निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
सर्वांना होळी आणि
सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा.
maajhyaa haataavarache ful
maajhyaa haataavarache ful naghaa. aakaaraane te olyaa dhaNyaaevaDhehee naahee. hi fule me roj paayareepashee baghat ase.
roj Thravaayacho ki gharun bhing aaNun he ful nirakhaayache.
paN te kaahi jhaale naahee.
kaahi divasaanee malaa tyaach taNaavar moThee fule disaayalaa laagalee. malaa aadhee vaaTale dusarech kaahitaree asel. mag vaaTale ekhaade chemical paDale asel mhaNun tasaa rang aalaay.
paN te navin aakaaraache gulaabee ful sukatahee navhate, ulaT aakaaraane vaaDhatach hote. shevaTee me tyaachee ek phaandee gharee aaNalee va phoTo kaaDhalaa.
photo tevaDhaa spashT naahee, paN tyaat ful disatey aaNi jhaaDaachaa gulaabee jhaalelaa bhaagahee disatoy.
ethe vaaLavanTaat taNaanaa asheech bhaDak rangaachee fule yetaat paN yaa bichaaRyaache ful tar agadee lahaan. mag kiTakaanche lax vedhun gheNyaasaaThee tyaane hi yukti kelee asel kaa. mee muddaam ase dusare taN shodhale. tyaachee paane normalach hotee.
mee phaandee toDalee taree taNaavar ajun don teen ase laal punjake aahe. haa badal kiTakaanaa aavaDalaa tar puDhachyaa piDheet to utarel kaa ? jar malaa to rang aakarShak vaaTalaa
tar mee dekheel shobheche jhaaD mhaNun he laaveen..
haa maajhaa vichaar jhaaDaane vaachalaa ki kaay ?
सुप्रभात!! धुळवडीच्या रंगीत
सुप्रभात!!
धुळवडीच्या रंगीत शुभेच्छा!!!

माझ्या मुलाने, चि. मल्हारने, आठवीत असताना फटाके उडवायचे सोडून दिले. कधी जास्त फटाके आणत नव्हतो. पण वाचलेले पैसे चिपळूणच्या श्री. भाऊ काटदरे यांच्याकडे कासव संवर्धनासाठी पाठवूया असे म्हणाला. तसेच पाठवते.
दहावी पासून होळी / धुळवड / रंगपंचमी खेळायचे सोडून दिले. हे चौथे वर्ष...
त्याचे त्यानेच स्वतः हून घेतलेले निर्णय. मला मात्र फार आनंद देतात.
हा प्रार्थना किडा.... अर्धवट जिवंत होता.....पण मुंगळे डसत होते...

दिनेशदांनी लिहिलेले
दिनेशदांनी लिहिलेले इंग्रजी-मराठी
खाली देत आहे -
माझ्या हातावरचे फुल बघा - आकाराने ते ओल्या धण्याएवढेही नाही. ही फुले मी रोज पायर्यांपाशी बघत असे. रोज ठरवायचो की घरुन भिंग आणून हे फुल निरखायचे. पण ते काही झाले नाही.
काही दिवसांनी मला त्याच तणावर मोठी फुले दिसायला लागली. मला आधी वाटले - दुसरेच काहीतरी असेल. मग वाटले एखादे केमिकल पडले असेल म्हणून तसा रंग आलाय. पण ते नवीन आकाराचे गुलाबी फुल सुकतही नव्हते, उलट आकाराने वाढतच होते. शेवटी मी त्याची एक फांदी घरी आणली व फोटो काढला.
फोटो तेवढा स्पष्ट नाही पण त्यात फुल दिसते आणि झाडाचा गुलाबी झालेला भागही दिसतोय.
इथे वाळवंटात तणांना अशीच भडक रंगाची फुले येतात पण या बिचार्याचे फुल तर अगदी लहान. मग कीटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने ही युक्ति केली असेल का, मी मुद्दाम असे दुसरे तण शोधले. त्यांची पाने नॉर्मल होती.
