फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इतकीसुद्धा नाही. पुस्तकसुद्धा फार ग्रेट-बिट वाटलं नाही.
मला आपलं उगाच असं वाटत होतं की एका अद्वितिय निर्मितीची माती केलीय जाधव अ‍ॅण्ड कंपनीने.. >>>>> Happy मला माहित होत हे....न आवडण्यासारखच आहे ते पुस्तक!!!

दुनियादारी ला हाईप करण्यासारख काय आहे...माझ्या मित्रांना मी जेव्हा बोल्ले की मला हा मुव्ही नाही आवडला तर मी वेडी असल्यासार्ख मला बघु लागलेत सर्व .... म्हणतात अर्रे तो मराठी मुव्ही आहे......

मला एक समजत नाहिये मराठी असला तरी फालतू असेल तर त्याला फालतू म्हणणं चुक आहे का??? कित्ती तरी मराठी दर्जेदार मुव्ही येतात आणि निघुन जातात कोणाला त्याचा पत्ता लागत नाही का? कारण त्यांच्याकडे प्रमोशन साठी पैसा नसतो. नसेलही ( सत्य परिस्थिती माहित नाही ) आणि म्हणुन लोकांना माहित नसते कि हा मुव्ही आला गेला.. ....मग त्या चित्रपटांना याच्या इतकं ग्लॅमर मिळत नाही......

मी सु.शी.ची इतर तीन पुस्तके वाचली.....त्यातली एक कथा तर रत्नाकर मतकरींची ढापलेली आहे..(मला कळत नाही लोक इतरांच्या उष्ट्या पानात का बसतात ??).बाकी कथा देखील भुक्कड आहेत....स्त्री देहाची वर्णन, स्त्री-पुरुष संबंधांचे वर्णन आहे नुसते! कथेला फारसा अर्थ नाही...

दुनियादारी च सुद्धा तेच!!! उगाच का पुस्तक आणि चित्रपटाची तुलना करताय??? चित्रपट कित्येक पटीन चांगला आहे!!

जेव्हड स.शी.लिखाण वाचल तेव्हड माझ हे मत खर असल्याची खात्री झाली मला.

Lol ..:खोखो:

@ मधुरा कुलकर्णी ,
तुम्हाला पुस्तक आवडला नाही ..हे आता दुनिया दारी च्या प्रत्येक धाग्यावर जाउन सांगून झालाय !....तरी अजुनही का गळा काढता कळत नाही ..

अनुपम खेरचा सारांश आवडला म्हणून हसीना मान जायेगी आवडला पाहिजे असा नाहीये ! ..
सचिनची शारजाह मधली खेळी चांगली म्हणून वर्ल्ड कप फायनलची खेळी बेस्ट असेल असा नाही ,..
सुशिंचा दुनियादारी बेस्ट आहे म्हणून सर्वच पुस्तके चांगली आहेत असा नाही..

पण जिथे तिथे तुम्ही या लेखकावर टीका करत सुटला आहात ..
>>पुस्तक आणि चित्रपटाची तुलना करताय??? चित्रपट कित्येक पटीन चांगला आहे!

अहो पुस्तकावरून चित्रपट बनवलेला आहे म्हणून तुलना ...

आणि त्यांनी पुस्तकाच्या कथेला धक्का लावला आहे ..म्हणून त्या टीम च्या अप्रामाणिकपणा बद्दल , कास्टींग बद्दल राग ..

खरे तर एकदा मत व्यक्त केले , सर्वापर्यंत पोहोचवले की थांबायला हवे ! तुम्हाला पुस्तक आवडले नाही , चित्रपट आवडला ...सर्वापर्यंत पोचले ..पण त्याची सतत होणारी आवर्तने यामुळे द्वेषाचा वास येउ लागला आहे ..

@शाहीर : मधूनच कुठे उगवता हो? मला जिथे गळा काढायचा आहे तिथे काढीन....तुम्ही का एव्हड लक्ष घालताय त्यात? आणि तुम्ही मराठी कलाकृतीचे गळे दाबत फिरता न? मी काही बोलते का? उगाच का माझ्या कॉमेंट् वर लिहित बसता? वाचा आणि सोडून द्या.

@ मधुरा : दुनियादारी कादंबरी मराठी कलाकृतीच आहे.. तिचाही तुम्ही गळा दाबतच आहात..
आणि मी उगवत नाही .. बर्‍याच लेखांवर लिहित असतो..

तुम्ही जिथे दुनियादारीच्या नावाने गळा काढाल तिथे आम्ही सूर लावयला हजर !!

दुनियादारी पु. = चार आने की मुर्गी बारा आने का मसाला
दुनियादारी चि. = मुर्गी मिसिंग, फीका अळणी मसाला

@शाहीर: बास न आता...किती पोवाडे गाणार आहात पुस्तकाचे? तुम्ही मायबोलीवर घेतलेला id सार्थक झालेला आहे हो....किती ते सतत? बास न....आता इतरांच्या मतांवर तुम्ही मत लादत आहात.

