मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

सायो,
पहिल्या मुद्द्याबद्दल माझं काहि म्हणण नाही, इन्फॅक्ट त्या धाग्यावर माझ्या पहिल्या दोन प्रतिसादातच मी लिहिलंयः
पुढच्या वेळेस तुम्हाला इतका मोठा प्रतिसाद टाईप करण्याची गरज पडणार नाही याची नक्कीच काळजी घेईन आणि नविन थीम घेऊन पुन्हा येईन, जी तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो

आणि तुम्ही म्हंटल्याप्रमाणे नुस्ते फोटो दाखवणं म्हणजे परवानगी नव्हे. तेव्हा त्यांना गृहीत धरल्या गेलं असं वाटतं.>>>>>अहो, मी वर लिहिलंय ना "(अर्थात "फोटो काढुन माबोवर प्रदर्शित करणे याला त्यांची परवानगी आहे" असा अर्थ होत नाही). इथं मी कुठेही त्यांना गृहित धरलंय असं लिहिलंय नाही."

मी तुमच्या दुसर्‍या मुद्द्यावर कन्फ्युज आहे. जर त्याचवेळी (ते धागे प्रदर्शित झाल्यावर) जर विरोध झाला असता तर कदाचित हि थीम प्रदर्शित करताना मी अजुन थोडा विचार केला असता.

उदाहरणच द्यायचे झाले तर माझ्या "हुस्न-ए-कश्मिर" या धाग्यावर मी काहि सैनिकांचे फोटो टाकले होते त्यावर मृण्मयीने मला विपुमधुन ते फोटो डिलीट करावयाची विनंती केली होती. जे मला मनापासुन पटलं होतं व मी ते फोटो लगेच डिलीटही केले. त्यानंतर मी माझ्या लडाखच्या धाग्यावर या प्रकारचे फोटो प्रदर्शित करणे कटाक्षांने टाळले.

"अफाट फोटो", "निरागसता छान टिपलीस", "सुंदर फोटो" इ. इ. प्रतिसाद दिले आहेत (ज्यात लहानमुलांचे पोर्ट्रेट फोटोही आहेत). या अशा दोन वेगवेगळ्या प्रतिसादामुळे माझं कन्फ्युजन झालं होतं >>>> यात कन्फ्युजन चा प्रश्नच उरायला नको खरं तर. एखादी गोष्ट नियमात बसत नाही/ बसणार नाही किंवा अनुचित आहे म्हटल्यावर किती लोकांनी त्याला 'वा वा' केले त्याने काय फरक पडणार आहे ??!! Uhoh
आत्ताच हे डिस्कशन का हा प्रश्न ठीक आहे पण त्याला तसा काही अर्थ नाही !!

होय....बहुतांशी माझे प्रश्न हेच आहेत....
आणि स्ट्रीट फोटोग्राफीचा मुद्दा स्पष्ट करून हवाय

माझा आत्तापर्यंत मायबोलीकडे बघण्याचा उद्देश्य हाच होता...की इथे माझे सगळे मित्र आहेत आणि मी कुठे जाऊन आलो त्याचे वर्णन, कुठे फोटो काढले ते असे सगळे त्यांच्याबरोबर शेअर करणे...

मध्यंतरी माझेच फोटो मेलनी फिरत फिरत आले तेव्हा आश्चर्य वाटले पण त्यानंतरही फोटो टाकणे थांबवले नाही....पण लहान मुलांचे फोटो असे माबोसारख्या साईटवरून उचलून त्यात फेरफार करून पोर्नोग्राफीसाठी वापरण्यात येत असतील अशी चुकुनही शंका आली नव्हती...

आणि त्यामुळे मी खूपच गांभिर्याने विचारत आहे आणि मला तातडीने उत्तर हवे आहे कारण त्यावर मी तातडीने माझे इथले सगळे फोटो डिलीट करणार आहे.

