मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

पण मी समजा निसर्ग म्हणून एखाद्या शेता/फार्मचा/झाडाचा फोटो घेतला, तर त्या शेता/फार्म/झाडाच्या मालकाची परवानगी लागेल का फोटो घ्याय्ला/प्रसिद्ध करायला?>>> शेताचे/बागेचे/वास्तुचे/दरी/डोंगर/गधा/घोडा/गाय/उल्लु ह्यांच्या प्रकाशचित्रात आणि जिवंत माणसाच्या प्रकाशचित्रात काही फरक नाही? शेताच्या/बागेच्या प्रकाशचित्राचा पोर्नोग्राफी साठी दुरुपयोग होऊ शकतो का? त्या प्रकाशचित्रांने बागेची/झाडाची प्रायव्हेसी भंग होते का? विचार करून बघा. Uhoh

का नाही? माझ्या घराचा फोटो कोणी काढला तर माझ्या सुरक्षिततेचे काय?? घर ही माझी प्रायवेट प्र्रॉपर्टी आहे, माझी प्रायवसी भंग नाही होत?? चित्रे फक्त पोर्नोग्राफीसाठीच वापरतात?? मग मुंबईपुणे एक्ष्प्रेस्स्वेवर फोटोग्राफीला मनाई आहे हे बोर्ड का लावलेत बोगद्यांआधी????

परवानगी घेऊन फोटो टाका असे सगळे म्हणताहेत, ठिक आहे. परवानगी घेतली तर फोटो चोरी व्हायचे थांबणार का?

परवानगी घेतली म्हणजे उद्या जर काही झाले तर त्यातुन फोटोग्राफरने आपली मान सोडवुन घेतली इतकेच. जे काही व्हायचे ते टळणार नाही. मुलांची काळजी वाट्तेय हे बोलणा-यांनाही परवानगी घेतली म्हणजे सगळे काही झाले असेच वाटते.

ज्यांना लहान मुलांबद्दल काळजी वाटते त्यांनी फोटो न काढणे हाच एकमेव उपाय आहे हेमावैम.

फोटो पाहिजे तेव्हढे काढा.. फक्त ते कुठेही पब्लिश करु नका.. आपल्यापाशीच सुरक्षित कपाटात बंद करुन ठेवा.. जमलच तर आपण फार सुरेख फोटो काढतो असे वाटत असेल तर प्रिंट्स काढून कॅमेर्‍या सकट देव्हार्‍यात ठेवून त्यांची पूजा करा..

हा निव्वळ विपर्यास आहे. >>>> अगदी अगदी ! मुळात मुद्दा काय आहे हे समजून न घेता उगीच कीस पाडणं चालू आहे. मृण्मयीने मांडलेल्या लहानमुलांच्या किंवा कोणाच्याही क्लोसअप फोटोच्या दुरुपयोगाचा मुद्दा लोकांच्या खरच लक्षात येत नाहीये का हा राहून राहून प्रश्न पडतोय !!

प्रशासनाचे धोरण जाहीर केलं ते बरच झालं. धोरणात ठोस असं काहीच दिसत नाहीये. पण
<< त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही.>>> हा मुद्दाही बरोबर आहे.

मंजुडी +१
खरच कमाल आहे , कशाशीही तुलना चाल्लीये .. अ‍ॅक्ट्रेसेस-शेतं-रस्ते ??
लहान मुलांची सुरक्षितता -प्रायव्हसी - दुसर्यांच्या लहान मुलांचे डिसिजन परवानगीशिवाय स्वतःघेउ नये हे साधे मुद्दे खरच इतके वेळा इतक्यांनी लिहून सम्जत नाहीयेत कि मुद्दाम चालुये हे Uhoh

विपर्यसाबद्दल मंजू +१

बाकी वस्तू, घरं इच्या फोटोसंदर्भात..
तसंही आपण कुणाच्या घरी गेलो आणि एखादी वस्तू आवडली तर त्याचा फोटो काढायच्या आधी परवानगी घेत नाही का? किमान मी तरी कुठेही फोटो काढायच्या आधी (खाजगी जागेचा, चित्राचा, व्यक्तीचा) फोटो काढला तर चालेल ना असं नक्कीच विचारते (अगदी कुठेही फोटो प्रसिद्ध करायचा नसला तरीही).

मुद्दे योग्य आहेत....
पण हा वाद सगळ्या सोशल साइटस वर का घातला जात नाहि.

