आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा विदेशजी !!... खूप दिवसांनी आणि तोही इतका मंद हळुवार दरवळणारा शेर घेवून
व्वा !!

धन्यवाद ...

____________

झाडहि हुरळुन गेले <<<हि आणि हु मुळे निर्माण होणारा नादरस हवासा वाटल्याने आपण असे केले असावेत बहुधा पण सोपे पर्याय अनेक सापडले असते तुम्हाला जसे....>>> झाड दरवळुन गेले <<< वगैरे ...
असो
सहज मनात आले ते बोलून दाखवले इतकेच
न पटल्यास क्षमस्व
असो !

अरेव्वा! मस्त धागा दिसतोय हा. धाग्यावरील बहुतेक शेर आवडले.

एक 'सडा' शेर अपुनकाभी. Happy

ऐकताना कान त्यांनी झाकले अन्
बोलले तेही जणू उपकार केले

- अभय

Pages