मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

उदयन, मी स्वतः असे फोटो प्रकाशित करत नाही, इथे काही माबोकरांच्या मुलांचे फोटो मी काढलेले आहेत, त्यापैकी काही त्यांची पूर्ण परवानगी घेऊनच मी प्रकाशित केलेत. स्वतःपुरतेच मी सांगू शकते.

आता तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः काय कराल? अन्यथा तुमची केजरीवाल बनण्याची पाळी. Happy

शैलजा, अगं दुसर्‍यांच्या मुलाचे फोटो टाकताना आपण निर्णय घ्यायचा नाही असे इथल्या काहि जणांचे म्हणणे आहे.. तु जर आधिची पाने वाचलिस तर कळेल तुला.

उदयन, अगदी बरोबर...
परवानगी घ्यायची म्हणजे नक्कि काय? हे सांगा प्लिज...

कोणीच इथे ही फूलप्रूफ सिस्टीम आहे असे म्हणत नाहीये, पण काही प्रमाणातली प्रीकॉशन अहे असे काहीसे.>> शैलजा + १.
आणि भरत मयेकरांनी या बाफच्या पान क्र.१ वर लिहिल्याप्रमाणे हे धोरण केवळ मायबोलीवरच आहे असे नाही.

आणि हे धोरण आहे, 'नियम' नाही.

भरत मयेकरांना अनुमोदन. अ‍ॅडमिनांच्या वरील निवेदनातही तपशीलवार माहिती देऊन परवानगी घेण्याबद्दल लिहिलं आहे.

शैलजा, अगदी मान्यच. पण समज, माझा एखादा सख्खा मित्र (किंवा मैत्रीण) फोटोग्राफर आहे, स्पर्धेला माझ्या बाळाचा फोटो पाठवू इच्छितो (इच्छिते)... तर मी तरी पटकन होकारच देईन बहुधा...<<<<<
ललिता, हा तुमचा दृष्टिकोन झाला आणि तसा निर्णय तुम्ही स्वतःच्या मुलाबाबत घेऊ शकता. परंतु इतरांचा दृष्टिकोन तसा असेलच असं नाही आणि ते त्यांच्यादृष्टीने बरोबरच आहे.

तसंच, तुम्ही वर्णन केलेल्या केसमध्ये तुम्ही जसं जमेल तसं त्या आईला समजावून सांगू शकता पण तुम्हांला जर जाणवलं की, त्या आईला हे सर्व नीटसं कळत नाहीये आणि त्यामुळे तिची परवानगी ही इन्फॉर्म्ड कन्सेन्ट होऊ शकत नाही, तर त्या बाळाचा फोटो न काढण्याचा / वापरण्याचा निर्णय घेणं तुमच्या हातात आहे की!

फोटो काढताना व्यवस्थित प्रोसेस वापरा, एवढं सुचवल्यावर लोक एवढे हायपर का होत आहेत, हे खरंच कळत नाहीये बाकी! (आमच्या नातेवाइकांत सध्या एक लहान बाळ आहे. त्याचा फोटो फेबुवर शेअर करणं त्याच्या सख्ख्या मामाला सुद्धा अलाउड नाहीये. पण या गोष्टीचा कुणीही बाऊ केलेला नाही. जर कुणाला बाळाचा फोटो इमेलातून वगैरे पाठवायचा झाला तर त्याच्या पालकांना सांगून परवानगी घ्यावीच लागते.)

त्यापैकी काही त्यांची पूर्ण परवानगी घेऊनच मी प्रकाशित केलेत. स्वतःपुरतेच मी सांगू शकते. >>>>> बरोब्बर..

आता मला सांगा जे परवानगी घेउन प्रकाशित केले .. त्यांचा गैरवापर झाला तर ????? अश्या वेळेला काय करणार ?

ही भिती मनात आहे ?

...................

