कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.
तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.
शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.
श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.
एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.
मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.
एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html
हा चित्रपट बनवताना कि एडिट
हा चित्रपट बनवताना कि एडिट करताना काहि तान्त्रिक करामती आहेत का?
कोणी जाणकार सांगु शकेल का?
काहि ठिकाणी लेन्स सॉफ्ट वाटत होती (ड्रीमी इफेक्ट) पण फोकसीन्ग उत्तम होतं.
हे कसं संभाळल असेल.
बाकी सुशींच्या नावावर भलतच काही दाखवलं असच वाटलं.
अन्कुश भाव खाउन गेलाय.
मला तर बै अंकुशच आवडला >>>
मला तर बै अंकुशच आवडला >>> मलाही त्याची अॅक्टींग आवडली, पण त्याचा आवाज दिग्याला सुट होत नाही अस वाटत.
सामी
हा चित्रपट बनवताना कि एडिट
हा चित्रपट बनवताना कि एडिट करताना काहि तान्त्रिक करामती आहेत का?>> काल दाखवलेलं झी मराठी वर चित्रपटाच्या मध्ये मध्ये... काहि ठिकाणी लेन्स सॉफ्ट वाटत होती (ड्रीमी इफेक्ट)>> यासाठी झुंबरं, काचा, क्रेप, पताके असे वाट्टेल ते आर्ट आयटम्स मध्ये दोरीला लावून हे ड्रीमी इफेक्ट क्रिएट केले होते... सईची एन्ट्री आठवतेय... सप्तरंगी पारदर्शक किरणांचे वर्तुळाकार!! फोटोग्राफी जाणकार अधिक सांगू शकतील..
मला हा चित्रपट आवडला... कादंबरी आणि चित्रपट हे पूर्ण वेगवेगळे कल्पले डोक्यात (कारण कादंबरीला न्याय देणारे खूप कमी चित्रपट बनलेत म्हणून उगा अती अपेक्षा नको यासाठी खबरदारी.) तर वेगळा दुनियादारी म्हणून मला आवडला.
त्या करामाती बद्दल आधीच्या
त्या करामाती बद्दल आधीच्या माहितीत आणि एक्स्ट्रा शॉट्स मध्ये सांगितले आहे.
पुस्तक वाचलं नाही, तरी
पुस्तक वाचलं नाही, तरी चित्रपट आवडला... एकंदरीत मसाला पूर्ण होता...
ड्रीम्गर्ल आणि अ मामी
ड्रीम्गर्ल आणि अ मामी धन्यवाद.
एक्स्ट्रा शॉट्स कडे लक्ष नाही दिलं.
मधले मधले कट्स अगदीच विसंगत
मधले मधले कट्स अगदीच विसंगत होते.. नीट कनेक्शनच लागत नव्हते.. कथा माहिती असल्यामुळे ते माहिती होते इतकेच.. एकही प्रसंग मनावर ठसत नाही.. सगळेच वरवरचे वाटले...
सुरेखानी लग्नानंतर दिगूला भेटताना घातलेलाच नेकलेस मीनूने म्हातारी झाल्यावर घातला आहे..
मधले मधले कट्स अगदीच विसंगत
मधले मधले कट्स अगदीच विसंगत होते.. नीट कनेक्शनच लागत नव्हते.. >>> बरोबर, उदा. शिरीन पहिल्यांदा श्रेयसच्या नाकातुन रक्त येताना पाहुन त्याला विचारते की कधीपासुन होतंय असं. आणी नंतर दुसराच कुठलासा सीन सुरू झाला.
सुशिंच्या मनातल्या
सुशिंच्या मनातल्या दुनियादारीत असेल बलदंड, निब्बर आणी ढपोरे नायक नायिका असतील काय. म्हणुनच की काय काल पावसाची एक सर येवुन गेली.
>>
यू सेड इट!
बास!
अमा, बरोबर अंकुशच काय तो बरा वाटला एकंदरच!
काल पुन्हा एकदा तिळपापड झालाच
आमच्या घरात माझी बहिण दुनियादारी फॅन आहे म्हणून आणखीनच संताप संताप संताप!
