मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलं :- बाबा, तु नाही जाऊ, मला बाबा आवडतो.... आई नाही आवडत......
बाप ऑफिसला गेल्यावर....
मुलं (दोघही) :- आई, मला तु आवडते... बाबा नाही आवडत....
आई :- आई का आवडते?
मुलं:- आई चॉकलेट दे, मला तू आवडते. Happy

बाप घरी आल्यावर... पुन्हा तेच........ छाकटेल, दुसरं काय. Happy

दाद Lol

भारतात गेल्या गेल्या दोन दिवसात मुलींना शेजारी वाढदिवसाला बोलावले. त्या दोघी, भावाची मुलगी आणि वहिनी वादिला गेल्या. तिथे सगळ्या मुलांसाठी मॅक डीचे बर्गर मागवले होते. ते बघुन आमची धाकटी रत्ना मामीला म्हणाली, बट इटस अनहेल्दी फुड! मामी म्हणाली, तुला नसेल खायचे तर नको खाऊ (पण गप्प बस!). बड्डे बॉयच्या आईला रत्ना काय म्हणतेय ते समजले नाही म्हणून ती म्हणाली, तू ते घरी घेऊन जा. तिलाही परत तेच म्हणाली. मामीने अ‍ॅक्सेंट समजत नाहीये म्हणत काढता पाय घेतला.

नंतर एकदा आम्ही अचानक माबोवरील एका मैत्रीणीकडे गेलो. तिने मुलींसाठी खास पेस्ट्री आणि इतर बरेच खाण्याचे पदार्थ मागवले होते. तिच्या मुलीसाठी सबवेचा बर्गर मागवला होता. तो बर्गर थोडा उशीरा आला. त्या दरम्यान आमचे सगळ्यांचे खाणे झाले होते. मैत्रीणीचे प्रशस्त आणि सुंदर घर बघत-बघत एका खोलीत पोहोचलो तर तिथे तिची मुलगी टीव्ही बघत बर्गर खात होती. ते बघुन रत्नाला परत खुप भुक लागली. माबोकर मैत्रीणीने परत विचारले की तुला हे खायचे का ते खायचे का तर म्हणे मला सँडविचसारखे काहीतरी हवे आहे, ब्रेड आणि त्यात व्हेजी असतात, ते हवे आहे. मैत्रीणीने तिच्या मुलीतले थोडे बर्गर हिला दिले. इतर हा किस्सा घडला असता तर मला कसंनुसं झालं असतं. पण माबोकरीण मैत्रीणीचे घर असल्याने फारसे काही वाटून घेतले नाही !

नासिकला जाताना कुल कॅबचा ड्रायव्हर फोनवर बोलत होता. हिला वाटले माझ्याशी बोलतोय आणि मी बाहेर बघतेय. तिला सांगितलं ते काका फोनवर बोलताहेत. त्यावर पुढची दहा मिनीटं 'ड्राइव्ह करताना फोनवर बोलु नये' या विषयावर मलाच ऐकवलं. काश त्या ड्रायव्हरला हिचे बोलणे समजले असते!

:)))))

maza mulaga adich varcshacha astana tyane ekda tyachya daddy la vicharle ki tumhi mamache kon aahat tar daddy ni sangitale ki tuzya mammala vichr tevha to mazyakade aala aani tyane mala vicharle aani mi utter dile ki te maze husbund aahe.
tyananter khari gammat suru zali te zevha office madhun yayache tevha ha suru ki mamma tuze husbund aale. aani kahar mhanaje tyana haak sudhdha ashich marayacha'' o mammache husbund" aani tehi sarvansamor...

maf kara marathi type karayala jamale nahi .pan ha kissa dyayachi ichcha hoti.

