फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यात दुनियादारी बघितल्यानंतरचे माझे फेसबूक अपडेट
_____________________

आज "दुनियादारी" बघितली..!!

आय नो, बरेच उशीरा पाहिली.. पण तसे वाटले नाही.. आजही थिएटर हाऊसफुल्ल होते.. बरेच दिवसांनी एक चित्रपट अगदी आतवर भिडला, अगदी सुरुवातीपासूनच.. ईंटरव्हल कधी आलागेला कळलेच नाही आणि दि एण्डची पाटी लागली तरी टिकटिक डोक्यात वाजतच होती.. एखाद्या लव्हस्टोरीची नाही तर यारीदोस्तीची टिकटिक.. ज्याने आयुष्यातले चार दिवस जरी मित्रांच्या कट्ट्यावर घालवले असतील त्यावर हा चित्रपट असेच काहीसे गारुड करून जात असेल.. आमची तर वर्षे गेलेली..

स्वप्निल, सई आणि इतर सारेच सही, पण अंकुश चौधरीला दिग्याभाईच्या भुमिकेत बघून बरे वाटले.. पण पिक्चरच्या शेवटी त्याच डीएसपी बद्दल सर्वात जास्त वाईट वाटले.. एनीवेज, पिक्चरचे परीक्षण द्यायला मी इथे बसलो नाही.. पण अजून कोण इडियट असेल आपल्यात ज्याने अजून हा पिक्चर पाहिला नाही तर आजच तिकीट बूक करा आणि थिएटरमध्येच बघा.. मराठी पिक्चर आहे, पॉपकॉर्नच्या किंमतीपेक्षाही स्वस्तात पडेल तिकिट.. आणि म्हणूनच मी आज पॉपकॉर्नच खाल्ले नाहीत.. .. विचार करतोय वाचलेल्या पैश्यात पुन्यांदा होऊन जाऊ दे.... तुझी माझी यारी, तर भोकात गेली दुनियादारी !!

___________________________

फेसबूक अपडेट संपले,

आता तळटीप - पुस्तक मी वाचले नाही आणि त्या वादात मला पडायचे नाही

फिल्मी शेवट (तो लग्नाच्यावेळचा हाणामारीचा प्रसंग. पुस्तकात असा शेवट आहे का? Uhoh ) आणि स्व.जोशी नायक म्हणून (म्हणजे दोन दोन हिरवीणी स्व. जोशीवर 'मरतात'? हे पचवणं जरा जडच जातं.) वगळता चित्रपट आवडला. मेकअप की काय म्हणतात तेही गंडलय. तरीही एकदा दुनियादारीचा अनुभव घ्यायला हरकत नाही.

स्व. = स्वप्नील. (कृपया 'स्वर्गीय' वाचण्याचा आगाऊपणा करू नये.)

पुस्तकातली स्टोरी आणि या मुव्ही चा काही संबंध नाहीये......फक्त पात्रांची नावं तीच आहेत.......पुस्तक जास्त बरं वाटलं वाचायला...तरी लोक दोन दोन वेळ हा मुव्ही बघुन आलेत म्हणे...

लोक दोन दोन वेळ हा मुव्ही बघुन आलेत म्हणे...>>>>> मी पण जाणारेय परत......या रविवारी. स्मित

>>>>>>>>>>>>>>>>>>>>

+७८६

दुसर्‍यांदा खरे तर जास्त मजा आली.. कॉलेजातले मित्र बरोबर होते ना.. अन गिरगावला होतो.. आजूबाजुची पब्लिक सुद्धा आमच्यासारखीच जमलेली.. शिट्ट्या टाळ्या दंगा फुल्ल धमाल आली..

मी पहिला........मि पाहिला ...सुरुवतिच्या ५ मिन्टातच पुस्तकाशी तुलना बन्द केली.
पात्र निवड खरोखरच चुकली आहे.
अन्कुश,सई, जोशि बुआन्चे cलोस-अप्स वय सान्ग्तात.
मैत्रि आणि प्रेम गाढ आहे असे ठळकपने जाणवुन देणारे प्रसन्गच नाहियेत.
अश्क्या म्हनतो ते बरोबर आहे स्व.जोशि मित्र म्हण्वन्या इतके ईन्टरएक्शन ग्रुप मध्ये झालेलेच नस्ते.
अन्कुश चरसि भाइ दिसतो.
जितेन्द्र जो. गे/विक्रुत/घाणेरडा/किळसवाणा दिसतो.
त्याने नेह्मिप्रमाणे चान्गल्या फ़िल्मचि वाट लावलेय (तुकाराम,शाळा.....)
तो लेखक/कवि ठिक आहेऽएक्टिन्ग नहि जम्या
फ़ॉर अ चेन्ज उर्मिला ठिक दिसते.

