निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
मी आधी पण लिहिले होते.. आणखी
मी आधी पण लिहिले होते.. आणखी एक गवत असते. त्याचा दांडा त्रिकोणी असतो. तो ओढून काढायचा. वरचा तूरा तोडायचा. मग दोन्ही बाजूनी त्याला छेद देऊन दोन मित्रांनी तो अलगद वेगळा करायचा. तो त्रिकोणी असल्यान्रे जर नीट ओढला तर त्याची चौकोनी फ्रेम तयार होते. ते होते आमचे फ्रेमचे झाड पण ती फ्रेम झाली तरस तू माझा खरा मित्र... अशी मेख पण असायची.
पिवळ्या अमरवेलीला दोन पोकळ गाठी मारून तिचा गांधींजीचा चष्मा व्हायचा. उंबराच्या पानावरच्या गाठी अलगद फोडून आतल्या किड्यांची आग्राहून सुटका करायची. बोराच्या बिया फोडून आतला चिमूटभर गर खायचा, चतूर पकडून त्याला डास खायला घालायचा... अजूनही ही झाडे, किटक दिसले तर मी असेच करेन.
आणि
याच बरोबर १)गावठी चाफ्याच्या पाकळ्यांना भोकं पाडून त्या भोकातून देठ ओवून)
>>>अगदी अगदी दिनेशदा आणि मानुषी.
माझ्या बालपणीच्या आठवणीत करंज्याचं झाड अगदी ठळक आहे. अजूनही कुठे दिसले की त्याचा वास नाकात भिनतोच आणि मी थेट बालपणात जाऊन पोहोचते. आणखी एक म्हणजे ते हलक्या वांगी रंगाच्या फुलांचं झाड. ती फुलं कापून आम्ही त्याची भाजी करायचो खेळताना. कोणतं ते झाड? नाव काय त्याचं?
मामी, पोटॅटो ट्री म्हणून एक
मामी, पोटॅटो ट्री म्हणून एक झाड असतं. त्याला जांभळी फुले येतात आणि मग ती फिक्कट व शेवटी पांढरी होतात.
एकाचवेळी तीन रंगाची फुले असतात झाडावर. ते झाड म्हणते आहेस का ? पण ते जरा दुर्मिळ आहे.
करंजाच्या झाडावर नाव कोरलं तर काही दिवसांनी ती अक्षरे वर येतात. आमच्या शाळेच्या मैदानात सगळ्यांनी अशी नावे कोरुन ठेवली होती.
मनुषी छान वर्णन... फोटो टाकाल
मनुषी छान वर्णन... फोटो टाकाल प्लीज.
कावळ्याचं ओरडणं जरा वेगळंच. ते मला काव काव पेक्षा टर्र टर्र असं ऐकू आलं.
:
मग वाट्लं .....अरे हां.....हा इन्ग्लिश मधे ओरड्त असणार.....काव काव (असं मराठीत ) करायला तो काय भारतीय कावळा थोडाच आहे! डोळा मारा व दिवा घ्या .....:)
वर्षा, अरे व्वा आरषा चे फुल कीती गोड आहे! अंन्जु शी सहमत आहे... अगदी पक्षा सारखे भासते आहे..
गावठी चाफ्याची अंगठी,मधु मालती, गुलबाक्षी च्या जाळ्या आम्हीपण करायचो. गुलबाक्षी ची फुलं
माला खुपच आवडतात.. एक प्रकारचा मंद सुवास असतो आणि दुपारी ४ च्या सुमारास उमलतात.
मागच्या वर्षी माझ्या चुलत सासु बाईनी ह्याच्या बिया दिल्या होत्या.. छान फुल लागली होती.
पिवळ्या फुलामधे एका पाकळी वर गुलबाक्षी रंगाची छटा होती... सिझन गेला की हे झाड आपोआप नाहीसे होते
आता परत त्याच कुंडीत एक छोटे ऱोपटे डोकावते आहे... दुर्दैवाने माझ्या चुलत सासु बाई आज हयात
नाही, पण ते रोपटे मला त्यांची खुप आठवण करुन देते आहे....
