मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

>>परवानगी घेतली म्हणजे उद्या जर काही झाले तर त्यातुन फोटोग्राफरने आपली मान सोडवुन घेतली इतकेच. जे काही व्हायचे ते टळणार नाही. मुलांची काळजी वाट्तेय हे बोलणा-यांनाही परवानगी घेतली म्हणजे सगळे काही झाले असेच वाटते.<<
हेच म्हणाले होते मी फिरुनी च्या धाग्यावर!
असो!

<<प्रत्येक नियम मोडणार्‍या पादचार्‍याला आधि विचारुन घ्यावे लागेल की बाबारे, तू नियम मोडतो आहेस, अन मी तुझा फोटो तू नियम मोडताना घेऊ पहातोय, तेव्हा तुझी परवानगी आहे का कारण हा फोटो मी इन्टरनेटवर प्रसिद्ध करणार आहे.>> लिंबूटिंबू Happy

अ‍ॅडमिन, स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

ज्या छायाचित्रकाराला किंवा फोटो प्रकाशित करणार्‍याला कोणाही व्यक्तीचे फोटो आपण प्रकाशित केल्यावर त्यांचा गैरवापर होऊ शकतो ह्या शक्यतेसंबंधी ती स्वतःची नैतिक जबाबदारी वाटते ती व्यक्ती ह्या पुढे असे फोटो प्रकाशित करणे नक्कीच टाळेल.

छायाचित्रण विभागाच्या हेडरमध्ये कृपया हे धोरण किंवा मायबोलीचे डिस्क्लेमर ठळकपणे लिहिता येईल का? किंवा तिथे ह्या धाग्याची लिंक देता येईल का? त्यामुळे मायबोलीवर ह्यापुढे येणार्‍या नव्या मायबोलीकरांना छायाचित्रे प्रकाशित करण्याअगोदर त्याबद्दल माहिती मिळू शकेल.

परवानगी घेतली म्हणजे उद्या जर काही झाले तर त्यातुन फोटोग्राफरने आपली मान सोडवुन घेतली इतकेच. जे काही व्हायचे ते टळणार नाही. मुलांची काळजी वाट्तेय हे बोलणा-यांनाही परवानगी घेतली म्हणजे सगळे काही झाले असेच वाटते.<<
हेच म्हणाले होते मी फिरुनी च्या धाग्यावर!

>>>> यासारखे दुसरे निर्बुद्ध अर्ग्युमेन्ट नसेल! व्यक्तीचे / मुलांचे फोटो कुठेही प्रसिद्ध करताना त्यांचा दुरुपयोग होण्याची ती जी रिस्क आहे ती तुम्ही इतरांसाठी परस्पर घेऊ नका, तर त्यांना अथवा त्यांच्या पालकांना ती रिस्क घ्यायची की नाही हा अधिकार आहे. इव्हन, ती रिस्क नाहीच आहे असे धरले तरी फोटो प्रसिद्ध करायचा का नाही हा अधिकार त्यांना आणि त्यांच्या पालकांनाच आहे. तुमच्यकडे कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला त्यांच्यावतीने निरणय घेण्ञाचा अधिकार नाही हा मुख्य मुद्दा आहे, पण इथे लोकांना हा साधा मुद्दा अजूनही समजलेला नाहीये याला काय म्हणावं!!
फोटोचे काय दुरुपयोग झालेच तर ते थांबवता येण्यासाठी पालक अथवा फोटोग्राफर कही करू शकतील हे शक्य नाही, तेव्हा "मान सोडवून घेणे " हा काय प्रकार अहे तो कळला नाही!!
समजा, उद्या जर तुम्ह्च्या मुलाला स्कूल बस ड्रायव्हर ने /रिक्षा /व्हॅनवाल्याने ठरवलं की चला आज दारात सोडण्याऐवजी रस्त्याच्या पलिकडे / २ गल्ल्या अलिकडेच ड्रॉप करतो मुलाला. रस्ता क्रॉस करून जाऊ देत की एखादा दिवस. इतके लोक रस्ता क्रॉस करतात रोज. सगळे कही मरत नहीत!! तर चालेल का तुम्हाला ?? तेव्हा म्हणाल ना , की हे ठरवायचा अधिकार तुला कुणी दिला ? आम्हाला न विचारता नेहमीच्याऐवजी दुसर्‍या ठिकाणी मुलाला का सोडले म्हणून ?? की तेव्हा हे अर्ग्यु करत बसाल की रस्त्यावरचे अपघात थांबवता येत नसतील या सगळ्या प्रोसिजरचा काय उपयोग आहे म्हणून !! Uhoh

फोटोन्चा पॉर्नोग्राफि मध्ये गैरवापर करणे म्हणजे नक्कि काय...?? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल काय.??
तो कसा केला जातो याबद्दल इथे कुणी अधिक सविस्तरपणे माहिती सांगू शकेल का?

