मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

नील.. गोंधळ हा माबोचा अविभाज्य भाग झाला आहे हे माहितीच आहे.

रॉहू.. भटकाया नहीं.. अब सही लाइन पे आया है...

ह्या बाबतीत प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असणार.. माबोवरचे आयडी जगभर विखुरलेले आहेत. तर नक्की कुठला कायदा लागू होणार हे ही कोणी तरी सांगा...

शैलजा, मला ह्याबद्दल माहिती मिळाली नाही म्हणून तर इथं विचारलं. Happy

भरत, एथिक्स हे तर आहेतच! पण ''द लॉ ऑफ द लँड'' काय सांगतो हेही जाणून घेणे (मलातरी) महत्त्वाचे वाटते.
''परवानगी'', ''व्यवस्थित परवानगी'' हा शब्द खूप मोघमपणे वापरला जातो किंवा जाऊ शकतो. शब्दखेळ करता येऊ शकतो.

तर भारतीय कायद्यानुसार अशी परवानगी ही कोणत्या स्वरूपात घेतली गेली पाहिजे?
तोंडी की लेखी?
त्यात कोणकोणत्या गोष्टी सांगणे / लिहिणे अपेक्षित (किंवा बंधनकारक) आहे?
ज्याचा फोटो घ्यायचा आहे त्या व्यक्तीस तुमचे सांगणे समजणे हे अपेक्षित आहे का?
लिखित स्वरुपातील परवानगी असल्यास त्यावर जो परवानगी देतो त्या व्यक्तीची स्वाक्षरी आवश्यक आहे का? जो फोटोग्राफ घेतो त्याने आणखी कोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे का?
फोटो कोठेही प्रसारित किंवा प्रकाशित करण्यापूर्वी फोटोग्राफरने अथवा त्या प्रसारमाध्यमाने कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे हे भारतीय कायद्यानुसार बंधनकारक आहे? हे बंधन न पाळल्यास कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते? इलेक्ट्रॉनिक मीडियासंदर्भात ह्याबद्दल काही वेगळे नियम / कायदे भारतात आहेत का?

ह्यासंदर्भात काही माहिती मिळाली तर ती मला (आणि कदाचित इतरांनाही) उपयोगी ठरेल असे वाटते.

हिम्या, तेच वर लिहिले आहे..

>>>> मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही.>>>>>>

नील ते वाचले आहे रे.. म्हणूनच विचारतोय.. की जर काही झाले तर काय करणार...

जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत ठिक आहे वरचे धोरण.. पण झाल्यावर काय?

मायबोली अमेरिकेत रजिस्टर्ड आहे... युजर उगांडात बसलेला आहे. त्याने टाकलेल्या फोटो वर लिगली आक्षेप घेतला गेला.. मुद्दामच लिगली विचारतो आहे.. कारण नुसता आक्षेप घेतला आणि युजरने फोटो काढून टाकले तर काही प्रश्नच येत नाही..

समजा, युगांडाच्या कायद्यात असे फोटो टाकण्यावर काहीच नियम नाहीत.. पण अमेरिकेच्या कायद्यात आहेत तर.. इथे कोणता कायदा लागू होणार??

त्याचं काय आहे ना हिम्स... असे प्रश्न विचारले की खालिल प्रमाणे उत्तरे मिळतात..

>>>त्यात असेच का नाही , तसेच का नाही , अशा परिस्थित याचा भंग होतो का अन त्याचा भंग होतो का असले फाटे फोडणे हे खोडसाळपणाचे लक्षण आहे.
अ‍ॅडमिन किंवा येथले कोणीही तुमचे कायदेविषयक सल्लागार नाहीत . कायदा वाचाल्यावर त्याचे इन्टरप्रिटेशन करण्याइतकी अक्कल इथे सर्वाना आहे किंबहुना जरा दीडपटीने जास्तच आहे:फिदीफिदी>>>> इति अति अक्कल असणारे..

अकु पहिली लिंक काही गोष्टी नक्कीच स्पष्ट करते... त्यातच एका फोटो पत्रकाराचे मत पण आहे..