नाही दिनेशदा, हे अगदी रानटी,
नाही दिनेशदा, हे अगदी रानटी, उग्र वासाचं झुडुप आहे. ग्रामोफोनच्या कर्ण्याच्या आकाराची पातळ अशी काहीशी मोठीच फुलं असतात. पाकळ्या वेगवेगळ्या नसून एकत्रच असतात.
हे इथे दिसतंय तेच बहुधा.
मामी, त्याला आम्ही बेशरमचं
मामी, त्याला आम्ही बेशरमचं झाड म्हणायचो. कुठेही, कसंही उगवायच म्हणुन.
या लिंकवर आहे बघ फोटो
http://www.maayboli.com/node/40660?page=10
सुदुपार!!! सकाळपासून एकीकडे
सुदुपार!!!
सकाळपासून एकीकडे नि.ग. चालू ठेवले होते. ८ पाने वाचली. सगळ्यांचे फोटो, लेख, माहीती, विचार, आठवणी .... फारच छान.
हो हो हेच ते. त्याचं नाव मला
हो हो हेच ते. त्याचं नाव मला माहित नाही. आम्ही त्या फुलांना कांद्याची फुलं म्हणायचो. खरं नाव काय आहे म्हणे?
खरं नाव काय आहे
खरं नाव काय आहे म्हणे?>>>>>त्याच लिंकवर अनिल यांनी "गारवेल" हे नाव सांगितलंय. गारवेल गुगलुन पाहिल्यावर तेच फुल दिसतंय.
जिप्सी तुझा फोटो बहुदा वेगळा
जिप्सी तुझा फोटो बहुदा वेगळा आहे..कारण ते झाड किंवा झुडुप वाटतेय्..मामी म्हणतेय तो वेल असतो..
Cairo morning glory या नावाने गुगलुन बघ.ते गारवेल आहे..
गारवेल म्हणजे मॉर्निंग ग्लोरी
गारवेल म्हणजे मॉर्निंग ग्लोरी नव्हे का?
धन्यवाद. ती काटेसावर आहे हे माहित नव्हते. निळ्या आकाशात लालभडक फुलांचे ते निष्पर्ण झाड फार सुंदर दिसत होते.
आरशाचे झाड नाव मजेदार आहे. ते
आरशाचे झाड नाव मजेदार आहे.
ते फोटोफ्रेम, चाफ्याच्या फुलाची अंगठी, आणखी कसल्याशा पानाची पिपाणी वगैरे उद्योग आम्हीपण करायचो.
जिप्सी तुझा फोटो बहुदा वेगळा
जिप्सी तुझा फोटो बहुदा वेगळा आहे..कारण ते झाड किंवा झुडुप वाटतेय्>>>>अगदी बरोबर मृनिश. गुगलुन पाहिलं. मी दिलेला फोटो झाडाचा आहे आणि गारवेल "वेल"च आहे.
दोघांची फुले सारखीच दिसत आहे. 
येस.. फुल सारखीच दिसत
येस.. फुल सारखीच दिसत आहेत..हे गारवेलीच बन आमच्या ही घराच्या आजुबाजुला बेशरम पणे उगवलेले होते.. सो त्यालाही हे नावे सुट होतेय..:-)
सो त्यालाही हे नावे सुट
सो त्यालाही हे नावे सुट होतेय>>>>>:फिदी:
सायली धन्यवाद....आज बघते फोटो
सायली धन्यवाद....आज बघते फोटो ़ जमल्यास.
ओह...ते कर्ण्याच्या आकाराचं लव्हेन्डर कलरचं फूल का? याला गारवेल म्हण्तात ना?
