मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल जेवता जेवता .. चीरंजिव....मम्मि बायकांचि पोट मोठी का असतात हे समझले आहे मला... नवरा हातातला घास घेउन उठु का बसुच्या भुमिकेत ...:) Happy : .... बोलन चालुच सुरमइ खाता खाता... ते काय ना .. बाळ पोटातुन बाहेर येते ना तेव्हा पोटात खुप हवा जाते .. आनि मग पोट मोठ दिसत... परत जेवण चालू Happy Happy :

बाळ पोटातुन बाहेर येते ना तेव्हा पोटात खुप हवा जाते .. आनि मग पोट मोठ दिसत... परत जेवण चालू >>>>>:हहगलो: अशक्य.

हायला काय पोर आहेत आताची.:हाहा: ती नवीन फाईव्ह स्टारची अ‍ॅड पण भलतीच विचीत्र आहे.:फिदी: हे असले पाहुन पोरे बिथरतात की काय्?:फिदी:

आमचे चिरंजीव...वय वर्ष आत्ताशा १.५
आत्ता थोडे थोडे तो बोलु लागला आहे. घरात दिवसभर माझ्या आई बाबांबरोबर तो असतो. माझी आई किंवा माझी बायको किंवा माझ्या सासुबाई ही कधी ही डोक्यावरची टिकली किंवा कुंकु काढत नाहीत. त्यामुळे माझ्या मुलाला स्त्री चे कपाळ आणि ते ही without कुंकु हे माहितच नाहीये......परवा संध्याकाळी माझी बायको आणि माझी आई त्याला घेऊन खाली समवयस्क मुलांमधे त्याला खेळवत होत्या, त्यांच्या पैकि एका मुलाच्या आई ने डोक्यावर टिकली/कुंकु असे काही ही लावले नव्हते......आमचे दिव्य रत्न त्या बाई ला न्याहाळत माझ्या बायको ला म्हणाले.... आई...काकु...कुकु....नाई.........बायको भयानक खजिल झाली.....आणि त्या वहिनी clean bold..अशक्य हसायला ही लागल्यात त्या !! आणि म्हणाल्यात....थांब लेका तू मोठा हो, मग बघते मी कि तुझी होणारी बायको कुकु लावते का ते !!!

मला नक्की आठवत नाही पण मागे कुठल्यातरी धाग्यावर कोणीतरी मुलांनी दुसर्यांच्या घरी दंगा केला वगैरे लिहील्याचं वाचलं होत. त्या धाग्यावर प्रतिक्रियांमध्ये थेट धागाकर्त्याच्या संस्कारांचा उद्धार झाला होता. इथे मात्र या समस्त पालकांनी आपापल्या मुलांवर काही संस्कार केलेत की नाही हे पडताळण्याची गरज असूनही कोणाला हा प्रश्न पडलेला दिसत नाहीये. कमाल आहे!!

त्या कुठल्याश्या धागाकर्त्यांबद्दल मायबोलीकरांना वैय्यक्तिक आकस असावा असे वाटते.

सावरी_क >>>

तुम्हाला ह्या धाग्याबद्दल काही वैय्यक्तिक आकस तर नाही ना ? Lol

हा धागा निव्वळ मनोरंजनासाठी सुरु केलाय असे मला वाटते.....तुम्हाला किसच पाडायचा असेल तर मग चला सुरुवात तुम्हीच करा मुलांवर संस्कार कसे करावेत ह्या बद्दल माहिती देऊन !!!!

क मा ल आहेत एकेक रत्ने Rofl
नताशा, लेक केवढी आहे तुझी? Happy
सृष्टी, नवरा हातातला घास घेउन उठु का बसुच्या भुमिकेत ...>>> मी लोळायची बाकी आहे Rofl
प्रसन्न, गोड्ड लेकरू आहे तुमचं Happy

सावरी, हलके घ्या Happy आणि तसेही प्रत्येक बाफ मनावर घ्यायचीही आवश्यकता नाही Happy

सावरी_क >>>
या किस्स्यांमधे मुलांवर काय संस्कार केले आहेत त्यापेक्षा ते किती निरागस आहेत ते जास्त दिसून येते.