हे म्हणजे पोलिसांनी एन्काउंटर केल्यावर मानवि हक्क आयोग वाले त्यांच्या समोर निदर्शन करतात पण जेव्हा अतिरेकी मुडदे पाडतात तेव्हा त्यांच्या समोर जात का कुणी??

पण हा वाद सगळ्या सोशल साइटस वर का घातला जात नाहि. >>> घाला की!! कोणी अडवलय ? जिथे कुठे तुम्हांला हे मुद्दे दिसतील आणि मांडणं शक्य असेल तिथे नक्की मांडा.

हे म्हणजे पोलिसांनी एन्काउंटर केल्यावर मानविइ हक्क आयोग वाले त्यांच्या समोर निदर्शन करतात पण जेव्हा अतिरेकी मुददे पाडतात तेव्हा त्यांच्या समोर जात का कुणी?? >>> हे उदाहरण मात्र अजिबात कळले नाही.

नील. | 12 February, 2014 - 16:51
घराबाहेरच पडू नये.. कुणी फोटो काढला तर..:हहगलो:

>>परवानगी घेतली म्हणजे उद्या जर काही झाले तर त्यातुन फोटोग्राफरने आपली मान सोडवुन घेतली इतकेच. जे काही व्हायचे ते टळणार नाही. मुलांची काळजी वाट्तेय हे बोलणा-यांनाही परवानगी घेतली म्हणजे सगळे काही झाले असेच वाटते.<<

+१

परवानगी घ्या म्हणणारे फक्त इतकाच विचार करून राहिलेत असेच वाटते. हे म्हणजे सीवायए टाईप झाले.
वरवर मुलांची काळजी वगैरे पण मुद्दा इतकाच की आपली मान अडकवू नका म्हणजे खूप झालं. जर पुढे कायद्याच्या लफड्यात अडकलात तर परवानगी घेतली होती हो आणि त्यानंतर काही जे झालं फोटॉच ती माझी जबाबदारी नाही असे सांगा.

त्यामुळे , लहान मुलांच्या बाबतीत इथून पुढे फोटो दाखवूच नका ओपन साईटवर हाच एक मुद्दा उरतो व रास्त आहे.

मग अ‍ॅडमिनला प्रश्ण, प्रकाशचित्रणात फक्त काय असावे व काय नसावे(कशाचा फोटो असावा/नसावा) तेच का सांगत नाही?

काही ठिकाणी जागांचे फोटो सुद्धा सुरक्षिततेच्य दृष्टीने काढायला परवानगी नसते वगैरे वगैरे (जे वरती उपस्थित झालेले मुद्दे आहेत) त्या अनुषंगाने प्रकाशचित्रण विभाग सुरु राहिल का?

पराग, मंजूडी, डीजे >> +१

धोरण स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद अ‍ॅडमीन. या चर्चेच्यानिमित्तानं का होइना फोटो काढताना इतरांची (फक्त लहान मुलांचीच नाही) प्रायव्हसी, सुरक्षितता, फोटोग्राफी इथिक्स याबद्दल थोडिफार जागरूकता आली असेल तर तेही या चर्चेचं यशच म्हणावं लागेल Happy

हिम्सकुल, नील Biggrin

पण हे क्लोज-अप्स कुठेना कुठे तर असतातच ना? या साईटवर नाही तर त्या.... मुळात फोटो का काढायचे, असा प्रश्न उद्भवू नये म्हणजे मिळवली.
दरम्यान बरेच फोटो उडाले, वाईट वाटलं. Sad

कोणत्याही व्यक्तीची छायाचित्रे जर मायबोलीवर [किंवा नेटवर] प्रकाशित करणे जर पूर्णपणे बंद केले तर पुढचे विनापरवानगी फोटो प्रकाशन / त्या फोटोचा गैरवापर इत्यादी प्रकार टळू शकतील असे वाटते.

जिप्सी आणि आशुचँप यांनी माबो वर प्रकाशित केलेले फोटो काढू नये असे मनापासून वाटते. खूप जेन्युईनली त्यांनी सर्वांबरोबर फोटो शेअर केले आहेत.

पण हे क्लोज-अप्स कुठेना कुठे तर असतातच ना? या साईटवर नाही तर त्या.... मुळात फोटो का काढायचे, असा प्रश्न उद्भवू नये म्हणजे मिळवली. >>>>

खरंच मुद्दा समजला नाहीये का? एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग करण्याचा फक्त मला फोटो काढता येतो किंवा माझ्याकडे कॅमेरा/मोबाइल आहे म्हणून मला आपल्याला अधिकार आहे असं नाहीये. कुणाचाही (मोठे किंवा छोटे) फोटो त्यांना विचारल्याशिवाय (छोट्यांच्या बाबतित त्यांच्या पालकांना) फोटू काढू नये इतकं साधं /सोप्पं आहे हे.