जौ द्या
जौ द्या हो.....................
नया है वो
ब्रेकमधे जे एक्स्ट्रॉ शॉटस
ब्रेकमधे जे एक्स्ट्रॉ शॉटस दाखवले त्यात एके ठिकाणी संजय जाधव म्हणाले की कधी काळी सुशिंनी लिहुन ठेवले आहे की डिएसपीचा रोल जर कोणी करु शकेल तर फक्त अंकुश चौधरीच. आणी हे ऐकल्यावर मात्र माझी अवस्था
झाली.
कधी काळी सुशिंनी लिहुन ठेवले
कधी काळी सुशिंनी लिहुन ठेवले आहे की डिएसपीचा रोल जर कोणी करु शकेल तर फक्त अंकुश चौधरीच. >>>>>>
पृथ्वीराज कपुर यांनी देखील कधी काळी लिहुन ठेवले की सलिम चा रोल कर कोणी करु शकेल तर तो फक्त " उदय चोप्रा / हिमेश रेशमियाच"
मी तर आज सकाळी टिक टिक गाणे
मी तर आज सकाळी टिक टिक गाणे यूट्यूब वरि ऐकले लिहून घेतले आणि म्हणतच आहे. फारच गोड आहे. सई येते तेव्हा एक कट्टेकर म्हणतो आप्ल्या नशिबी कायम कळकट मळकट अन कामाला दणकट. हे फारच आवडले. साधारण तीच प्रोफाइल असल्यामुळे. श्रेयस ला आप्ल्या आईने जे केले तेच आता मैत्रेणी आणि सुरेखा करत आहेत हे समजून येते तो क्षण छान टिपला आहे.
सुरेखानी लग्नानंतर दिगूला
सुरेखानी लग्नानंतर दिगूला भेटताना घातलेलाच नेकलेस मीनूने म्हातारी झाल्यावर घातला आहे..>>>
आणि त्या शिरिन आजी जेंव्हा
आणि त्या शिरिन आजी जेंव्हा पहिलेंदाच दिसतात तेंव्हा त्यांनी गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट घातलेला दाखवला आहे. अरे भाऊ, संजय जाधवा, अरे इंग्लंड अमेरिकेतही त्या वयात बायका असा स्कर्ट नाही रे घालत! अजून थोडीलांबी असलेला स्कर्ट हवा होता.
मेकप पूर्ण गंडला आहे. म्हातार्या लोकांची स्किन अगदी तुकतुकीत, तजेलदार दिसत होती. सुशिंनी दुनियादारीत " केवळ संतूर वापरला तरच घ्यावे" असेही बहुदा लिहून ठेवले असावे.
एकंदरीत पिक्चर कधी कधी बरा वाट्तो तो अभिनयामुळे नाही तर त्यातील डायलॉग्स मुळे. आणि इंटरव्हल नंतर वगैरे तर बोअर होतो !! डिग्या अन साईची पुस्तकातील ष्टोरी पडद्यावर आलीच नाही !
जितेंद्र दोशीचा साइ अगदीच
जितेंद्र दोशीचा साइ अगदीच डोक्यात गेला. काय ते केस, काय ते चालण अन ओठांवरून जीभ फिरवत बोलण
साई म्हणून जितेन्द्र जोशी
साई म्हणून जितेन्द्र जोशी काहीतरीच. लोचट वाटतो. सई ताम्हणकरला केव्हा साक्षात्कार झाला की ती हिरॉइन बनु शकते म्हणून? एकतर तिला कपड्याचा सेन्स नाही. अन्गप्रदर्शन हेलनचे पण होत होते, पण ती कधी बीभत्स वाटली नाही. ही कायम ढब्बाडीच वाटते. सारखे हसले म्हणून हिला कुणी माधुरी तर म्हणणार नाही. देवा! चान्गले कपडे घालण्याची बुद्धी दे तिला.
मध्यंतरानंतर कधीतरी दिग्या
मध्यंतरानंतर कधीतरी दिग्या आणि श्रेयस कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यास करताना दिसतात. ते बघता क्षणी लेक म्हणाला, 'हे कॉलेजमध्ये आहेत होय!