मी कदाचित त्यासाठीही वाट पाहणार नाही...बहुदा आजच ते करायला सुरुवात करेन

>>मी तुमच्या दुसर्‍या मुद्द्यावर कन्फ्युज आहे. जर त्याचवेळी (ते धागे प्रदर्शित झाल्यावर) जर विरोध झाला असता तर कदाचित हि थीम प्रदर्शित करताना मी अजुन थोडा विचार केला असता.>>

त्यावेळी झाला नाही म्हणून पुढेही होणार नाही किंवा होऊ नये असं नाही ना? त्यानिमित्ताने चर्चा झाली, काय करावं, करू नये हे सगळ्यांनाच लक्षात आलं हे ही बरंच की.

माझा आत्तापर्यंत मायबोलीकडे बघण्याचा उद्देश्य हाच होता...की इथे माझे सगळे मित्र आहेत आणि मी कुठे जाऊन आलो त्याचे वर्णन, कुठे फोटो काढले ते असे सगळे त्यांच्याबरोबर शेअर करणे...

मध्यंतरी माझेच फोटो मेलनी फिरत फिरत आले तेव्हा आश्चर्य वाटले पण त्यानंतरही फोटो टाकणे थांबवले नाही....पण लहान मुलांचे फोटो असे माबोसारख्या साईटवरून उचलून त्यात फेरफार करून पोर्नोग्राफीसाठी वापरण्यात येत असतील अशी चुकुनही शंका आली नव्हती...>>>>आशु, +१.

त्यावेळी झाला नाही म्हणून पुढेही होणार नाही किंवा होऊ नये असं नाही ना? >>>>मला नेमकं काय म्हणायचंय तेच तुम्हाला समजलं नाही असं दिसतंय.

असो.

फोटोंची जवाबदारी आणि फोटोंचे होणारे गैरप्रकार .......हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहे .... कृपया हे आधी लक्षात घ्या..

परवाणगी घेउन सुध्दा जर त्या फोटोचे गैरप्रकार झाले तर ? याचे उत्तर कोणीच दिले नाही अजुन ही ...

मुळात परवाणगी घ्यावी हे बरोबरच आहे यात वाद नाही अथवा शंका देखील नाही .. परंतु त्यामुळे गैरप्रकार होणार नाही हा समज चुकिचा आहे...

मागच्या पानावर माझा दुसरा मुद्दा हा होता ज्यावर तू माझं कन्युजन झालं आहे असं म्हणतो आहेस

>> २- तिथे आक्षेप घेतलेल्या बर्‍याच आयडींनी तुझ्या दुसर्‍या फोटोवर 'अरे वा, छान' वगैरे प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा आक्षेप घेतला नाही. मग आत्ताच का?>>

आणि वर मी >>त्यावेळी झाला नाही म्हणून पुढेही होणार नाही किंवा होऊ नये असं नाही ना>> ह्यात कुठे मला मुद्दा कळाला नाही?

माझा आत्तापर्यंत मायबोलीकडे बघण्याचा उद्देश्य हाच होता...की इथे माझे सगळे मित्र आहेत आणि मी कुठे जाऊन आलो त्याचे वर्णन, कुठे फोटो काढले ते असे सगळे त्यांच्याबरोबर शेअर करणे... >>> मायबोलीच्या हजरो युजर्सपैकी सगळेच तुमचे मित्र नसणार म्हणून तर तुम्ही प्रकाशित केलेले फोटो ढापून स्वतःच्या नावाने खपवण्याचे प्रकार होतात. त्याही पुढे जाऊन काही विकृत प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे हे असे धोरण /संकेत हे फोटोच्या गैरवापरापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग होवू नये यासाठी असते /आहे.

माझ्या माहितीप्रमाणे हे असे धोरण /संकेत हे फोटोच्या गैरवापरापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग होवू नये यासाठी असते /आहे.

गैरप्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छायाचित्र नेटवर प्रसिद्ध न करणं. आपल्यापैकी कित्येकजण स्वतःच्या मुलांसदर्भात /स्वतःसंदर्भात हे कटाक्षाने करतंच असतात.

>>परवाणगी घेउन सुध्दा जर त्या फोटोचे गैरप्रकार झाले तर ? याचे उत्तर कोणीच दिले नाही अजुन ही ...