या फुलांचा देठ काढून पाकळीकड्चा गोलाकार आम्ही वहीत ठेऊन प्रेस्स करत असू( जरा निर्दयी काम आहे.....पण एकदा क्रिएटिविटीचा किडा ड्सला की ............)
नंतर हा गोलाकार वाळला की त्याचा अम्ब्रेला फ्रॉक चा घेर म्हणून इतर चित्र पूर्ण करायचं. अर्थातच मुलीचं.
काय बाई तरी एकेक उद्योग! हे तेव्हाचं वर्णन आहे.....जेव्हा मानवी जीवनावर टीव्ही, कॉम्प्युटरचं अतिक्रमण झालेलं नव्हतं.
जरा जड वाक्य आहे ...हलके घ्या!
हा गोलाकार पूर्ण पणॅ वाळ्ला की अगदी सॉफ्ट सुळ्सुळीत होतो.
ओह...ते कर्ण्याच्या आकाराचं लव्हेन्डर कलरचं फूल का? याला गारवेल म्हण्तात ना?
या फुलांचा देठ काढून पाकळीकड्चा गोलाकार आम्ही वहीत ठेऊन प्रेस्स करत असू( जरा निर्दयी काम आहे.....पण एकदा क्रिएटिविटीचा किडा ड्सला की ............)
नंतर हा गोलाकार वाळला की त्याचा अम्ब्रेला फ्रॉक चा घेर म्हणून इतर चित्र पूर्ण करायचं. अर्थातच मुलीचं.
काय बाई तरी एकेक उद्योग! हे तेव्हाचं वर्णन आहे.....जेव्हा मानवी जीवनावर टीव्ही, कॉम्प्युटरचं अतिक्रमण झालेलं नव्हतं.
जरा जड वाक्य आहे ...हलके घ्या!
हा गोलाकार पूर्ण पणॅ वाळ्ला की अगदी सॉफ्ट सुळ्सुळीत होतो.
ते फूल मोर्निन्ग ग्लोरी चं
ते फूल मोर्निन्ग ग्लोरी चं आहे, ह्या प्रकारात त-हेत-हेच्या रंगांची तशी फुलं सध्या फुलत आहेत.
गुगल वर टाईप करुन प्रतिमा पाहिल्या की कितीतरी प्रकार पहायला मिळतात.
मामी, त्या फुलाच्या वरच्या
मामी, त्या फुलाच्या वरच्या भागाला ( देठाकडच्या ) समोरासमोर दोन छेद द्यायचे. त्यापैकी एक छेद खालपर्यंत
द्यायचा, मग समोरच्या बाजूने तो अगदी मर्लिन मन्रोचा ( तोच तो उडणारा ) झगा दिसतो.. शाळेत मुलीना असे
करून दाखवल्यावर त्या तोंडावर रुमाल ठेवून आधी अय्या म्हणायच्या ( आणि मग बावळट्ट्चै असं पण म्हणायच्या )
हॅल्लो जी... आजच इतक्या
हॅल्लो जी... आजच इतक्या दिवसांनी वेळ मिळाला.. खूप दिवसांपास्न नुस्त्या भेटीगाठी, फिरणं ,खाणपिणं चालूये...
बापरे हा धागा सुप्पर स्पीड मधे धावला खरंच..
इथे जुन्या ओळखीच्या रस्त्यांवरून रस्त्यांवरून चालताना ,' ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है.. असं म्हणत राहावसं वाटतंय... नॉस्टेलजिया चे उमाळे सरल्यावर फोटोग्राफी ला सुरु करेन
निग च्या आत्तापर्यन्त च्या पोस्टी वाचून झाल्या... फोटो तर सर्वच सुर्रेख आहेत..
गारवेलीचा फोटो एकदम सुट
गारवेलीचा फोटो एकदम सुट होतोय. पानंही विशिष्ट प्रकारची असतात हे आता फोटो पाहून आठवलं. धन्यवाद मृनिश.
वर्षुताई, तु कुठे भटकत आहेस?
