मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

जिप्सी Sad Sad

जिप्सीबुवा उगीच हुतात्मा बनण्याचा प्रयत्न करू नका आणि मायबोलीला दोष देऊ नका

मायबोलीला काय दोष दिलाय? प्रकाशचित्रण सोडुन इतरत्र असेल असे लिहिलेय ना? 'हा मी चाललो मायबोली सोडून" असे लिहिलेय का त्याने?? याच्यात हुतात्मा कसा काय बनतोय तो?? उगीच काहीतरी.....

फोटो टाकायचे की नाही हा त्याचा निर्णय आहे. आधीचे कुठले फोटो काढतोय आणि का काढतोय हेही त्याने स्पष्ट लिहिलेय. मुळात असे फोटो टाकताना स्वतः फोटोग्राफरने तारतम्य बाळगावे असे स्पष्ट धोरण असताना जुन्या फोटोत जिथे परवानगी घेणे शक्य नाही ते फोटो नेटवरुन काढणे हे जर फोटोग्राफरला योग्य वाटले तर त्याला आपण काय करणार?

वरील सर्व चर्चेचा विचार करताना सध्यातरी मला फक्त दोनच गोष्टी दिसत आहे (माझ्यासाठी):
१. फोटो काढताना परवानगी घेणे >>> बरोबर
२. मायबोलीवर फोटो प्रदर्शित न करणे. >>> चुक

मायबोली काय नी इतर मुक्त व्यासपीठ काय... अश्या ठिकाणी जेव्हा एखादा कलाकार आपली कला सादर करतो तेव्हा त्या कले मधून त्या कलाकाराची त्या कले प्रती असेलेली त्याची निष्ठा , व्यासंग, आभ्यास आणि सद्सदविवेक बुद्धीचे दर्शन घडते. त्यामुळे तुला एव्हढच सांगण आहे की, या पुढे ही तू पुर्वीच्याच उत्साहात फोटो काढ आणि इथे प्रदर्शित कर..

बाकी वाद विवाद तर होतच रहाणार... nobody is perfect. या वादविवादांना दैनंदिन जिवनातील शाळा समजून त्यातून शिकून सरवून (तावून सुलाखुन) बाहेर पडायच असतं... शाळे कडे पाठ फिरवुन कसं चालेल?

तुला जे योग्य वाटत ते तू करच.. त्याच बरोबर जे अयोग्य आहे ते ही ठामपणे सांगायला विसरु नकोस... तुझा वरिल प्रतिसादाचा आदर आहेच. मात्र फोटो प्रदर्शित करण्याच्या निर्ण्याचा पुर्नविचार कर.

रॉबिनहुड Happy
खर तर मी तुम्हाला उत्तर द्यायला नकोय कारण तुम्ही प्रश्न मला विचारला नाही आहे ... तरीही
कदाचित जिप्सी मायबोली सोडुन कुठेच काहीच लिहित नाही म्हणून त्याने तसे म्हणले असावे.
मायबोलीला दोष देण्याचा किंवा त्याच्या वाक्यातुन तो मायबोलीला दोष देतोय असा अर्थ निघेल असा काही विचारही त्याने केला नसावा असं मला वाटतय!

इंद्रा, तुझ्याशी १००% सहमत. गेल्या काही दिवसात झालेल्या मनस्तापातुन तो बाहेर पडला की या निर्णयावर नक्कीच पुनर्विचार करेल अशी मी आशा बाळगतेय.

>>>> आणि मायबोलीला दोष देऊ नका. ख <<<<<
हूडा, यात मायबोली प्रशासनाला कोणीही दोष देत नाहीये.
जिप्स्याचा निर्णय योग्यच आहे.
मात्र, ज्या पद्धतीने या विषयावर "काहूर" माजवले गेले त्याची खरोखरच "गरज" होती/आहे का याचाही विचार व्हायला हवा.

माझ्या ईमेल बॉक्सला कोणतेही नियम आणि धोरणं नाहीत तेंव्हा तुला अशा सुंदर थिम्स सुचल्याच तर माझ्या ईमेल बॉक्स मध्ये त्यांची वाट पाहीन स्मित>> + १

<<जिप्सी,
तुझ्या निर्णयाचा आदर आहेच.
माझ्या ईमेल बॉक्सला कोणतेही नियम आणि धोरणं नाहीत तेंव्हा तुला अशा सुंदर थिम्स सुचल्याच तर माझ्या ईमेल बॉक्स मध्ये त्यांची वाट पाहीन >> मलाही पाठव हं योगेश.

जिप्सीने मायबोलीचा अनादर कुठेच केलेला नाही. उलट आदर राखून त्याने आपला निर्णय सादर केला आहे हे त्याची पोस्ट निट वाचली की समजेल.