maza mulaga adich varcshacha astana tyane ekda tyachya daddy la vicharle ki tumhi mamache kon aahat tar daddy ni sangitale ki tuzya mammala vichr tevha to mazyakade aala aani tyane mala vicharle aani mi utter dile ki te maze husbund aahe.
tyananter khari gammat suru zali te zevha office madhun yayache tevha ha suru ki mamma tuze husbund aale. aani kahar mhanaje tyana haak sudhdha ashich marayacha'' o mammache husbund" aani tehi sarvansamor...

maf kara marathi type karayala jamale nahi .pan ha kissa dyayachi ichcha hoti.

ajun ek kissa mazya putani cha aahe. ti char varchaci asatana cha. ekda sarvjan jevet astatna maze mothe dir mhanje tiche pappa mhanale ki mala tar diwalit phatake phodayala ajibat awdat nahit far dhwaniprdushan hote sagalyana tras hoto tar hi lagech sagalyansamor mhanali aani diwas bhar phatake phodat basta aamachasamor tyache kay ?????

pappancha ghas tondatch..... aani sarvanchi hasun husun vat lagli....

sarvana joke samajala asel ashi asha aahe....

माझ्या जावेकडे राहायला गेलो असतानाचा किस्सा. त्यांचे घर एकदम शिस्तप्रिय. सगळं वेळ्च्या वेळी असतं.
आम्हि गेलो असताना जाऊ माझ्या मुलीला म्हणाली "जा गं आंघोळ करून घे" आमचं कन्यारत्न तितक्याच तत्परतेने म्हणालं "कालच केलीये मी आंघोळ" Uhoh
जावेचा चेहेरा माझ्याकडे बघुन ही काय मुलीला ३-४ दिवसांनी आंघोळ घालते काय ? असा झाला होता. Happy

कालच रात्री जेवण करुन एका रेस्टॉरेन्ट मधुन बाहेर पडुन २ एक मिनीटाच्या अंतरावर असलेल्या गाडीकडे थन्डी असल्यामुळे आणि चालायला तयार नसल्यामुळे मैत्रीनीने तिच्या ४ वर्श्या च्या मुलीला कडेवर घेतले आणि जवळ जवळ पळतच आम्ही गाडी गाठली. पटकन मुलीला गाडीत टाकुन वैतागुन ती म्हणाली- आई गं हात गेलेत माझे. त्यावर मुलगी म्हण्ते - शो मी. आणि हात बघुन - युअर हॅन्डस आर देअर. Happy

ह्या वरुन मला अजुन एक किस्सा आठवला. एकदा माझ्या मामीला बर नव्हतं आणि काहीतरी लागल होत आणि ते खुप दुखत होतं. म्हणुन तिच सारखं आई गं मेले मी ... मरते मी आता .. मेले असं चाललं होत. ते बर्याच वेळ ऐकल्यावर तिचा ३ वर्षांचा मुलगा म्हणतो पट्कन मरुन घे.

'पटकन मरुन घे' >>>:खोखो:

काल नातवाशी बोलायचं म्हणून आजोबांनी फोन केला. आपण 'हॅलो' म्हटल्यावर पलीकडून डायरेक्ट 'कुमार * * * आहेत का ?' अशी नाव-मधले नाव-आडनाव घेऊन विचारणा करण्याची आजोबांची स्टाईल आहे. बाबानेही त्याच शैलीत लेकाला 'तुझ्यासाठी श्री. * * * ह्यांचा फोन आहे.' असे मजेत सांगितले. असे पूर्ण नाव ऐकून लेक गोंधळला आणि पटकन मोठ्याने म्हणाला, "ते ? पण ते तर देवाघरी गेले ना ?" Lol

धम्माल आहेत सगळे :d

शनिवारी चिरंजीवाला आणि त्याच्या मित्राला सोबत घेऊन फेरफटका मारत असताना परळच्या मॅटर्निटी वाडिया हॉस्पिटल शेजारुन जाणे झाले. तेव्हा चिरंजीवांनी आपल्या ज्यु. मित्राला एक मोलाची माहिती दिली. या हॉस्पिटलात पोटातले बाळ काढून देतात.

Pages