वर्षू.. मला हे फिलींग चांगलेच
वर्षू.. मला हे फिलींग चांगलेच समजू शकते.. मस्कतला, नैरोबीला, नायजेरियाला परत गेलो तर मलाही असेच वाटेल.
नव्या नव्या ठिकाणांना भेट देते आहेस ना ?
इथे जुन्या ओळखीच्या
इथे जुन्या ओळखीच्या रस्त्यांवरून रस्त्यांवरून चालताना ,' ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है.. असं म्हणत राहावसं वाटतंय... नॉस्टेलजिया चे उमाळे सरल्यावर फोटोग्राफी ला सुरु करेन
खरेच खरेच.. आणि काही ओळखीचे जुने आजही तसेच राहिलेले पाहुन आनंदअॅटॅकच येतो अगदी
दिनेश दा.. शाळेत मुलीना
दिनेश दा.. शाळेत मुलीना असे
:
करून दाखवल्यावर त्या तोंडावर रुमाल ठेवून आधी अय्या म्हणायच्या ( आणि मग बावळट्ट्चै असं पण
तर हा गोलाकार वाळला की त्याचा
तर हा गोलाकार वाळला की त्याचा अम्ब्रेला फ्रॉक चा घेर म्हणून इतर चित्र पूर्ण करायचं. अर्थातच मुलीचं.
काय बाई तरी एकेक उद्योग! हे तेव्हाचं वर्णन आहे..... खरच अम्ब्रेला फ्रॉक चा घेर अगदी बरोबर उपमा
दिलीत...
या झाडा खाली साप असतात म्हणे.. खरच का?
अरे कसला धावतोय हा धागा.
अरे कसला धावतोय हा धागा. आठवडाभर कोकणात आणि मालवणला जाऊन आले. वाटेत. खूप ठिकाणी पांगीरा फुललेला दिसला. त्याशिवाय अजून एक प्रकरची फुले फुललेली दिसली. नाव माहीत नाही. महाड येईपर्यंत हा फुलोरा दिसत होता.


करवंदाची फुले.
करवंदाची फुले.

ही उक्षी. या दिवसातच फुलते.
ही उक्षी. या दिवसातच फुलते. किती सुंदर दिसते ना झाडावर
घराच्या जवळच निर्गुडी ची रोपे
घराच्या जवळच निर्गुडी ची रोपे उगवली आहेत. ही औषधी वनस्पती आहे आणि गुढगेदुखीवर याच्या पानांचा रस लावतात.
सामी छान फोटो. साधना नावासाठी
सामी छान फोटो. साधना नावासाठी धन्यवाद, मला नव्हतं माहिती हे नाव.
करवंद, वा, जाळीतून तोडून खाण्यात खरी मजा. आता हंगाम सुरु होईल.
आमच्या सोसायटीतपण आहे निर्गुडी, ह्यालाच निगडीपण म्हणतात का?
साधना थॅन्क्स. अग खूप छान
साधना थॅन्क्स. अग खूप छान दिसत होता हा फुलोरा आणि कधी इथे येवून नाव विचारतेय असे झाले होते.
आमचे गावचे घर निसर्ग गटग साठी छान ठिकाण आहे. पण अर्धा तास घाटी उतरून जायचा स्टॅमिना पाहिजे आणि अर्थात चढायचा पण. दुसरा मार्ग बोटीतून. घरापर्यंत जायला डायरेक्ट रोड नाही. अनेक प्रकारचे पक्षी आणि झाडे आहेत. या भेटीत खरच निसर्गाच्या गप्पाच आठवत होत्या.
घराच्या जवळच बोटीतून
घराच्या जवळच बोटीतून येण्यासाठी धकका आहे . गावी त्याला पख्ती म्हणतात. या पख्तीवरून सकाळी काढलेला फोटो. सगळीकडे धुके होते, आणि पाण्यावर सुर्याची किरणे पसरली होती. फोटोशॉप केलेला नाही.
Pages