निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
आज पाहील तो बी टी कवडे रोडवर
आज पाहील तो बी टी कवडे रोडवर आणि दुसरा आमच्या बिबवेवाडीतच. >>>>झाड बहरलंय का? म्हणजे राणीबागेत चक्कर टाकायला.
गुलाबी कॅशियाच्या बहराचा फोटो नाही आहे माझ्याकडे. 
स्निग्धा, दुसरा आमच्या
स्निग्धा,
दुसरा आमच्या बिबवेवाडीतच >>>> म्हणजे नक्की कुठे - तो कोंढवा रोड सुरु होतो त्या सिग्नलपाशी आहे एक - त्या महाराष्ट्र बँकेच्या बाहेर आहे तोच का ?
जिप्सी, राणीबागेत चक्कर
जिप्सी, राणीबागेत चक्कर टाकायला बहावा कशाला बहरायला हवाय...... आणि.......... राणीबागेतला बहर पुण्यात कसा रे दिसेल
आमच्या कंपनीच्या टाउनशिपमध्ये
आमच्या कंपनीच्या टाउनशिपमध्ये आहे गुलाबी कॅशिया. फुलला असेल तर मी पण एक चक्कर मारून येईन.
म्हणजे नक्की कुठे - तो कोंढवा
म्हणजे नक्की कुठे - तो कोंढवा रोड सुरु होतो त्या सिग्नलपाशी आहे एक - त्या महाराष्ट्र बँकेच्या बाहेर आहे तोच का ?>>>> महाराष्ट्र बँकेच्या लगेचच बाहेर असेल तर तो मलाही पहावा लागेल. मी वसंतबाग बस स्टॉप जवळ पारीजात सोसायटीच्या हॉलच्या लगतचा पाहीलाय.
मी वसंतबाग बस स्टॉप जवळ
मी वसंतबाग बस स्टॉप जवळ पारीजात सोसायटीच्या हॉलच्या लगतचा पाहीलाय. >>>> मला वाटतंय मी ही तेच ठिकाण म्हणतोय बहुतेक .....
स्निग्धा, मी या धाग्या वर
स्निग्धा, मी या धाग्या वर कच्चा लिंबु आहे...... पण मला इथे इतकी मज्जा येते आहे...
जुने भाग पण वाचते आहे, खजीना हाती लागल्या सारखे वाटते आहे......
जागु, हिरव्या चाफ्या ची खुप
जागु, हिरव्या चाफ्या ची खुप सुंदर माहिती दिली आहेस.. (बहुतेक भाग ७ मधे)
हिरवा चाफा असतो हे सुद्धा माहिती नव्ह्ते मला.
राणीबागेतला बहर पुण्यात कसा
राणीबागेतला बहर पुण्यात कसा रे दिसेल>>>>स्निग्धा :फिदी:, मला म्हणायचं होतं कि पुण्यात जर फुलला असेल तर मुंबईतही बहरला असेल.
भुई चाफा कोणी दाखवेल
भुई चाफा कोणी दाखवेल का?
बहावा म्हणजे अमलताष का?
शशांक, तुमच्याकडुन येताना
शशांक, तुमच्याकडुन येताना वसंतबाग आधी येत, महाराष्ट्र बँक थोडीशी पुढे आहे. अगदी सिग्नलला.
बहावा म्हणजे अमलताष का?>>>>हो
बहावा म्हणजे अमलताष का?>>>>हो सायली
सायली पातुरकर, - इथे बाजूलाच
सायली पातुरकर, - इथे बाजूलाच "शोध" म्हणून एक खिडकी (विंडो) दिसेल - त्यात आपल्याला जे शोधायचे तो शब्द टाकायचा ... तुम्हाला जे पाहिजे ते सर्व मिळेलच ....
(नाही तर गुगलबाबा आहेच की ....
) राग मानू नका पण हे असे शोधताना अजून दोन -चार जास्त गोष्टीही कळतील तुम्हाला ....
व खूप मजाही वाटेल ...