नंतरची लिंक धोकादायक प्रकाशना बद्दल असलेल्या कायद्याची आहे... त्यातल्या ह्या व्याख्या
2.Definitions

(a)“Harmful publication” means any book, magazine, pamphlet, leaflet, newspaper) or other like publication which consists of stories told with the aid of pictures or without the aid of pictures or wholly in pictures, being stories portraying wholly or mainly-

(i)The commission of offences; or

(ii)Acts of violence or cruelty; or

(iii)Incidents of repulsive or horrible nature; in such way that the publication as a whole would tend to corrupt a young person into whose hands it might fall, whether by inciting or encouraging him to commit offences or acts of violence or cruelty or in any other manner whatsoever;

(b)“State Government” in relation to a-Union Territory, means the administrator thereof,

(c)“Young person” means a person under the age of twenty years.

हिम्या, बहुधा वरच्या तिन रिड विथ चार अन पाच बघितले तर मग "सप्तशती" सारख्या ग्रंथावर/रामायण-महाभारतावर देखिल बन्दी आणावी लागेल असे कित्येकान्चे मत आहे/मागणी आहे असे स्मरते.
असो.
बाकि उद्या वाचतो.

Publishing of information which is obscene in electronic form

BARE ACTS >>CYBER LAW>>INFORMATION TECHNOLOGY ACT 2000

Publishing of information which is obscene in electronic form

Whoever publishes or transmits or causes to be published in the electronic form, any material which is lascivious or appeal to the prurient interest or if its effect is such as to tend to deprave and corrupt persons who are likely, having regard to all relevant circumstances, to read, see or hear the matter contained or embodied in it, shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and with fine which may extend to one lakh rupees and in the event of a second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to ten years and also with fine which may extend to two lakh rupees.

सगळ्या धाग्याचे सार सांगणारा माझा एक अत्यंत महत्वाचा प्रतिसाद उडवला अ‍ॅडमिनने. Proud

पुन्हा टाकला तर हासुध्दा उडविला जाईल, म्हणून नकोच. Proud

नेटवर शोध घेताना कन्सेन्ट फॉर्मचे काही नमुने मिळाले. अर्थात ते भारतात लागू होतात / ग्राह्य धरले जातात अथवा नाही ह्याबद्दल अजून तरी कल्पना नाही. परंतु उदाहरणादाखल :

१.
सॅम्पल मॉडेल रिलीज

२.
फोटोग्राफ रिलीज फॉर्मचा नमुना

३.
पाल्याचा फोटो घेण्यासाठी पालकांची लेखी परवानगी नमुना

'फोटो' हा प्रकार ' पर्सनल डेटा' मधे बसतो बहुतेक. त्यामुळे माझ्यामते जो काही 'डेटा प्रोटेक्शन अ‍ॅट' असेल तो लागू होइल.

आय एस ओ २७००१ हे इंटरनॅशनल इंफर्मेशन सिक्युरिटी स्टंडर्ड आहे, डेटा प्रोटेक्शन हे स्टँडर्ड चा एक भाग आहे.अर्थात हा काही कायदा नाही.

अरुंधती कुलकर्णी,

दुव्यांबद्दल धन्यवाद! Happy तुम्ही जे कायदे म्हणत आहात ते बीभत्स/अश्लील वाङ्ग्मय प्रकाशित करण्याच्या प्रतिबंधाबद्दल आहेत. मात्र सदरहू प्रकरणात एकलेपणाचा (=प्रायव्हसीचा) भंग झाल्याचा मुद्दा आहे. त्यासंबंधी भारतीय कायदा संदिग्ध आहे.

जर भारतीय पत्रकारांनी सार्वजनिक ठिकाणी (=पब्लिक प्लेस) परवानगीशिवाय फोटो काढूनही कायदेभंग होत नसेल तर जिप्सीला माबोवर प्रकाशचित्रे प्रसिद्धण्यास काहीही अडचण नाही/नसावी.

आ.न.,
-गा.पै.

अकु यांचे प्रश्न अतिशय योग्य.
उत्तरे मिळाली जाणकारा लो़कांकडुन तर काळजी नकीच घेता येइल.

व्वा अरुंधती, ग्रेट काम.
सहज मला शन्का आली की पोलिसांद्वारे जे पुढुन कडेने फोटो काढले जातात अन सार्वजनिक ठिकाणी "या या गुन्हेगारांपासून सावध रहा" म्हनून सान्गितले जाते, तर पोलिसांना देखिल अशा परवानगीची गरज असते का? असो. धाग्याचा विषय नसेल, पण कुतुहल म्हणून विचारतो आहे.

