निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

Sayli krishnkamal sandhyakali
Sayli krishnkamal sandhyakali mavltat.
Tu ase lavlelibphule pahun hyachi morachya pisaryachi chan rangoli kadhta yeil hi kalpana aali manat.
Ashwini mast bale g.
sadhna hahahaha.........
dineshda sandhyakal paryant navin dhaga kadhte
जागु, कल्पना खरच आवडली.... पण
जागु, कल्पना खरच आवडली....
पण अशी फुले ती मला नेहमीच आणुन देते.. आणि किमान दोन दिवस तरी ही टवटवीत राहातात,
फक्त पाण्यात ठेवावी लागतात...
सायली, मोरपिसांचीच आठवण होतेय
सायली, मोरपिसांचीच आठवण होतेय तो फ़ोटो बघून.
:
Changlach aahe mag. Mi pan
Changlach aahe mag. Mi pan theun baghen.
सायली मस्त आहेत, मलापण
सायली मस्त आहेत, मलापण मोरपिसांची आठवण आली.
मुझे पैलेच मालूम था ये कि
मुझे पैलेच मालूम था ये कि जिप्सीको इसका पता नही होगा ...>>>>सांगा ना हा काय प्रकार आहे ते.
केश्वी, सायली मस्त फोटोज.
मोरपिसांचीच आठवण होतेय तो फ़ोटो बघून>>>>अगदी अगदी
दिनेशदा, साधना सन्यास नै कै काडीमोड घेतलायं.
dineshda sandhyakal paryant navin dhaga kadhte>>>>>>जागू, एक आठवडा अजुन थांब ना आणि गुढिपाडव्याला नविन धागा सुरू कर (चैत्रबहर, चैत्रचाहूल, चैत्रपालवी इ.इ.)
दिनेशदा, साधना सन्यास नै कै
दिनेशदा, साधना सन्यास नै कै काडीमोड घेतलायं. फिदीफिदी>>>>>>>> आणि हे हसत सांगतोयस?
जागू, एक आठवडा अजुन थांब ना आणि गुढिपाडव्याला नविन धागा सुरू कर (चैत्रबहर, चैत्रचाहूल, चैत्रपालवी इ.इ.)>>>>>>>>१०० % अनुमोदन!
येस, गुढीपाडव्यासाठी माझंपण
येस, गुढीपाडव्यासाठी माझंपण अनुमोदन.
मुझे पैलेच मालूम था ये कि
मुझे पैलेच मालूम था ये कि जिप्सीको इसका पता नही होगा ...>>>>सांगा ना हा काय प्रकार आहे ते. >>>> ते परत गृहस्थाश्रमात आलास तरच सांगण्यात येईल.... नाही तर राहिलं... आपल्याला काय ????

धन्यवाद सगळ्यांचे.... हो
धन्यवाद सगळ्यांचे....
हो जागु, नक्की ठेवुन बघ...
वा ! गुढीपाडव्यासाठी माझंपण अनुमोदन.
नाही तर राहिलं... आपल्याला
नाही तर राहिलं... आपल्याला काय ????>>>>>>>>>>>
शशंकजी, मी अजून नाही सांगितलं हां! 
Are pan toparyant capacity
Are pan toparyant capacity sampel na dhagyachi.
नमस्कार लोकहो, मला खालील
नमस्कार लोकहो, मला खालील फुलांची/झाडांची नावे सांगणार का? दोन्ही फोटो तारापूरला काढले आहेत आजच.

हा एक मोठा वृक्ष होता.
आणि हे छोटे झुडूप होते:

कित्ती क्युट आहेत, वर्षा.
कित्ती क्युट आहेत, वर्षा. पहिली काटेसावर (शाल्मली) आहे का?
झुडुपावर, गुलाबी रंगाचे शेपटीवाले पक्षी बसलेत असा भास होणारी फुले आहेत.
वॉव ...वर्षा ... मस्त रंग
वॉव ...वर्षा ... मस्त रंग आहेत. आणि सायलीचा बुके....कृ.कमळांचा !
व 
बरेच दिवस एकच रस्त्याने चालायला जाते. त्यामुळे इथले निसर्गाचे बदलते रंग अगदी जाण्वताहेत.