दुनियादारी पुस्तक वाचले... मला सु.शि यन्ची लेखन्शैली खुप भावली...
लहान-सहान डिटेल्स खूप मस्त रेखटले आहेत....

नायकाची मनोवस्था फारच सुन्दर लिहिली आहे.... अनादि- अनन्त कालापासुन चालत आलेली कथा, नेहमी तड्जोडीवर स्थिरावते हे पुन्हा अधोरेखित होते...

चित्रपट माहित नाही कसा असेल !!!!!!!!!

(पुस्तकात कथानयक बर्याच वेळा गालातल्या गालात हस्तो... ते वचुन मला तरी स्वप्निल जोशि ने केलेल्या श्री कृश्णाची भुमिका अथवली.. म्हणून कदचित दिग्दर्शकाने त्याला निवडले असेल तर माहित नही!!!!! :ड Wink ))))))३३

पिक्चर आवडला नाही. विस्कळीत वाटला.

पुस्तक आवडतं आहे. सुशि हा लेखकही आवडता. पण इथे त्याबद्दल बोलणं म्हणजे महापाप आहे असं वाटायला लागलंय. म्हणून तुलना वगैरे टाळत आहे.

काल पाहिला. बरा होता. परत आवर्जुन बघेन अस नाही वाटत. मी पुस्तक नव्हत्म वाचलेलं. म्हणुन पुस्तकाशी तुलना नाही करता आली. शिरिन अगदी आजच्या काळातली वाटत होती.

पुस्तक आवडतं आहे. सुशि हा लेखकही आवडता. पण इथे त्याबद्दल बोलणं म्हणजे महापाप आहे असं वाटायला लागलंय. म्हणून तुलना वगैरे टाळत आहे.>>>> अगदी सहमत.
हा चित्रपट काल पाहिला. बरा होता. But the book rocks. Of course it's my personal opinion....no offense Happy

इथे अफ्रिकेत असल्यामुळे चान्स मिळाला नव्हता.. पण काल यु ट्युब वर पाहिला.
अजिबात आवडला नाही.
सिनेमा माध्यम म्ह्णुन काही लिबर्टीज घ्याव्या लागतात हे मान्य .. पण त्या नादात ओरिजनल कथेची पार वाट लाऊन टाकली आहे ... सुशिंचा आत्मा तळमळला असेल ही मोडतोड पाहुन Sad

चित्रपट नाही आवडला. पण पुस्तक वाचलं नसतं तर बरा वाटला असता.

ते महाविद्यालयात असताना कित्ती मोठे दिसतात....आणि नंतर म्हातारे दाखवलेत तेव्हा उगाच केस पांढरे करुन आल्यासारखे दिसतात. पुन्यात वर्षभर स्वेटर घालतं का कुणी?

पाहिला. आवडण्याची शक्यता कमी आहे हे माहित होते तरी मनस्ताप झालाच. किती म्हणजे किती फसलेले कास्टिंग!! स्वप्निल ला पहावत नाही अगदी. त्यात पहिल्याच एन्ट्रीत तो नाकातून शेंबूड आल्यासारखे रक्त !! अरे काय चाललंय काय ! Angry
मुख्य म्हणजे दुनियादारी का नाव दिलेय या पुस्तकाला याचा विचार केलाच नाहिये. पुस्तकात २-३ कॉलेज ची वर्षे जरी तेरी मेरी यारी ... अशी गाढ मैत्री असली तरी दुनियादारी कुणाला चुकली नाहिये. काही वर्षात सगळे आयुष्यात 'मूव्ह ऑन' झालेले दाखवलेत...दिग्याचा पत्ता नाही, श्रेयस घरचा बिझेनेस सांभाळातोय, शीरीन अन तिचा नवरा ... सगळेच वेगवेगळ्या मार्गाला... अन हीच तर गोष्ट हूरहूर लावून जाते त्या कादंबरीत !!
इथे ३ इडियट ची कॉपी मारत फ्लॅशबॅक, कॉलेज ला कुणीच कधी न जाणे, सगळे फॅन्सी ड्रेस केल्यासारखे पांढरे केस करून श्रेयसच्या जाण्यानंतर चाळीस वर्षे त्याच कट्ट्यात अन तेरी मेरी यारे मधे अडकलेले दाखवलेत !! पार त्या मिनूचा नवरा पण येडचापसारखा हाय श्रेयस वगैरे करताना बघून डोक्याला हातच लावला!! नोबडी मूव्ह्ड ऑन इन लाइफ ???? ते रिडिक्युलस वाटले सगळ्यात !!!!! Uhoh

त्याला नक्की काय रोग झालेला असतो? ज्याचे लक्षण (लहानपणापासून) फक्त नाकातून रक्त येणे हेच असते आणि ते पाहून फक्त त्या डॉ. स्टुडंटला कळते त्याला काय झाले ते....बाकी तो चांगला टुनटुनीत अन् गुब्बा असतो.

Pages