आपल्याकडे लोकांना (पक्षी आपल्यालाच) खाजगीपणा जपणं कळत नाही हेच खरं. Sad

जर वर लिहिलेल्या सगळ्या सुचना पाळल्या तर फेसबुक बंद पडेल Happy
आक्षेप घेणार्यांचे मुद्दे मान्य आहेत पण त्याची अंमलबजावणी करण फार किचकट आहे . जेवढे खोलात जाऊ तेवढे ग्रे एरिया आहेत.

खाजगीपणा जपण्याबद्दल सहमत. चांगल्या प्रचिचे धागे बंद पडलेत पण माबोच्या धोरणाशी सुसंगतच आहे म्हणायचं. Sad

वरच्या चर्चेत अनेकांनी मायबोली प्रशासनाच्या धोरणाचा अर्थ ’फोटो प्रकाशित करू नका’ असा घेतला आहे, असं दिसतंय. ’फोटो प्रकाशित करताना काळजी घ्या, लहान मुलांची प्रकाशचित्रं प्रकाशित करताना परवानगी घेणे उत्तम’, एवढंच प्रशासनाने सांगितलं आहे. प्रकाशचित्र प्रकाशित करण्यावर बंदी घातलेली नाही, किंवा प्रकाशित करू नका, आधीची प्रकाशचित्रं अप्रकाशित करा, असंही सांगितलेलं नाही. विविध देशात वेगवेगळे नियम असतात. त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीनं जाहीर केलेलं हे धोरण आहे. कृपया त्याचा विपर्यास करू नका.

कोणत्याही व्यक्तीची छायाचित्रे जर मायबोलीवर [किंवा नेटवर] प्रकाशित करणे जर पूर्णपणे बंद केले तर पुढचे विनापरवानगी फोटो प्रकाशन / त्या फोटोचा गैरवापर इत्यादी प्रकार टळू शकतील असे वाटते. <<<

अरुंधती, मला वर स्पष्ट केलेल्या धोरणातून इतके कळले की मी टाकलेल्या फोटोतून जे काही बरे-वाईट उद्भवेल त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येते. मला अशी जबाबदारी घ्यायची नसेल तर मी फोटो न टाकणेच बरे. पण त्यासाठी मायबोलीनेच अपलोड होणारा प्रत्येक फोटो तपासून तो व्यक्तिचा आही की नाही हे तपासून मगच प्रकाशित करावा, अशी आशा करणे म्हणजे टोकाचे झाले.

"राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज" हे "दोन्हीही" संपूर्णपणे "पोस्टकर्त्याचे" असं स्पष्टपणे धोरणातून दिसतं आहे. यानंतरचं आपापलं 'वैयक्तिक धोरण" प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. विपर्यास व्हायला जागाच नाही खरं तर.

"राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज" हे "दोन्हीही" संपूर्णपणे "पोस्टकर्त्याचे" असं स्पष्टपणे धोरणातून दिसतं आहे. यानंतरचं आपापलं 'वैयक्तिक धोरण" प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. विपर्यास व्हायला जागाच नाही खरं तर. >
पर्फेक्ट. सगळ्या चर्चेच सारं हेच आहे.

>>"राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज" हे "दोन्हीही" संपूर्णपणे "पोस्टकर्त्याचे" असं स्पष्टपणे धोरणातून दिसतं आहे. यानंतरचं आपापलं 'वैयक्तिक धोरण" प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. विपर्यास व्हायला जागाच नाही खरं तर. << +१

कमाल आहे. हे व्यक्ती रेखान्च्या ( म्हणजे जिवन्त व्यक्ती/ लहान मुले/ तरुणी ) विषयी असेल तर समजता येईल. पण जिप्सीने निसर्गाचे जे अजोड आणी अविट प्रकाशचित्रण केले आहे, त्याबद्दलही बाकीच्यान्चा आक्षेप आहे का?

जिप्सी तुम्ही ते निसर्गाचे फोटो का काढलेत?( म्हणजे इथुन काढुन टाकलेत?)

मायबोली प्रशासनाचे असे धोरण असेल तर मग पूर्ण गुलमोहर विभागच बन्द करा.

सगळ्यांनी आपापले प्रगा(कॅमेरे) आता बासनात गुंडाळून ठेवा बरं! Happy

Pages