जिथे माण्साच्या अस्तित्वाच्या खुणा म्हण्जे घरे आणि गाड्या. यातली घरे गुपचुप उभी, गाड्या मात्र नुस्ती भुर्र भुर्र!
कोणत्याही प्रकारचा किलबिलाट नाही. फक्त गीजचं हॉन्किन्ग तेवढं कधी तरी. कधी सी गल्सचा चीत्कार.
पण आता रस्त्याकडेच्या खुरट्या गोलाकार झुडुपातून असंख्य चिमण्यांचा चिवचिवाट चालू ़ ़ असलेला जाण्वतो. या ़ झुडुपांच्या जवळून गेलं की सगळा थवा सामुहिक उड्डाण करतो.
कावळेही ओरड्तात. यातल्याचिमण्या आपल्या भारतीय चिमण्यां पेक्षा थोड्या मोठ्या तर कावळ्याचं ओरडणं जरा वेगळंच. ते मला काव काव पेक्षा टर्र टर्र असं ऐकू आलं.
मग वाट्लं .....अरे हां.....हा इन्ग्लिश मधे ओरड्त असणार.....काव काव (असं मराठीत ) करायला तो काय भारतीय काबळा थोडाच आहे!
असो...विंटर संपून स्प्रिन्गची चाहूल.... म्हण्जे ऑफिशियली सुरू झालाय.
रस्त्यावर माण्सं दिसायला लागलीत. आणि त्यांच्या बरोबरची पाळीव कुत्री !
सायकलिस्ट आणि रनर्स! मस्त. वाट्त हे सगळं बघून. माणसाच्या अस्तित्वाच्या जिवंत खुणा!
आधीच्या खराट्यांना आता काही ठिकाणी सूक्ष्म लाल चुटुक फुलांचे धुमारे चहुअंगांनी फुटताहेत.
( उद्या फुट्टू....जमल्यास)
मी काय कुणाचं नाव नाय घेतलं
मी काय कुणाचं नाव नाय घेतलं बॉ. टिंब टिंब हे काय कुणाच नाव अस्तं का ?
वर्षा पहिली आहे सावर.. आणि दुसर्या झाडाला आम्ही आरश्याचे झाड म्हणायचो. त्याचे पान अर्धे मोडून किंचीत ताणले तर त्यात आरसा दिसतो. लहानपणीचे भाबडे खेळ.
जिप्स्या, यावर्षी कारवी
जिप्स्या, यावर्षी कारवी फुलणार आहे ना ? मी अजून एकदाही बघितलेली नाही. आपण सगळे जाऊ शकू अशी एखादी जागा सांग. जुलै मधल्या पहिल्या दुसृया आठवड्यात असेन मी तिथे.
मानुषी.. या नव्या पालवीचे
मानुषी.. या नव्या पालवीचे फोटो हवेतच.. सफरचंद आणि द्राक्षांना पण धुमारे फुटतील आता.
आरशाचे झाड, अरे वा किती सुंदर
आरशाचे झाड, अरे वा किती सुंदर नाव आहे.
पहिली काटेसावर (शाल्मली) आहे
पहिली काटेसावर (शाल्मली) आहे का?>>>>> अरे देवा! इतके दिवस मी त्याला पळस समजत होते.
.
.
मी आधी पण लिहिले होते.. आणखी
मी आधी पण लिहिले होते.. आणखी एक गवत असते. त्याचा दांडा त्रिकोणी असतो. तो ओढून काढायचा. वरचा तूरा तोडायचा. मग दोन्ही बाजूनी त्याला छेद देऊन दोन मित्रांनी तो अलगद वेगळा करायचा. तो त्रिकोणी असल्यान्रे जर नीट ओढला तर त्याची चौकोनी फ्रेम तयार होते. ते होते आमचे फ्रेमचे झाड पण ती फ्रेम झाली तरस तू माझा खरा मित्र... अशी मेख पण असायची.