मी ह्या संदर्भातले भारतातले लॉज ऑफ द लँड शोधायचा प्रयत्न केला. फोटोग्राफी करताना, खास करून पब्लिक (सार्वजनिक) ठिकाणी फोटोग्राफी करताना पाळावयाचे नियम किंवा कोणत्याही व्यक्तीचे कोणत्या प्रकारचे फोटोग्राफ्स प्रसारमाध्यमांमधून किंवा अन्य प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारित होण्यात भारतीय कायद्यानुसार नियमभंग होतो ह्याबद्दल मला काही ठोस मटेरियल मिळाले नाही. कदाचित मी शोधते आहे ते इथे मायबोलीकरांना अगोदरच माहित असेल. तर कृपया भारतात कोणाही व्यक्तीच्या (ओळखीतील / अनोळखी / सज्ञ / अज्ञ / सार्वजनिक स्थळी / खाजगी जागेत) फोटोग्राफ्स काढण्याबद्दल व ते फोटोग्राफ्स प्रकाशित करण्याअगोदर कोणकोणत्या कायदेशीर पूर्तता करणे आवश्यक आहे, तसेच ते फोटो प्रसिद्ध करण्याबद्दल, फोटोग्राफ काढल्या जाणार्‍या व्यक्तीच्या हक्कांबद्दल व फोटोग्राफरच्या हक्कांबद्दल भारतीय कायदा काय सांगतो ह्याची माहिती / लिंक असल्यास ती येथे कोणी देऊ शकेल का?

माझ्या ईमेल बॉक्सला कोणतेही नियम
आणि धोरणं नाहीत तेंव्हा तुला अशा सुंदर
थिम्स सुचल्याच तर माझ्या ईमेल बॉक्स
मध्ये त्यांची वाट पाहीन स्मित>> + १

अरुंधती, तुम्ही कायदेशीर मुद्दे/कलमे यांची एक बाजू लावून धरली आहे ते चांगलेच आहे. पण इकडे भारतात याबद्दल जरा शोधच घ्यावा लागेल बरका. थोडा वेळ लागेल असे दिसते.
कायेना की भारतात भले तिकडे कोकणात अगदी पायवाटेच्या एखाद फुटादिडफुटाचे पट्टीकरता लोक पिढ्यानपिढ्या कोर्टात लढत असतील, पण तिकडे युरोप अमेरिकेत ज्या गोष्टीन्करता कायदे आह्त त्याबाबिन्ची कायदेविषयक "सुधारणा" अन "जाणिव" इकडे देशात अजुन आलेली नाहीये, अजुनही आम्ही अठराशे..... वगैरे चे मूळचे ब्रिटीश कायदे थोडीफार दुरुस्ती करुन वापरतो, अन नवे कायदे फार से केले नाहीयेत.
तरीही आंतरजालिय गुन्ह्यांसंदर्भातील कायद्यात कदाचित या विषयावर उपयुक्त माहिती मिळू शकेल.

बायदिवे, नुकताच मन्गळाने तुला राशीत प्रवेश करुन तिथे आधीच असलेल्या शनिच्या साथिस यायला सुरवात केली आहे. कलाविषयक प्रश्नांवर उडत असलेला धुरळा/राळ पाहिल्यास हा परिणाम शुक्राचे तुलाराशीत होत असलेल्या शनिमन्गळ युतिचा आहे वा कसे? Wink अन्निसवाले यावर काही प्रकाश टाकू शकतील काय?

जिप्स्या, माझा इमेल आयडि तुझ्याकडे आहेच. सर्व फोटो माझ्या आयडीवर नक्की पाठव. >> त्यापेक्षा जिस्पीला शक्य असेल तर त्याने स्वतःची वेबसाईट बनवावी. म्हणजे लिंब्या सकट सगळ्यांचीच सोय होईल. Proud

जिप्सी - मला सुद्धा इमेल कर बरं का!!

आणि तू जे म्हटलेस ज्यात व्यक्तिचित्रण आहे ते फोटो तू माय्बोलीवर प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहेस. ह्याला अनुमोदन. पण तरीही मला असं वाटतं व्यक्तिचित्रणाचे फोटो असं म्हणताना क्लोझप फोटो किंवा ज्यात चेहरे नीट दिसत आहेत ते फोटो असे फोटो तू प्रकाशित करू नकोस. स्ट्रीट फोटोग्राफीत कोणाचेही चेहरे ओळखू येत नसतील असे फोटो टाकायला काही हरकत नसावी. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे फोटो सुद्धा असायला हरकत नसावी (हेमावैम). ती प्रचि नसती तर तो सोहळा किती शानदार झाला हे आम्हाला कसं कळलं असतं?