मी फांदी तोडली तरी तणावर अजून २-३ असे लाल पुंजके आहेत. हा बदल कीटकांना आवडला तर पुढच्या पिढीत तो उतरेल का? जर मला तो रंग आकर्षक वाटला तर मीदेखील शोभेचे झाड म्हणून हे लावीन ...
हा माझा विचार झाडाने वाचला की काय ??
दिनेशदा - तुमचे विचार झाड नक्कीच वाचू शकत असणार .... तेवढी त्याच्याशी तुमची सख्यभक्ति नक्कीच आहे .....
कालचा दिवस अगदी सार्थकीच
कालचा दिवस अगदी सार्थकीच लागला - कारण प्रत्यक्ष डॉ. सानेमॅडमचे दर्शन झाले.... (शांकली तर विशेष खूष ...)
पण ....आता खूपच वाकून चालतात मॅडम .... तरीही बुद्धि, नजर, कान आणि बोलणे सगळे तसेच अगदी तेज, धारदार ...
) , हेलिकोनिया पूर्ण वेगळे ...
त्यांना नुकतेच कोणी दिलेले --- 1001 garden plants in singapore हे अप्रतिम पुस्तक अगदी वरवर चाळले - फारच सुंदर पुस्तक ...
आम्ही बसलो होतो तिथे बाजूलाच एका ओल्या स्पंजमधे हेलिकोनियासारखे फूल खोचलेले दिसले - मी विचारले हे हेलिकोनोया का हो - तर मॅडम म्हणाल्या नाही हो - हे तर बर्ड ऑफ पॅरडाईज - Strelitzia (स्पेलिंगसकट सांगितले - तिथल्या तिथे..
मॅडम एवढ्या ज्ञानवृद्ध - तरी म्हणत होत्या -एक जन्म पुरत नाही हो या वनस्पतींच्या अभ्यासाला ....
मेडिसिनल प्लांट्स विषयीचे त्यांचे नवीन पुस्तक येत आहे त्याविषयीही सांगत होत्या - काय अजून जबरदस्त इच्छाशक्ति आहे त्यांच्या कडे.... आपण विचारही करू शकत नाही...
त्या म्हणत होत्या -आपण परिस्थितीचा, शरीराचा फार बाऊ करतो .. उगाचच - आपली इच्छाशक्ति जर जबरदस्त असेल तर सर्व काही करता येते - मात्र इच्छाशक्ति पाहिजेच .... मॅडमपुढे मी व शांकली अगदी नतमस्तकच ... फार जगावेगळे व्यक्तिमत्व लाभलेल्या आहेत त्या ...
सानेमॅडमनी इतक्या सहज ते
सानेमॅडमनी इतक्या सहज ते हेलिकोनिया आणि स्ट्रेलिट्झिया हे वेगवेगळे आहेत हे सांगितल्यामुळे ते फोटोसकट इथे टाकावे असे वाटले - (सर्व फोटो विकिपिडियावरुन साभार ... ) मला वाटतं दिनेशदांनी या बर्ड ऑफ पॅरेडाइजवर एक खास लेखही लिहिलाय इथे माबो वर.....
Strelitzia -
आणि हे हेलिकोनिया -
आणि हे ही हेलिकोनियाच - स्पेसिज फक्त वेगळी ..
काये, कोणी फिरकलेच नाही इकडे
काये, कोणी फिरकलेच नाही इकडे आज !!! कालची "पुरणपोळी" इतकी जडावून गेली का काय ????
फोटो लोड करता येत नाहियेत.
फोटो लोड करता येत नाहियेत. कसे लोअद करायचे ते कुणी सांगेल कां?
मधू ...माझ्या मुलाने, चि.
मधू ...माझ्या मुलाने, चि. मल्हारने, आठवीत असताना फटाके उडवायचे सोडून दिले. कधी जास्त फटाके आणत नव्हतो. पण वाचलेले पैसे चिपळूणच्या श्री. भाऊ काटदरे यांच्याकडे कासव संवर्धनासाठी पाठवूया असे म्हणाला. तसेच पाठवते.