तुला कुठे दिसली जांभळ्या
तुला कुठे दिसली जांभळ्या रंगाची सुरळी?
सायली हे गुगलुन बघ Kaempferia rotunda. http://www.maayboli.com/node/34014?page=5
जिप्सी, धन्यवाद. शशांक जी,
जिप्सी, धन्यवाद.
शशांक जी, अरे व्वा.. बर झाल सांगीतल ते.. आत अजुन नविन माहिती मिळेल...
साधना धन्यवाद... मस्त आहे,
साधना धन्यवाद... मस्त आहे, भुई चाफा..
माझी नणंद लग्न होऊन लंडनला
माझी नणंद लग्न होऊन लंडनला काही वर्षासाठी गेली आहे. फुले पाहीली की तिला माझी आठवण येते
तिच्या लग्ना पूर्वी आम्ही दोघी फुलांच्या फोटोच्या शोधात अॅक्टीवा वरून लांब निसर्गरम्य ठिकाणी जायचो. लंडनला स्प्रिंग सिझन चालू झाला आहे. माझ्यासाठी तिने हे फोटो काढून पाठवले आहेत. अजून थोड्या दिवसांनी पाठवणार आहे. तिच्या परवानगीने हे फोटो इथे टाकत आहे.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९) ह्या गुलाबांना कळ्या पानापासुन किती जवळ लागल्यात.

१०)
तुला कुठे दिसली जांभळ्या
तुला कुठे दिसली जांभळ्या रंगाची सुरळी? >>>>>>>>>अग, इथे नाही. कोकणात, मी पाहिलेय.जांभळ्या रंगाची वरच्या दिशेला तोंड करून येतात ती. (नीट वर्णन नाही करता येत.
)
जागु, सगळीच फुल गोड आहेत.....
जागु, सगळीच फुल गोड आहेत.....
त्या गुलाबा च विशेष
त्या गुलाबा च विशेष वाटतय...काय गोंडस कळी आहे आणि पानाच्या कीती जवळ आहे...
साधने , किती सुंदर फ़ुलं आहेत
साधने , किती सुंदर फ़ुलं आहेत त्या लिंक वर. मस्तच! (मला हवं असलेलं नाही मिळालं)
जागू, खूपच गोड आहेत सर्व
जागू, खूपच गोड आहेत सर्व फुले.
जागू, फ़ुले आणि कळ्या मस्तच!
जागू, फ़ुले आणि कळ्या मस्तच!


नवीन भागासाठी याचचं कोलाज कर. छान दिसेल .
की गुढीपाडव्याच असेल?
व्वा! जागू...मस्त आहेत फुलं.
व्वा! जागू...मस्त आहेत फुलं. नणंद असावी तर अशी.
जागूच्या बदामावरून आठवलं... घराजवळ्च आमची शाळा होती. शाळेत प्रचंड मोठी २ झाड्ं ... वृक्षच.
बकुळी आणि बदाम. तर घरी खूप मोठी बाग सभोवार असल्याने खूप पक्षी येत. आणी येताना बदाम घेऊन येत...पलिकड्च्या झाडाचे.... आमच्या बागेत बदामांचा सडा असायचा.
मग एकदा आम्हा (शाळ्करी)मैत्रिणींचं ठरलं की बागेत स्वयंपाक करायचा चुलीवर. त्यात महत्वाचं म्हण्जे बागेतले बदाम गोळा करत रहायचं. आणि हळूह ळू ते साठ्ले की फोडून ठेवायचे. खूप चिकाटीचं काम. पण तेव्हा वेळ खूप असायचा मग मजा वाटायची असल्या कामात.
गमंत म्हण्जे चुलीवर सगळा स्वयंपाक करून या फोडलेल्या बदामाच्या बीयांची खीर सुद्धा झाली.
जागू सुंदर आहेत फुलं.
जागू
सुंदर आहेत फुलं.
