फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या चित्रपटाने म्हणे ३५ कोटीचा विक्रमी व्यवसाय केला. त्याच बरोबर लोबजेट टाईमपास ने २८ कोटीचा. काहीही असो मराठी प्रेक्षक मराठी पडद्याकडे परत येऊ लागला आहे अस म्हणाव लागेल.

एकच सीन पाहिला. अंकुश चौधरी मुलीच्या बापाला उचलून कठड्यावर धरतो तोवाला.

नवरा म्हणे, हे स्वजो आणि अंकुश वधूपिते आहेत का? म्हटलं नाही बहुतेक स्वतःच्याच लग्नाची बोलणी क्करायला आलेत.

स्व. जो ने शिरीन चा रुमाल(शेमडा) गोळा करणं -- सरफरोश ची कॉपी.
स्व. जो ची शा.खा. पोज कॉपी. अजुन ही बर्याच मसाला सीन मधे अशीच कॉपी उदाहरणे दिसलीत...

चित्रपट जेव्हा आला तेव्हा पाहिला नाही कारण सुशिंच्या दुनियादारीची जादू चित्रपटात नसणार असे इन्स्टिंक्टिव्हली की काय म्हणतात तसे जाणवले होते. टीव्हीवर लागला तेव्हा पाहिला नाही त्याचेही कारण पुन्हा तेच होते. काल पुन्हा टीव्हीवर लागला तेव्हा मात्र अगदीच इतर काही करण्यासारखे नसल्याने बर्‍यापैकी भाग बघितला चित्रपटाचा. तो बघून मनात आलेला विचार लिहायचा झाला तर असा लिहावा लागेल.

दिग्दर्शक, निर्माता, कथालेखक, पटकथाकार, संगीतकार, गीतकार, अभिनेते, अभिनेत्र्या ह्यांच्यापैकी एकालाही मूळ कादंबरी समजलेलीच नाही आहे.

आज सुहास शिरवळकर असते तर त्यांनी हा चित्रपट पाहून कपाळाला हात लावला असता.

धन्यच वाद!

>>पृथ्वीराज कपुर यांनी देखील कधी काळी लिहुन ठेवले की सलिम चा रोल कर कोणी करु शकेल तर तो फक्त " उदय चोप्रा / हिमेश रेशमियाच"
>> हे कॉलेजमध्ये आहेत होय
>> जितेंद्र दोशीचा साइ अगदीच डोक्यात गेला. काय ते केस, काय ते चालण अन ओठांवरून जीभ फिरवत बोलण राग >> तो स्वजोकडे पाहून ओठांवरुन जीभ फिरवतो तेंव्हा हसून हसून गडबडा लोळण झालं. किमान शिरिन, सुरेखा, मिनू वगैरेला पाहून तसं करताना तरी दाखवायचं

Lol

>>सुरेखानी लग्नानंतर दिगूला भेटताना घातलेलाच नेकलेस मीनूने म्हातारी झाल्यावर घातला आहे..
काय ऑब्जर्वेशन आहे , कूऽऽल !!!

सिनेमा फालतू.... कादंबरी ग्रेट!!!!
काल टिव्हीवर थोडा वेळ बघीतला मनाला वेदना होत असल्याने चॅनल बदलले.

दिग्दर्शक, निर्माता, कथालेखक, पटकथाकार, संगीतकार, गीतकार, अभिनेते, अभिनेत्र्या ह्यांच्यापैकी एकालाही मूळ कादंबरी समजलेलीच नाही आहे,

>>>> सहमत!!!!!!!

दिग्दर्शक, निर्माता, कथालेखक, पटकथाकार, संगीतकार, गीतकार, अभिनेते, अभिनेत्र्या ह्यांच्यापैकी एकालाही मूळ कादंबरी समजलेलीच नाही आहे,>>>>खरय...म्हंजे, सई ताम्हणकरला तर डायलॉगचे अर्थ पण माहित नव्हते. तो डायलॉग होता ना, कि हातात katbari असतात बिस्किटहि सोडवत नाही...तर तिला वाटल, कि ती katbari आणि उर्मिला म्हणजे बिस्कीट!!! बघा आता.....

पण चित्रपट बरा होता. आता इतका वेळा पाहून झालंय कि आता कंटाळा आला त्या झ.बा.चा!!!

तर तिला वाटल, कि ती katbari आणि उर्मिला म्हणजे बिस्कीट!!!<<<

पुढेमागे तिला माझ्यासारखा कोणी भेटला तर उपमा म्हणून ती काय उल्लेख करेल कोण जाणे!

मधुरा कुलकर्णी | 10 February, 2014 - 18:53 नवीन
पण चित्रपट बरा होता. आता इतका वेळा पाहून झालंय कि आता कंटाळा आला त्या झ.बा.चा!!!
>>
Uhoh

हॅक झालं का हिचं अकाऊंट? Uhoh

पुढेमागे तिला माझ्यासारखा कोणी भेटला तर उपमा म्हणून ती काय उल्लेख करेल कोण जाणे!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हातात बर्फाचा गोळा असताना समोरचा "पेप्सीकोला"ही सोडवत नाहिये म्हणेल..... Proud

मी ही पाहिला. मी सुशिंची काही पुस्तके वाचली होती पण दुनियादारी वाचल्याचे लक्षात नाही (म्हणजे बहुधा वाचले नसावेच). त्यामुळे काहीच रेफरन्स नव्हता. पिक्चर बर्‍यापैकी वाटला. अंकुश चौधरी चे काम सर्वात जबरी. त्याने कपड्यांपासून स्क्रीन प्रेझेन्स पर्यंत अमर अकबर अँथनी व काला पत्थर चा अमिताभ चॅनेल केला आहे. जमलाय, आवाज वगळता. सई ताम्हनकर च्या आधीच्या एक चित्रपटांप्रमाणेच मला तिचे काम आवडले.