मुळात परवाणगी घ्यावी हे बरोबरच आहे यात वाद नाही अथवा शंका देखील नाही .. परंतु त्यामुळे गैरप्रकार होणार नाही हा समज चुकिचा आहे...>> हो, होऊ शकतीलच. परवानगी घेतली म्हणजे त्या फोटोवर काही सिक्युरीटी लेअर चढणार नाही. विकृत लोकांची कमतरता नाहीच (आता विकृती अमेरिकेतून आली आहे असा मुद्दा आणू नका कृपया) पण आपल्याकडून आपण गैरवापर टाळता यावा म्हणून हातभार लावायला काय हरकत आहे?

जे मी इथे लिहिले नाही..... ते इथे मुद्दामुन लिहायची गरज ???????? Uhoh

आपण गैरवापर टाळता यावा म्हणून हातभार लावायला काय हरकत आहे>>>>>>>>>>> सांगा आता गैरवापर टाळता येईल असे काय करावे .. तुम्हीच एखादा मुद्दा सुचवा... कृपया

माझी त्यालाही काय फारशी हरकत नाहीये...मुळात मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही...त्यामुळे माझे फोटो कुणाला ढापावेसे वाटत असतील त्यांना ते चांगले वाटले असावेत असे मी समजतो....
हा काही विनय वगैरे नाही...मी गणेशोत्सवातल्या फोटोंवर वॉमा टाकलेले नाहीत...आणि तिथेही हा मुद्दा मांडला आहे...ज्याला पाहिजेत त्यांनी ते फोटो खुशाल वापरावेत...

प्रश्न येतो की गैरवापर होण्याचा....परवानगी घेणे विशेषत मी उल्लेख केलेल्या ठिकाणी हे सर्वथा अशक्य आहे....त्यामुळे एकतर असे फोटोच न काढणे किंवा ते प्रकाशित न करणे...हे दोनच पर्याय उपलब्ध होतात....

आणि फोटो काढून कुणाला दाखवायचेच नसतील तर ते काय करायचे...

वर लिहिलं आहे बघा

>>गैरप्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छायाचित्र नेटवर प्रसिद्ध न करणं. आपल्यापैकी कित्येकजण स्वतःच्या मुलांसदर्भात /स्वतःसंदर्भात हे कटाक्षाने करतंच असतात.>>

गैरप्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छायाचित्र नेटवर प्रसिद्ध न करणं>> +१

म्हणूनच धोरण हे मला वैयक्तिकरित्या "यू कॅन ओन्ली डू सो मच" प्रकाराचं वाटलं. इंटरनेटवर एखादी गोष्ट परवानगीने टाकली तरी त्याचा गैरवापर होणार नाही याची कोणतीही खात्री नसते.

गैरप्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छायाचित्र नेटवर प्रसिद्ध न करणं. आपल्यापैकी कित्येकजण स्वतःच्या मुलांसदर्भात /स्वतःसंदर्भात हे कटाक्षाने करतंच असतात.

हा मुद्दा माझ्याबाबतीत तरी लागू होत नाही....मी माझ्या मुलाचे फोटो निशंकपणे इथे प्रकाशित केले आहेत. आणि याचे कारण मी वर दिले तेच आहे...

त्यामुळे आपल्या मुलाबाबत काही होऊ नये, बाकींच्याबाबतीत काय झाले तरी चालेल अशी बेपर्वा वृत्ती मी एकदाही दाखवलेली नाही....जो न्याय माझ्या मुलाला तोच बाकिच्यांना....

त्यामुळे आपल्या मुलाबाबत काही होऊ नये, बाकींच्याबाबतीत काय झाले तरी चालेल अशी बेपर्वा वृत्ती मी एकदाही दाखवलेली नाही....जो न्याय माझ्या मुलाला तोच बाकिच्यांना.... >>>

मी स्वतः माझ्या मुलाचे काही फोटो इथे टाकले आहेत. पण तेच मी दुसर्‍यांच्या मुलांबद्दल नाही करू शकत. माझ्या मुला फोटो सार्वजनिक करायचे की नाही /माझं आयुष्य कितपत सार्वजनिक करायचं हे ठरवण्याचा हक्क मला आहे. पण दुसर्‍यांच्या बाबत (अगदी माझी पुतणी,वहिनी किंवा इतर नातेवाईक) मी असा डिसिजन नाही घेवू शक्त. तो त्यांच्या प्रायव्हसीचा भंग होईल.

