतेय. प्रत्येक खोलीत उंब-यावर रॉकेलचे दिवे ठेवायचे. कंदील असायचे पण ते बाहेर मेन खोलीत आणि येताजाता वापरायला. बाकी घरात सगळिकडे बाटलीतले दिवे. जुन्या अर्ध्या फुटी चॉकलेटी रंगाच्या बाटल्या, त्याच्या बुचात दोरीची वात घातली की झाला दिवा. उंब-यावर दिवा ठेवला की दोन्ही खोल्यात प्रकाश.>>>>>>>...आमच्याकडे चिमण्या आणि कंदिल होते. अजूनही इथे एक कंदिल आहे. चिमणी आहे का माहित नाही. त्यावर लावलेल्या काचेचा आकार अजूनही मला आवडतो. दिवेलागणी आधी कंदिलाची, चिमणीची काच, हळू हाताने, मऊ राखेने, आणि मग कागदाने पुसणे हे एक नाजूक काम असे. Happy

आम्हीपण सुट्टीत गावाला जायचो तेव्हा वीज नव्हतीच गावात. रात्री भुताच्या गप्पा ऐकायला मजा यायची अंधारात, कंदिलाच्या प्रकाशात.

शोभा वडीलांचे वाक्य मस्त.

शशांकजी, जिप्स्या, साधना, शोभा किती आठवणींना उजाळा मिळतो एखाद्या विषयाने ना? माझे सासरचे गाव पेण आहे. तिथून पोह्यांची भेट येते किंवा आम्हीही तिथे गिरणीवर जाऊन पोहे घेतो. जर असे हातसडीचे पोहे कुणी करत असेल तर मी विचारेन.

धारोष्ण दुधावरून आठवले. सगुणा बागेत सकाळी व संध्याकाळी धारोष्ण दूध पिण्यासाठी तेथील पर्यटकांना तबेल्यात बोलावतात. एकदा गटग करुया आपण सगुणा बागेत.

शोभाताई, लाल तांदूळ माझ्या नवऱ्याला खूप आवडतो म्हणून कोणी दिला आणि त्याच सुमारास इकडून कोणी गेले किंवा कोणी यायचं असेल तर आमचे घरातले पाठवतात, विकत मिळत असेल तर विकत घेतो नवरा तिथे गेल्यावर.

Pages