मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगिनी (बायको) घरी ४ - ६ वयाच्या मुलांचे वर्ग घेते.
rhyming words चा तास होता.. छोट्यांना बरेच शब्द दिले होते. त्यात Duck - Truck अशी एक जोडी होती (तिच्याकडे rhyming words मधे बरेच वर्षं हा वापरलेला आहे).. काल मात्र....
'Mrs. Desai, I know a very very bad word that rhyms with that.. but I am not allowed to say it.' असा एक Response मिळाला...

कालचाच किस्सा माल परसाकडे धावून धावून डीहायड्रेशन झालं होत
पार थकल्या सारखं होत असल्याने सौ च्या खाय्न्द्यावर मानटाकली होती, अचानक लेक आली आणि मला म्हणाली लेक : "बाबा कांय होताय कां" ?
मी : "नाही रे पोरग्या"
लेक : "मग असे कांय चिकटलायत" Uhoh
मी अंगात त्राण नसताना देखील Rofl

केदार. Lol

हा लाजवणारा नाही, पण धमाल किस्सा आहे. मागच्या रविवारी मी हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी रक्त देत असताना आमच्या कन्यका बाजूला बसून होत्या. "आता मला हे लोकं टुच्च करणार" याची अपरंपार भिती डोळ्यांत होती. पण सिस्टरने तिच्याऐवजी मला सुई खुपसलेली बघून आणी मी "आईगं" असं म्हटलेल बघून कन्यकेने दुसरा हात धरून लगेच "दोन्त वली, ममा, दोन्त वली, दोनच सेकंद दुखतं गं, मग लग्गेच बरं वाटतं. डॉक्टरने औषध दिलंय ना, डोण्ट वरी" असे अगदी निरूपा रॉयच्या ममतेने आणि कारूण्याने म्हटलं की आजूबाजूचे सगळे हसून हसून बेजार.

भाच्याला मोठी गाडी हवी होती खेळायला.. म्हणुन त्याला डंपर आणुन दिला.. गाडी आवडली.. खेळला.. खेळता खेळता मधेच म्हणाला, "आतु, ही कचर्‍याची गाडीय ना??". कचरा वाहुन न्यायला अश्याच गाड्या वापरतात हे आम्हा सगळ्यांच्या तेव्हा लक्षात आलं.

आई तिच्या आईकडे ३-४ दिवस गेली होती तेव्हा याच भाच्याने (वय साडेतीन वर्ष) बाबांना (त्याच्या आजोबांना) सांगितलं की आजीला फोन करुन बोलावुन घ्या, दुसर्‍यांच्याकडे इतके दिवस राहतात का?

मच्छिंद्र कांबळींचं वस्त्रहरण कोणी कोणी पाहीलं आहे ?

आमच्या घरी त्याची सी.डी. आहे.. टाईमपास म्हणून बरेचदा बघीतले जाते. त्यातला कांबळींचा एक डायलॉग,
" अरे हो कितवो पांडव कोणा पासून कोणाक झालेलो "

परवा पुन्हा नाटक पाहून झाल्यावर सौभाग्यवतींनी आपल्या बहिणीला फोन केला. चिरंजीव सगळं बोलणं होईपर्यंत शांतपणे ऐकत होते. फोन संपताक्षणीच,

" अगो ही कितवी मावशी कोणा पासून..."

सौभाग्यवती बसल्या जागी बेशुध्द पडायच्या बाकी होत्या.

मस्त किस्से.
माझ्या लेकीचा पण एकः आम्ही एक रीसेलचं घर बघायल गेलो होतो. सध्या ते घर भड्याने एका फॅमिलीला दिलं आहे. बाथरूम्स वैगरे स्वच्छ करण्याचे फारसे कष्ट ते घेत नसावेत. लेक ते बघूनन खणखणीत आवजात म्हणाली, "मम्मा, ईट ईज सो डर्टी, वुई विल् हॅव टू क्लिन ईट अ लॉट!" त्या बाईंचा चेहरा बघण्यासारखा झाला. मी अन नवरा कसेनुसे हसलो फक्त. Sad

७७७

काल नवरा, मी आणि लेक जोधा अकबर बघत होतो.

जोधा पाण्यात पडून ओली होते. अबकराचा मेहूणा (बक्षी बानूचा नवरा) तिच्याकडे हपापलेल्या नजरेने बघत असतो. लेकीने विचारले "सगळे men भिजलेल्या बायकांकडे असे काय बघतात? त्यात त्यांना एवढे काय आवडते" Uhoh

Pages