सावरी_क यांचा हा मायबोलीवरचा पहिलाच प्रतिसाद आहे असे दिसते. त्यांचे अभिनंदन.
<<
+१

बहुतेकांना जे दिसत नाही, तेही पहाण्याची कला अवगत असलेल्या अल्पसंख्यांक माबोकरांपैकी तुम्ही असल्याबद्दल तुमचेही होळीनिमित्ताने अभिनंदन Wink

सावरीताई नक्की आक्षेप कशाला आहे...
मुलांनी असे वागण्याला का त्या कुठल्याश्या धागाकर्त्यांवर टीका करण्याला....:)

बरोब्बर हुडकून काढलात की हो तो धागा....
मान गये....
आपकी पारखी नजर...ऑर निरमा सुपर दोनोंको... Happy

आशुचँप

तुमच्या पोष्टिला especially मान गये....आपकी पारखी नजर...ऑर निरमा सुपर दोनोंको... <<
साक्षात दंडवत !!! Rofl

मी सहसा मायबोलीवर फक्त वाचन करत राहते. लिहित नाही. का लिहावसं वाटत नाही याचे वर तुम्ही सर्वांनी हे इतके पुरावे दिलेत. जे वाटेल ते बोलणार्याची खिल्ली उडवणे हा प्रकार इथे अगदीच कॉमन आहे. कोण जाणे मी कशाची अपेक्षा करून लिहिलं होतं हे. मायबोलीवर काही लिहिल्याबद्दल माफ करा. मला एखादा कंपू मिळाला की मगच येईन मी लिहायला परत. निदान माझी री ओढणारी ४ डोकी असतील तेव्हा. माझ्यापुरता हा विषय इथेच संपला. धन्यवाद.

माझ्यापुरता हा विषय इथेच संपला. धन्यवाद>>>> हुश्श्श्श!!
हा हल्का फुल्का निरागस धागा आहे, इथे फुकट संस्कार वगैरेचं तुणतुणं वाजऊ नये! आणि हो, मी कुठ्ल्याच कंपूचीही नाही, पाहिजे असल्यास माझा इथला रेकॉर्ड पहा :p

बाप रे Uhoh मायबोली वाचत असता तर इथलं फक्त नकारात्मकच का बरं दिसलं तुम्हाला?
खुप काही छान छानही घडत असतं इथे. किंबहुना, चांगलंच जास्त घडत असतं!

आणि बरंच काही शेवटी आपण कसे आहोत, कसं घेतो त्यावरही अवलंबून असतं, हो की नाही सावरी?

मुलगा वय वर्षे ४-५ (आम्ही सिडनीत आहोत).
सासू-सासरे आले आहेत आणि रविवार सकाळची निवांत जेवणं चाललीयेत.
"बाबा, डु यू लव्ह आई?" (बाबाचा घास हातातला हातात, तोंडातला तोंडात)
"आ?"
"डु यू लव्ह आई ऑर नॉट?"
"अरे.. म्हणजे कायै... (हातातला पानात आणि तोंडातला तोंडातच घोळवत)... लग्नं झालय आमचं ... ते म्हणजे..."
"मग? हाऊ कम यू नेव्हर किस हर? "
"आ?"
"हाऊ कम यू नेव्हर किस हर? लाईक अ‍ॅलिस्टएअर्स डॅड? ऑर रेशल्स डॅडी?..."

मला आठवत नाहीये नवर्‍याने काय म्हटलं आणि सुटका झाली ते. पण ते धड्डामकन मनातल्या मनात आपटल्याचं आणि जाये तो जाये कहा झाल्याचं अगदी व्यवस्थित आठवतय.
ह्याला १८-२० वर्ष झालीत Happy

दाद................

लय भारी !!!
हाऊ कम यू नेव्हर किस हर? लाईक अ‍ॅलिस्टएअर्स डॅड? ऑर रेशल्स डॅडी?..." Lol

Pages