अहो मी तर संपुर्ण स्पर्धा आयोजित केलेली ज्यात मी माझ्या भाच्यांचे सुध्दा फोटो टाकलेले.. आता मावशीला सांगुन ..

भावविश्व मधे अनेक मायबोलीकरांनी फोटो टाकलेले... वरती प्रश्न उपस्थित करणारे देखील होते त्यात (बहुदा)
अश्या वेळेला "गैरप्रकाराचे अवास्तव स्तोम माजवणे" बरोबर आहे का ???????

माझे म्हणने हे आहे... की ,,,,,,, परवानगी नक्कीच घ्यावी .. त्यात चुकीचे नाही आहे.. परंतु गैरप्रकार होणारच आहे आणि असे होईलच याचा बागुलबुवा दाखवुन जे स्तोम माजवले आहे ते बंद करावे...

काहींच्या मनात असले विचार येत असेल तर ते काय घराबाहेर पडताना बुरखा घालुन मग बाहेर जातात का ?

उदयन केजरीवाल, दळण दळत बसायचा काही फायदा असतो का हो? Happy तुमच्या वरच्या पोस्टींमध्यल्या प्रश्नांची उत्तरे मी आधीच दिली आहेत, तेह्वा परत लिहित नाही. Happy

अ‍ॅडमिन टीमने हा धागा आता वाचनमात्र करायलाही हरकत नसावी Happy

नील, एवढी ग्वाही देत आहेस, की मायबोलीवर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर होऊच शकत नाही, ती भिती अनाठायी आहे, तर मग तो प्रश्नच मिटला !

मला सांगा जे परवानगी घेउन प्रकाशित केले .. त्यांचा गैरवापर झाला तर ????? अश्या वेळेला काय करणार ? >>

याचे उत्तर दिले नाही ....... Happy स्पष्ट आणि क्लिअर स्वरुपात कृपया द्यावे ... गोल फिरवुन नको

गजानन, अशी गॅरेंटी कुणीही देणार नाही... पण हे नक्कि होइल असं जे काहि संगितला जातय ते ही चुकिचं आहे.

गजानन, अशी गॅरेंटी कुणीही देणार नाही... <<< नील, माझा मुद्दा हाच आहे. असे होण्याची काही अंशी शक्यता जरी असली तरी एक पालक फोटोसाठी दहादा विचार करील...

पण हे नक्कि होइल असं जे काहि संगितला जातय ते ही चुकिचं आहे. <<< अशीही पोस्ट कोणी टाकली आहे का? माझे वाचायचे राहून गेले असल्याची शक्यता आहे... 'हे नक्की होईल' असं कोणी लिहिलंय?

गैरवापर झाला तर (आपली चूक नसतानाही ) होणार्‍या परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवायची. फोटोचा गैरवापर होण्यात आपला काही हात नाही हे सिद्ध करताना होणारा मनस्ताप सहन करायचा.याला पर्याय नाही. असलाच तर फोटो केवळ तुम्हाला अत्यंत विश्वासपात्र वाटणार्‍या लोकांशीच शेअर करा असा आहे.
अशा वेळी तुम्ही इन्फॉर्म्ड कन्सेन्ट घेतलेली असण्याचे महत्त्व लक्षात येईल.

माझ्या मते माबो ने क्लीअर केलेत ते फक्त नेहमी पाळले जाणारे नियम.
आणि माबोचे धोरण त्यास सुसंगत आहे हे ही स्पष्ट केलय.
तर असे फोटो पब्लिश करताना आपण त्या नियमात आहोत की नाही आणि त्याची जबाबदारी आपल्यावरच येइल हे स्वतःच लक्षात ठेवुन करणेचे आहे. इतकच.

असे नियम वै चर्चा झाली ते बरच म्हणा एकप्रकारे.

जिप्सी, एक विनंती.
सर्व फोटो उडवु नकोस प्लीज.