(मी इथे सोडा, फेसबुकवर फक्त मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा नातेवाईकांचे/मित्र-मैत्रिणींचे फोटो शेअर करताना आधी त्यांची परवानगी घेते)

बाप रे! इतकी सगळी चर्चा झालेली वाचलीच गेली नव्हती.

वाचताना सर्वात आधी एक गोष्ट आठवली - फेब्रुवारी २०१४च्या 'अंतर्नाद'चं मुखपृष्ठ जिप्सीच्या कलेक्शनमध्ये पर्फेक्ट बसणारं आहे.
पण ते पाहताना किंवा त्याच्या फोटोग्राफरचं त्या फोटोबद्दलचं अंकातलं निवेदन वाचतानाही मृण्मयीनं मांडलेला मुद्दा डोक्यातही आला नाही.

अर्थात, तिचं म्हणणं तत्वतः पटणारं आहे. पण त्यावर उपाय काय याचं उत्तर मात्र समोर दिसत नाहीये.

आपल्या धोरणाचा आदर राखत मी आत्तापर्यंत माबोवर प्रकाशित केलेल्या सर्व मुलाबाळांचे, माणसांचे प्रचि उडवून टाकले आहेत. यापुढे माझ्याकडून अशा प्रकारचा एकही फोटो प्रकाशित होणार नाही याची हमी देतो....

धन्यवाद

चायवाला | 11 February, 2014 - 16:04 नवीन

>>पण काय दैवदुर्विलास आहे बघा, जिवन्त व्यक्तिच्या निर्जिव फोटोवरील "वस्त्रे उतरवली जाऊ" शकतील म्हणुन एकीकडे दु:ख/वेदना व्यक्त होता हेत, अन दुसरीकडे, जिवन्त व्यक्तिला नागटी उभी करुन केल्या गेलेल्या नग्नचित्रणाचे मात्र कलास्वादा की अशाच कशाकरता तरी उद्दात्तीकरणही हाच समाज याच इथे मायबोलिवर करतो आहे. .

स्मित
<<<

आपल्या 'अवतारात' बालमजूरीचा पुरस्कार आहे, त्याचा इच्चार करा जरा आधी, मग हितं फोटूबद्दल ज्ञानदीप प्रज्वलन करा Happy

webmaster | 11 February, 2014 - 19:31

मायबोलीवर राईटक्लीक बंद का करत नाही असे वारंवार लिहिले जाते त्याबद्दलचा हा खुलासा.

राईटक्लीक बंद केल्यावर फोटो सेव्ह करता येत नाही असा एक प्रचंड गैरसमज आहे.
१) ज्या क्षणी तुम्ही आंतरजालावरचे एखादे पान पाहता त्या क्षणी त्या पानावरचे सगळे फोटो आधीच तुमच्या ब्राऊझरने एका डिरेक्टरीत (कॅश)अगोदरच उतरवले असतात. राईट क्लीक न करताही तिथून ते सगळे मिळवता येतात.
२) अनेक ब्राऊझर आहेत जे राईटक्लिक बंद केले तरी वर मेनू मधून संपूर्ण पान आणि आणि त्यावरचे फोटो डाऊनलोड करू देतात.
राईटक्लीक बंद केले तर जे अगदीच नवशिके आहेत ते सोडून इतर कुणालाही तुम्ही थांबवू शकत नाही. ज्याला मुद्दाम ते फोटो चोरायचे आहेत त्यांना तर नाहीच. पण राईट्क्लीक बंद केले तर त्यामुळे इतर ज्या सुविधा मिळतात त्या मिळणार नाहीत.
<<
ब्राऊजर्स सोडा हो. जस्ट तो फोटो नॉर्मल लेफ्ट क्लिकने धरून डेस्कटॉपवर सोडला तरी सेव्ह होतो. कसला मेन्यु अन कसलं काय. तुमचे एक हजार टक्के बरोबर आहे.

*

जिप्सी अन आशूचँप.

लहान मुलांच्या फोटोज बद्दल मी तुमच्या अन अ‍ॅडमिन्/वेमांच्या दोघांच्या विचारांशी सहमत आहे. डबल ढोलकी म्हणा हवे तर.