एक सर्वे करायला हवा... तरीही माझा अंदाज सांगतो..

१०० पैकी ९० लोकांना हा सिनेमा आवडला असावा..
सिनेमा न आवडणार्‍यां १० पैकी ९ जणांनी पुस्तक वाचलेले असावे. आणि त्यांना सिनेमा न आवडण्याचे कारण त्यांच्या डोक्यात भिनलेले पुस्तकच असावे.
तर उर्वरीत १ टक्के लोकांना "असते एकेकाची आवड" हा नियम लागू होईल.

दाद्या माझ्या पहाण्यात १०० पैकी ७० जणांना सिनेमा आवडला (कारण त्यांना केकता टाईप्स गोष्टी/शेवट आवडतात )
न आवडणार्‍यांमध्ये १५ पुस्तक वाचलेले होते तर १५ पुस्तक न वाचलेले Happy

असते आवड एखाद्याची
आम्ही तुमच्यावर सिनेमा आवडून घेऊ नका अशी जबरदस्ती करत नाही आणि तुम्ही आमच्यावर सिनेमा आवडून घ्या अशी जबरदस्ती करू नका!

सिनेमा बेक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कारच आहे असच आम्ही म्हणनार
आणि
सिनेमा ऑस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सस्स्मच आहे असच तुम्ही म्हणणार....

पण त्याने कोणाचेच विचार बदलणार नाहीयेत तेंव्हा आता लोकांची मतं नुसती वाचा आणि सोडून द्या..... प्रतिउत्तर नको ... कंटाळा आला Happy

घे आता Happy
मुद्दा राहिला बाजुला चुका आणि गणित पाहत बसलाय... Proud
साई कुठला Proud

दाद्या माझ्या पहाण्यात १०० पैकी ७० जणांना सिनेमा नाही आवदला
न आवडणार्‍यांमध्ये १५ पुस्तक वाचलेले होते तर १५ पुस्तक न वाचलेले

>>>>>>>>>>>>>>>

पुन्हा वाच.. हिशोब गंडलाय Wink

सध्या पुस्तक वाचतोय.
कथानक इन्टरेस्तिन्ग वाटतय.
पण बीटवीन द लाइन्स गोष्टी दाखवायला दिग्दर्शन खुपच महत्वाचं ठरतं.
बहुतेक सर्व पुस्त्क वाचलेल्याना हेच पडद्यावर न दिसल्याने निराशा झालेली असावी.

आधी पुर्ण पुस्तक वाचणार.
मगच चित्रपट पाहणार..

एक सर्वे करायला हवा... तरीही माझा अंदाज सांगतो..

१०० पैकी ९० लोकांना हा सिनेमा आवडला असावा..
सिनेमा न आवडणार्‍यां १० पैकी ९ जणांनी पुस्तक वाचलेले असावे. आणि त्यांना सिनेमा न आवडण्याचे कारण त्यांच्या डोक्यात भिनलेले पुस्तकच असावे.
तर उर्वरीत १ टक्के लोकांना "असते एकेकाची आवड" हा नियम लागू होईल.>>>>>>>+११११११११११११११११....

अभिषेक,

तुम्ही 'आमचे' निश्चितच नाही आहात..
Wink
Light 1
कारण आमचा हिशेब/ अनुभव/ सांख्यिकी फार वेगळे/ळी आहेत.

माझ्या निकटवर्तीयांपैकी बहुतांश लोकांना चित्रपट नुसता नावडलाच नाही, तर बंडल, डब्बा, भिकार, टुकार, दळभद्री, भंकस, सडियल वगैरे वगैरे वाटला.. (टक्केवारी काढली नाही. क्षमस्व!)
ह्या नावडलेल्यांपैकी लोक पुस्तक वाचलेलेही होते आणि न वाचलेलेही.. (ह्याचीही टक्केवारी काढली नाही. क्षमस्व.)

रसप, तुम्ही म्हणता म्हणुन सिनेमा फ्लॉप तर होत नाही ना. तो सिनेमा अजूनही हाऊसफुल होतोय तर तो सिनेमा बंडल, डब्बा, भिकार, टुकार, दळभद्री, भंकस, सडियल वगैरे वगैरे कसा असेल? मुळात लोकांच्या आवडीवर आहे ते. आणि खूप लोकांना तो सिनेमा आवडला ह्यात खटकण्यासारखं काय आहे? तुम्हा सगळ्यांची प्रत्येक कॉमेंट सतत ज्यांना सिनेमा आवडला त्यांना मुर्खात काढणारी आहे, म्हणून सांगतेय...हा सिनेमा ६ ते ७ वेळा पाहणारी लोक सुद्धा परत पाहायचा म्हणून तिकीट काढण्याच्या रांगेत उभी असतात. मग तुम्हा लोकांना तो आवडला नाही म्हणून तो चित्रपट चांगला नाहीच आहे अस म्हणून कस चालेल?