Any person's photograph can be distorted or clubbed with other individuals or captioned with malicious intent or it can be used in a completely different context than the original photographer intended. One can not put a stop to that once that photo gets published on internet. Any harm caused by such action to the photographed person - ultimately whose 'moral' responsibility is this? If the original photographer feels that its her/ his responsibility, then NO, even with the 'informed consent', he or she might decide not to publish any such photos. Or decide to delete the earlier ones and that is completely their decision to take. I respect that.

ही माझी पहिली पोष्ट ! हीमापपो..

काही लोक खरेच वेड घेऊन पेडगावला जात आहेत.

पूर्वी प्रकाशनाची माध्यमे मर्यादित होती. वृत्तपत्रे , फार तर मासिके, ह्यान्डबिले , पोस्टर्स इ. त्याच्या प्रसारालाही मर्यादा होत्या . आणि गैरवापर तर नव्हताच जवळ जवळ.मुळात फोटो प्रिन्ट मेडिअमम्ध्ये छापायची केवढी यातायात ! त्याचा ब्लॉक बनवावा लागे त्याला काही तास ते थोडे दिवसही लागत . आणि त्या एवमगुणविशिष्ट ब्लॉकाची फायडेलिटी काय वर्णावी महाराजा ! कोणत्याही दाढी वाल्याचा फोटो रवीन्द्रनाथ टागोर, कार्ल मार्क्स, काका कालेलकर, गुरुजी, आसाराम बापू , डब्ल्यू जी ग्रेस, रामदेवबाबा , सुर्जीत सिन्ग बर्नाला , हसनभाई शेख अंडेवाला,म्हणून छापला तरी खपून जावा. त्यातही कॅप घातलेला , काळाकुट्ट चेहरा दिसणारा , शानदार चौकार मारतानाचा गोर्‍या बायकॉटपासून तर काळ्या सोबर्सपर्यन्त (व्हाया पतौडी) नाव दिलेला बाऊन्ड्रीलाइनच्या बाहेरून घेतलेला फोटो चार दिवासानी पेप्रात येत असे::फिदी:
आता माध्यमे बदलली तशा त्याच्या व्याप्तीही बदलली . एकतर निर्मितीची आणि फेरफाराची प्रचंड सुलभता.
प्रसाराचा वार्‍यासारखा वेग . आता तर मारलेल्या चौकाराचा चेन्डू बाऊन्ड्रीच्या बाहेर जाई पर्यन्त फलंदाजाचा मारतानाच्या अ‍ॅक्शनचा फोटो जालावर येत असावा... Happy

कुणी शेवटचा श्वास घेताक्षणीच श्रद्धांजलीचे फ्लेक्स नाक्यावर लागतो. (खरेच सांगतो एका महापौराच्या निवडणुकीसाठी आधल्या दिवशी रात्री उशिरा त्या गावात पोचलो तर चौकाचौकात महापौर झाल्याबद्दल अभिनन्दनाचे फ्लेक्ष (बहुमताची खात्री असल्याने ) लावण्याचे काम निवडणुकीच्या आधीच रात्री चालू होते ::फिदी:)

तर ते असो (च)
त्यामुळे दुरुपयोग करणार्‍या मंडळीना मोकळे आकाश (जाल म्हणा हवे तर)मिळाले आहे ... आपला किंवा आपल्या नातेवाईकाचा फोटो नेटवर कोणत्या स्वरूपात सामोरा येईल याचा नेम नाही. सुरुवातीला याचा भयंकरच त्रास व्हायचा सेलेब्रेटीना. काही नट्या, सानिया मिर्झा, शरपोवासारख्या देखण्या खेळाडू चे कितीतरी विकृत फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. त्या मानाने पुरुष सेलेब्रेटीना हा त्रास कमी. त्या मागचे तांत्रिक इंगित कळल्यामुळे अशी चित्रे हल्ली फार कोणी सिरिअसली घेत नाही किंवा त्यातल्या माणसाना कोणी बदचलन समजत नसले तरी त्या व्यक्तीला वैयक्तिक मानसिक त्रास होतोच ना !