फोटोन्चा पॉर्नोग्राफि मध्ये गैरवापर करणे म्हणजे नक्कि काय...?? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल काय.??
तो कसा केला जातो याबद्दल इथे कुणी अधिक सविस्तरपणे माहिती सांगू शकेल का? <<< विकिपिडियावरचे पेज पहा.

नील, या खालच्या वाक्यातही नाही का?

Simulated child pornography produced without the direct involvement of children in the production process itself includes modified photographs of real children.....

हे ही वाचलं मी.. पण कसं??? ते नाहि लिहिलय ना... मला सविस्तर महिती हविये...
ती इथे कूणाला आहे का? कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? ते फोटो म्हणुनच वापरतात कि व्हिडीओ मध्ये वापरले जातात??

दाखवलेली भिती योग्य आहे... पण नक्की काय आहे हे कळावे असे वाटले म्हणुन हा खटाटोप...

ती इथे कूणाला आहे का? कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? ते फोटो म्हणुनच वापरतात कि व्हिडीओ मध्ये वापरले जातात?? >> नील साधनापेक्षा हेतूला मह्त्व आहे. तुम्ही paint वापरले कि photoshop ki sonI rebel ह्यांनी नक्की काय फरक पडला ?

यासारखे दुसरे निर्बुद्ध अर्ग्युमेन्ट नसेल! व्यक्तीचे / मुलांचे फोटो कुठेही प्रसिद्ध करताना त्यांचा दुरुपयोग होण्याची ती जी रिस्क आहे ती तुम्ही इतरांसाठी परस्पर घेऊ नका, तर त्यांना अथवा त्यांच्या पालकांना ती रिस्क घ्यायची की नाही हा त्यांचा अधिकार आहे. इव्हन, ती रिस्क नाहीच आहे असे धरले तरी फोटो प्रसिद्ध करायचा का नाही हा अधिकार त्यांना आणि त्यांच्या पालकांनाच आहे. तुमच्यकडे कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला त्यांच्यावतीने निरणय घेण्ञाचा अधिकार नाही हा मुख्य मुद्दा आहे >> fantastic मैत्रेयी. तुझ्या मुद्द्यातले काहि शब्द बोल्ड केले आहेत. street photography चा इथे संबंध जोडणार्‍यांनी क्रुपया हा प्रकार काय आहे ह्याची किमान माहिती तरी करून घ्या रे.

अ‍ॅडमिन, साजिर्‍या चा हा तर्जुमा तुमच्या लेखाच्या वर चिकटवला तर तुमच्या म्हणण्याचा विपर्यास होणे टळेल.
""राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज" हे "दोन्हीही" संपूर्णपणे "पोस्टकर्त्याचे" असं स्पष्टपणे धोरणातून दिसतं आहे. यानंतरचं आपापलं 'वैयक्तिक धोरण" प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. "

कसं आहे ना.... की माहिती अपुर्ण असल्याने त्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधतो.

असामी +१.

@ नील
लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सुद्धा फोटोचा गैरवापर जरी होत नसता (खरं तर तसा गैरवापर सध्या जगात मोठ्या प्रमाणात होतोय ) तरीही आपण, आपले पाल्य आणि कदाचीत जवळचे नातेवाईक सोडून दुसर्‍या कुणाचेही फोटो विनापरवानगी काढणं किंवा काढून प्रसिद्ध करणं चुकीचं आहे, त्यांच्या प्रायव्हसीचा भंग करणारं आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

आणि जर हे चुकीचं वाटत असेल तर मग बाकी प्रश्न यायची गरजच नाही ना.

अल्पना, विनापरवानगी फोटो प्रसिद्ध न करण्याचा मुद्दा बरोबर आहे...

पण माझी शंका दाखवलेल्या दुसर्‍या भिती बद्दल आहे...

नील, खरंच एवढा इंटरेस्ट असेल तर इथे माहिती विचारत बसण्यापेक्षा गुगल करून शोध घ्या की. नक्कीच काहीतरी हाती लागेल.

असामी, शब्दाचे खेळ नको आहेत.. उत्तर माहिती असेल तर द्या.... >> तुम्ही स्वतः म्हटलय "दाखवलेली भिती योग्य आहे" मग ते कसे केलेय ह्याने काय फरक पडतो ? तुम्हाला मूळ मुद्दा माहिती आहे म्हटल्यावर बाकीचे प्रश्न पडताहेत हेच आश्चर्यकारक आहे.