मला वाटते अ‍ॅडमिननी असे प्रतिबंद धागा कर्त्यावर घातल्या पेक्षा स्वतः चे वेबसाईटवर या वेबसाईटवर प्रसिध्द झालेली सर्व प्रचि. लेख हे धागाकर्ता व वेबमास्टर यांचे पुर्व परवानगी शिवाय अन्यत्र वापरता येणार नाही. असे आढळ्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा मजकुर टाकल्यास प्रश्न सुटणार नाही काय??

मुक्तेश्वर कुळकर्णी,

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे हक्क प्रकाशचित्रकाराकडे असतात. इतरत्र प्रकाशनासाठी मायबोली प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता नसते.

हा सगळा काथ्याकूट करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने वोटिंग घ्या ना. (कितीजण सहमत आहेत आणि किती असहमत हे तरी माहिती होईल.)
ह्या धाग्याचा पार चावून चावून चोथा केलाय. तरीही काहीजण अजून रस काढताहेत.

ललीत जगताप,

यात मतदान घेण्यासारखं काही नाही. हे धोरण आहे आणि मला वाटतं ते पुरेसं स्पष्ट आहे. इथे लिहिणार्‍या / प्रकाशचित्र टाकणर्‍या सदस्यांकडे त्याचे हक्क आहेत तसेच जबाबदर्‍याही आहेत. एवढाच भाग मुख्य आहे.

>>>>> मला वाटते अ‍ॅडमिननी असे प्रतिबंद धागा कर्त्यावर घातल्या पेक्षा <<<<<
माफ करा मुक्तेश्वरजी, पण "प्रतिबन्ध" मायबोलीने घातलेले नसून, अमुक एक न केल्यास तमुक होऊ शकते याची जाणिव करुन दिली आहे, व अमकेतमके झाल्यास मायबोलीस प्रचलित कायद्यान्चे कायद्यास अनुसरुन प्रचलित प्रशासनांस सहकार्य करावे लागेल इतकेच सान्गितले आहे. व असे असल्याने, फोटो वगिअरे बाबत वापरकर्त्याने कायदे पाळण्याची द्यान्ची योग्य ती काळजी घ्यावी असे सुचविले आहे. यात गैर काहीच नाही, उलट हे आवश्यकच होते असे मला वाटते.

लेख वाचला एकदाचा, हुश्श!! त्यानुसार तरी खालील गोष्टी लक्षात आल्या :

१. भारतात फोटोग्राफ्स काढताना (खास करून सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी) ज्या व्यक्तीचे फोटो काढत आहात त्यांची परवानगी घेतलीच पाहिजे असा काटेकोर कायदा अथवा बंधन नाही किंवा तशी अंमलबजावणीही होताना दिसत नाही. परवानगी घेणे अपेक्षित आहे, परंतु लेखातल्या पत्रकाराच्या उदाहरणावरून जाणवते की प्रसारमाध्यमांतील लोकही अशा तर्‍हेची परवानगी घेताना आढळत नाहीत.

२. लहान मुलांची, खास करून एच आय व्ही बाधित / एड्स पेशन्ट्स, बलात्कार पीडित, सुधारगृहांमधील किंवा ड्रग अ‍ॅडिक्ट मुलांची ओळख माध्यमांद्वारे जाहीर होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी असे संकेत आहेत. [परंतु लेखात लिहिल्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघटनाही ते संकेत पाळत नाहीत.] तसेच अशा लहान मुलांच्या फोटोंसोबत त्यांचे नाव, गाव, इतर तपशील जाहीर होऊ नयेत व त्यांना कोणी त्रास देऊ नये यासाठी काळजी घेण्याचे संकेत आहेत.

३. भारतीय घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीस आपले खाजगीपण जपण्याचा अधिकार व हक्क आहे. प्रसारमाध्यमे या हक्काचे वारंवार उल्लंघन करताना आढळतात. तसेच भारतात 'खाजगी' व 'सार्वजनिक', खाजगी जागा व सार्वजनिक जागा यांबद्दलही विविध मते आढळतात. त्यांत एकवाक्यता नाही. परिस्थितीनुसार व स्थलकालानुसार ह्याचे संदर्भ बदलत राहातात. इथे खाजगीपणाच्या हक्काचा भंग या संदर्भात वेगवेगळ्या कोर्टांचे केस टू केस बेसिस वर वेगवेगळे निकाल आहेत.

४. परवानगी घेण्याबद्दल कायदेशीर बंधन नसले तरी परवानगी घेऊन मगच फोटो काढणे हे कधीही उत्तम!

Pages