फर्स्ट हाफ बरा वाटला. सेकन्ड मात्र अति ईमोशनल आणि अगदी बळंच! एकूणात, टीव्हीवर बघण्याच्याच लायनीतला वाटला.
'हे कॉलेजमध्ये आहेत होय! >>>
'हे कॉलेजमध्ये आहेत होय! >>>
त्याला ते शिक्षक नव्हते ना वाटले??
काल टीव्हीवर बघितला. मला एक
काल टीव्हीवर बघितला. मला एक कळले नाही, श्रेयस आजारी असतो हे शिरीनला माहिती असते तरी ती लग्न करते हे ठीक पण एक डॉक्टर म्हणून त्याच्यावर उपचार करत का नाही?
एक डॉक्टर म्हणून त्याच्यावर
एक डॉक्टर म्हणून त्याच्यावर उपचार करत का नाही? >>>>>> उपचार केले तर नवर्या कडुन पैसे कसे मागणार
झकास, त्याला ते कुठल्याच
झकास, त्याला ते कुठल्याच अॅन्गलने शिक्षणाशी संबंधित वाटले नसावेत
सगळेच डोक्यात गेले, एक अंकुश
सगळेच डोक्यात गेले, एक अंकुश त्यातल्यात्यात बरा वाटला. अर्थात कॉलेजकुमार म्हणून थोराडच वाटला.
उदयन, गुड वन.
माझ्या घरी पण विचारणा झाली
माझ्या घरी पण विचारणा झाली सईला बघून ती टीचर आहे का म्हणून.
हा चित्रपट खरेच इतका सुपर
हा चित्रपट खरेच इतका सुपर डुपर हिट (२५-२६ कोटी कलेक्शन) होण्यासारखा होता का हा प्रश्न मला चित्रपट पाहिल्यावर पडला आहे. साधारणपणे ज्या चित्रपटाना "रीपीट ऑडीयन्स" असतो ते चित्रपट हिट होतात असा माझा समज आहे. हा चित्रपट लोकाना इतका आवडला कि तो त्यांनी परत परत पाहिला??
मला नाही वाटत मी तरी हा चित्रपट टीव्ही वर (चकटफु)ही परत पाहु शकेन. चित्रपट वाईट नक्कीच नाही. टेकिंग, निर्मिती मुल्ये सफाईदार आहेत पण बरेच लुझ एंड्स वाटले. दोन गाणी चांगली आहेत. पण तितकेच. असो.
या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले हेही नसे थोडके.
मराठीत "दुनियादारी" हिंदीत
मराठीत "दुनियादारी"
हिंदीत "धुम - ३"
'हे कॉलेजमध्ये आहेत होय! >>>
'हे कॉलेजमध्ये आहेत होय! >>>
पृथ्वीराज कपुर यांनी देखील
पृथ्वीराज कपुर यांनी देखील कधी काळी लिहुन ठेवले की सलिम चा रोल कर कोणी करु शकेल तर तो फक्त " उदय चोप्रा / हिमेश रेशमियाच" >>

झालं. किमान शिरिन, सुरेखा, मिनू वगैरेला पाहून तसं करताना तरी दाखवायचं 
हे कॉलेजमध्ये आहेत होय >>
जितेंद्र दोशीचा साइ अगदीच डोक्यात गेला. काय ते केस, काय ते चालण अन ओठांवरून जीभ फिरवत बोलण राग >> तो स्वजोकडे पाहून ओठांवरुन जीभ फिरवतो तेंव्हा
कारण कादंबरीला न्याय देणारे
कारण कादंबरीला न्याय देणारे खूप कमी चित्रपट बनलेत म्हणून उगा अती अपेक्षा नको यासाठी खबरदारी.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.
ते राजीव पाटिल ला जमलं होतं....... !!!
किमान शिरिन, सुरेखा, मिनू
किमान शिरिन, सुरेखा, मिनू वगैरेला पाहून तसं करताना तरी दाखवायचं हाहा>>>

Pages