सब घोडे बारा टक्के ह्या न्यायाने सगळेच (व्यक्तिचित्र असालेले) फोटो काढू नकोस ही कळकळीची विनंती.

इंद्राशी पुर्णतः सहमत.
जिप्सी, मात्र फोटो प्रदर्शित न करण्याच्या निर्णयाचा खरोखरच पुर्नविचार कर. जिप्सी मायबोली वर पुर्णवेळ आणि नेहेमीच येणे शक्य नसत पण जेव्हा जेव्हा नविन लेखन मधे तुझ्या प्रचिंची लिन्क असते ना तेव्हा तेवढीच पाहिली जातात आणि पुन्हा कामा कडे घूम जाव. तुझ्या थिम्स नेहेमिच छान असतात आणि 'मस्त सुरुवात दिवसाची' असे मनापासून वाटत. दरवेळी रिप्लाय लिहिला जातोच असे नाही. वारी चे फोटो बघून 'अरे आपण किती वर्ष प्लॅन करतोय पण ठिक आहे, जिप्सी चे फोटो बघितले ना ' असे मनापासून वाटते.
सो प्लिझ या वाटण्याचा पण विचार कर.
जिप्सीबुवा उगीच हुतात्मा बनण्याचा प्रयत्न करू नका > हे वाक्य वाचून तू पण नक्किच हसला असशील. रॉबीनहूड, सॉलीड सुचत हं तुम्हाला.

हूडा, यात मायबोली प्रशासनाला कोणीही दोष देत नाहीये.
जिप्स्याचा निर्णय योग्यच आहे.
मात्र, ज्या पद्धतीने या विषयावर "काहूर" माजवले गेले त्याची खरोखरच "गरज" होती/आहे का याचाही विचार व्हायला हवा.>>>>>>>

लिम्बू भाउ... मी ही हेच सान्गतोय कधिपासुन इथे..

आणि तू जे म्हटलेस ज्यात व्यक्तिचित्रण आहे ते फोटो तू माय्बोलीवर प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहेस. ह्याला अनुमोदन. पण तरीही मला असं वाटतं व्यक्तिचित्रणाचे फोटो असं म्हणताना क्लोझप फोटो किंवा ज्यात चेहरे नीट दिसत आहेत ते फोटो असे फोटो तू प्रकाशित करू नकोस. स्ट्रीट फोटोग्राफीत कोणाचेही चेहरे ओळखू येत नसतील असे फोटो टाकायला काही हरकत नसावी. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे फोटो सुद्धा असायला हरकत नसावी (हेमावैम). ती प्रचि नसती तर तो सोहळा किती शानदार झाला हे आम्हाला कसं कळलं असतं? >>>>>>>

वेल... असं नाहि गं करता येत...

भारतात सध्या अस्तित्त्वात असलेल्या कायद्याच्या चौकटीत फोटोग्राफरने फोटो काढण्या अगोदर/ नंतर घेतलेली 'व्यवस्थित परवानगी' ही कोणत्या स्वरूपात असते, त्यात काय काय अंतर्भूत असते हेही जाणून घ्यायचे आहे. इथल्या माहितगारांनी त्यावर प्रकाश टाकावा प्लीज.

तसेच भारतातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डिजिटल अ‍ॅसेट्स हे त्याच्या कायदेशीर वारसदारांना भारतीय कायद्यानुसार क्लेम करता येतात का? [इथे फोटोग्राफी संदर्भात.] एखाद्या फोटोग्राफरने प्रकाशित केलेल्या फोटोग्राफ्सची जबाबदारी त्याच्या मृत्यूनंतर कोणाकडे हस्तांतरित होते? असेही अनेक प्रश्न आहेत.

अखेर दोनशे वीस पोस्ट नंतर नक्की कायदा काय आहे? हे कोणाला तरी हवे आहे... ही उत्तम आहे..

वकिल कुठे हारवले माबो वरचे... का नाहीच्चेत कोणी???

नया है वह .................... च्या नंतर

परवानगी लिया क्या ?????????? Biggrin

रश्मी.................................... असे नाही .........

परवानगी लिया क्या .? .......... असे Happy

तसेच भारतातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डिजिटल अ‍ॅसेट्स हे त्याच्या कायदेशीर वारसदारांना भारतीय कायद्यानुसार क्लेम करता येतात का? [इथे फोटोग्राफी संदर्भात.] एखाद्या फोटोग्राफरने प्रकाशित केलेल्या फोटोग्राफ्सची जबाबदारी त्याच्या मृत्यूनंतर कोणाकडे हस्तांतरित होते? असेही अनेक प्रश्न आहेत.

अरुंधती, ह्याबद्दल काही माहिती मिळाली तर जरुर कळव.

Pages