मात्र बरेचसे लोक कॉलेजकुमार दाखवलेत तेव्हा तसे वाटत नाहीत आणि नंतर म्हातारे दाखवलेत तेव्हा म्हातारे वाटत नाहीत Happy

थिएटरात ३ वेळा आणि छोट्या पडद्यावर २ वेळा असे टोटल ५ वेळा बघून झाला पण अजून कादंबरी वाचायचा योग आला नाही.. .. याचा अर्थ निव्वळ मार्केटींग वर चालतात हे सिनेमे !!!

>> दिग्दर्शक, निर्माता, कथालेखक, पटकथाकार, संगीतकार, गीतकार, अभिनेते, अभिनेत्र्या ह्यांच्यापैकी एकालाही मूळ कादंबरी समजलेलीच नाही आहे,<<

बहुतेक मलाही समजलेली नाही, असे मी प्रामाणिकपणे नमूद करतो कारण मला तर पुस्तकसुद्धा प्रचंड 'ओव्हररेटेड' वाटलं.

रसप, कधी वाचलेस त्यावर असेल बहुधा. मीही ते वाचलेले नव्हते. आता वाचले तर कॉलेज मधे त्याच काळात असताना जसा परिणाम होइल तसा होणार नाही.

मला पिक्चर ओव्हरऑल टाईमपास वाटला. बर्‍याच गोच्या आहेत पण तरीही बघणेबल आहे.

अजून एक उल्लेख करायचा राहिला - पार्श्वसंगीत मला खूप आवडले.

>> रसप, कधी वाचलेस त्यावर असेल बहुधा. <<

हो. अनेक जण तसंच म्हणाले.
बट देन.... ह्याचा अर्थ हाच ना की ते अन्कन्डिशनली चांगले नाही. जर त्या पुस्तकाची परिणामकारकता अशी कन्डिशनल असेल तर ते इतकं डोक्यावर घेण्याइतकं चांगलं आहे, हे मानता येत नाहीये मला.
असो.
मला आवडलं नाही, इतरांना आवडू नये असं माझं म्हणणं नाहीच..
Happy

पुस्तक ही इतकं छान नाहीये...आणि मुव्ही बद्दल बोलणेच नको.......पुस्तकातील गोष्ट आणि मुव्हीतील ...दोन्ही वेगळ्याच आहेत...
ती सई तर त्या साई देडगावकर ला मोठे केस लावले आणि लांडा फ्रॉक घातला तर जस दिसेल तशी दिसते..
बाकी तो झपाटलेला बाहुला ३-४-५-६-७ ( माहित नाही किती ) वर्ष नापास झालेल्या अंकुश पेक्षा थोराड दिसतो..
जितेंद्र जोशी मला आवडायचा पण दुनियादारी बघुन किळस येते त्याची....
अंकुश च काम त्यातल्या त्यात बरं..पण तो हडकुळा का होतोय...खंगलेला दिसतो.. Sad
उर्मिला छान दिसते..पण तिला इतकं काही महत्व देण्याइतका रोल नाहीये तिचा...
एकदा वेड्या मित्राच्या नादी लागुन ३०० + ३०० = ६०० रुपडे वेस्ट केले....त्याची शिक्षा म्हणुन नवीन मुव्ही बघु देत नाहीये नवरा माझा.... Angry
हे वाचुन भरपुर लोक माझ्या अंगावर धाउन येणारेत हे नक्की...पण इतके महिने उलटुन गेल्यावर ही इथली चर्चा संपणे होतच नाहीये म्हणुन मी पण एक पोस्ट टाकली.....

त्या सई चे डोळे मला काहितरी विचित्र वाटतात...बटाट्या सारखे आहेतच पण नॉर्मल लोकांपेक्षा तीचे डोळे फार जवळ जवळ आहेत....

आणि अजुन एक सई काहीतरी चॉकलेट बिस्किट चा फालतु डायलॉग मारते....ते नक्की काये?? कोण चॉकलेट कोण बिस्किट??? सईला बहुदा स्वताला चॉकलेट म्हणायचे असेल....पण ते तर मारी च गोल मोट्ठ बिस्किट आहे.....मारी ला जरा तरी टेस्ट असते पण ती गोष्ट वेगळी

अनू, आता बरेच दिवस झालेत तेंव्हा लिहायला हरकत नाही म्हणून लिहितेय.
ज्याला स्पॉयलर अलर्ट वगैरे हवाय त्याने तो तसा समजा -

पुस्तकामध्ये हा श्री कन्फ्युज दाखवलाय. त्याला शिरिन जितकी आवडत असते तितकीच मिनुही आवडत असते. दोघींसोबतच्या फिलिंग्स वेगळ्या तरीही हव्याहव्याश्या!.
( असतात अशी ही मुलं समाजात. तुम्ही पाहिलीयेत की नाही माहीत नाही पण मी पाहिलीयेत....दुनियादारीच की ही देखील एक प्रकारची!)
तेंव्हा त्याला उद्देशुन शिरिन म्हणते तुझी अवस्था लहान मुलासारखी झालीये. त्याला हातात चॉकलेट असताना समोरचं बिस्किटही हवं असतं... एकाचीही मजा (चांगल्या अर्थी घ्या) तो पुर्णपणे घेऊ शकत नाही. सिनेमातल्या श्रीच्या मनात आधीपासुनच शिरिन दाखवलीये त्यामुळे या डायलॉगला फारसा अर्थ उरत नाही.
मग हा डायलॉग घेतलाच का आहे ते कळत नाही. असो!

Pages