अगदी खर्‍याखुर्‍या फोटोचा देखील चुकीचा संदर्भ वापरून अपमान करण्यासाठी वापर करता येतो. उदा: एखादा नेता पराभूत झाला, कोर्ट केस हरला, त्याला मंत्रीपदावरू काढले तर जुना कुठला तरी डोळ्यातला कचरा काढताना डोळ्याला लावलेल्या , अथवा चेहरा पुसताना वापरलेल्या रुमालाचा फोटो टाकून द्याचा. किंवा कपाळ खाजवतानाचा फोटो कपाळाला हात लावलेला म्हणून टाकायचा. वगैरे.ही अगदी साधी उदाहरणे आहेत.

यातून काही कायदेशीर कॉम्प्लिकेशन्स उद्भवली तर बर्‍याचदा फोटो काढाणार्‍याबरोबर छापणार्‍या माध्यमावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. उदा. एखादा वादग्रस्त , सामाजिक तणाव निर्माण करणारा मजकूर लिहिणार्‍याबरोबर प्रसिद्ध करणार्‍या माध्यमातील जबाबदार अधिकार्‍यावर सुद्धा कारवाई होते. काही वर्षांपूर्वी एका लेखकाने भृशुंडी रामायणातील काही मूळ मजकूर , एका दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीत संशोधनपर लेखात टाकला होता. या रामायणाच्या व्हर्शनमध्ये राम सीता संबधांची अत्यंत अश्लील म्हणावी अशी वर्णने आहेत . त्यावर बरेच खळ्ळ खट्याक झाले. सम्पादकाना मारहाण , पेपरच्या मालकाना, कुटुम्बियाना मारहाण, झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीसानी या सर्वावर गुन्हे दाखल केले. सम्पादकांची नोकरी गेली. लेख लिहिणारा पत्रकार एका शाळेत शिक्षक होता त्या शाळेने त्याला नोकरीवरून काढून टाकले.

वस्तविक लिहिलेले ऋषींनी, ते उद्धृत केले लेखकाने, छापले सम्पादकांनी , आणि मालकाला तर पत्त्याच न्हवता काय झालेय त्याचे !! तो मजकूर ह्यापैकी कोणाचीही निर्मीती नव्हता Happy

(रच्याकने,सदर रामयाणाची प्रत कुठे व कशी मिळेल याची पृच्छा मुमुक्षुंनी माझ्या विपुत करावी. )व ही विपु अर्जदाराशिवाय इतरानी उत्सुकतेपोटीही पाहू नये::फिदी:) )

तात्पर्य काय : संस्थळ चालवताना या बाबी लक्षात घेतल्याच पाहिजेत त्याला जबाबदारी झटकणे कसे म्हणता येईल. त्यामुळे या परिणामांची संबधितांना जाणीव करून देण्याची कायदेशीर आणि त्याहून महत्वाचे म्हणजे नैतिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा अ‍ॅडमिनचा प्रयन आवश्यक आणि स्तुत्यच आहे.
इनोसन्ट पण हौशी छायाचित्रकार त्याची योग्य काळजी घेतीलच कारण इतर संस्थळावरही ते अडचणीत येऊ शकतील. हा एक अ‍ॅडमिनकडून करण्यात आलेला एज्युकेशनचाही भाग म्हणता येईल...