दहावी पासून होळी / धुळवड / रंगपंचमी खेळायचे सोडून दिले. हे चौथे वर्ष...>>>>>>>
फार छान! पण हे घरातल्या कळ्त न कळ्त झालेल्या संस्कारांमुळेच ना! :स्मितः
दिनेश ़ खूप छान विचार. झाडांना नक्की कळ्ला असणार!
काल संध्या. डेलावेर इथे एका
काल संध्या. डेलावेर इथे एका पार्कात गेलो होतो.

अप्रतीम दृश्य आणि वातावरण !
वरचे सगळ्यांचेच फोटो
वरचे सगळ्यांचेच फोटो सुंदर.
शशांकजी साने madamना hats off.
मी इथे फिरकले होते शशांकजी पण आज सोसायटीत पावभाजी आणि पुलाव, गुलाबजाम होते होळी सेलिब्रेशन म्हणून ते अंगावर आले म्हणून प्रतिसाद नाही दिला.
मानुषीताई मजा चालू आहे लेकीकडे, आम्हालापण छान फोटो बघायला मिळतात.
हो अन्जू लेकीकडे जाईन तूप
हो अन्जू
लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन.........:स्मितः
शशांकजी साने madamना hats off॓ + १००
शशांक,मानुषी फोटो मस्तच.
शशांक,मानुषी
फोटो मस्तच.
ओह ...मग शशां़क शेवट्चा फोटो
ओह ...मग शशां़क शेवट्चा फोटो ....हॅलिकोनिया व बर्ड ऑफ पॅरडाइज...सीतेची वेणी एकच का?
माझ्याकडे नगरला याचा एक मोठा वाफा आहे. सगळ्या "वेण्या" आल्या की फार सुंदर दिसते.
.हॅलिकोनिया व बर्ड ऑफ
.हॅलिकोनिया व बर्ड ऑफ पॅरडाइज... >>> वर दिलंय याचं उत्तर - पुन्हा देत आहे ... वरील फोटो परत पहाणे ...
हे वेगवेगळे आहेत........
येस्स बॉस्स ......कळ्लं!
येस्स बॉस्स ......कळ्लं!
शशांक काय योगायोग आहे. त्या
शशांक काय योगायोग आहे. त्या नारिंगी रंगाच्या फुलांवरचा लेख उत्क्रांती वरचाच होता.. आणि या वरच्या तणातही मला तशीच शक्यता दिसते आहे. आज बघितले तर झाडावर आणखीनच गुलाबी रंग चढलाय.
आपल्याकडे शेतीत कापसाची झाडे लावतात ती एक वर्षेच जगतात ना ? मी इथे रस्त्याच्या कडेने कापसाची झाडे बघतो त्यांची एकदा बहर मग पानगळ आणि पुन्हा बहर अशी सायकल पण पूर्ण झाली.
मानुषी, मस्त फोटो.
त्या वेण्या खास हमिंग बर्डस साठी असतात. जेवढ्या संख्येने वेण्या दिसतात तेवढ्या संख्येने ते पक्षी दिसत नाहीत आपल्याकडे.
मानुषीतै, मी प्लिज तो फोटो
मानुषीतै, मी प्लिज तो फोटो घेऊ का माझ्या डेस्कटॉपसाठी?
वॉलपेपर म्हणून ऑसम दिसेल. कसला मस्त आहे.
सुप्रभात!!!
सुप्रभात!!!


शशांक, दिनेशदा मस्त
शशांक, दिनेशदा मस्त माहिती.
मानुषीताई, एकदम भन्नाट फोटो. पेंटिंग असल्यासारखा वाटतोय.
मधु, हे लाल कृष्णकमळ आहे ना?
मधु, हे लाल कृष्णकमळ आहे
मधु, हे लाल कृष्णकमळ आहे ना?
रच्याकने, मीही लाल कृष्णकमळच म्हणते हा... खरेतर लाल पॅशन्फ्लॉवर म्हणायला हवे.