ते दोघे सीपी/केपी बद्दलच्या अमेरिकन व्ह्यूपॉइंटने बोलत आहेत, जो बरोबर आहेच. इंटरनेटवर माझा वावर अनेक स्तरांवर असतो, अन त्यात या दोहोंची जी काळजी आहे ती बरोबर आहे असे माझे म्हणणे आहे.
माबोच सोडा, फेसबुकावर तुम्ही-आम्ही आपल्या घरचे जे फोटो विनाकारण टाकत असतो, ते टाकूच नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. कशाचा गैरवापर कुठे होईल ते सांगता येत नाही. या अँगलने माबो व्यवस्थापनाशी सहमत.

पब्लिक प्लॅटफॉर्मवर जर मुले पर्फॉर्म करत असतील, तर इतरांनी त्यांना पहावे, ही सग्ळ्यांची इच्छा आहे, असे गृहित धरून, 'मॉडेलिंग' दाखवणार्‍या साईट्स उघड उघड उद्दीपक चित्रे दाखविणार्‍यादेखिल असल्या तरी अमेरिकन कायद्याच्या कचाट्यातून वाचतात हे मला ठाऊक आहे. तेव्हा गणेशोत्सव मिरवणूकीतील मुलांच्या चित्रांना, किंवा शाळेत ग्यादरिंगच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार्‍या मुलांच्या चित्रांना तितकाच आक्षेप असायला हवा का? हा मुद्दा माझ्या मनात येतोच. (या अँगलने, तुम्ही असे फोटो टाकण्यात गैर काहीच नाही, याबद्दल सहमत.)

वरील उचलेगिरी व गैरवापर करण्याच्या मुद्द्याच्या सपोर्टसाठी मी अनेक 'चाईल्ड आर्टिस्ट'स चे 'मॉर्फ' केलेले फोटो दाखवू शकतो Happy

**

तर, समारोपादाखल इतकेच म्हणतो,
जिथे तुम्हाला मनात थोडी शंका येईल की माझ्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, तर तो फोटो इंटरनेटवर टाकू नका.
तुमच्या मित्रांना पर्सनली मेल करा. फेसबुका/फ्लिकरवरही टाकू नका. तुमच्या अकाउंटला फक्त मित्र पाहू शकतात इ. गैरसमज आहेत, असे सांगतो Wink त्यावर विश्वास ठेवा.

जिप्सी अन चँप यांचे नेत्रसुखद व सुंदर फोटो पहायला मिळतच रहावेत अशी इच्छा आहे.

धन्यवाद!

हा विषय खरोखरच विचित्र आहे. सुत्रसन्गतपणे त्याचे विश्लेषण करणे मला अवघड जाते आहे. ते नन्तर करु पाहीन.
बर, पण मी समजा निसर्ग म्हणून एखाद्या शेता/फार्मचा/झाडाचा फोटो घेतला, तर त्या शेता/फार्म/झाडाच्या मालकाची परवानगी लागेल का फोटो घ्याय्ला/प्रसिद्ध करायला?
गावाकडे माझ्या अनुभवाप्रमाणे "ए भो+++++च्या माझ्याकडे का बघतो? " किन्वा "माज्या घराकडी का बगतो" म्हणून भान्डणे काढणारी लोक देखिल आहेत. हां, आता अशा भाण्डने काढणार्‍या भाण्डणपिपासू जागृत नागरिकान्कडुन संरक्षण हवे म्हणून फोटो परवानगी शिवाय काढू नयेत / इकडे तिकडे बघूही नये इत्यादी बाबी आमाला आमच्या आईने लहानपणीच शिकवल्या होत्या. Happy त्यानुसार, परवाणगी घेणे आवश्यक आहे असे माझे मत. कायद्याने आवश्यक तर असेलच असेल.

What I learnt from this discussion is that
1. You should not publish any individual's photograph on internet (including maayboli) as it could be misused for any purpose. No site is secure enough.
2. Any individual's permission does not count really, because they can retract their permission, or question the usage.
3. Any 'decent' photograph can be used for indecent purposes as far as the photographs depicting any person are concerned.

Pages