त्यात असेच का नाही , तसेच का नाही , अशा परिस्थित याचा भंग होतो का अन त्याचा भंग होतो का असले फाटे फोडणे हे खोडसाळपणाचे लक्षण आहे.
अ‍ॅडमिन किंवा येथले कोणीही तुमचे कायदेविषयक सल्लागार नाहीत . कायदा वाचाल्यावर त्याचे इन्टरप्रिटेशन करण्याइतकी अक्कल इथे सर्वाना आहे किंबहुना जरा दीडपटीने जास्तच आहे::फिदी:

(अंक पहिला, दुसरा आणि शेवटचा)
महाराज: प्रधानजी, काय चाल्लंय काय आपल्या राज्यात?
प्रधानजी: म्हाराज, क..क्क काही नाही?
महाराजः मग इतका कल्ला का चाललांय?
प्रधानजी: ते काय ना महाराज, जिप्सीच्या त्या धाग्यावर चर्चा चालु आहे?
महाराजः चर्चा? कसली चर्चा?
प्रधानजी: तेच ते वो, प्रकाशचित्र प्रदर्शित करण्याची परवानगी, प्रचिंचा गैरवापर, चाईल्ड पोर्नोग्राफी, प्रचि प्रदर्शित करायची कि नाही.
महाराजः मग यावर उपाय?
प्रधानजी: (स्वगतः उपायच तर कळंत नाहिए) त्यावरूनच तर सगळा कल्ला चालु आहे.
महाराजः पण नक्की प्रॉब्लेम कुठे आहे?
प्रधानजी: (स्वगतः आता हे पण मीच सांगू? स्वतःला जरा कुठे फिरून माहिती करून घ्यायची सवयच नाही ना.) महाराज, कसंय कि "त्या" राज्यातल्या लोकांना "ह्या" राज्यातल्या लोकांच म्हणण पटत नाही आणि "ह्या" राज्यातल्या लोकांना "त्या" राज्यातल्या लोकांच. "त्या" राज्यातील काहि लोक "ह्या" राज्यातील लोकांची बाजु घेतात तर "ह्या" राज्यातील काहिजण "त्या" लोकांच म्हणण कसं बरोबर आहे ते समजवतात.
महाराजः अरे काय हे? डोक्याचा पार भुस्काट झालंय.
प्रधानजी: (स्वगत: यांच्या डोक्याचा भुस्काट झालंय आणि आमच्या ?)
महाराजः बरं, या सगळ्यांना कारणीभुत असलेला तो जिप्सी कुठाय.
प्रधानजी: अवो ते बेणं कालपासुन गायब आहे. निरोप धाडला तर सांगतोय काहितरी "टेक्निकल प्रॉब्लेम" आहे इथे येण्याचा.
महाराजः ठिक आहे उद्या त्याला पुन्हा एकदा बोलावणं धाडा.

(दुसर्‍या दिवशी)
प्रधानजी: महाराज.....महाराज.....महाराज.
महाराजः अरे काय झालं प्रधानजी.
प्रधानजी: जिप्स्याने खलिता धाडलाय.
महाराजः अरे तुम्ही प्रधान आहात कि बारदान? यात इतक आरडत ओरडत यायची काय गरज? मला वाटलं कि राम गोपाल वर्माने शोलेसारखाच त्याचा "आग" चित्रपटसुद्धा थ्रीडीमध्ये काढला कि काय? कि अजुन कुणी एकाने टोलनाका फोडला कि काय? घाबरलो ना आम्ही.
प्रधानजी: (स्वगतः !@#$#@%$$&^)
महाराजः काय लिहिलंय त्या खलित्यात ते वाचा.
प्रधानजी: त्याने ते सर्वांसमोर वाचायची विनंती केली आहे.
महाराजः अहो मग वाचा कि, सगळी प्रजा आहेच कि समोर.
प्रधानजी: वोक्के म्हाराज.
(प्रधानजी खलिता वाचतात)

"नमस्कार,

वरील सर्व चर्चेचा विचार करताना सध्यातरी मला फक्त दोनच गोष्टी दिसत आहे (माझ्यासाठी):
१. फोटो काढताना परवानगी घेणे
२. मायबोलीवर फोटो प्रदर्शित न करणे.