पिवळ्या अमरवेलीला दोन पोकळ गाठी मारून तिचा गांधींजीचा चष्मा व्हायचा. उंबराच्या पानावरच्या गाठी अलगद फोडून आतल्या किड्यांची आग्राहून सुटका करायची. बोराच्या बिया फोडून आतला चिमूटभर गर खायचा, चतूर पकडून त्याला डास खायला घालायचा... अजूनही ही झाडे, किटक दिसले तर मी असेच करेन.
Dineshda te frame che jhad
Dineshda te frame che jhad mhanje lave che jhad. Disale ki photo aani frame pan karun taken.
जागू, त्या गवताला एक प्रकारचा
जागू, त्या गवताला एक प्रकारचा मस्त वास येतो नाही ? माझ्या लहानपणी प्लॅस्टीकचा कचरा नसायचा. सगळीकडे मातीच असायची. त्यामूळे अशी झाडे खेळायला मिळायची.
हो ते काटेसावर(शाल्मली)च आहे
हो ते काटेसावर(शाल्मली)च आहे (हे एकच झाड आता मला ओळखायला येतं
थँक्स टू साधना
)
हे, सगळ्या गप्पा
हे, सगळ्या गप्पा टप्प्याटप्प्याने वाचतेय.४ दिवसात एक धागा असं वाचन चालू आहे.
मजा येतेय. ज्या झाडांबद्द्ल उत्सुकता होती त्यांची माहिती मिळतेय.मस्त. मला तर खजिना साप्ड्ल्यासारखंच वाट्तय.
बटाट्याच्या वासा्चं जे जंगली झुडुप असतं, त्याचा फोटु पहायला मिळेल का?
पिवळ्या अमरवेलीला दोन पोकळ
पिवळ्या अमरवेलीला दोन पोकळ गाठी मारून तिचा गांधींजीचा चष्मा व्हायचा. उंबराच्या पानावरच्या गाठी अलगद फोडून आतल्या किड्यांची आग्राहून सुटका करायची. बोराच्या बिया फोडून आतला चिमूटभर गर खायचा, चतूर पकडून त्याला डास खायला घालायचा... अजूनही ही झाडे, किटक दिसले तर मी असेच करेन.>>>>>>>>
याच बरोबर १)गावठी चाफ्याच्या पाकळ्यांना भोकं पाडून त्या भोकातून देठ ओवून)२)मधुमालती चा लांब देठ फुलाच्या मध्यभागी टाचून ....अश्या २ अंगठ्या ही आम्ही करत असू. कदाचित हे बायकी प्रकार मुलं करत नसावेत म्हणून दिनेशच्या यादीत हे नाही.
पण चाफ्याची अंगठी सिगारेट धरतात तशी २ बोटांच्या पेरात धरायला लागायची. मधुमालतीची मात्र बोटात घालता यायची.
पण या दोन्ही अंगठ्या घालून दिल अगदी खुष व्हायचा! त्यावेळच्या मानाने क्रिएटिविटीचा कळ्स!
गांधीजींचा चष्माही करून घालत असू.
मानुषीताई, गावठी चाफ्याची
मानुषीताई, गावठी चाफ्याची अंगठी आम्हीपण करायचो पण गावाला कोकणात गेल्यावर, डोंबिवलीत नव्हती एवढी गावठी चाफ्याची झाडे आमच्या आसपास.
मानुषी.. गणपतीसाठी दूर्वा,
मानुषी..
गणपतीसाठी दूर्वा, हरतालिका, नागपंचमी, श्रावणी शुक्रवार यासाठी लागणार्या पत्री, वटपोर्णिमेसाठी वडाची फांदी, गुढीपाडव्याचा कडूनिंब, दसर्याच्या पाडव्याच्या तोरणासाठी आंब्याची पाने कधी बाजारातून विकत आणावी लागायची नाहीत. बाजारात मिळायचीदेखील नाहीत.
श्रावणातल्या प्राजक्ताचा लक्ष असेल तर त्यासाठीदेखील ओळखीच्या दोनचार ठिकाणी सांगून काम व्हायचे.
चाफ्यांच्या अंगठ्या मालवणला.. त्याची झाडे कोल्हापूरकडे पण नाहीत फारशी.
म्हणून माझा आग्रह असतो कि नुसती शोभेची झाडे लावण्यापेक्षा अशी झाडे लावावीत.
Pages