गमंत म्हण्जे चुलीवर सगळा
गमंत म्हण्जे चुलीवर सगळा स्वयंपाक करून या फोडलेल्या बदामाच्या बीयांची खीर सुद्धा झाली.>>>>> चुलीवर केलेल्या कुठल्याही पदार्थाला एक मस्त चव असते... मग तो साधा भात असो का पिठलं किंवा आमटीही.... निखार्यावर भाजलेली गरम भाकरी म्हणजे ....अहाहा - क्या कहने !!!
माझ्या लहानपणी मी आजीसोबत माझ्या गावाला (पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर) जाऊन रहात असे - महिनाभर .... तिथे त्या चुलीवरचे इतके सुंदर आणि चविष्ट पदार्थ खाल्ले आहेत की बस्स ... त्या निखार्यावर भाजलेले कांदे असो वा बटाटे वा वांगी .. अशी काही मस्त लागत की त्या आठवणीने अजून तोंडाला पाणी सुटते आहे ...
एकदा तर असली मजा आली ना .... सकाळी सकाळी उठून पाहिले तर आजीने मोठ्ठ्या पातेल्यात काही तरी पाणी उकळत ठेवलेले ... मी विचारले तर म्हणाली - जा तोंड धू, आंघोळ कर आणि मगच इकडे ये ... मी घाई-घाईने सारे उरकून तिथे उभा राहिलो - एक मोठे उखळ आणो मुसळही तिथे ठेवलेले -आणि अजून एक-दोन कामकरी बाया आलेल्या होत्या...
त्या मोठ्ठ्या पातेल्यात पाणी उकळत होते आणि त्यात सालासकट तांदूळ (आता नेमका शब्द आठवत नाही काय म्हणतात त्याला ते ???? -साळीचा तांदूळ म्हणतात बहुतेक ) टाकत होते आणि लगेचच ते जरासे उकडलेले आख्खे तांदूळ त्या उखळात घालून कांडत होते - अगदी हलक्या हाताने -.... त्या कांडणामुळे त्या तांदळाच्या वरच्या सालामधून ते पांढरट पोहे बाहेर पडत होते ... (आता नेमके आठवत नाहीये ते वेगळे कसे करत होते ते .....)
त्या कांडणातून असले मस्त पोहे बाहेर पडत होते ना की ते गरम गरम पोहे खाताना (कुठल्याही तिखटमिठाशिवायही) असे वाटत होते की अमृतही फिके पडेल याच्यापुढे - असली जबरदस्त चव होती त्या ताज्या पोह्यांची .....
-- त्या चवीला उपमाच नाही त्याच्यासारखी तीच चव .. :))
आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही मी ... ती जबरी चव ... (तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥ या बुवांच्या उक्तीचीच आठवण आली अगदी ...
कोणाला असले पोहे खायला मिळाले असतील तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !!
सुदुपार.
सुदुपार.
मदन मस्त म्हणजे, हिरवा चाफा
मदन मस्त म्हणजे, हिरवा चाफा काय? कोणी उलगडा करेल क? काल जागुचा हिरवा चाफा
पाहुन ४ - ५ नर्सर्या पालथ्या घातल्या... एक नर्सरी वाला म्हणाला, आप जो हरी चंपा बोल
रही हो,वो ही मदन मस्त है. पण मला जरा शंका येते आहे... आमचा फ्ल्याट असल्या मुळे जागा
मर्यादीत आहे...तो बोलला बडे गमले मे लग जायेगा... शोध खिड्कीत शोधुन झाल..
गुगलवर पण शोधले.. हिरवा चाफा दिसतल पण इथे कोणी सांगेल तेव्हा खात्री होईल.....
शशांकजी मी अजुन महिन्यातून
शशांकजी मी अजुन महिन्यातून एकदा तरी चूल लावते.
पुन्हा एकदा माझ्या लेखाची लिंक.
http://www.maayboli.com/node/43308
मदन मस्त - नाव बरोबर आहे. हे
मदन मस्त - नाव बरोबर आहे. हे ही हिरव्या चाफ्याचेच एक नाव आहे..
(http://www.flowersofindia.net/catalog/slides/Hari%20Champa.html येथून साभार....
)
Pages