यापैकी दुसरा ऑप्शन मी निवडला आहे आणि म्हणुनच यापुढे मायबोलीवर मी काढलेले फोटो प्रदर्शित न करण्याच्या निर्णय घेतला आहे. मला स्वतःलाच कुठेतरी आता माझ्याभोवती एक धुसर चौकट आखली गेली आहे असं वाटतं आणि त्यामुळेच मला जे माझ्या फोटोतुन सांगायच असतं ते मी नीटपणे सांगु शकणार नाही. थोडक्यात माझ्या थीम बेस्ड फोटोंना व्यवस्थित न्याय नाही देऊ शकणार नाही. माझ्या थीम/फोटोफिचर मध्ये पूर्वी कधीतरी काढलेल्या फोटोंचाही समावेश असतो ज्याची सध्यातरी परवानगी घेणे शक्य नाही. यापुढे थीम/फोटोफिचर तयार करताना/मायबोलीवर प्रदर्शित करताना आता नेहमी एक किडा डोक्यात वळवळंत राहणार कि यावरून तर काही वाद होणार नाही ना? यावर सध्यातरी मला एकच उपाय दिसतोय, तो म्हणजे यापुढे मायबोलीवर फोटो प्रदर्शित करायचे नाहीत.

मायबोलीवर ज्या काही धाग्यांवर वाद होत नाही त्यापैकी एक प्रकाशचित्रण विभाग. आता त्या विभागातही वाद सुरू व्हावा हे दुर्दैवच.

मी माझे आधीचे धागे पाहिले असता त्यात भरपूर धागे असे आहेत कि ज्यात व्यक्तिचित्रण केले आहे, जी त्या थीमच/धाग्याची गरज होती (उदा. "रंगोत्सव", "मुकी अंगडी.....", "मन का बोलाविते...." "आयुष्यावर बोलु काही" इ. इ.) ते सर्व आता डिलीट करायला सुरूवात केलेली. काल काहि तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकले नाही. असे भरपूर फोटोज असल्याने डिलीट करायला थोडा वेळ लागतोय, पण ह्या विकएण्डपर्यंत नक्की पूर्ण होईल.

गजानन यांनी म्हटल्याप्रमाणेच:
ज्यांना हरकत घ्यायची आहे ते कोणत्याही तारखेच्या फोटोवर घेऊ शकतील. समजा मी एखादा फोटो पूर्वी टाकला असेल तर मायबोली प्रशासनास नाही (कारण प्रशासनाचे धोरण आता बनले आहे) पण मला तरी याचा पुनर्विचार करावा लागेल.

हे मनोमन पटतंय

पण ज्यात व्यक्तिचित्रण नाही ते धागे डिलीट करत नाही आहे. Happy

अर्थात प्रकाशचित्र प्रदर्शित न करण्याव्यतिरीक्त माझा मायबोलीवर वावर पूर्वीसारखाच असेल."
— जिप्सी

महाराजः हम्म्म असं हाय तर.
प्रधानजी: म्हाराज आता काय करायंच?
महाराजः काय करायचं म्हणजे? आपल्याला इतरही महत्वाची कामं आहे ती करूया. त्या शाहरूख खानने, चेन्नई एक्सप्रेसमध्ये म्हटंलयच कि "जन पळभर म्हणतील.......".
प्रधानजी: वोक्के म्हाराज.
(शेवटच्या अंकानंतर पडदा हळुहळु पडतोय आणि बॅकग्राउंडला गीत वाजतंय.....)

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी...
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी
.

(इतक्या मोठ्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व .माझ्याकडुन तरी ह्या चर्चेला पूर्णविराम.)

>>>> काहींच्या मनात असले विचार येत असेल तर ते काय घराबाहेर पडताना बुरखा घालुन मग बाहेर जातात का ? <<<<<
काय की काय करतात ते, पण स्वतःच्या फोटोला मात्र बुरखा घालून ठेवावा असेच सुचविले जाते आहे का?

आत्ता आठवले उदयन, की थीमफोटोस्पर्धेचा धागातर तुच चालवतोस. Sad वाईट वाट्टय.