अच्छा, असा मुद्दा आहे होय!!! बरं, चालू द्या.
झोपल्याचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही हेच खरं.

करेक्ट सायो...

पण ज्या गोष्टीची आपल्याला माहितीच नाहि त्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने कसं कुणी बोलु शकतं??

> यासारखे दुसरे निर्बुद्ध अर्ग्युमेन्ट नसेल! व्यक्तीचे / मुलांचे फोटो कुठेही प्रसिद्ध करताना त्यांचा दुरुपयोग होण्याची ती जी रिस्क आहे ती तुम्ही इतरांसाठी परस्पर घेऊ नका, तर त्यांना अथवा त्यांच्या पालकांना ती रिस्क घ्यायची की नाही हा अधिकार आहे. इव्हन, ती रिस्क नाहीच आहे असे धरले तरी फोटो प्रसिद्ध करायचा का नाही हा अधिकार त्यांना आणि त्यांच्या पालकांनाच आहे. तुमच्यकडे कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला त्यांच्यावतीने निरणय घेण्ञाचा अधिकार नाही हा मुख्य मुद्दा आहे, पण इथे लोकांना हा साधा मुद्दा अजूनही समजलेला नाहीये याला काय म्हणावं!!>>>>>>>>>>>>>. पर्फेक्ट!!!! नकळत्या वयातील मुलांची आई आहे म्हणून तुझा मुद्दा अगदी मनापासून पटतोय. आपल्या मुलांचे फोटो कुठे आणि कुणाबरोबर शेयर करायचे आणि त्यातून काही झाल्यास ते कसं निस्तरायचं हा निर्णय घेण्याचा हक्क फक्त आणि फक्त पालकांचा आहे.

जगात इतके परव्हर्ट्स आहेत की आपलं मुल त्यांच्या नजरेतही पडायला नकोय वाटतं. त्यात असे परस्पर फोटो प्रकाशन तर कहर आहे. गूगल इमेज सर्च ने फोटो कुणाचा आहे , कादाचित शाळेचे नाव, कादाचित घरचा पत्ता काहीही कळू शकण्याची आणि त्यातून त्रास होण्याची शक्यता नाकरता येते का? तेव्हा कुणा निरागस मुलाबद्दल अशी रिस्क न घेणेच जास्त रास्त नाही का?

पण ज्या गोष्टीची आपल्याला माहितीच नाहि त्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने कसं कुणी बोलु शकतं?? >> डोळे उघडे ठेवून जगात वावरणार्‍याला अशा प्रकारच्या गैर वापराची नि त्यांच्या victims ची असंख्य उदाहरणे तुम्हाला दिसतील. त्यासाठी ती कशी केली गेली ह्याची माहिती असणे जरुरीचे होते का ? प्रति सादाच्या विंडोमधे टाइप केल्यावर अक्षरे स्क्रिनवर उमटतात हे दिसत असेल तर ते द्रुपल मधे केलय कि अल्बरकॅटमधे कि फक्त स्क्रिप्टींग केलय ह्याने कसा काय फरक पडतो नक्की ? तो फरक त्यातले दोष शोधणार्‍यांना शोधू द्या.

You do not have to find a way to lay an egg to taste the omelette समजा हव तर Lol

यासारखे दुसरे निर्बुद्ध अर्ग्युमेन्ट नसेल!
>>>
स्वतःच्या पोस्टीही वाचत चला...अनेक निर्बुद्ध अर्ग्युमेंट्स मिळतीलच!

असामी, टिपिकल माबोकरांचा रिप्लाय दिला आहेत...
लिहिलय खुप काही.. पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाहि मिळालय...

जाउ दे.. ते इथे मिळणार पण नाही याची मला खात्री आहे. चालु द्या...

धोरण जाहीर केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
बर्‍याच पोस्ट्स पडलेल्या दिसत आहेत त्या अर्थी चर्चा अजून सुरू आहे. सावकाशीने वाचते.

नील, बॉलिवूड किंवा हॉलिवूड मध्ये कित्येक अ‍ॅक्ट्रेसेच्या चेहर्‍याचे फोटो वेगळ्याच धडाच्या फोटो वर मॉर्फ करुन प्रसिद्ध केले जातात ह्याबद्दल ऐकलेले नाहीये का तुम्ही? इथेही तेच. ज्यांना चाईल्ड पॉर्न मध्ये रस आहे ते लहान मुलांचे फोटो घेऊन तेच करु शकतात.

Pages