रच्याकने, मीही लाल कृष्णकमळच
रच्याकने, मीही लाल कृष्णकमळच म्हणते हा... खरेतर लाल पॅशन्फ्लॉवर म्हणायला हवे. >>>>>>> आता मीही लाल पॅशन्फ्लॉवर म्हणीन.
आजच्या लोकसत्ता मधील बातमी:
'फ्लॉवर्स ऑफ सह्य़ाद्री' अॅप विकसित
वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी हे अॅप विकसित केले आहे. आयपॅड किंवा टॅबलेटमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून ते वापरता येणार आहे.
याच चालीवर जांभळा पितांबर,
याच चालीवर जांभळा पितांबर, पांढरा नीलकमल इ.इ. वाचावे..>>>>ओह्ह
आत्ता ट्युब पेटली.

जागु, निसर्गमय झालेले आयडी
जागु, निसर्गमय झालेले आयडी माझे नाव शामिल केल्या बद्दल खुप आभार...
दिनेश दा, ते तणावरचे फुल कीती गोड आहे... त्याचा गुलाबी रंग पण कीती मोहक आहे..
शशांक जी, ट्रान्सलेशन साठी धन्यवाद...
मधुमकरंद, इतक्या लाहान वयात, इतके छान विचार,खरोखर घरातल्या वातावरणामुळे च,
खुप खुप कौतुक चि. मल्हारचे.....
मनुषी, आ हा हा! काय सुखद नजारा आहे... दिल खुष हो गया... फोटो बघुन इतक छान वाटतय
तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलय.....
शशांक जी... साने मॅडम एवढ्या
शशांक जी...
साने मॅडम एवढ्या ज्ञानवृद्ध - तरी म्हणत होत्या -एक जन्म पुरत नाही हो या वनस्पतींच्या अभ्यासाला ....
क्या बात है !
तसेच तुमचा ज्ञानवृद्ध हा शब्द + दिनेशदां चा झाडा बद्द्ल चा विचार खुपच भावला...
Strelitzia - + हेलीकेनिया
Strelitzia - + हेलीकेनिया दोन्ही पण सुरेख...
दिनेशदा नी, "वेण्या" असे अगदी अनुरुप संबोधिले आहे...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29995?page=2 या धाग्यावर डॉ. हेमा साने यांच्याविषयी एकाने लिहिलेले मी उद्धृत केले आहे - कोणाला सानेमॅडमबद्दल जाणून घ्यायचे असेल तर जरुर पहाणे - त्या पानावर जशी माहिती आहे तशीच त्याच्या आधीच्या पानावरही दिलेली आहे -
डॉ सानेमॅडम म्हणजे चालती-बोलती बॉटनी.... एकदम वेगळेच व्यक्तिमत्व ...... त्यांचा जन्मच बहुधा या वनस्पतिशास्त्राकरता झालेला आहे असे वाटते - बाकी भौतिक गोष्टींमधे त्यांना काहीही रस नाही वा उगाच आपले नाव व्हावे म्हणूनही त्या काही खटाटोप करत नाहीत - वनस्पतींविषयी ज्यांना काही जाणून घ्यायचे असते अशी अनेक देशी-परदेशी मंडळीच त्यांना शोधत त्यांच्या घरी जात असतात ......
Majya fb var mi black rose
Majya fb var mi black rose share karun ghetlay te paha. Mast aahe.
सर्वांना धन्यवाद. रिये....घे
सर्वांना धन्यवाद. रिये....घे गं तो फोटो. तुला आवडला ना !
शशांक जी, ( नीलेश गोरे) खुप
शशांक जी, ( नीलेश गोरे) खुप आभार, इतक्या सुंदर व्यक्तीमत्वा चा परिचय करुन दिल्या बद्द्ल.
"जस्ट ग्रो सम रेयर प्लांन्टस ओन युअर हेड.... हे खुपच आवडल...
तुम्ही (+ शांकली) फार नशीबवान आहत... त्याना प्रत्यक्ष भेटलात...
Pages