सहज आठवलं, पन्नास पाऊण शे वर्षांपूर्वी "फोटो काढला" तर आयुष्य कमी होत अशी "अंधश्रद्धा" होती.
कदाचित तेव्हाच्या फोटोग्राफरना व्यक्तिस विनवुन सान्गाव लागत असेल की बाबारे मी फोटु काढला तरी तुझ आयुष्य कमी होणार नाही....
पण या गैरवापर वगैरे बाबत / पब्लिश केल तर काय होईल हे कस कस सान्गायच? हे असच होईल गैरवापरच होईल हे तर गृहितच धराव लागेल ना? कारण परवानगी घेऊनही गैरवापर झाला, तर पब्लिश करनारे दोषी की नाही हे कोण ठरवनार्/सान्गणार? इब्लिसा, तुझी आधीचि पोस्ट आवडली बर्का.

जिप्स्या, आधिचे फोटो काढले नसतेस तरी चालले असते. Happy मी तर नाय काढनार ब्वॉ......

थीमफोटोस्पर्धेचा धागातर तुच चालवतो >>>> चालवत होतो.. लिंबुभाउ... हे असल्या प्रकारामुळे स्पर्धा नको वाटते..

भावमुद्रा थीम वर अनेकांनी फोटो टाकलेले तेव्हा कुणाच्या मनात ही शंका आलीच नाही .. कसे येणार कारण त्या कारणाची अवास्तव स्तोम नाही माजवलेले .. Wink

मग आता का ते एवढे वाढले? अनेकान्च्या जी टी जी चे पण इथे फोटो आहेत, त्याचे काय? आधी परवानगी घेतली असेल मान्य आहे, पण अजूनही ते फोटो माबोवर आहेतच की. मग आता जिप्सीच्या फोटोवरुन एवढे का वादळ झाले. जीटीजी मधले जे लहान मुलान्चे फोटो माबोवर आता आहेत( परवानगी घेतली असेलच टाकताना) त्याचे काय? ते पण कुणी ढापु शकतेच ना?

अगदी हास्य वदनाने काढलेले फोटो पण इथे आहेत, समजा फोटोशॉप वापरुन त्या बाई किन्वा बुवा शेजारी ( बाई आणी बुवा हा कॉमन शब्द) कुणी तसेच त्यान्च्या खान्द्यावर हात टाकुन फोटो काढले तर?

माझा दुसरा पॅरामधला प्रश्न हा जेन्युईन आहे. आधीचा पॅरा वादग्रस्त समजा हवा तर.

२. मायबोलीवर फोटो प्रदर्शित न करणे.
>>>

जिप्सीबुवा उगीच हुतात्मा बनण्याचा प्रयत्न करू नका आणि मायबोलीला दोष देऊ नका. खरे तर कोणत्याही संस्थळावर फोटो प्रदर्शित न करणे तुमच्यासाठी उचित राहील. अथवा योग्य ती पथ्ये पाळून प्रदशित करावित त्यात मायबोलीही आलेच. मी स्वतःही अनेक साईटवर टाकतो पण इथल्या चर्चेने काही नव्या बाबी लक्षात आल्या आहेत त्या माझ्यासाठी हितावह आहेत असे मी मानतो एक नेटीकेट म्हणून....

उगीच रुसल्यासारखे करू नका..... काळजीपूर्वक छन्द जोपासा एवढेच !!

जिप्सी,
तुझ्या निर्णयाचा आदर आहेच.
माझ्या ईमेल बॉक्सला कोणतेही नियम आणि धोरणं नाहीत तेंव्हा तुला अशा सुंदर थिम्स सुचल्याच तर माझ्या ईमेल बॉक्स मध्ये त्यांची वाट पाहीन Happy
तुझा छंद तू थांबवण्याचं काहीच कारण नाही. अशा उत्त्मोत्तम थिम आणखी येतील आणि त्या तुझ्या थिम्सच्या चाहत्यांसोबत शेअर होतील अशी अपेक्षा Happy

Pages