मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाला "चिमणा चिमणीच लगिन" हे गाण खुप आवडत. कारण त्यात प्राणी व पक्षी आहेत.तो नेहमी बघतो. त्याच्याकडे त्याची एक मैत्रिण रोज खेळायला येते, जी त्याच्यापे़क्षा मोठी असल्याने तो तिला दिदी म्हणतो. एक दिवस तो तिच्या आईला म्हणाला मीपण चिमणा चिमणीसारख दिदीबरोबर लग्न करणार. गोल गोल फिरणार(होमाभोवती फिरतात तसे)

पण लिहिताना तुम्हाला शरमिंदं वाटण्यापेक्षा नकळत तिच्या बोलण्याची भलामण आणि काकाची कशी फजिती झाली असा सूर जास्त डोकावतोय, म्हणुन अरेरे, वाईट.>+१

६ जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मलाही पुरस्कार होता त्यामुळे मी बायकोला घरून आणि मुलांना शाळेतून घेऊन नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात गेलो. एकची वेळ होती, पण प्रमुख पाहुणे काही लवकर येईनात. छोटा मुलगा आत्मज खूप कंटाळला होता. तेवढ्यात नाशिकचे महापौर प्रेक्षक येतात तिथूनच आत आले. ते आमच्या खुर्च्यांच्या समोरून चालताहेत तोच आमचं दिवटं म्हणतं, ‘पप्पा, हा टकल्या कोण आहे.?’ तो एवढ्या जोरात म्हणाला की, पुढच्या रांगेतले सगळे माना फिरवून मागे पहायला लागले. (महापौरांनाही ते तितक्याच जोरात ऐकू गेलं असावं याची ९९ टक्के शक्यता. कारण आम्ही दुसऱ्याच रांगेत बसलेलो होतो.). पहिल्या रांगेतल्यांनी अशा तऱ्हेने माझ्याकडे पाहिले, की आता जमीन मला पोटात घेईल तर बरे, असे वाटू लागले. त्याला गप्प ठेवण्याचा प्रयत्न करीत हळूच म्हणालो, ‘अरे, ते चीफ गेस्ट आहेत.’ त्यावर त्याचे (वरच्या पट्टीतच) उत्तर तयारच होते. ‘चीफ गेस्ट काय असे टकले असतात काय? आमच्या स्कूलमध्ये कधीच असे टकले चीफ गेस्ट नसतात...’ यावर मी, माझी बायको आणि आजूबाजूच्यांनाही हसू आवरता आलं नाही...

आम्ही हॉटेलात बसलो असताना एक सरदारजी आला. तर २.५ ची भाच्ची म्हणाली,,,ते बघ शिवाजी महाराज ! त्यांच्या मुकुटाला हात लावु चल...

टोच्या, तुम्हाला पुरस्कार देतांना महापौर काही म्हणाले नाही का?>>
तसेही आपले महापौर कधी काही म्हणतात का? ते काही म्हणाले असते तर किमान नाशिक तरी ‘सुतासारखे सरळ ’ झाले नसते का? Wink

आई (ओरडून) : तू चूक केलीस की नाही? मग चूक केली तर तुलाच पनिशमेंट मिळणार.

लेकरू : पालीला पनिशमेंट कर.

आई (भंजाळून) : पालीला???

लेकरू: मग पाल चुक चुक करतो ना?

(आई हतबुद्ध वगैरे होऊन मग बापाकडे वळून "शिकव अजून असलंच काहीतरी तिला !!!!" )

रश्मी.. हम नंदिनी है.

दादमावशी तुम्ही सोत्ता भेटून काय ते मिठ्यापाप्या द्या तिला. त्यानिमित्ताने आम्हाला तरी भेटाल!!

बाबाने अ‍ॅनिमल साऊण्डमधे नेहमीचे कुत्रा, मांजर, गाय, लायन, हॉर्स, पिग वगैरे झाल्यावर जनरल नॉलेज म्हणून पाल, चिचुंद्री, भुंगा, मस्किटो, साप वगैरे प्राण्यांचे आवाज शिकवून ठेवलेत.

एक्झाक्टली लाजवणारा किस्सा नाही, पण काल घरभर खेळणी टाकल्यावर ती आवरायचं काम दिलं तेव्हा अशी काव्यप्रतिभा उफाळून आली होती.

बिट्स ऑफ टोयज, बिट्स ऑफ टोयज
लाईंग ऑन द फ्लोअर, लाईंग ऑन द फ्लोर.
मम्मा आता ओललते. मम्मा आता ओललते
पिक देम अप आणि बास्केट देम.

Happy
धमाल किस्से आहेत.

काल संक्रांतीनिमित्त मी आणि माझा मित्र + त्याचा दोन वर्षाचा मुलगा चिरायु, असे एका दुसर्‍या मित्राच्या घरी गेलो होतो. त्या दुसर्‍या मित्राचा आदल्या दिवशी वाढदिवस होता, त्यामुळे आम्ही चिरायुला सांगीतले अंकलला विश कर म्हणून. त्यानेही मस्तपैकी शेकहॅन्ड केला.
आणि हात सोडताच विचारले- "केक?" Happy

बाबा आणि लेक वेफर्स खात होते. अचानक लेक - "बाबा तू असा काय वेफर्स खातोयस? तू कुत्रा कसा बिस्किट खातो तसा दिसतोयस."

नशीब घरातच होतो आम्ही.

एकदा हायपरसिटि मध्ये खरेदीला गेलेलो .
वेळ : दूपारची , त्यामुळे आजूबजूला फार गर्दी नव्हती.
लेकाला cart मध्ये उभ करून मी भाज्या गोळा करत होते .
समोरून २ बुरखाधारी तरुणी आल्या. पूर्ण काळा बूरखा घतला होता आणी नाक आणि तोंडही झाकल होत.

लेकाने माझा हात खेचला आणि कानाशी गुणगुणला
" मम्मा , ही लोक चोर आहेत का ? " Sad Sad

नशिब त्या मुली भारतिय नव्हत्या. ( निदान त्यांच्या बोलणयावरून तरी तसच वाटलं)

एका भारतभेटीतली कथा. काकांच्यात सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो.
काकांनी तीर्थ आणून नीट माझ्या लेकाच्या समोर गुढग्यांवर बसले. मग '...उजव्या हाताची छोटी ओंजळ कर... सांड्वू नको... हं... सगळं पिऊन टाक .. वगैरे झालं.
'..हात कुठे पुसू?'...
'अरे... डोक्याला पूस'...
लेकाने काकांच्या डोक्याला पुसला होता हात.

मी लाजून मेले... काका हसून हसून... लोळले होते.

Pages