मधुराशी सहमत... तुमचे आमचे आकडे बाजूला राहू द्या... पण बॉक्स ऑफिसचे अधिकृत आकडे तुम्ही कसे नाकारत आहात? जर बहुतांश लोक हा सिनेमा बकवास अन बंडल आहे असे बोलत असतील तर आजही गर्दी का उसळतेय.. कारण बहुतांश लोक सिनेमा चांगला आहे असे बोलत आहेत जे त्यांच्या कानावर पोहोचलेय..

असेही मुळातच एखादा मराठी चित्रपट थिएटरला जाऊन बघूया म्हणण्यापेक्षा घरीच बघूया असे बोलणारा मराठी चित्रपटरसिक.. याला तुम्ही मार्केटींग करून चित्रपटगृहाकडे नाही खेचू शकत.. सिनेमाची माऊथ पब्लिसिटी चांगला म्हणूनच होतेय म्हणून आज एक महिन्यानेही पब्लिक खेचतेय..

आणखी एक... दुनियादारीतील गाणी काय मस्त आहेत.. आणि हिट देखील जात आहेत.. खास करून ते टिकटिक वाजते डोक्यात तर फेसबूकवर दर थोड्यावेळाने कोणी ना कोणीतरी उगाचच शेअर करत असतो.. थिएटरमध्ये सुद्धा ते लागले की शिट्ट्या येतात.. तसेच मी दुसर्‍यांदा बघायला गेलो होतो तेव्हा जिंदगी गाण्याच्या वेळीही लोकांनी नुसता गोंधळ घातला होता.. तसेच देवा तुझ्या गाभार्‍याला सॅड साँग असल्याने असे काही झाले नाही, मात्र नो डाऊट ते ही चांगलेच गाणे आहे..

पण चित्रपट आवडला नाही असे बोलणारे मुद्दामच याकडे दुर्लक्ष करतात असे बरेचदा जाणवते.. सारे मुद्दे फिरून फिरून पुस्तकातील कथेला न्याय नाही आणि पात्रांची चुकीची निवड याकडेच येतात.. मात्र कोणी काही बोलले तरी स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी आणि सई हे मराठीतले सुपरस्टारच निवडले होते चित्रपटाला आणि त्यांचा या चित्रपटाच्या यशात खूप वाटा आहे..

गाणी म्हणजे सिनेमा नव्हे!

खुप काही लिहायची इच्छा होतेय पण एका प्रचंड लाडक्या आणि आदरणिय माणसामुळे मी शांत आहे

रसप, तुम्ही म्हणता म्हणुन सिनेमा फ्लॉप तर होत नाही ना. >> मी ? मी म्हणतोय ?

असो......

मी काहीच 'आकडेवारी' वगैरे दिलेली नाहीये! फक्त माझे मत व माझ्या मित्रांचे मत मांडले.
चांगला चित्रपट आणि 'हीट' चित्रपट, ह्या माझ्यासाठी स्वतंत्र संकल्पना आहेत. बॉक्स ऑफिसवरील गल्ला माझ्या डोळे दिपवत नाही. हा चित्रपट लोकांनी ६-७ नव्हे रोज पाहिला तरी मला माझे डोके आहे आणि ते तिथेच राहाणार असल्याने मी त्याचा वापर करूनच माझे मत बनवत असतो.

मत लादायचा प्रयत्न केला नव्हता. झाला असल्यास क्षमा मागतो.
धन्यवाद !

रिया ___ गाणी म्हणजे सिनेमा असे मी तरी कुठे बोलतोय.. .. पण सिनेमा म्हणजे गाणी ही, हे तर कबूल करशील..

रसप,
तुम्ही पुस्तक वाचल आहे न? तुम्हाला खरंच ते आवडलंय? तुमचे रिव्हू जेव्हडे छान असतात तेव्हडे सुद्धा चांगले सु.शिंनी लिहिलेलं नाही त्या पुस्तकात. असो, ज्याचं त्याचं मत असत.

रिया,
कोणामुळे शांत आहेस? बोल.....उगाच गप्प बसू नकोसं.

Pages